Redmi k2 Pro - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 23 Feb 2021 15:19:14 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 गीकबेंचवर लिस्ट झाला Redmi K40, पावरफुल प्रोसेसर आणि मोठ्या बॅटरीसह 25 फेब्रुवारीला होईल लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/redmi-k40-geekbench-launch-25-february-in-china/ https://www.91mobiles.com/marathi/redmi-k40-geekbench-launch-25-february-in-china/#respond Tue, 23 Feb 2021 15:19:14 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10142 गीकबेंचच्या सोर्सकोड नुसार फोन मधील क्वालकॉम चिपचा अधिकतम स्पीड 3.19GHz पर्यंत असू शकतो. यावरून समजले आहे कि हा फोन स्नॅपड्रॅगॉन 870 प्रोसेसरसह येईल.

The post गीकबेंचवर लिस्ट झाला Redmi K40, पावरफुल प्रोसेसर आणि मोठ्या बॅटरीसह 25 फेब्रुवारीला होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Redmi K40 सीरीज चीनमध्ये 25 फेब्रुवारीला लॉन्च केली जाणार आहे. या सीरीजमध्ये कंपनी रेडमी के40 आणि रेडमी के40 प्रो सादर करणार आहे. त्याचबरोबर असे पण समजले आहे कि हि अपकमिंग सीरीज छोट्याश्या पंच-होल कटआउट आणि ट्रिपल रियर कॅमेरा सिस्टमसह सादर केली जाईल. तसेच एका पोस्टर मध्ये स्पष्ट झाले आहे कि फोन (जो प्रो मॉडेल असेल) मध्ये Qualcomm Snapdragon 888 SoC दिला जाईल. आता बेंचमार्किंग साइट गीकबेंचवर Redmi K40 डिवाइस मॉडेल नंबर M2012K11AC सह स्पॉट केला गेला आहे, लॉन्चच्याआधी Redmi K40 च्या स्पेसिफिकेशन्सचा खुलासा केला गेला आहे. (redmi k40 geekbench launch 25 february in china)

गीकबेंचच्या सोर्सकोड नुसार फोन मधील क्वालकॉम चिपचा अधिकतम स्पीड 3.19GHz पर्यंत असू शकतो. यावरून समजले आहे कि हा फोन स्नॅपड्रॅगॉन 870 प्रोसेसरसह येईल. सिंगल-कोर टेस्टमध्ये या फोनला 1016 आणि मल्टी-कोर टेस्ट मध्ये 3332 स्कोर मिळाला आहे. तसेच Redmi K40 Pro मध्ये Qualcomm Snapdragon 870 SoC असेल हे आम्ही आधीच सांगितले आहे. Redmi K40 बद्दल बोलायचे तर यात 8GB रॅम आणि अँड्रॉइड 11 ऑपरेटिंग सिस्टम असेल.

हे देखील वाचा : आता बदलेल मोबाईल फोटोग्राफीची दुनिया, Samsung ने आणला ISOCELL GN2 50MP इमेज सेंसर

असू शकतात पावरफुल स्पेसिफिकेशन्स

आता समोर आलेल्या माहितीनुसार Redmi K40 मध्ये सॅमसंग AMOLED E4 डिस्प्लेचा वापर केला जाऊ शकतो जो सेंटर सेल्फी कॅमेरा कटआउटसह येईल. फोनची डिस्प्ले साइज 6.6-इंच असेल. इतकेच नव्हे तर फोनचा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट आणि फुल एचडी+ रिजोल्यूशनसह येईल. फोनला पावर देण्यासाठी यात 4,520mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी 33 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

दुसऱ्या रिपोर्ट्स मध्ये हा फोन Dimensity 1100/1200 किंवा अपकमिंग स्नॅपड्रॅगॉन 7 सीरीजच्या एखाद्या प्रोसेसरसह येईल असे बोलले जात आहे. K40 च्या प्रोसेसरबाबत अजूनही कोणतीही ठोस माहिती बाहेर आली नाही. कनेक्टिविटी फीचर्स म्हणून फोन मध्ये 5G, 4G LTE, वाय-फाय 6, ब्लूटूथ 5.2, GPS, NFC, आणि USB टाइप- C पोर्टचा समावेश असू शकतो.

हे देखील वाचा : लॉन्चच्याआधी समोर आले OnePlus 9 Pro आणि OnePlus 9E चे सर्व स्पेसिफिकेशन्स, लवकरच येत आहे हा पावरफुल फोन

तसेच असे स्पष्ट झाले आहे कि फोनच्या मागे आयताकृती ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप असेल. फोन मध्ये सुरक्षेसाठी एक साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर असू शकतो आणि सर्व मॉडेल 5जी कनेक्टिविटीसह येतील. दुर्दैवाने रेडमी K40 सीरीजबाबत आतापर्यंत आम्हाला इतकीच माहिती मिळाली आहे. लॉन्चसाठी दोन दिवस आहेत त्यामुळे फोनचे सर्व फीचर्स जाणून घेण्यासाठी आपल्याला जास्त वेळ वाट बघावी लागणार नाही.

The post गीकबेंचवर लिस्ट झाला Redmi K40, पावरफुल प्रोसेसर आणि मोठ्या बॅटरीसह 25 फेब्रुवारीला होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/redmi-k40-geekbench-launch-25-february-in-china/feed/ 0
Mi Super Sale मध्ये Redmi K20 Pro आणि Redmi Note 7 Pro सह अनेक स्मार्टफोन्स वर मिळत आहे धमाकेदार सूट https://www.91mobiles.com/marathi/mi-super-sale-1-8-january-2020-via-mi-com-discount-on-redmi-k20-redmi-k20-pro-redmi-note-7pro/ https://www.91mobiles.com/marathi/mi-super-sale-1-8-january-2020-via-mi-com-discount-on-redmi-k20-redmi-k20-pro-redmi-note-7pro/#respond Fri, 03 Jan 2020 11:27:38 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6183 Redmi K20 Pro चा 6 जीबी + 128 जीबी मॉडेल 24,999 रुपये आणि या डिवाइस के 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज वेरिएंट 27,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

The post Mi Super Sale मध्ये Redmi K20 Pro आणि Redmi Note 7 Pro सह अनेक स्मार्टफोन्स वर मिळत आहे धमाकेदार सूट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
नवीन वर्ष सुरु होताच रियलमी सोबतच शाओमीने पण आपल्या ग्राहकांसाठी सेलचे आयोजन केले आहे. Xiaomi च्या यावर्षीच्या Mi Super Sale ची सुरवात झाली आहे. Realme च्या एक दिवस आधी शाओमीच्या मी सुपर सेलची 1 जानेवारी पासून सुरवात झाली आहे जो 8 जानेवारी पर्यंत चालू राहील.

Mi Super सेल शाओमीच्या वेबसाइट वर सुरु झाला आहे. या सेल मध्ये कंपनी आपल्या अनेक शानदार स्मार्टफोन्स वर डिस्काउंट देत आहे, ज्यात Redmi Note 7 Pro, Redmi K20, Redmi K20 Pro आणि Poco F1 चा समावेश आहे.

डिस्काउंट व्यतिरिक्त हे फोन्ससह झिरो इंटरेस्ट ईएमआई ऑप्शन वर पण विकत घेता येतील. तसेच कंपनीच्या लो बजेट ग्राहकांसाठी Redmi 8A, Redmi Go, Redmi Y3 आणि Redmi 7A सारखे स्मार्टफोन स्वस्तात विकले जात आहेत.

सर्वात आधी बोलूया Xiaomi च्या रेडमी के20 बद्दल, ज्याच्या किंमतीत 2,000 रुपयांची सूट दिली जात आहे. या फोनचा 6 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज मॉडेल 19,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच डिवाइसचा 6 जीबी + 128 जीबी मॉडेल 22,999 रुपयांमध्ये विकला जात आहे.

दुसरीकडे Redmi K20 Pro चा 6 जीबी + 128 जीबी मॉडेल 24,999 रुपये आणि या डिवाइस के 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज वेरिएंट 27,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. या डिवाइसच्या किंमतीत 3 हजार रुपयांची सूट दिली जात आहे.

रेडमी के20 व्यतिरिक्त शाओमीच्या लोकप्रिय Poco F1 वर पण शानदार सूट दिली जात आहे. या डिवाइसचा 64 जीबी वेरिएंट 14,999 रुपये आणि 256 वेरिएंट 18,999 रुपयांमध्ये विकला जात आहे. या डिवाइसच्या किंमतीत 4,000 रुपयांची कपात करण्यात आली आहे.

कंपनीचा प्रसिद्ध Redmi Note 7 Pro चा 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज वेरिएंट 9,999 रुपयांमध्ये विकला जात आहे. तर रेडमी नोट 7 प्रो चा 6 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज मॉडेल 12,999 रुपये आणि 6 जीबी + 128 जीबी मॉडेल 14,999 रुपयांमध्ये विकला जात आहे.

रेडमी नोट 7एस चा 3 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज मॉडेल 8,999 रुपये, 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज मॉडेल 9,999 रुपयांमध्ये विकला जात आहे. तर रेडमी वाई3 ग्राहक 4,000 रुपयांच्या डिस्काउंट सह 7,999 रुपयांमध्ये विकत शकता.

शाओमी रेडमी के20 प्रो वीडियो

The post Mi Super Sale मध्ये Redmi K20 Pro आणि Redmi Note 7 Pro सह अनेक स्मार्टफोन्स वर मिळत आहे धमाकेदार सूट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/mi-super-sale-1-8-january-2020-via-mi-com-discount-on-redmi-k20-redmi-k20-pro-redmi-note-7pro/feed/ 0
Redmi च्या फ्लॅगशिप हँडसेट मध्ये असेल इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर आणि पावरफुल बॅटरी https://www.91mobiles.com/marathi/redmi-flagship-to-include-in-display-fingerprint-sensor/ https://www.91mobiles.com/marathi/redmi-flagship-to-include-in-display-fingerprint-sensor/#respond Thu, 09 May 2019 11:53:59 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4289 रेडमी फ्लॅगशिप फोनची बॅटरी दमदार असेल.

The post Redmi च्या फ्लॅगशिप हँडसेट मध्ये असेल इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर आणि पावरफुल बॅटरी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
चीनी स्मार्टफोन निर्माता कंपनी शाओमीच्या अपकमिंग फ्लॅगशिप फोन बद्दल अनेक दिवसांपासून माहिती समोर येत आहे. तसेच यावेळी ब्रँडचे जनरल मॅनेजर लू विबिंग ने हिंट दिली आहे कि Redmi फ्लॅगशिप स्मार्टफोन मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर आणि दमदार बॅटरी असेल.

जरी Xiaomi ने अजून ऑफिशियली Redmi फ्लॅगशिप डिवाइसची माहिती दिली नसली किंवा अजून या फोनच्या लॉन्च डेट बद्दल पण कोणताही खुलासा केला नाही. तरी काही टीजर पाहता हा फोन 13 मे ला लॉन्च केला जाऊ शकतो.

या आधी Redmi च्या फ्लॅगशिप मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 855 प्रोसेसर असण्याची शक्यता आहे. हा फुल-स्क्रीन डिजाइन आणि पॉप-अप सेल्फी कॅमेरा सह येईल. विशेष म्हणजे चीनच्या सोशल मीडिया साइट वीबो वर लू विबिंग ने एका स्मार्टफोनच्या स्क्रीनचा स्क्रीनशॉट शेयर केला आहे.

या स्क्रीनशॉट वरून मिळत आहे कि हा रेडमी फ्लॅगशिप हँडसेटचा आहे. स्क्रीनशॉट वरून या डिवाइस मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर असल्याचे समजले आहे. तसेच यात 44 टक्के बॅटरी असल्याचे दिसत आहे. हा एक प्रकारचा इशारा आहे कि रेडमी फ्लॅगशिप फोनची बॅटरी दमदार असेल.

रिपोर्ट्सनुसार फोन मध्ये 4,000 एमएएच बॅटरी असू शकते. सोबत स्क्रीनशॉटच्या साइज वरून स्पष्ट झाले आहे कि रेडमीच्या या डिवाइस मध्ये फुल-एचडी+ (1080×2340 पिक्सल) रिजोल्यूशन वाली स्क्रीन असेल.

आता पर्यंत समोर आलेल्या लीकनुसार रेडमी फ्लॅगशिप फोन मध्ये 6.39-इंचाचा फुल-एचडी+ डिस्प्ले असेल. सोबत हँडसेट ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप सह येईल. यात 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर, 8 मेगापिक्सलचा सेकेंडरी सेंसर आणि 13 मेगापिक्सलचा सेंसर असेल. या फोन मध्ये 32 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा असू शकतो.

रेडमी फ्लॅगशिप फोन मध्ये 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज देऊ शकते. तसेच अलीकडेच आलेल्या एका रिपोर्ट वरून या फोन मध्ये एंडरॉयड 9 पाई वर आधारित मीयूआई 10 असण्याची माहिती मिळाली आहे. बोलले जात आहे कि हा फोन Redmi K20 Pro नावाने लॉन्च केला जाईल.

सोर्स

The post Redmi च्या फ्लॅगशिप हँडसेट मध्ये असेल इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर आणि पावरफुल बॅटरी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/redmi-flagship-to-include-in-display-fingerprint-sensor/feed/ 0