Mi Super Sale मध्ये Redmi K20 Pro आणि Redmi Note 7 Pro सह अनेक स्मार्टफोन्स वर मिळत आहे धमाकेदार सूट

नवीन वर्ष सुरु होताच रियलमी सोबतच शाओमीने पण आपल्या ग्राहकांसाठी सेलचे आयोजन केले आहे. Xiaomi च्या यावर्षीच्या Mi Super Sale ची सुरवात झाली आहे. Realme च्या एक दिवस आधी शाओमीच्या मी सुपर सेलची 1 जानेवारी पासून सुरवात झाली आहे जो 8 जानेवारी पर्यंत चालू राहील.

Mi Super सेल शाओमीच्या वेबसाइट वर सुरु झाला आहे. या सेल मध्ये कंपनी आपल्या अनेक शानदार स्मार्टफोन्स वर डिस्काउंट देत आहे, ज्यात Redmi Note 7 Pro, Redmi K20, Redmi K20 Pro आणि Poco F1 चा समावेश आहे.

डिस्काउंट व्यतिरिक्त हे फोन्ससह झिरो इंटरेस्ट ईएमआई ऑप्शन वर पण विकत घेता येतील. तसेच कंपनीच्या लो बजेट ग्राहकांसाठी Redmi 8A, Redmi Go, Redmi Y3 आणि Redmi 7A सारखे स्मार्टफोन स्वस्तात विकले जात आहेत.

सर्वात आधी बोलूया Xiaomi च्या रेडमी के20 बद्दल, ज्याच्या किंमतीत 2,000 रुपयांची सूट दिली जात आहे. या फोनचा 6 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज मॉडेल 19,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच डिवाइसचा 6 जीबी + 128 जीबी मॉडेल 22,999 रुपयांमध्ये विकला जात आहे.

दुसरीकडे Redmi K20 Pro चा 6 जीबी + 128 जीबी मॉडेल 24,999 रुपये आणि या डिवाइस के 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज वेरिएंट 27,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. या डिवाइसच्या किंमतीत 3 हजार रुपयांची सूट दिली जात आहे.

रेडमी के20 व्यतिरिक्त शाओमीच्या लोकप्रिय Poco F1 वर पण शानदार सूट दिली जात आहे. या डिवाइसचा 64 जीबी वेरिएंट 14,999 रुपये आणि 256 वेरिएंट 18,999 रुपयांमध्ये विकला जात आहे. या डिवाइसच्या किंमतीत 4,000 रुपयांची कपात करण्यात आली आहे.

कंपनीचा प्रसिद्ध Redmi Note 7 Pro चा 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज वेरिएंट 9,999 रुपयांमध्ये विकला जात आहे. तर रेडमी नोट 7 प्रो चा 6 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज मॉडेल 12,999 रुपये आणि 6 जीबी + 128 जीबी मॉडेल 14,999 रुपयांमध्ये विकला जात आहे.

रेडमी नोट 7एस चा 3 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज मॉडेल 8,999 रुपये, 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज मॉडेल 9,999 रुपयांमध्ये विकला जात आहे. तर रेडमी वाई3 ग्राहक 4,000 रुपयांच्या डिस्काउंट सह 7,999 रुपयांमध्ये विकत शकता.

शाओमी रेडमी के20 प्रो वीडियो

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here