Realme 9i - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 10 Mar 2023 05:28:42 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Realme 9i च्या एमआरपीवर 5000 रुपयांची ऑफर; फ्लिपकार्टवर सुरु आहे विक्री https://www.91mobiles.com/marathi/realme-9i-smartphone-with-5000-rs-discount-flipkart-deal/ https://www.91mobiles.com/marathi/realme-9i-smartphone-with-5000-rs-discount-flipkart-deal/#respond Thu, 27 Oct 2022 12:37:47 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=14388 बजेट फ्रेंडली स्मार्टफोन सादर करणाऱ्या चिनी कंपनी रियलमीनं यंदा जानेवारीमध्ये एक शानदार डिवाइस बाजारात सादर केला होता. 5000mAh ची बॅटरी, 50MP ट्रिपल रियर कॅमेरा, सेल्फीसाठी 16MP फ्रंट कॅमेरा, 33W फास्ट चार्जिंग, 6.6 इंचाचा मोठा डिस्प्ले, 6GB पर्यंत रॅम आणि 128GB पर्यंतच्या स्टोरेजसह Realme 9i भारतीयांच्या भेटीला आला होता. याची विक्री ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Flipkart च्या माध्यमातून […]

The post Realme 9i च्या एमआरपीवर 5000 रुपयांची ऑफर; फ्लिपकार्टवर सुरु आहे विक्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
बजेट फ्रेंडली स्मार्टफोन सादर करणाऱ्या चिनी कंपनी रियलमीनं यंदा जानेवारीमध्ये एक शानदार डिवाइस बाजारात सादर केला होता. 5000mAh ची बॅटरी, 50MP ट्रिपल रियर कॅमेरा, सेल्फीसाठी 16MP फ्रंट कॅमेरा, 33W फास्ट चार्जिंग, 6.6 इंचाचा मोठा डिस्प्ले, 6GB पर्यंत रॅम आणि 128GB पर्यंतच्या स्टोरेजसह Realme 9i भारतीयांच्या भेटीला आला होता. याची विक्री ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Flipkart च्या माध्यमातून केली जात आहे. विशेष म्हणजे या हँडसेटवर आता 5,000 रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे. डिस्काउंटसह फोनवर बँक ऑफर, एक्सचेंज ऑफर आणि नो कॉस्ट ईएमआय सारखे ऑप्शन देखील उपलब्ध आहेत. त्यामुळे हा स्मार्टफोन फक्त 649 रुपयांमध्ये देखील विकत घेता येईल. चला जाणून घेऊया Realme 9i ची किंमत, ऑफर्स आणि फीचर्सची माहिती.

Realme 9i किंमत आणि ऑफर्स

Realme 9i स्मार्टफोनची फ्लिपकार्टवर एमआरपी 16,999 रुपये आहे. ज्यावर 29 टक्के म्हणजे 5,000 रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे. या ऑफर नंतर तुम्ही हा स्मार्टफोन फक्त 11,999 रुपयांमध्ये विकत घेऊ शकता. तसेच Realme 9i फोन फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्डनं विकत घेतल्यास 5 टक्क्यांचा कॅशबॅक मिळेल. ईएमआय ऑप्शन पाहता नो कॉस्ट ईएमआयच्या माध्यमातून तुम्ही हा फोन फक्त 3 आणि 6 महिन्यांच्या सुलभ हप्त्यांवर विकत घेऊ शकता. तसेच एक्सचेंज ऑफर अंतर्गत तुम्ही तुमचा जुना स्मार्टफोन देऊन Realme 9i फोनवर 11,350 रुपयांपर्यंतची सूट मिळवू शकता. म्हणजे जर तुमच्या जुन्या डिवाइसवर तुम्हाला चांगली किंमत मिळाली तर हा डिवाइस तुम्हाला फक्त 649 रुपयांमध्ये मिळेल. हे देखील वाचा: रेडमी-रियलमीचं साम्राज्य धोक्यात! Samsung घेऊन येत आहे सर्वात स्वस्त 5जी फोन, इतकी असेल किंमत

Realme 9i चे स्पेसिफिकेशन्स

Realme 9i स्मार्टफोनमध्ये 6.6-इंचाचा फुल एचडी+ आयपीएस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. यात सेल्फी कॅमेऱ्यासाठी पंच होल कटआउट मिळते. फोनमध्ये क्वॉलकॉमचा ऑक्टाकोर 2.4GHz 6nm Snapdragon 680 प्रोसेसर देण्यात आला आहे. सोबतीला 6GB पर्यंत रॅम आणि 128GB पर्यंतची स्टोरेज आहे. व्हर्च्युअल रॅम फिचरच्या मदतीनं 5GB अतिरिक्त रॅम मिळवता येतो. हा फोन अँड्रॉइड 11 बेस्ड रियलमी युआय 2.0 वर चालतो. हे देखील वाचा: पुन्हा ओटीटीवर दिसणार अभिषेक बच्चनची जादू; ‘Breathe: Into the Shadows’ च्या दुसऱ्या सिझनची रिलीज डेट ठरली, पाहा ट्रेलर

रियलमीच्या या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात 50MP चा प्रायमरी कॅमेरा, 2MP B&W लेन्स आणि 2MP मॅक्रो कॅमेरा आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये 16MP चा फ्रंट कॅमेरा मिळतो. या फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी 33W फास्ट चार्जिंगसह देण्यात आली आहे. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये ड्युअल सिम कार्ड, 4G VoLTE, Wi-Fi 802.11 b/g/n/ac, GPS, Bluetooth v5.0, a 3.5mm ऑडियो जॅक आणि USB Type-C पोर्ट देण्यात आला आहे.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post Realme 9i च्या एमआरपीवर 5000 रुपयांची ऑफर; फ्लिपकार्टवर सुरु आहे विक्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-9i-smartphone-with-5000-rs-discount-flipkart-deal/feed/ 0
15 हजारांत 11GB रॅम, 50MP कॅमेरा आणि 5G ची ताकद; Realme 9i ची स्पेक्स आणि किंमत लीक https://www.91mobiles.com/marathi/11gb-ram-50mp-camera-and-5g-realme-9i-can-be-launched-for-just-rs-15000/ https://www.91mobiles.com/marathi/11gb-ram-50mp-camera-and-5g-realme-9i-can-be-launched-for-just-rs-15000/#respond Wed, 17 Aug 2022 03:04:56 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=12271 Realme 9i 5g स्मार्टफोन भारतात मीडियाटेकच्या Dimensity 810 प्रोसेसरसह लाँच होईल.

The post 15 हजारांत 11GB रॅम, 50MP कॅमेरा आणि 5G ची ताकद; Realme 9i ची स्पेक्स आणि किंमत लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Realme 9i 5G स्मार्टफोन भारतात 18 ऑगस्टला लाँच होऊ शकतो. रियलमीच्या आगामी स्मार्टफोनचं लँडिंग पेज काही दिवसांपूर्वीच रियलमी इंडियाच्या वेबसाइटवर लाइव्ह झालं आहे. रियलमी फोनचं लँडिंग पेज लाइव्ह झाल्यामुळे या फोनच्या रियर पॅनलच्या डिजाइन आणि प्रोसेसरची माहिती मिळाली आहे. रियलमीचा हा फोन मीडियाटेकच्या डिमेन्सिटी 810 प्रोसेसरसह लाँच केला जाईल. फोन लाँच होण्याच्या आधीच याच्या स्पेसिफिकेशन्स, प्राइस आणि रेंडर्सबद्दल माहिती समोर आली आहे. पुढे आम्ही तुम्हाला Realme 9i 5G स्मार्टफोनबद्दल सविस्तर माहिती देत आहोत.

Realme 9i 5G ची डिजाइन

Realme 9i 5G स्मार्टफोनची डिजाइन पाहता या फोनच्या फ्रंट डिस्प्लेमध्ये टियरड्रॉप नॉच मिळेल. रियलमीच्या या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा दिला जाईल. फोनच्या पावर बटन मध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे. जो उजव्याबाजूला असेल. लीक इमेजनुसार रियलमीचा हा फोन ब्लॅक आणि गोल्ड कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध होईल. हे देखील वाचा: Realme घेऊन येत आहे 10,000 आणि 15,000 रुपयांमध्ये 5G फोन, Realme 10 देखील होणार लाँच

Realme 9i 5G चे स्पेसिफिकेशन्स

Realme 9i 5G स्मार्टफोनमध्ये 6.6-इंचाचा IPS LCD पॅनल देण्यात आला आहे, ज्याचे रिजोल्यूशन Full HD+, रिफ्रेश रेट 90Hz, टच सॅम्पलिंग रेट 180Hz आहे. रियलमीचा हा स्मार्टफोन Android 12 OS आधारित Realme UI 3.0 कस्टम युजर इंटरफेसवर चालेल. फोनमध्ये मीडियाटेकच्या Dimensity 810 प्रोसेसरची ताकद मिळेल. सोबतीला फोनमध्ये 11GB रॅम सपोर्ट दिला जाऊ शकतो. ज्यात 6GB पर्यंतच्या रॅम आणि 5GB पर्यंतचा व्हर्च्युअल रॅमचा समावेश असेल. कंपनी यात 128GB बिल्ट इन स्टोरेज देईल. या फोनची स्टोरेज मायक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून वाढवता येईल.

Realme 9i 5G स्मार्टफोन 8 मेगापिक्सलच्या सेल्फी कॅमेऱ्यासह सादर केला जाऊ शकतो. तर फोनच्या मागे ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. ज्यात एलईडी फ्लॅशसह 50MP चा प्रायमरी कॅमेरा दिला जाईल. तर जोडीला 2MP ची पोर्टेट लेन्स आणि 2MP चा मॅक्रो कॅमेरा मिळेल. हे देखील वाचा: Realme ची कमाल! लाँच केला सर्वात स्वस्त 5G टॅबलेट आणि कॉलिंग असलेला स्मार्टवॉच, जाणून घ्या किंमत

Realme 9i 5G ची किंमत

Realme 9i 5G स्मार्टफोन 4GB RAM + 64GB स्टोरेज आणि 6GB RAM + 128GB स्टोरेज अशा दोन व्हेरिएंटसह सादर केला जाऊ शकतो. कंपनीनं या फोनच्या भारतीय किंमतीची कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. परंतु रियलमीचा हा फोन भारतात 15000 रुपयांपर्यंतच्या किंमतीत सादर केला जाईल, अशी माहिती मीडिया रिपोर्ट्समधून समोर आली आहे.

The post 15 हजारांत 11GB रॅम, 50MP कॅमेरा आणि 5G ची ताकद; Realme 9i ची स्पेक्स आणि किंमत लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/11gb-ram-50mp-camera-and-5g-realme-9i-can-be-launched-for-just-rs-15000/feed/ 0
Realme च्या शानदार स्मार्टफोन मोठी सूट; बजेटमध्ये 6GB रॅम आणि 33W फास्ट चार्जिंग मिळवण्याची संधी https://www.91mobiles.com/marathi/6gb-ram-phone-realme-9i-discount-and-offers-detail/ https://www.91mobiles.com/marathi/6gb-ram-phone-realme-9i-discount-and-offers-detail/#respond Thu, 28 Jul 2022 10:24:09 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=11797 Realme 9i स्मार्टफोनमध्ये 5000 mAh ची बॅटरी, 50MP ट्रिपल रियर कॅमेरा आणि सेल्फीसाठी 16MP फ्रंट कॅमेरा मिळतो.

The post Realme च्या शानदार स्मार्टफोन मोठी सूट; बजेटमध्ये 6GB रॅम आणि 33W फास्ट चार्जिंग मिळवण्याची संधी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म Flipkart वर Realme चे स्मार्टफोन जबरदस्त डिस्काउंटसह विकले जात आहेत. जर तुम्ही देखील कमी बजेटमध्ये एक दमदार स्मार्टफोन शोधत असाल तर Realme 9i स्मार्टफोन तुमच्यासाठी एक चांगलं ऑप्शन ठरू शकतो. रियलमीच्या या फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी, 50MP ट्रिपल रियर कॅमेरा, सेल्फीसाठी 16MP फ्रंट कॅमेरा, 33W फास्ट चार्जिंग, 6.6 इंचाचा मोठा डिस्प्ले, 6GB पर्यंत रॅम आणि 128GB पर्यंतची स्टोरेज मिळते. Realme 9i स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 680 प्रोसेसर देण्यात आला आहे. इथे आम्ही तुम्हाला रियलमीच्या या स्मार्टफोनवर मिळणाऱ्या डील, स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्सची माहिती दिली आहे.

Realme 9i वरील डील्स आणि ऑफर्स

Realme 9i स्मार्टफोन फ्लिपकार्टवर 12,499 रुपयांमध्ये लिस्ट करण्यात आला आहे. रियलमीचा हा फोन SBI च्या क्रेडिट कार्डद्वारे विकत घेतल्यास 1500 रुपये पर्यंतचा डिस्काउंट मिळत आहे. परंतु 1500 रुपयांचा डिस्काउंटसाठी तुम्हाला हा फोन EMI ट्रांजेक्शनवर विकत घ्यावा लागेल. फुल पेमेंट केल्यास फक्त 750 रुपयांची सूट मिळेल. तसेच डेबिट किंवा क्रेडिट कार्डनं पेमेंट केल्यास फ्लिपकार्ट 250 रुपयांचा अतिरिक्त डिस्काउंट देखील देत आहे. अशाप्रकारे रियलमीचा हा शानदार फोन फक्त 10,749 रुपयांमध्ये तुमचा होईल.

Realme 9i ची किंमत

Realme 9i स्मार्टफोनचे तीन व्हेरिएंट भारतीयांच्या भेटीला आले आहेत. या फोनचा बेस व्हेरिएंट 4GB रॅमसह 64GB स्टोरेजला सपोर्ट करतो ज्याची किंमत 12,499 रुपये ठेवण्यात आली आहे. तर 4GB रॅम व 128GB मेमरी व्हेरिएंट 13,499 रुपये आणि 6GB रॅम व 128GB मेमरी व्हेरिएंट 14,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. वरील ऑफर या स्मार्टफोनच्या तिन्ही व्हेरिएंटवर उपलब्ध आहे.

Realme 9i स्पेसिफिकेशन्स

Realme 9i स्मार्टफोनमध्ये 6.6-इंचाचा फुल एचडी+ आयपीएस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. यात सेल्फी कॅमेऱ्यासाठी पंच होल कटआउट मिळते. फोनमध्ये क्वॉलकॉमचा ऑक्टाकोर 2.4GHz 6nm Snapdragon 680 प्रोसेसर देण्यात आला आहे. सोबतीला 6GB पर्यंत रॅम आणि 128GB पर्यंतची स्टोरेज आहे. व्हर्च्युअल रॅम फिचरच्या मदतीनं 5GB अतिरिक्त रॅम मिळवता येतो. हा फोन अँड्रॉइड 11 बेस्ड रियलमी युआय 2.0 वर चालतो.

रियलमीच्या या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात 50MP चा प्रायमरी कॅमेरा, 2MP B&W लेन्स आणि 2MP मॅक्रो कॅमेरा आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये 16MP चा फ्रंट कॅमेरा मिळतो. या फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी 33W फास्ट चार्जिंगसह देण्यात आली आहे. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये ड्युअल सिम कार्ड, 4G VoLTE, Wi-Fi 802.11 b/g/n/ac, GPS, Bluetooth v5.0, a 3.5mm ऑडियो जॅक आणि USB Type-C पोर्ट देण्यात आला आहे.

The post Realme च्या शानदार स्मार्टफोन मोठी सूट; बजेटमध्ये 6GB रॅम आणि 33W फास्ट चार्जिंग मिळवण्याची संधी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/6gb-ram-phone-realme-9i-discount-and-offers-detail/feed/ 0