BSNL ने या तीन प्लान मध्ये केले बदल, मिळेल 25 पट जास्त डेटा

भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) आपल्या ग्राहकांना खुश करण्यासाठी अनेक दिवसांपासून प्रयत्न करत आहेत. याच प्रयत्नात BSNL ने यावेळी आपले जुने प्लान रिवाइज केले आहेत. BSNL ने आता आपल्या प्रीपेड रिचार्जच्या लिस्ट मध्ये तीन स्पेशल टॅरिफ वाउचर्स (एसटीवी) को रिवाइज किया आहे. कंपनी ने 35 रुपए, 53 रुपये आणि 395 रुपये के स्पेशल टॅरिफ वाउचर मध्ये बदल केले आहेत. चला जाणून घेऊया या प्लान मध्ये बदलांनंतर तुम्हाला काय फायदा मिलेळ.

35 रुपयांचा प्लान
35 रुपयांच्या प्लान बद्दल बोलायचे तर या प्लान मध्ये आधी यूजर्सना 200एमबी डेटा मिळत होता. आता बदलानंतर यूजर्सना 5जीबी डेटा मिळेल. म्हणजे यूजर्सना आधीपेक्षा 25 पट जास्त डेटा मिळत आहे. पण या प्लानच्या वॅलिडिटी मध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. आधीप्रमाणे या प्लानची वॅलिडिटी 5 दिवस आहे.

53 रुपयांचा प्लान
तसेच BSNL ने 53 रुपयांच्या स्पेशल टॅरिफ वाउचर मध्ये पण बदल केले आहेत. या प्लान मध्ये आधी यूजर्सना 250एमबी डेटा मिळत होता आणि याची वैधता 21 दिवस होती. पण बदलानंतर या प्लान मध्ये 8जीबी डेटा आणि वॅलिडिटी 7 दिवस कमी करून 14 दिवस झाली आहे.

हे देखील वाचा: TikTok वरचा बॅन हटला ! पुन्हा करता येईल फोन मध्ये डाउनलोड साठी उपलब्ध

395 रुपयांचा प्लान
BSNL च्या 395 रुपयांच्या स्पेशल टॅरिफ वाउचर प्लान बद्दल बोलायचे तर यात ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंग आणि फ्री नॅशनल रोमिंग (मुंबई आणि दिल्ली सोडून) मिळेल. तसेच यूजर्सना प्रतिदिन 2जीबी एफयूपी डेटा मिळेल. या प्लानची वॅलिडिटी 71 दिवस आहे. आधी या प्लान मध्ये यूजर्सना अनेक प्रकारचे बेनेफिट्स मिळत नव्हते. या प्लान मध्ये आधी यूजर्सना नेट वॉइस कॉल्स वर 3,000 मिनिटे आणि ऑफ-नेट वॉइस कॉल्स वर 1,800 मिनिटे ऑफर केले जात होते.

हे देखील वाचा: Vivo Y17 स्मार्टफोन ट्रिपल रियर कॅमेरा आणि 5,000एमएएच बॅटरी सह झाला लॉन्च, बघा किंमत आणि फीचर्स

अलीकडेच प्रीपेड यूजर्सना भेट देत BSNL ने 666 रुपयांच्या प्लान मध्ये बदल केले आहेत. या बदलांमुळे यूजर्सना प्लान मध्ये वॅलिडिटी वाढवून मिळेल. आधी यूजर्सना 122 दिवसांची वैधता मिळत होती. तर आता या प्लान मध्ये यूजर्सना 134 दिवसांची वॅलिडिटी मिळेल. तसेच कंपनी ने आपले दोन प्लान बंद केले आहेत. हे दोन्ही प्लान दीर्घ वैधते सह येतात. कंपनीने 999 रुपये आणि 2,099 रुपयांचे प्लान बंद केले आहेत. दोन्ही प्लानची वॅलिडिटी एकावर्षाची होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here