Redmi Note 5 Pro - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 06 Jul 2023 08:24:45 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 शाओमी ने सुरु केला ‘मी सुपर सेल’, बघा कोणत्या स्मार्टफोन वर मिळत आहे किती सूट https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-super-sale-redmi-note-6-pro-y2-poco-f1-offer-discount-price/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-super-sale-redmi-note-6-pro-y2-poco-f1-offer-discount-price/#respond Thu, 11 Apr 2019 13:59:12 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4073 Mi Super Sale मध्ये रेडमी नोट 5 प्रो चे हे दोन्ही वेरिएंट क्रमश: 10,999 रुपये तसेच 11,999 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध होतील.

The post शाओमी ने सुरु केला ‘मी सुपर सेल’, बघा कोणत्या स्मार्टफोन वर मिळत आहे किती सूट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
शाओमी ने याच महिन्यात आपल्या ‘मी फेस्टिवल’ चे आयोजन केले होते. हा फेस्टिवल 4 एप्रिल पासून सुरु होऊन 6 एप्रिल पर्यंत चालला होता ज्यात फक्त शाओमी स्मार्टफोन डिस्काउंट वर विकले गेले नव्हते तर अनेक ऑफर्स अंतर्गत मी फॅन्स गिफ्ट व फ्री प्रोडक्ट पण मिळाले. एका महिन्यात आपल्या इंडियन फॅन्सना अजून एक भेट देत शाओमी ने आज पासून ‘मी सुपर सेल’ चे आयोजन केले आहे. जर तुम्ही पण एखादा शाओमी फोन घेऊ इच्छित असाल तर हीच योग्य वेळ आहे तो फोन कमी किंमतीत घेण्याची.

शाओमी मी सुपर सेल
Xiaomi ने आज ‘मी सुपर सेल’ ची सुरवात केली आहे. हा खास सेल 3 दिवस आयोजित करण्यात आला आहे जो आज 11 एप्रिल पासून सुरु होऊन 13 एप्रिल पर्यंत चालेल. Xiaomi Mi Super Sale मध्ये शाओमी प्रोडक्ट खूप कमी किंमतीत आणि भारी डिस्काउंट वर मिळत आहेत. या सेल मध्ये कंपनीने शाओमीच्या रेडमी सीरीजच्या नवीन व अन्य स्मार्टफोन्स सह पोको ब्रँड फोनचा पण समावेश केला आहे. या सेल मध्ये शाओमी स्मार्टफोन थेट 2,000 पर्यंतची सूट मिळत आहे.

इतका मिळेल डिस्काउंट
सर्वात आधी पोकोफोन बद्दल बोलायचे तर शाओमी ‘मी सुपर सेल’ मध्ये Poco F1 च्या 6जीबी रॅम आणि 128जीबी स्टोरेज वेरिएंट वर 2,000 रुपयांची सूट दिली जात आहे. डिस्काउंट नंतर पोको एफ1 चा हा वेरिएंट 20,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच Redmi Note 5 Pro चा 4जीबी रॅम व 64जीबी मेमरी वेरिएंट आणि 6जीबी रॅम व 64जीबी वेरिएंट पण 2,000 रुपये स्वस्तात विकत घेता येईल. ​सूटीनंतर Mi Super Sale मध्ये रेडमी नोट 5 प्रो चे हे दोन्ही वेरिएंट क्रमश: 10,999 रुपये तसेच 11,999 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध होतील.

हे देखील वाचा: Realme 3 Pro च्या लॉन्च डेटचा खुलासा, 22 एप्रिलला लॉन्च होईल हा शानदार स्मार्टफोन

Mi Super Sale मध्ये शाओमी Redmi Note 6 Pro च्या 6जीबी रॅम व 64जीबी वेरिएंट वर 2,000 रुपयांची सूट देत आहे ज्यामुळे हा वेरिएंट 13,999 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध होईल. तसेच Redmi 6 Pro वर कंपनी कडून 1,000 रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे. या सूटीनंतर रेडमी 6 प्रो चा 4जीबी रॅम व 64जीबी वेरिएंट 9,999 रुपये तर 3जीबी रॅम व 32जीबी मेमरी वेरिएंट 7,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

Xiaomi Mi Super Sale मध्ये 7,999 रुपयांचा Redmi 6 चा 3जीबी रॅम व 32जीबी मेमरी वेरिएंट 1,000 रुपयांच्या डिस्काउंट सह 6,999 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध होईल. तसेच कंपनी Redmi Y2 स्मार्टफोन वर पण 1,000 रुपयांचा डिस्काउंट देत आहे. या सेल मध्ये रेडमी वाई2 चा 3जीबी रॅम व 32जीबी मेमरी वेरिएंट 7,999 रुपये तर 4जीबी रॅम व 64जीबी मेमरी वेरिएंट 9,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

हे देखील वाचा: 4,500एमएएच बॅटरी आणि 6जीबी रॅम सह लॉन्च झाला सॅमसंग Galaxy A70

विशेष म्हणजे Xiaomi ने फक्त एका महिन्यात देशात रेडमी नोट 7 आणि रेडमी नोट 7 प्रो चे 10,00,000 यूनिट विकले आहेत. इंडियन मार्केट मध्ये रेडमी नोट 7 प्रो चा 4जीबी रॅम व 64जीबी मेमरी वेरिएंट 13,999 रुपये तर 6जीबी रॅम व 128जीबी मेमरी वेरिएंट 16,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच रेडमी नोट 7 चा 3जीबी रॅम व 32जीबी मेमरी वेरिएंट 9,999 रुपये तथा 4जीबी रॅम व 64जीबी मेमरी वेरिएंट 11,999 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध आहे. हे दोन्ही फोन मी डॉट कॉम आणि फ्लिपकार्ट वर फ्लॅश मध्ये मिळतात.

The post शाओमी ने सुरु केला ‘मी सुपर सेल’, बघा कोणत्या स्मार्टफोन वर मिळत आहे किती सूट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-super-sale-redmi-note-6-pro-y2-poco-f1-offer-discount-price/feed/ 0
शाओमी ने सुरु केला ‘मी सुपर सेल’, बघा कोणत्या फोन वर मिळेल किती डिस्काउंट https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-super-sale-redmi-note-6-pro-6a-redmi-y2-mi-a2-discount-offer-price/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-super-sale-redmi-note-6-pro-6a-redmi-y2-mi-a2-discount-offer-price/#respond Mon, 25 Mar 2019 12:15:58 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3921 28 मार्च पर्यंत हे स्मार्टफोन्स फक्त कमी किंमतीत विकत घेता येतील असे नाही तर सोबत एक्सचेंज ऑफर आणि फोनच्या खरेदीवर कॅशबॅक पण मिळेल

The post शाओमी ने सुरु केला ‘मी सुपर सेल’, बघा कोणत्या फोन वर मिळेल किती डिस्काउंट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
शाओमी आज भारतातील नंबर वन स्मार्टफोन ब्रान्ड बनला आहे. या कंपनीच्या स्मार्टफोन लॉन्च सोबत यशाचे नवीन विक्रम पण बनतात. कमी किंमत आणि शानदार स्पेसिफिकेशन्सनी शाओमीला वर आणले आहे. शाओमी पण आपल्या फॅन्सची विशेष काळजी घेते आणि वेळोवेळी ऑफर्स व सेलचे आयोजन करते. होळी झाल्यांनतर पण शाओमी आपल्या इंडियन फॅन्ससाठी शानदार भेट घेऊन आली आहे. शाओमीने ‘मी सुपर सेल’ चे आयोजन केले आहे, ज्यात कंपनीचे अनेक स्मार्टफोन डिस्काउंट आणि ऑफर्स सह सेल साठी उपलब्ध झाले आहेत.

मी सुपर सेल
शाओमीने ‘मी सुपर सेल’ चे आयोजन केले आहे. मी सुपर सेल आज म्हणजे 25 मार्च पासून सुरु झाला आहे जो 28 मार्च पर्यंत चालेल. या चार दिवसीय सेल मध्ये शाओमी ने मी सीरीज आणि रेडमी सीरीज अंतर्गत लॉन्च झालेल्या अनेक शानदार स्मार्टफोन्सचा समावेश केला आहे जे भरभक्कम डिस्कांउट सह सेल साठी उपलब्ध होतील. 28 मार्च पर्यंत हे स्मार्टफोन्स फक्त कमी किंमतीत विकत घेता येतील असे नाही तर सोबत एक्सचेंज ऑफर आणि फोनच्या खरेदीवर कॅशबॅक पण मिळेल.

इथे मिळतील स्वस्त फोन
शाओमी द्वारा आयोजित मी सुपर सेल आज सुरु होऊन 28 मार्च पर्यंत चालेल आणि यात कंपनीच्या अधिकृत वेबसाइट मी डॉट कॉम वर शाओमी फोन्स ऑफर्स अंतर्गत विकत घेता येतीलच. सोबत शापिंग साइट अमेझॉन इंडिया तसेच फ्लिपकार्ट वर पण शाओमी स्मार्टफोन डिस्काउंट व अन्य ऑफर्स सह सेल साठी उपलब्ध होतील. लक्षात ठेवा मी सुपर सेल फक्त आनलाईन प्लॅटफॉर्म वरच आयोजित करण्यात आला आहे जो मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध असेल.

हे स्मार्टफोन मिळतील स्वस्त
मी सुपर सेल मध्ये रेडमी नोट 6 प्रो चा 6जीबी रॅम वेरिएंट 2,000 रुपये स्वस्त विकत घेता येईल तसेच 4जीबी रॅम वेरिएंट 1,000 रुपये कमी किंमतीत विकत घेता येईल. या फोनचा 6जीबी रॅम 15,999 तसेच 4जीबी रॅम वेरिएंट 12,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला होता पण मी सुपर सेल अंतर्गत फोनचा 6जीबी रॅम वेरिएंट 12,999 रुपये तर 4जीबी रॅम वेरिएंट 11,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

त्याचप्रमाणे शाओमीचा रेडमी 6ए स्मार्टफोन पण मी सुपर सेल मध्ये डिस्काउंटेड प्राइज वर विकत घेता येईल. या सेल मध्ये रेडमी 6ए चा 2जीबी रॅम व 16जीबी मेमरी वेरिएंट 5,999 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध होईल तर 2जीबी रॅम व 32जीबी मेमरी वेरिएंट 6,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल. मी सुपर सेल मध्ये शाओमी मी ए2 चा 4जीबी रॅम 64जीबी स्टोरेज वेरिएंट 11,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तर मी ए2 अमेझॉन से एक्सचेंज ऑफर मध्ये विकत घेतल्यास 2,000 रुपयांचा अतिरिक्त कॅशबॅक पण मिळेल.

मी सुपर सेल मध्ये शाओमी रेडमी नोट 5 प्रो चे सर्व वेरिएंटच्या किंमती कमी करण्यात आल्या आहेत. ​रेडमी नोट 5 प्रो चा 4जीबी रॅम व 64जीबी स्टोरेज वेरिएंट 13,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला होता. पण मी सुपर सेल अंतर्गत हा वेरिएंट 11,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. त्याचप्रमाणे 15,999 रुपयांमध्ये लॉन्च झालेला रेडमी नोट 5 प्रो चा 6जीबी रॅम व 64जीबी स्टोरेज वेरिएंट 11,999 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध होईल.

रेडमी वाई2 चा 3जीबी रॅम वेरिएंट 9,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला तर 4जीबी रॅम वेरिएंटची किंमत 12,999 रुपये ठेवण्यात आली होती. पण मी सुपर सेल मध्ये फोनचा 3जीबी रॅम वेरिएंट 7,999 रुपये तथा 4जीबी रॅम वेरिएंट 9,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. त्याचप्रमाणे शाओमी रेडमी 6 चा 32जीबी स्टोरेज वेरिंएट शाओमी मी सुपर सेल मध्ये 7,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल तर फोनचा 64जीबी वेरिएंट 7,999 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध होईल.

The post शाओमी ने सुरु केला ‘मी सुपर सेल’, बघा कोणत्या फोन वर मिळेल किती डिस्काउंट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-super-sale-redmi-note-6-pro-6a-redmi-y2-mi-a2-discount-offer-price/feed/ 0
शाओमी ने केली ‘मी डेज’ ची सुरवात, 5,000 रुपयांपर्यंत स्वस्त मिळतील कंपनीचे स्मार्टफोन https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-days-redmi-note-6-pro-note-5-pro-redmi-6-poco-f1-flipkart-sale-price-discount-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-days-redmi-note-6-pro-note-5-pro-redmi-6-poco-f1-flipkart-sale-price-discount-in-marathi/#respond Mon, 28 Jan 2019 09:17:00 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3470 पोको एफ1 चा सर्वात मोठा मॉडेल 25,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

The post शाओमी ने केली ‘मी डेज’ ची सुरवात, 5,000 रुपयांपर्यंत स्वस्त मिळतील कंपनीचे स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
शाओमी भारतातील सर्वात मोठा स्मार्टफोन ब्रँड बनली आहे. स्वस्तात मिळणारे या कंपनीचे स्मार्टफोन पावरफुल स्पेशिफिकेशन्सने सुसज्ज असतात जे सामान्य जनतेच्या बजेट मध्ये फिट बसतात. आपल्या फॅन्सना अजून एकभेट देत शाओमी ने ‘मी डेज’ ची सुरवात केली आहे. या सेल मध्ये शाओमी ने आपला हिट स्मार्टफोन वर डिस्काउंट ऑफर सुरु केली आहे ज्यात रेडमी नोट 6 प्रो, रेडमी 6 व रेडमी नोट 5 प्रो सोबतच पोको एफ1 चा पण समावेश आहे. मी डेज मध्ये शाओमी स्मार्टफोन्स 5,000 रुपयांपर्यंच्या डिस्कॉउंटसह विकत घेता येतील.

शाओमी मी डेजचे आयोजन शॉपिंग साइट​ फ्लिपकार्ट वर केले गेले आहे. मी डेजची सुरवात आज पासून झाली आहे जे 3 दिवस चालतील. 30 जानेवारी पर्यंत रेडमी नोट 6 प्रो, रेडमी 6, रेडमी नोट 5 प्रो आणि पोको एफ1 डिस्काउंटेड प्राइज वर विकत घेता येतील. सर्वात आधी पोको एफ1 पाहता मी डेज मध्ये पोको एफ1 चा सर्वात मोठा मॉडेल 25,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. हा मॉडेल 8जीबी रॅम सह 256जीबी मेमरीला सपोर्ट करतो.

पोको एफ1 चा 23,999 रुपयांचा 6जीबी रॅम व 128जीबी स्टोरेज वॉल वेरिएंट मी डेज अंतर्गत 21,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच 6जीबी रॅम व 64जीबी मेमरी वाला पोको एफ1 18,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. रेडमी नोट 6 प्रो बद्दल बोलायचे तर फोनचा 4जीबी रॅम व 64जीबी स्टोरेज वेरिएंट कंपनी ने 13,999 रुपयांच्या किंमतीती लॉन्च केला होता तर मी डेज मध्ये हा 12,999 रुपयांमध्ये घेता येतो.

रेडमी नोट 6 प्रो चा 6जीबी रॅम व 64जीबी मेमरी वेरिएंट मी डेज मध्ये 1,000 रुपयांच्या सुटीसह फक्त 14,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच 13,999 रुपयांमध्ये लॉन्च झालेला रेडमी नोट 5 प्रो चा 4जीबी रॅम व 64जीबी स्टोरेज वेरिएंट 10,999 रुपये त्याचबरोबर 15,999 रुपयांमध्ये लॉन्च झालेला 6जीबी रॅम व 64जीबी स्टोरेज वेरिएंट 12,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

मी डेज सेल मध्ये तीन दिवस रेडमी 6 स्मार्टफोन डिस्काउंट छूट सह सेल साठी उपलब्ध असेल. या सेल मध्ये रेडमी 6 चा 3जीबी रॅम व 32जीबी मेमरी वेरिएंट 7,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल तसेच फोनचा 3जीबी रॅम व 64जीबी स्टोरेज वेरिएंट 8,499 रुपयांमध्ये मिळेल.
शाओमी मी डेज मधून फोन विकत घेण्यासाठी (इथे क्लिक करा)

The post शाओमी ने केली ‘मी डेज’ ची सुरवात, 5,000 रुपयांपर्यंत स्वस्त मिळतील कंपनीचे स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-days-redmi-note-6-pro-note-5-pro-redmi-6-poco-f1-flipkart-sale-price-discount-in-marathi/feed/ 0
शाओमीने मी ए2 नंतर 2,000 रुपयांनी कमी केली रेडमी नोट 5 प्रो ची किंमत, हि आहे नवीन किंमत https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-5-pro-price-cut-new-price-start-rs-12999-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-5-pro-price-cut-new-price-start-rs-12999-in-marathi/#respond Tue, 08 Jan 2019 10:48:48 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3320 काही महिन्यांपूर्वी टॅक्स स्ट्रक्चर मधील बदलांमुळे डिवाइसची किंमत एक हजार रुपयांनी वाढवून 14,999 रुपये करण्यात आली होती.

The post शाओमीने मी ए2 नंतर 2,000 रुपयांनी कमी केली रेडमी नोट 5 प्रो ची किंमत, हि आहे नवीन किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
शाओमी ने नवीन वर्षात पुन्हा एकदा आपलूं दुसऱ्या स्मार्टफोनची किंमत कमी केली आहे. जर तुम्ही पण शाओमी फॅन असाल आणि नवीन स्मार्टफोन विकत घेण्याचा विचार करत असाल तर तुम्ही रेडमी नोट 5 प्रो विकत घेऊ शकता कारण कंपनी ने या डिवाइसची किंमत 2,000 रुपयांपर्यंत कमी केली आहे.

डिवाइसच्या 4जीबी रॅम व 64जीबी स्टोरेज आणि 6जीबी रॅम व 64जीबी स्टोरेजच्या किंमतीती कपात करण्यात आली आहे. याआधी कंपनी ने एंडरॉयड वन ऑपरेटिंग सिस्टम वर आधारित मी ए2 ची किंमत पण 3,000 रुपयांनी कमी केली होती.

शाओमी इंडिया के एमडी आणि ग्लोबल वीपी मनु कुमार जैन यांनी आपल्या ट्विटर हँडल वर रेडमी नोट 5 प्रो च्या नवीन किंमतीची महती दिली. इतकेच नव्हे तर मनु कुमार जैन ने कपाती सोबत सांगितले कि कंपनी ने आतापर्यंत रेडमी नोट 5 सीरीज मध्ये 1 कोटी स्मार्टफोन्स सेल करण्याचा किर्तीमान मिळवला आहे. तसेच ट्विट मध्ये कंपनी येत्या काळात अशाच अजून 3 नवीन डील्स सादर करू शकते अशी हिंट मिळाली आहे.

हि असेल रेडमी नोट 5 प्रो ची नवीन किंमत
रेडमी नोट 5 प्रो चा 4जीबी रॅम व 64जीबी स्टोरेज वेरिएंट 13,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला होत. पण काही महिन्यांपूर्वी टॅक्स स्ट्रक्चर मधील बदलांमुळे डिवाइसची किंमत एक हजार रुपयांनी वाढवून 14,999 रुपये करण्यात आली होती. पण आता या कपातीनंतर डिवाइस 12,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तर 6जीबी रॅम व 64जीबी स्टोरेज वेरिएंट कंपनी ने 15,999 रुपयांमध्ये लॉन्च केला होता, ज्याची किंमत आता 2,000 रुपयांनी कमी करण्यात आली आहे. आता हा वेरिएंट 13,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स पाहता यात 5.99-इंचाची 18:9 आसपेक्ट रेशियो असलेली फुल एचडी+ स्क्रीन देण्यात आली आहे. कंपनीने हा क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 636 चिपसेट वर सादर केला आहे आणि फोन मध्ये 1.8गीगाहट्र्जचा ऑटाकोर प्रोसेसर आहे. याची इंटरनल मेमरी 64जीबी आहे.

एंडरॉयड ऑपरेटिंग सिस्टम 7.1 नुगट आधारित या फोन मध्ये 12-मेगापिक्सल+5-मेगापिक्सलचा डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. सोबत 20-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. तसेच पावर बॅकअप साठी कंपनी ने यात 4,000 एमएएच बॅटरी दिली आहे.

The post शाओमीने मी ए2 नंतर 2,000 रुपयांनी कमी केली रेडमी नोट 5 प्रो ची किंमत, हि आहे नवीन किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-5-pro-price-cut-new-price-start-rs-12999-in-marathi/feed/ 0
शाओमीचा न्यू ईयर धमाका, एक साथ 10 स्मार्टफोन वेरिएंट्सच्या किंमती केल्या 2,000 रुपयांपर्यंत कमी https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-new-year-offer-discount-redmi-mi-phone-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-new-year-offer-discount-redmi-mi-phone-in-marathi/#respond Mon, 24 Dec 2018 11:42:37 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3205 शाओमीची हि खास ऑफर क्रिसमसच्या दिवशी म्हणजे उद्या 25 डिसेंबरपासून सुरु केली जाईल जी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजे 1 जानेवारी पर्यंत चालेल.

The post शाओमीचा न्यू ईयर धमाका, एक साथ 10 स्मार्टफोन वेरिएंट्सच्या किंमती केल्या 2,000 रुपयांपर्यंत कमी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
शाओमी फॅन्ससाठी साल 2018 खूप खास गेले आहे. यावर्षी शाओमीने फक्त हिट स्मार्टफोन इंडियन टेक मार्केट मध्ये आणले नाहीत तर सोबतच स्मार्टटीव व अन्य प्रोडक्ट्स सह गॅजेट बाजरावर पण कब्जा केला आहे. साल 2018 संपण्यासाठी थोडेच दिवस बाकी आहेत आणि शाओमी नवीन वर्षाचे हे दिवस आपल्या फॅन्ससाठी खास बनवू इच्छित आहे. आपल्या यूजर्सना ‘न्यू ईयर’ ची भेट देत शाओमीने एक साथ आपल्या 10 स्मार्टफोन वेरिएंटच्या किंमतींवर थेट 2,000 रुपयांची सूट जाहीर केली आहे.

शाओमीच्या हिट स्मार्टफोन्स मधील एक मी ए2 थेट 2,000 रुपयांच्या डिस्काउंट वर विकत घेता येईल. शाओमी मी ए2 च्या 6जीबी रॅम व 128जीबी मेमरी वाल्या वेरिएंटच्या किंमतीवर 2,000 रुपयांची सूट देत आहे, ज्यांनंतर हा वेरिएंट 17,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच 14,999 रुपयांमध्ये लॉन्च झालेला मी ए2 चा 4जीबी रॅम व 64जीबी मेमरी वेरिएंट 1,000 रुपयांच्या डिस्काउंट सह 13,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

तसेच शाओमी रेडमी वाय2 तसेच रेडमी नोट 5 प्रो च्या सर्व वेरिएंट्स वर 1,000 रुपयांचीसूट देत आहे. यात 12,999 रुपयांच्या किंमतीत लॉन्च झालेला रेडमी वाय2 चा 4जीबी रॅम व 64जीबी मेमरी वेरिएंट 11,999 रुपयांमध्ये तसेच 9,999 रुपयांमध्ये लॉन्च झालेला रेडमी वाय2 चा 3जीबी रॅम व 32जीबी मेमरी वेरिएंट 8,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

तर रेडमी नोट 5 प्रो चा 16,999 रुपयांचा 6जीबी रॅम/64जीबी मेमरी वेरिएंट तसेच 14,999 रुपयांचा 4जीबी रॅम/64जीबी मेमरी वेरिएंट पण 1,000 रुपयांच्या डिस्काउंट सह विकत घेता येईल.शाओमी 7,999 रुपयांच्या रेडमी 6 स्मार्टफोन वर 500 रुपयांची सूट देत आहे. या डिस्काउंट नंतर 3जीबी रॅम व 64जीबी मेमरी असलेला हा फोन 7,499 रुपयांमध्ये मिळेल. तसेच शाओमीच्या सब ब्रँड पोकोचा पहिलाच फोन पोको एफ1 आपण या न्यू ईयर ऑफर मध्ये आहे.

स्पेशल ऑफर अंतर्गत पोको एफ1 चा 6जीबी रॅम/128जीबी मेमरी व्हेरिएंट 1,000 रुपयांच्या डिस्काउंट सह विकत घेता येईल. तर पोको एफ1 के 8जीबी रॅम/256जीबी मेमरी सोबतच 8जीबी रॅम व 256जीबी मेमरी असलेला आरर्मड एडिशन पण 2,000 रुपयांच्या डिस्काउंट वर विकत घेता येईल.

शाओमीची हि खास ऑफर क्रिसमसच्या दिवशी म्हणजे उद्या 25 डिसेंबरपासून सुरु केली जाईल जी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजे 1 जानेवारी पर्यंत चालेल. शाओमीची हि ऑफर ऑनलाइन रिटेल स्टोर्स वर पण उपलब्ध असेल.

The post शाओमीचा न्यू ईयर धमाका, एक साथ 10 स्मार्टफोन वेरिएंट्सच्या किंमती केल्या 2,000 रुपयांपर्यंत कमी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-new-year-offer-discount-redmi-mi-phone-in-marathi/feed/ 0
शाओमी ची भेट : कंपनी ने आपल्या 5 हिट स्मार्टफोन वेरिएंट्सच्या किंमती केल्या कमी https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-permanent-price-drop-by-rs-1000-redmi-note-5-pro-redmi-y2-mi-a2-india-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-permanent-price-drop-by-rs-1000-redmi-note-5-pro-redmi-y2-mi-a2-india-in-marathi/#respond Fri, 16 Nov 2018 12:44:09 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=2883 आईडीसी च्या लेटेस्ट रिपोर्ट ने सांगितले आहे कि शाओमी लागोपाठ 5व्यांदा भारतातील नंबर वन स्मार्टफोन ब्रँड बनला आहे. शाओमी ने आपल्या या यशाचे श्रेय आपल्या यूजर्सना दिले आहे.

The post शाओमी ची भेट : कंपनी ने आपल्या 5 हिट स्मार्टफोन वेरिएंट्सच्या किंमती केल्या कमी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
शाओमी देशातील सर्वात मोठा ब्रँड बनला आहे. हि बाब फक्त शाओमी फॅन्स नाही तर देशातील स्मार्टफोन बाजारावर नजर रखने ठेवणाऱ्या रिसर्च फर्म ने पण सांगतिले आहे. आईडीसी च्या लेटेस्ट रिपोर्ट ने सांगितले आहे कि शाओमी लागोपाठ 5व्यांदा भारतातील नंबर वन स्मार्टफोन ब्रँड बनला आहे. शाओमी ने आपल्या या यशाचे श्रेय आपल्या यूजर्सना दिले आहे. हा आनंद सेलिब्रेट करत शाओमी इंडिया ने आपल्या फॅन्स साठी पण शानदार भेट आणली आहे. शाओमी ने एक साथ आपल्या 5 हिट स्मार्टफोन्स च्या किंमती कमी केल्या आहेत.

शाओमी ने रेडमी आणि मी सीरीजच्या हिट स्मार्टफोन्सच्या किंमती कमी केल्या आहेत. शाओमी ने आपल्या खालील सर्व स्मार्टफोन्सच्या किंमतीती थेट 1,000 रुपयांची कपात केली आहे. हा प्राइस कट आॅनलाईन प्लॅटफार्म सोबतच आॅफलाईन रिटेल स्टोर्स वर पण लागू होईल आणि आज पासून शाओमी चे हे स्मार्टफोन्स नवीन किंमती सह येतील. प्राइस कट मध्ये मी सीरीजचा मी ए2 स्मार्टफोन तसेच रेडमी सीरीजचा रेडमी वाय2 आणि रेडमी नोट 5 प्रो सामील आहे.

सर्वात आधी मी ए2 पाहता कंपनी ने 16,999 रुपयांमध्ये लॉन्च केलेला 4जीबी रॅम/64जीबी मेमरी वेरिएंट आता 15,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच 19,999 रुपयांमध्ये लॉन्च झालेला मी ए2 चा 6जीबी रॅम/128जीबी मेमरी वेरिएंट 18,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच 12,999 रुपयांचा रेडमी वाय2 चा 4जीबी रॅम/64जीबी मेमरी वेरिएंट 11,999 रुपये तसेच 10,999 रुपयांमध्ये लॉन्च झालेला फोनचा 3जीबी रॅम वेरिएंट 9,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

शाओमी रेडमी नोट 5 प्रो चा 4जीबी रॅम/64जीबी मेमरी जो आता पर्यंत 14,999 रुपयांमध्ये विकला जात होता तर आता या वेरिएंटची किंमत 13,999 रुपये झाली आहे तसेच 16,999 रुपयांचा रेडमी नोट 5 प्रो 6जीबी रॅम/64जीबी मेमरी वेरिएंट आता 15,999 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध होईल. विशेष म्हणजे आईडीसी च्या रिपोर्ट अनुसार मागील तिमाहीत एकट्या शाओमी ने इंडियन स्मार्टफोन बाजाराच्या 27.3 प्रतिशत हिस्स्यावर कब्जा केला आहे.

The post शाओमी ची भेट : कंपनी ने आपल्या 5 हिट स्मार्टफोन वेरिएंट्सच्या किंमती केल्या कमी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-permanent-price-drop-by-rs-1000-redmi-note-5-pro-redmi-y2-mi-a2-india-in-marathi/feed/ 0
शाओमी रेडमी नोट 5 प्रो यूजर्स साठी मोठी बातमी, फोनला मिळाला मीयूआई 10 चा सर्वात नवीन अपडेट, असा करा इंस्टाल https://www.91mobiles.com/marathi/miui-10-new-version-update-on-xiaomi-redmi-note-5-pro-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/miui-10-new-version-update-on-xiaomi-redmi-note-5-pro-in-marathi/#respond Wed, 24 Oct 2018 13:02:09 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=2624 जर तुम्हाला मीयूआई 10 चा ओटीए अपडेट मिळाला नसेल तर फोनच्या सेटिंग्स मधील अबाउट फोन मध्ये जाऊन सिस्टम अपडेट वर क्लिक करून उपलब्ध अपडेट मॅनुअली चेक करू शकता.

The post शाओमी रेडमी नोट 5 प्रो यूजर्स साठी मोठी बातमी, फोनला मिळाला मीयूआई 10 चा सर्वात नवीन अपडेट, असा करा इंस्टाल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
शाओमी ने आपला आठवा वर्धापनदिन वेगळ्याच पद्धतीने साजरा केला होता. या निमित्ताने कंपनीने मी 8 स्मार्टफोन सीरीज लॉन्च करण्यासोबतच आपला सर्वात वेगवान आणि स्मार्ट यूजर इंटरफेस मीयूआई 10 पण सादर केला होता. मीयूआई 10 सप्टेंबर मधेच भारतात आला आहे आणि रेडमी नोट 5 व नोट 5 प्रो सारख्या स्मार्टफोन साठी जाहीर झाला आहे. तर आता शाओमी ने हा यूआई अजून एडवांस केला आहे. हा सर्वात नवीन व फास्ट अपडेट रेडमी नोट 5 प्रो स्मार्टफोन वर रोलआउट झाला आहे. मीयूआई 10 च्या या अपडेटने रेडमी नोट 5 प्रो ची प्रोसेसिंग आणि वापर बदलला आहे.

शाओमी ने मीयूआई 10 चा हा नवीन अपडेट को मीयूआई फोरम वर सादर करण्यात आला आहे. फोरम वर मीयूआई 10 चा नवीन अपडेट V10.0.2.0.OEIMIFH सॉफ्टवेयर वर्जन नंबर सह दिसला आहे. भारतात रेडमी नोट 5 प्रो स्मार्टफोन सध्या 10.0.1.0.OEIMIFH वर्जन वर चालत आहे. रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे कि मीयूआई10 च्या या नवीन अपडेट नंतर रेडमी नोट 5 प्रो मध्ये फेस अनलॉक आधीपेक्षा फास्ट होईल. तसेच फिंगरप्रिंट सेंसर च्या टच आणि रिस्पांसचा वेग वाढेल.

रेडमी नोट 5 प्रो वरील नवीन यूआई अपडेट बद्दल बोलले जात आहे कि हा फोनचा रॅम मॅनॅजमेन्ट आधीपेक्षा जास्त चांगला झाला आहे तसेच या अपडेटने 60 फ्रेम पर सेकेंड स्पीडने फुलएचडी वीडियो रेकॉर्डिंग करता येईल. मीयूआई 10 चा नवीन वर्जन फोन मधील बग्स ठीक करेल तसेच लॉक स्क्रीन, स्टेटस बार आणि नोटिफिकेशन्स बार वर येणारे नको असलेल्या नोटिफिकेशन्स पासून यूजर्सची सुटका करेल.

शाओमी मीयूआई फोरम वर नवीन अपडेट ची साइज 597एमबी सांगण्यात आली आहे. पण जर तुमच्या रेडमी नोट 5 प्रो स्मार्टफोन मध्ये आधीपासूनच मीयूआई 10 असल्यास हा नवीन अपडेट फक्त 152एमबी साइज ने फोन मध्ये डाउनलोड होईल. शाओमी मीयूआई 10 चा नवीन अपडेट ओवर द एयर म्हणजे ओटीए च्या माध्यमातून रेडमी नोट 5 प्रो स्मार्टफोन्सना देत आहे. आपल्या फोन मध्ये नवीन अपडेटची उपलब्धता जाणून घेण्यासाठी मीयूआई फोरम वर जा किंवा सिस्टम अपडेट चेक करा.

असा करा इंस्टाल

जर तुम्हाला मीयूआई 10 चा ओटीए अपडेट मिळाला नसेल तर फोनच्या सेटिंग्स मधील अबाउट फोन मध्ये जाऊन सिस्टम अपडेट वर क्लिक करून उपलब्ध अपडेट मॅनुअली चेक करू शकता.

तुमच्या फोन मध्ये मीयूआई 10 च्या नवीन वर्जनचा अपडेट आला असेल तर तो डाउनलोड करा.

फाईल डाउनलोड झाल्यावर इंस्टाल अपडेट वर क्लिक करा, तुमचा फोन आपोआप बूट मोड मध्ये जाईल.

काही मिनिटांत तुमचा शाओमी स्मार्टफोन कंपनीच्या लेटेस्ट यूजर इंटरफेस मीयूआई 10 च्या नवीन वर्जन वर अपडेट होईल.

लक्षात ठेवा नवीन अपडेट इंस्टाल होत असताना फोनची बॅटरी कमीत कमी 30 टक्के असावी.

The post शाओमी रेडमी नोट 5 प्रो यूजर्स साठी मोठी बातमी, फोनला मिळाला मीयूआई 10 चा सर्वात नवीन अपडेट, असा करा इंस्टाल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/miui-10-new-version-update-on-xiaomi-redmi-note-5-pro-in-marathi/feed/ 0
शाओमीचा दिवाळी धमाका: रिटेल स्टोर्स वर मिळेल 3,000 रुपयांचा डिस्काउंट आणि 1,000 रुपयांचा कॅशबॅक, आॅनलाईन सेल पेक्षा स्वस्त झाले फोन https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-offer-discount-on-redmi-phone-in-offline-store-with-cashback-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-offer-discount-on-redmi-phone-in-offline-store-with-cashback-in-marathi/#respond Thu, 18 Oct 2018 05:58:28 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=2558 शाओमी आज इंडियन स्मार्टफोन बाजाराच्या मोठया हिस्स्यावर राज्य करत आहे. शाओमीचे स्मार्टफोन देशात नंबर वन पोजिशन मिळवत आहेत. शाओमी फॅन कंपनीच्या स्मार्टफोन वर जितका विश्वास ठेवतात शाओमी इंडिया पण आपल्या यूजर्सची तितकीच काळजी घेते. वेळोवेळी मी सेल आयोजित करणारी शाओमी ने दिवाळीच्या निमित्ताने शाओमीच्या आॅफलाईन ग्राहकांसाठी खुपच शानदार आॅफर्सची सुरवात केली आहे. या खास आॅफर […]

The post शाओमीचा दिवाळी धमाका: रिटेल स्टोर्स वर मिळेल 3,000 रुपयांचा डिस्काउंट आणि 1,000 रुपयांचा कॅशबॅक, आॅनलाईन सेल पेक्षा स्वस्त झाले फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
शाओमी आज इंडियन स्मार्टफोन बाजाराच्या मोठया हिस्स्यावर राज्य करत आहे. शाओमीचे स्मार्टफोन देशात नंबर वन पोजिशन मिळवत आहेत. शाओमी फॅन कंपनीच्या स्मार्टफोन वर जितका विश्वास ठेवतात शाओमी इंडिया पण आपल्या यूजर्सची तितकीच काळजी घेते. वेळोवेळी मी सेल आयोजित करणारी शाओमी ने दिवाळीच्या निमित्ताने शाओमीच्या आॅफलाईन ग्राहकांसाठी खुपच शानदार आॅफर्सची सुरवात केली आहे. या खास आॅफर अंतर्गत शाओमी आपल्या स्मार्टफोन्स वर 3,000 रूपयांची सूट आणि 1,000 रुपयांचा कॅशबॅक देत आहे.

शाओमीने दिवाळीच्या निमित्ताने आयोजित केलेला हा सेल खास करुन त्या ग्राहकांसाठी आहे जे इंटरनेट वर आॅनलाईन शॉपिंग करत नाहीत तर आपल्या जवळच्या रिटेल स्टोर्स व दुकानातून स्मार्टफोन विकत घेतात. शाओमी आपल्या या फेस्टिवल आॅफर अंतर्गत कंपनीच्या काही हिट स्मार्टफोन्स वर डिस्काउंट देत आहे. या डिस्काउंट नंतर रिटेल स्टोर्स वरून विकत मिळणारे शाओमी स्मार्टफोन आॅनलाईन पेक्षा स्वस्त होतील.

शाओमी आॅफर अंतर्गत आॅफलाईन बाजारात 13,499 रुपयांमध्ये मिळणारा शाओमी रेडमी वाय2 च्या 4जीबी रॅम वेरिएंट वर 2,000 रूपयांची सूट देण्यात येत आहे. या डिस्काउंट नंतर रेडमी वाय2 फक्त 11,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच 17,499 रुपयांमध्ये मिळणारा शाओमी मी ए2 आॅफर अंतर्गत दोन हजार रुपयांच्या डिसकाउंट नंतर 15,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

शाओमीच्या हिट स्मार्टफोन रेडमी नोट 5 प्रो वर पण कंपनी थेट 2,000 रूपयांची सूट देत आहे. आता पर्यंत शाओमी रेडमी नोट 5 प्रो चा 4जीबी रॅम/64जीबी मेमरी वेरिएंट 13,999 रुपये आणि 6जीबी रॅम/64जीबी मेमरी वेरिएंट 16,999 रुपयांमध्ये विकत घेता येत होता.

शाओमी आपल्या हाईएंड डिवाईस मी मिक्स 2 वर ग्राहकांना 3,000 रुपयांचा डिस्काउंट देत आहे. मी मिक्स 2 आता पर्यंत 30,499 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध होता तो फोन आता 27,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल. या डिस्काउंट सोबतच शाओमी स्मार्टफोन्सच्या खरेदीवर कॅशबॅक पण देत आहे. एसबीआई कार्ड ने फोन खरेदी केल्यास शाओमी 500 रुपयांचा फ्लॅट कॅशबॅक देत आहे.

जर तुम्ही 10,000 रुपयांपेक्षा कमी किंमत पेटीएम मधून दिलीत तर 500 रुपयांचा कॅशबॅक मिळेल. तसेच जर 10,000 रुपयांपेक्षा जास्त किंमतीचा फोन विकत घेतल्यास 1,000 रुपयांचा कॅशबॅक मिळेल. या स्पेशल आॅफर अंतर्गत कंपनीचा पोको एफ1 नो कॉस्ट ईएमआई वर विकत घेता येईल. शाओमीच्या या शानदार आॅफर ची सुरवात आज 18 ऑक्टोबर पासून झाली आहे आणि ही दिवाळी पर्यंत म्हणजे 9 नोव्हेंबर पर्यंत चालू असेल.

The post शाओमीचा दिवाळी धमाका: रिटेल स्टोर्स वर मिळेल 3,000 रुपयांचा डिस्काउंट आणि 1,000 रुपयांचा कॅशबॅक, आॅनलाईन सेल पेक्षा स्वस्त झाले फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-offer-discount-on-redmi-phone-in-offline-store-with-cashback-in-marathi/feed/ 0
शाओमी रेडमी नोट 5 प्रो झाला अजूनच स्टाइलिश, रेड कलर मध्ये झाला लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-5-pro-red-variant-launch-feature-specifications-price-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-5-pro-red-variant-launch-feature-specifications-price-in-marathi/#respond Tue, 04 Sep 2018 11:21:46 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1943 शाओमी रेडमी नोट 5 प्रो आधी ब्लॅक, ब्लू, गोल्ड आणि रोज गोल्ड कलर मध्ये मिळत होता तसेच आता हा फोन नवीन लुक सह रेड कलर मध्ये विकत घेता येईल.

The post शाओमी रेडमी नोट 5 प्रो झाला अजूनच स्टाइलिश, रेड कलर मध्ये झाला लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
रेडमी नोट 5 प्रो शाओमी च्या हिट स्मार्टफोन्स पैकी एक आहे. या फोन ने पण आपल्या लॉन्च सोबतच अनेक रिकॉर्ड बनवले. रेडमी नोट 5 प्रो ची मागणी इतकी होती की आपल्या प्रत्येक फ्लॅश सेल मध्ये हा स्टॉक आउट होत असे. पण फॅन्सची समस्या पाहून शाओमी रेडमी नोट 5 प्रो ओपन सेल साठी उपलब्ध करण्यात आला आहे. तसेच आता पुन्हा आपल्या फॅन्सना भेट देत शाओमी ने आज रेडमी नोट 5 प्रो नवीन लुक सह सादर केला आहे. कंपनी ने शाओमी रेडमी नोट 5 प्रो रेड कलर वेरिएंट मध्ये लॉन्च केला आहे.

शाओमी रेडमी नोट 5 प्रो आधी ब्लॅक, ब्लू, गोल्ड आणि रोज गोल्ड कलर मध्ये मिळत होता तसेच आता हा फोन नवीन लुक सह रेड कलर मध्ये विकत घेता येईल. रेडमी नोट 5 प्रो च्या या नवीन कलर वेरिएंटचा फ्रंट पॅनल ब्लॅक आहे तर फोनचा बॅक पॅनल पूर्णपणे रेड म्हणजे लाल आहे. फोनच्या बॅक पॅनल वर वर्टिकल शेप चा डुअल रियर कॅमेरा आणि फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तर बॅक पॅनल वर खालच्या बाजूला शाओमी चा लोगो आहे.

शाओमी रेडमी नोट 5 प्रो चे दोन वेरिएंट सेल साठी उपलब्ध आहेत. यात 4जीबी रॅम/64जीबी मेमरी वेरिएंट आणि 6जीबी रॅम/64जीबी मेमरी वेरिएंट यांचा समावेश आहे. 4जीबी रॅम वेरिएंट 14,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल तर 6जीबी रॅम वेरिएंट घेण्यासाठी यूजर्सना 16,999 रुपये द्यावे लागतील. हे दोन्ही वेरिएंट्स फ्लिपकार्ट वरून विकत घेता येतील. तसेच यांच्या खरेदीवर कंपनी एक्सिस बँक क्रेडिट कार्ड धारकांना 5 टक्क्यांचा अतिरिक्त डिस्काउंट देत आहे.

रेडमी नोट 5 प्रो चे कलर वेरिएंट पाहता मी डॉट कॉम सोबत फ्लिपकार्ट वर 4जीबी रॅम वेरिएंट ब्लॅक, ब्लू, गोल्ड आणि रोज कलर ऑप्शन मध्ये विकत घेता येईल. तसेच जर तुम्हाला 6जीबी रॅम वेरिएंट घ्यायचा असेल तर तो सध्या फक्त लेक ब्लू कलर वेरिएंट मध्ये घेता येईल. शाओमी रेडमी नोट 5 प्रो चे फीचर्स फुल चे स्पेसिफिकेशन्स जाणून घेण्यासाठी तसेच फोन चा रिव्यू वाचण्यासाठी (इथे क्लिक करा)

The post शाओमी रेडमी नोट 5 प्रो झाला अजूनच स्टाइलिश, रेड कलर मध्ये झाला लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-5-pro-red-variant-launch-feature-specifications-price-in-marathi/feed/ 0
शाओमी फॅन्स साठी खुशखबर : रेडमी नोट 5 प्रो साठी आता बघावी लागणार नाही फ्लॅश सेल ची वाट, ओपन सेल साठी झाला उपलब्ध https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-5-pro-available-for-open-sale-feature-specification-price-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-5-pro-available-for-open-sale-feature-specification-price-in-marathi/#respond Mon, 13 Aug 2018 13:10:59 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1697 कंपनी ने रेडमी नोट 5 प्रो ओपन सेल साठी सादर केला.

The post शाओमी फॅन्स साठी खुशखबर : रेडमी नोट 5 प्रो साठी आता बघावी लागणार नाही फ्लॅश सेल ची वाट, ओपन सेल साठी झाला उपलब्ध first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
शाओमी च्या हिट स्मार्टफोन्स मध्ये साल 2018 मध्ये भारतात रेडमी नोट 5 प्रो ने यशाचे अनेक रेकॉर्ड बनवले आहेत. शाओमीचा हा फोन इतका जास्त डिमांड मध्ये राहिला आहे की फोनचा फ्लॅश सेल सुरू होताच हा मिनिटांमध्ये विकला जातो. शाओमी फॅन व स्मार्टफोन यूजर्स कित्येक दिवस आधी फोन च्या फ्लॅश सेल ची वाट बघत असत तरीही अनेकांना हा फोन मिळत नसे. आपल्या फॅन्सच्या समस्येला उपाय म्हणून शाओमी ने यूजर्सना नवीन भेट दिली आहे. कंपनी ने रेडमी नोट 5 प्रो ओपन सेल साठी सादर केला.

शाओमी इंडिया ने रेडमी नोट 5 प्रो ओपन सेल साठी आणला आहे. म्हणजे रेडमी नोट 5 प्रो घेण्यासाठी आता कोणत्याही फ्लॅश सेल ची वाट बघावी लागणार नाही तर शाओमी फॅन जेव्हा हवं तेव्हा रेडमी नोट 5 प्रो आॅनलाईन विकत घेऊ शकतात. शाओमी ने रेडमी नोट 5 प्रो कंपनी च्या आॅफिशियल वेबसाइट आणि शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर ओपन सेल साठी सादर करण्यात आला आहे.

शाओमी रेडमी नोट 5 प्रो चे दोन्ही वेरिएंट ओपन सेल साठी उपलब्ध झाले आहेत. यात 4जीबी रॅम/64जीबी मेमरी वेरिएंट आणि 6जीबी रॅम/64जीबी मेमरी वेरिएंट यांचा समावेश आहे. 4जीबी रॅम वेरिएंट 14,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल तर 6जीबी रॅम वेरिएंट घेण्यासाठी यूजर्सना 16,999 रुपये द्यावे लागतील. हे दोन्ही वेरिएंट्स च्या खरेदीवर कंपनी एक्सिस बँक क्रेडिट कार्ड धारकांना 5 टक्क्यांचा अतिरिक्त डिस्काउंट देत आहे.

रेडमी नोट 5 प्रो चे कलर वेरिएंट पाहता मी डॉट कॉम सोबत फ्लिपकार्ट वर 4जीबी रॅम वेरिएंट ब्लॅक, ब्लू, गोल्ड आणि रोज कलर ऑप्शन मध्ये विकत घेता येईल. तसेच जर तुम्हाला 6जीबी रॅम वेरिएंट घ्यायचा असेल तर तो सध्या फक्त लेक ब्लू कलर वेरिएंट मध्ये घेता येईल. शाओमी रेडमी नोट 5 प्रो चे फीचर्स फुल चे स्पेसिफिकेशन्स जाणून घेण्यासाठी तसेच फोन चा रिव्यू वाचण्यासाठी (इथे क्लिक करा)

The post शाओमी फॅन्स साठी खुशखबर : रेडमी नोट 5 प्रो साठी आता बघावी लागणार नाही फ्लॅश सेल ची वाट, ओपन सेल साठी झाला उपलब्ध first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-5-pro-available-for-open-sale-feature-specification-price-in-marathi/feed/ 0