Realme X नंतर कंपनी घेऊन येणार आहे सर्वात ताकदवान फोन, फ्लॅगशिप प्रोसेसर असेल यात

अमेरिकन कंपनी क्वालकॉमने आपल्या नवीन मिड-साइकिल फ्लॅगशिप प्रोसेसर स्नॅपड्रॅगॉन 855 चिपसेटची घोषणा केली आहे, ज्या नंतर चीनी स्मार्टफोन निर्माता कंपनी Realme ने स्नॅपड्रॅगॉन 855 प्लस पवार्ड स्मार्टफोनच्या लॉन्च बद्दल टीजर जारी केला आहे. कोणत्या फोन सोबत हा प्रोसेसर सादर केला जाईल याचा उल्लेख कंपनीने अजूनतरी केला नाही.

Realme ने चीनच्या माइक्रोब्लॉगिंग साइट वीबो वर पोस्ट केली, ज्यात Hello स्नॅपड्रॅगॉन 855+ लिहिण्यात आले आहे. या पोस्ट सह प्रोससेरचा फोटो पण आहे. यावरून हिंट मिळाली आहे कि कंपनी येत्या काळात स्नॅपड्रॅगॉन 855+ प्रोसेसर असलेला फोन सादर करू शकते.

हे देखील वाचा: 12जीबी रॅम असलेला ASUS फोन वेबसाइट वर लिस्ट, 23 जुलैला होईल लॉन्च

नवीन स्नॅपड्रॅगॉन 855 प्लस बद्दल बोलायचे तर यात पावरफुल सीपीयू आणि चांगल्या जीपीयू चा वापर केला गेला आहे. तसेच रियलमी व्यतिरिक्त Black Shark, nubia Red Magic, Vivo NEX आणि Vivo iQOO कंपन्या पण आपले स्मार्टफोन या प्रोसेसर सह लॉन्च करू शकते.

काही दिवसांपूर्वी रियलमीचे सीईओ माधव सेठ यांनी एक ट्विट करून याची माहिती दिली होती कि कंपनी लवकरच 5G हँडसेट मार्केट मध्ये सादर करू शकते. तसेच हि टेक्नोलॉजी भारतात सादर करण्यासाठी पण माधव यांनी आपल्या ट्विट मध्ये उल्लेख केला होता.

आगामी 5G स्मार्टफोन बद्दल सध्या तरी कोणतीही माहिती समोर आली नाही आशा आहे कि स्मार्टफोन क्वॉलकॉमच्या फ्लॅगशिप प्रोसेसर स्नॅपड्रॅगॉन 855 किंवा स्नॅपड्रॅगॉन 855 प्लस सह येईल. स्नॅपड्रॅगॉन 855 किंवा 855+ असल्यामुळे या फोन मध्ये फ्लॅगशिप फीचर्स दिले जातील.

हे देखील वाचा: 31 जुलैला लॉन्च होईल 8जीबी रॅम आणि 48-एमपी ट्रिपल रियर कॅमेरा असलेला Vivo Z5

विशेष म्हणजे कंपनीने अलीकडेच आपला Realme X आणि Realme 3i भारतात लॉन्च केले होते. Realme 3i एक बजेट कॅटगरीचा फोन आहे, ज्याची सुरवातीची किंमत 7,999 रुपये आहे. तर Realme X को कंपनी ने 16,999 रुपयांमध्ये सादर केला होता. डिवाइस 23 जुलै पासून प्लिपकार्ट वर सेल साठी येईल.

रियलमी एक्स वीडियो

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here