Samsung Galaxy A60 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 23 Jan 2023 05:13:54 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 लॉन्चच्या आधीच समोर आले सॅमसंग गॅलेक्सी ए60 चे फुल स्पेसिफिकेशन्स, बघा किती दमदार असेल हा फोन https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a60-full-specifications-listed-on-tenaa-32mp-selfie-camera-8gb-ram/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a60-full-specifications-listed-on-tenaa-32mp-selfie-camera-8gb-ram/#respond Tue, 26 Mar 2019 15:01:11 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3937 अशा आहे कि येत्या 10 एप्रिलला सॅमसंग गॅलेक्सी ए90 सोबत गॅलेक्सी ए60 पण लॉन्च केला जाईल.

The post लॉन्चच्या आधीच समोर आले सॅमसंग गॅलेक्सी ए60 चे फुल स्पेसिफिकेशन्स, बघा किती दमदार असेल हा फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सॅमसंग गॅलेक्सी ए सीरीजचा आगामी डिवाईस गॅलेक्सी ए60 गेल्याच आठवड्यात चीनी सर्टिफिकेशन्स साइट टेना वर दिसला होता. या लिस्टिंग मध्ये गॅलेक्सी ए60 सोबत गॅलेक्सी ए70 स्मार्टफोन पण लिस्ट केला गेला होता. स्मार्टफोन लिस्टिंग मध्ये दोन्ही फोनचे काही महत्वाचे स्पेसिफिकेशन्स समोर आले होते तसेच टेना लिस्टिंग नंतर काही दिवसांनी कंपनी ने गॅलेक्सी ए70 समोर आणत टेक मंचावर सादर केला होता. गॅलेक्सी ए70 च्या लॉन्च नंतर आता पुन्हा एकदा गॅलेक्सी ए60 चीनी सर्टिफिकेशन्स साइट वर दिसला आहे. पण यावेळी टेना ने गॅलेक्सी ए60 फुल स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स सह लिस्ट केला आहे.

टेना लिस्टिंग
सॅमसंग गॅलेक्सी ए60 पुन्हा एकदा चीनी सर्टिफिकेशन्स साइट टेना वर लिस्ट केला गेला आहे. या वेबसाइट वर गॅलेक्सी ए60 एसएम-ए6060 मॉडेल नंबर सह लिस्ट केला गेला आहे. टेनाच्या जुन्या लिस्टिंग मध्ये फोनची ईमेज दाखवण्यात आली होती, ज्यावरून गॅलेक्सी ए60 चा लुक आणि डिजाईनची माहिती मिळाली होती आता टेना वर हि लिस्टिंग पूर्ण झाली आहे. अर्थात् टेनाच्या लिस्टिंग मध्ये आता गॅलेक्सी ए60 चे स्पेसिफिकेशन्स पण दिसत आहेत.

सॅमसंग गॅलेक्सी चा ए60 लुक
टेनाच्या या लिस्टिंग मध्ये गॅलेक्सी ए60 पंच होल डिस्प्ले वर बनलेला दाखवण्यात आला आहे. असाच डिस्प्ले गॅलेक्सी ए10 सीरीजच्या स्मार्टफोन्स मध्ये होता. पण गॅलेक्सी ए70 इनफिनिटी-वी डिस्प्ले वर लॉन्च केला गेला आहे, त्यामुळे गॅलेक्सी ए60 च्या डिस्प्ले लुक वर थोडी शंका येते. तसेच टेना वरील फोटोज मध्ये गॅलेक्सी ए60 ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप ने सुसज्ज दाखवण्यात आला आहे. फोनच्या बॅक पॅनल वर डावीकडे वर्टिकल शेप मध्ये तीन कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत. फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर पण आहे.

तुमचा वोटर आईडी वैध आहे कि नाही ! तपासा असे

सॅमसंग गॅलेक्सी ए60 चे स्पेसिफिकेशन्स
गॅलेक्सी ए60 चे स्पेसिफिकेशन्स पाहता टेना नुसार हा स्मार्टफोन 19.5:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला जाईल जो 6.3-इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करेल. गॅलेक्सी ए60 मध्ये एंडरॉयड चा लेटेस्ट ओएस एंडरॉयड 9 पाई असेल सोबत हा फोन आक्टा-कोर प्रोसेसर आणि सॅमसंगच्या एक्सनॉस चिपसेट वर चालेल. टेना लिस्टिंग मध्ये चिपसेट मॉडेलची माहिती मिळाली नाही.

टेना नुसार सॅमसंग हा फोन दोन रॅम वेरिएंट्स मध्ये लॉन्च करू शकते. या वेरिएंट्स मध्ये 6जीबी रॅम आणि 8जीबी रॅम असेल जे 64जीबी मेमरी तसेच 128जीबी इंटरनल स्टोरेज वर लॉन्च केले जाऊ शकतात. सर्टिफिकेशन्स साइटच्या लिस्टिंग मध्ये गॅलेक्सी ए60 चे कॅमेरा डिटेल्स पण सांगण्यात आले आहेत. टेनानुसार गॅलेक्सी ए60 च्या बॅक पॅनल वर 16-मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर दिला जाईल. तसेच फोन मध्ये 8-मेगापिक्सलची टेलीफोटो लेंस तर 5-मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर असेल.

2 एप्रिलला लॉन्च होईल नोकिया एक्स71, पंच-होल डिस्प्ले सह मिळेल 48-एमपी कॅमेरा

गॅलेक्सी ए60 मध्ये सेल्फी साठी 32-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा सेंसर दिला जाऊ शकतो जो पंच-होल मध्ये असेल. टेना वर सांगण्यात आले आहे कि गॅलेक्सी ए60 मध्ये पावर बॅकअप साठी 3,410एमएएच ची बॅटरी दिली जाऊ शकते. लिस्टिंग नुसार सॅमसंग गॅलेक्सी ए60 ब्लॅक, ब्लू आणि ऑरेंज कलर वेरिएंट मध्ये बाजारात येईल. अशा आहे कि येत्या 10 एप्रिलला सॅमसंग गॅलेक्सी ए90 सोबत गॅलेक्सी ए60 पण लॉन्च केला जाईल.

The post लॉन्चच्या आधीच समोर आले सॅमसंग गॅलेक्सी ए60 चे फुल स्पेसिफिकेशन्स, बघा किती दमदार असेल हा फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a60-full-specifications-listed-on-tenaa-32mp-selfie-camera-8gb-ram/feed/ 0
मोठी बॅटरी आणि मोठ्या स्क्रीन सह आला सॅमसंगचा धमाकेदार गॅलेक्सी ए70 फोन, बघा याचे शानदार फीचर्स https://www.91mobiles.com/marathi/galaxy-a70-official-with-32mp-cameras/ https://www.91mobiles.com/marathi/galaxy-a70-official-with-32mp-cameras/#respond Tue, 26 Mar 2019 08:20:51 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3928 स्टीव नामक एका टिप्सटर ने ट्विटर वर सांगितले कि गॅलेक्सी ए90 मध्ये ओपो फाइंड एक्स प्रमाणे रोटेटिंग कॅमेरा असेल

The post मोठी बॅटरी आणि मोठ्या स्क्रीन सह आला सॅमसंगचा धमाकेदार गॅलेक्सी ए70 फोन, बघा याचे शानदार फीचर्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
साउथ कोरियातील दिग्गज कंपनी सॅमसंग 10 एप्रिलला ‘गॅलेक्सी ईवेंट’ चे आयोजन करणार आहे. पण या इवेंट मध्ये कोणते डिवाइस समोर येतील याबद्दल सध्या कोणतीही माहिती समोर आलेली नाही. आता कंपनी ने आपल्या गॅलेक्सी ए सीरीज मध्ये एक नवीन स्मार्टफोन गॅलेक्सी ए70 सादर केला आहे.

साल 2019 मध्ये गॅलेक्सी ए सीरीज मध्ये कंपनी ने आतापर्यंत गॅलेक्सी ए40, गॅलेक्सी ए10, गॅलेक्सी ए20, गॅलेक्सी ए30 आणि गॅलेक्सी ए50 सादर केले आहेत. तसेच परवा गॅलेक्सी ए60 सह गॅलेक्सी ए70 टेना वर दिसला होता. टेना लिस्टिंग नंतर कंपनीने दोन फोन्स पैकी गॅलेक्सी ए70 ऑफिशियली सादर केला आहे.

सॅमसंग गॅलेक्सी ए70 चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स
सॅमसंग गॅलेक्सी ए70 बद्दल बोलायचे तर यात 6.7-इंचाचा फुल एचडी+ सुपर ऐमोलेड इनफिनिटी-यू डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच फोन मध्ये सिक्योरिटी साठी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर आहे. अशाप्रकारचा ऑप्टिकल सेंसर कंपनी ने गॅलेक्सी ए50 मध्ये दिला होता. वाटरड्रॉप नॉच सह सादर केल्या गेलेल्या या फोन मध्ये ऑक्टा-कोर प्रोसेसर आणि 6जीबी व 8जीबी रॅम सह 128जीबी इंटरनल स्टोरेजचा ऑप्शन देण्यात आला आहे.

पावर बॅकअप साठी गॅलेक्सी ए70 मध्ये 4,500एमएएच ची बॅटरी 25 वॉट फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजी सह देण्यात आली आहे. अशाचप्ररकची टेक्नॉलॉजी कंपनीने याआधी गॅलेक्सी एस10 5जी मध्ये सादर केली आहे. बोलले जात आहे कि सॅमसंग यावर्षीच्या शेवटीपर्यंत हि टेक्नॉलॉजी आपल्या सर्व नवीन फोन मध्ये उपलब्ध करेल.

सॅमसंग गॅलेक्सी ए70 मध्ये सेल्फी आणि वीडियो कॉलिंग साठी 32एमपी फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच मागे 32-मेगापिक्सल सेंसर प्राइमरी आहे जो 8-मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि 5-मेगापिक्सल डेप्थ सेंसिंग कॅमेरा सह येतो.

सध्या कंपनी ने गॅलेक्सी ए70 ची किंमत आणि उपलब्धता याबद्दल माहिती दिली नाही. तसेच कंपनी 10 एप्रिलला एका इवेंटचे आयोजन करणार आहे, ज्याबद्दल काही दिवसांपूर्वी ऑफिशियल ट्विटर हँडेल वरून ट्विट करण्यात आले होते. इवेंट कुठे होईल याची माहिती समोर आलेली नाही. पण अशा आहे कि या इवेंट मध्ये गॅलेक्सी ए सीरीज ग्लोबली सादर केली जाईल.

विशेष म्हणजे गॅलेक्सी ए सीरीजचा गॅलेक्सी ए90 स्मार्टफोन काही दिवसांपूर्वी यूके मध्ये कंपनीच्या आफिशियल वेबसाइट वर दिसला होता. लीकनुसार या स्मार्टफोन मध्ये ‘स्लाइडिंग एंड रोटेटिंग कॅमेरा सिस्टम’ असू शकते. तसेच स्टीव नामक एका टिप्सटर ने ट्विटर वर सांगितले कि गॅलेक्सी ए90 मध्ये ओपो फाइंड एक्स प्रमाणे रोटेटिंग कॅमेरा असेल. पण टिप्सटर ने हि बातमी निश्चित नाही असे देखील सांगितले.

The post मोठी बॅटरी आणि मोठ्या स्क्रीन सह आला सॅमसंगचा धमाकेदार गॅलेक्सी ए70 फोन, बघा याचे शानदार फीचर्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/galaxy-a70-official-with-32mp-cameras/feed/ 0
मोठी स्क्रीन, मोठी बॅटरी आणि ट्रिपल कॅमेऱ्यासह सॅमसंग घेऊन येत आहे दोन मोठे डिवाइस https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a60-and-a70-come-with-big-display-big-battery-and-triple-rear-camera/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a60-and-a70-come-with-big-display-big-battery-and-triple-rear-camera/#respond Mon, 25 Mar 2019 10:14:27 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3911 विशेष म्हणजे सॅमसंगच्या नवीन गॅलेक्सी ए-सीरीज मध्ये आतापर्यंत गॅलेक्सी ए40, गॅलेक्सी ए10, गॅलेक्सी ए20, गॅलेक्सी ए30 आणि गॅलेक्सी ए50 लॉन्च केले गेले आहेत.

The post मोठी स्क्रीन, मोठी बॅटरी आणि ट्रिपल कॅमेऱ्यासह सॅमसंग घेऊन येत आहे दोन मोठे डिवाइस first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
साउथ कोरियन इलेक्ट्रॉनिक कंपनी सॅमसंगने यावर्षी आपली अगदी नवीन गॅलेक्सी ‘एम’ सीरीज बाजारात आणली होती. तसेच कंपनीने आपल्या ‘ए’ सीरीज मध्ये पण नवीन स्मार्टफोन्स लॉन्च केले आहेत. सोबत सॅमसंग गॅलेक्सी ए सीरीजच्या आगामी स्मार्टफोन्स बद्दल पण अनेक लीक्स येत असतात. अलीकडेच गॅलेक्सी ए70 ब्लूटूथ सर्टिफिकेशन साइटने सर्टिफाइड केला होता. तर आता गॅलेक्सी ए60 आणि ए70 टेना वर स्पॉट केला गेला आहे.

चीनच्या सर्टिफिकेशन साइट टेना वर गॅलेक्सी ए60 आणि ए70 काही स्पेसिफिकेशन्स सह स्पॉट केला गेला आहे. या दोन्ही फोन्सव्यतिरिक्त असे बोलले जात आहे कि ‘ए’ सीरीज मधील फोन ए90 नॉचलेस डिस्प्ले सह पुढल्या महिन्यात 10 एप्रिलला होणाऱ्या इवेंट मध्ये सादर केला जाऊ शकतो.

टेना वर सॅमसंगचे हे स्मार्टफोन्स गॅलेक्सी एसएम-ए6060 मॉडेल नंबर आणि गॅलेक्सी एसएम-ए7050 मॉडेल नंबर सह स्पॉट केले गेले आहेत. हे दोन्ही मॉडेल नंबर क्रमश: गॅलेक्सी ए60 आणि गॅलेक्सी ए70 चे आहेत असे सांगण्यात आले आहे. ए60 बद्दल बोलायचे तर लिस्टिंगनुसार डिवाइस मध्ये 6.3-इंचाचा डिस्प्ले असेल. तसेच पावर बॅकअप साठी फोन मध्ये 3,410एमएएच असेल.

टेना वर समोर आलेल्या फोटोनुसार ए60 च्या डिजाइनची माहिती मिळाली आहे. या फोन मध्ये इनफिनिटी-वी डिस्प्ले दिला जाईल. तसेच बॅक मध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप आणि एलईडी फ्लॅश मॉड्यूल असेल. तसेच फोनच्या मागे फिंगरप्रिंट सेंसर दिसत आहे, ज्याचा अर्थ असा कि फोन मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर नसेल.

गॅलेक्सी ए70 पाहता हा एसएम-ए7050 मॉडेल नंबर सह लिस्ट केला गेला आहे. लिस्टिंगनुसार या फोन मध्ये 6.7-इंचाचा डिस्प्ले आणि 4,400एमएएच ची बॅटरी असेल. डिस्प्ले साइज पाहता गॅलेक्सी ए60 पेक्षा गॅलेक्सी ए70 मोठा आहे. तसेच गॅलेक्सी ए60 मध्ये इनफिनिटी-ओ डिस्प्ले असेल. डिजाइन बद्दल बोलायचे तर फोनच्या मागे ट्रिपल रियर कॅमेरा एलईडी फ्लॅश सह दिला जाईल.

साउथ कोरियातील्या दिग्गज कंपनी सॅमसंगने काही दिवसांपूर्वी घोषणा केली आहे कि ते येत्या 10 एप्रिलला ‘गॅलेक्सी ईवेंट’ चे आयोजन करणार आहेत. या इवेंट मध्ये कोणते डिवाइस येतील याची कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. असे सांगण्यात आले आहे कि या इवेंट मध्ये कंपनी ग्लाबोली ए सीरीजचे सर्व फोन्स सादर करू शकते.

विशेष म्हणजे सॅमसंगच्या नवीन गॅलेक्सी ए-सीरीज मध्ये आतापर्यंत गॅलेक्सी ए40, गॅलेक्सी ए10, गॅलेक्सी ए20, गॅलेक्सी ए30 आणि गॅलेक्सी ए50 लॉन्च केले गेले आहेत. तसेच या सीरीज मध्ये येणारे नवीन फोन कंपनी 10 एप्रिलला होणाऱ्या इवेंट मध्ये सादर करू शकते.

The post मोठी स्क्रीन, मोठी बॅटरी आणि ट्रिपल कॅमेऱ्यासह सॅमसंग घेऊन येत आहे दोन मोठे डिवाइस first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a60-and-a70-come-with-big-display-big-battery-and-triple-rear-camera/feed/ 0
32एमपी सेल्फी कॅमेरा आणि इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर सह येईल सॅमसंग गॅलेक्सी ए60 स्मार्टफोन https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a60-specifications-leaked-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a60-specifications-leaked-in-marathi/#respond Tue, 05 Mar 2019 09:52:51 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3766 अपकमिंग ए60 हॅन्डसेट मध्ये 3डी ग्लासस्टिक कंस्ट्रक्शन असेल.

The post 32एमपी सेल्फी कॅमेरा आणि इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर सह येईल सॅमसंग गॅलेक्सी ए60 स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सॅमसंग यावर्षीच्या सुरवातीपासून सतत चर्चेत आहे. कंपनी आतापर्यंत गॅलेक्सी एस10 सीरीज, गॅलेक्सी एम सीरीज सोबत गॅलेक्सी ए सीरीज मध्ये आपले स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. तसेच आता बातमी येत आहे कि कंपनी आपल्या ए सीरीज मध्ये एकूण 9 स्मार्टफोन लॉन्च करेल. आतापर्यंत या सीरीज मध्ये कंपनीने गॅलेक्सी ए 10, गॅलेक्सी ए 30 आणि गॅलेक्सी ए 50 लॉन्च केले आहेत.

तसेच काही दिवसांपूर्वी एक रिपोर्ट आला होता ज्यात सांगण्यात आले होते कि सॅमसंग तीन अश्या स्मार्टफोन्स वर काम करत आहे ज्यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर दिला जाईल. सांगण्यात आले होते कि हे तिन्ही फोन गॅलेक्सी ए सीरीजचे असतील आणि हे गॅलेक्सी ए90, गॅलेक्सी ए70, गॅलेक्सी ए60 तसेच गॅलेक्सी ए50 नावाने बाजारात येतील. तसेच आता या सीरीज मध्ये सादर केल्या जाणाऱ्या गॅलेक्सी ए60 स्मार्टफोनची अजून थोडी माहिती समोर आली आहे.

हा लीक स्लॅशलीक्स द्वारा समोर आला आहे, ज्यात गॅलेक्सी ए60 च्या स्पेसिफिकेशन्सची माहिती मिळाली आहे. समोर आलेल्या फोटो नुसार गॅलेक्सी ए50 आणि गॅलेक्सी S60 ची डिजाइन जवळपास एक सारखी असेल. प बोलले जात आहे कि गॅलेक्सी ए60 चा डिस्प्ले थोडा मोठा म्हणजे 6.7-इंचाचा असेल जो फुल एचडी+ स्क्रीन रिजॉल्यूशन सह येईल. तसेच फोन गॅलेक्सी ए50 प्रमाणे हा इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर सह येईल. स्पेसिफिकेशन शीट मधून समजले आहे कि अपकमिंग ए60 हॅन्डसेट मध्ये 3डी ग्लासस्टिक कंस्ट्रक्शन असेल.

सॅमसंगचा आगामी स्मार्टफोन गॅलेक्सी ए60 बेजल लेस पंच-होल नॉच डिस्प्ले सह येईल. म्हणजे या फोनच्या फ्रंट पॅनल वर बॉडी पार्ट देण्यात येणार नाही. फोनच्या डिस्प्ले मध्ये एक छिद्र असेल आणि या छिद्रात सेल्फी कॅमेरा असेल. तसेच फोटो नुसार कंपनी सॅमसंग गॅलेक्सी ए60 मध्ये एसएम6150 क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन प्रोसेसर असेल. हॅन्डसेट दोन वेरिएंट मध्ये सादर केला जाईल, ज्यात 6जीबी आणि 8जीबी रॅम सह 128जीबी स्टोरेज दिली जाईल.

फोटोग्राफी साठी गॅलेक्सी ए60 मध्ये फ्रंट कॅमेरा 32-मेगापिक्सलचा असेल. तसेच फोन मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप असेल जो गॅलेक्सी ए50 मध्ये होता. यात प्राइमरी शूटर मध्ये बदल होतील. सोबत पावर बॅकअप साठी फोन मध्ये 4,500एमएएच ची बॅटरी असेल.

किंमत पाहता कंपनी गॅलेक्सी ए60 गॅलेक्सी 50 आणि ए 70 च्या मध्ये सादर केला जाऊ शकतो. सध्या या डिवाइसची ऑफिशियल किंमत आणि उपलब्धता समोर आलेली नाही. काही दिवसांपूर्वी आलेल्या रिपोर्ट नुसार सॅमसंग गॅलेक्सी ए60 गॅलेक्सी ए90, गॅलेक्सी ए70 आणि गॅलेक्सी ए50 स्मार्टफोन सोबत दुसऱ्या तिमाहीत सादर करू शकते. गॅलेक्सी ए60 एप्रिल मध्ये लॉन्च होऊ शकतो.

सॅमसंग बद्दल सांगण्यात आले आहे कि कंपनी यावर्षी आपल्या गॅलेक्सी ए सीरीज मध्ये 9 स्मार्टफोन लॉन्च करणार आहे आणि या 9 मध्ये 3 स्मार्टफोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर सह येतील. गॅलेक्सी ए60 मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर दिला जाईल कि नाही याबाबत अजूनही शंका आहे. या सीरीज मध्ये गॅलेक्सी ए90 सर्वात मोठा फ्लॅगशिप फोन असू शकतो ज्यात 8जीबी रॅम आणि 128जीबी इंटरनल स्टोरेज असेल.

The post 32एमपी सेल्फी कॅमेरा आणि इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर सह येईल सॅमसंग गॅलेक्सी ए60 स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a60-specifications-leaked-in-marathi/feed/ 0