ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म Flipkart वर Realme चे स्मार्टफोन जबरदस्त डिस्काउंटसह विकले जात आहेत. जर तुम्ही देखील कमी बजेटमध्ये एक दमदार स्मार्टफोन शोधत असाल तर Realme 9i स्मार्टफोन तुमच्यासाठी एक चांगलं ऑप्शन ठरू शकतो. रियलमीच्या या फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी, 50MP ट्रिपल रियर कॅमेरा, सेल्फीसाठी 16MP फ्रंट कॅमेरा, 33W फास्ट चार्जिंग, 6.6 इंचाचा मोठा डिस्प्ले, 6GB पर्यंत रॅम आणि 128GB पर्यंतची स्टोरेज मिळते. Realme 9i स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 680 प्रोसेसर देण्यात आला आहे. इथे आम्ही तुम्हाला रियलमीच्या या स्मार्टफोनवर मिळणाऱ्या डील, स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्सची माहिती दिली आहे.
Realme 9i वरील डील्स आणि ऑफर्स
Realme 9i स्मार्टफोन फ्लिपकार्टवर 12,499 रुपयांमध्ये लिस्ट करण्यात आला आहे. रियलमीचा हा फोन SBI च्या क्रेडिट कार्डद्वारे विकत घेतल्यास 1500 रुपये पर्यंतचा डिस्काउंट मिळत आहे. परंतु 1500 रुपयांचा डिस्काउंटसाठी तुम्हाला हा फोन EMI ट्रांजेक्शनवर विकत घ्यावा लागेल. फुल पेमेंट केल्यास फक्त 750 रुपयांची सूट मिळेल. तसेच डेबिट किंवा क्रेडिट कार्डनं पेमेंट केल्यास फ्लिपकार्ट 250 रुपयांचा अतिरिक्त डिस्काउंट देखील देत आहे. अशाप्रकारे रियलमीचा हा शानदार फोन फक्त 10,749 रुपयांमध्ये तुमचा होईल.
Realme 9i ची किंमत
Realme 9i स्मार्टफोनचे तीन व्हेरिएंट भारतीयांच्या भेटीला आले आहेत. या फोनचा बेस व्हेरिएंट 4GB रॅमसह 64GB स्टोरेजला सपोर्ट करतो ज्याची किंमत 12,499 रुपये ठेवण्यात आली आहे. तर 4GB रॅम व 128GB मेमरी व्हेरिएंट 13,499 रुपये आणि 6GB रॅम व 128GB मेमरी व्हेरिएंट 14,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. वरील ऑफर या स्मार्टफोनच्या तिन्ही व्हेरिएंटवर उपलब्ध आहे.
Realme 9i स्पेसिफिकेशन्स
Realme 9i स्मार्टफोनमध्ये 6.6-इंचाचा फुल एचडी+ आयपीएस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. यात सेल्फी कॅमेऱ्यासाठी पंच होल कटआउट मिळते. फोनमध्ये क्वॉलकॉमचा ऑक्टाकोर 2.4GHz 6nm Snapdragon 680 प्रोसेसर देण्यात आला आहे. सोबतीला 6GB पर्यंत रॅम आणि 128GB पर्यंतची स्टोरेज आहे. व्हर्च्युअल रॅम फिचरच्या मदतीनं 5GB अतिरिक्त रॅम मिळवता येतो. हा फोन अँड्रॉइड 11 बेस्ड रियलमी युआय 2.0 वर चालतो.
रियलमीच्या या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात 50MP चा प्रायमरी कॅमेरा, 2MP B&W लेन्स आणि 2MP मॅक्रो कॅमेरा आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये 16MP चा फ्रंट कॅमेरा मिळतो. या फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी 33W फास्ट चार्जिंगसह देण्यात आली आहे. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये ड्युअल सिम कार्ड, 4G VoLTE, Wi-Fi 802.11 b/g/n/ac, GPS, Bluetooth v5.0, a 3.5mm ऑडियो जॅक आणि USB Type-C पोर्ट देण्यात आला आहे.