Realme ची कमाल! लाँच केला सर्वात स्वस्त 5G टॅबलेट आणि कॉलिंग असलेला स्मार्टवॉच, जाणून घ्या किंमत

Realme नं भारतात आपल्या मेगा लाँच इव्हेंटमध्ये AIoT पोर्टफोलियो वाढवत अनेक प्रोडक्ट लाँच केले आहेत. या लाँच इव्हेंटमध्ये कंपनीनं Realme Watch 3, Realme Buds Air 3 Neo, Realme Buds Wireless 2S, आणि realme PAD X सह एक मॉनीटर देखील लाँच केला आहे. रियलमीनं भारतात मॉनीटर लाँच करून आपल्या टेकलाईफ इकोसिस्टम पोर्टफोलियोचा विस्तार केला आहे. चला जाणून घेऊया Realme च्या नवीन प्रोडक्टची वैशिष्ट्ये आणि किंमत जाणून घेऊया.

Realme Pad X

रियलमीचा लेटेस्ट Realme Pad X टॅबलेट 5G LTE आणि Wi-Fi Only व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. या टॅबलेटमध्ये 11-इंचाचा 2K LCD डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचं रिजोल्यूशन Full HD+ आणि रिफ्रेश रेट 60Hz आहे. प्रोसेसिंगसाठी Snapdragon 695 5G चिपसेट मिळतो. पावर बॅकअपसाठी 8,340mAh ची बॅटरी आणि 33W फास्ट चार्जिंग मिळते. फोटोग्राफीसाठी 13MP चा रियर आणि 8MP चा फ्रंट कॅमेरा आहे. टॅबलेटचे तीन व्हेरिएंट आले आहेत. या टॅबचा 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज असलेला Wi-Fi ओन्ली मॉडेल 19999 रुपये, LTE व्हेरिएंट 25999 रुपये आणि 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेला व्हेरिएंट 27999 रुपयांमध्ये सादर करण्यात आला आहे.

Realme Full HD LED मॉनीटर

Realme चा पहिला मॉनीटर 23.8-इंचाच्या डिस्प्लेसह सादर करण्यात आला आहे, ज्याचं रिजोल्यूशन Full HD 1920 x 1080 पिक्सल आहे. हा एक VA पॅनल आहे जो LED backlit बॅकलाईट सपोर्टसह सादर करण्यात आला आहे. ज्याचा रिफ्रेश रेट 75Hz, 178° व्यूविंग अँगल, sRGB कलर गमुट, 8ms रिस्पॉन्स टाइम, 250निट्स ब्राईटनेस आणि 16:9 अस्पेक्ट रेश्यो आहे. Realme च्या मॉनीटरमध्ये HDMI 1.4, USB Type-C, आणि VGA ऑप्शन देण्यात आला आहे. Realme Full HD LED Monitor ची किंमत 12,999 रुपये आहे, जो 29 जुलैला पहिल्या सेलमध्ये 10,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

Realme Buds Air 3 Neo

Realme Buds Air 3 Neo कंपनीचा लेटेस्ट इन-एयर इयरबड्स आहे जो स्टेम डिजाइनसह येतो. या इयरबड्स मध्ये 10mm डायनॅमिक बास ड्रायव्हर सेटअप देण्यात आला आहे जो Dolby Atmos ला सपोर्ट करतो. यात AI इनवायरमेंटल नॉइज कॅन्सलेशन फीचर देण्यात आलं आहे जे 15dB पर्यंतचं नॉइज कमी करतं. सिंगल चार्जमध्ये हे बड्स चार्जिंग केससह 30 तास आणि फक्त बड्स 7 तासांचा बॅकअप देतात. Realme Buds Air 3 Neo ची किंमत 1,999 रुपये ठेवण्यात आली आहे, जे 27 जुलैला पहिल्या सेलमध्ये 1,699 रुपयांमध्ये विकत घेता येतील.

Realme Buds Wireless 2S

Realme Buds Wireless 2S कंपनीचे अफोर्डेबल वायरलेस इयरफोन हेडसेट आहेत, ज्यात 11.2mm डायनॅमिक ड्रायव्हर सेटअप देण्यात आला आहे. यात रियलमीनं AI ENC आणि चांगल्या ऑडियोसाठी Dirac सपोर्ट दिला आहे. सिंगल चार्जमध्ये हे 24 तासांचा बॅकअप देतात. तर 20 मिनिटांच्या चार्जमध्ये 7 तासांचा बॅकअप मिळतो. Realme Buds Wireless 2S भारतात 1,499 रुपयांमध्ये सादर करण्यात आले आहेत. परंतु 26 जुलैच्या पहिल्या सेलमध्ये यांची विक्री 1,299 रुपयांमध्ये केली जाईल.

Realme Watch 3

Realme Watch 3 स्मार्टवॉच आपल्या सेग्मेंटमध्ये सर्वात मोठ्या डिस्प्ले आणि ब्लूटूथ कॉलिंग फीचरसह सादर करण्यात आलं आहे. या वॉचमध्ये 1.8 इंचाचा हॉरिजन कर्व डिस्प्ले आणि 340mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 7 दिवसांपर्यंतचा बॅकअप आणि 110+ फिटनेस मोडला सपोर्ट करते. या वॉचमध्ये हार्टरेट आणि SpO2 मॉनीटर फिचर मिळतात. Realme Watch 3 भारतात 3499 रुपयांमध्ये सादर करण्यात आलं आहे. 2 ऑगस्टला आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या सेलमध्ये याची किंमत 2999 रुपये असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here