सॅमसंग गॅलेक्सी ए सीरीजचा आगामी डिवाईस गॅलेक्सी ए60 गेल्याच आठवड्यात चीनी सर्टिफिकेशन्स साइट टेना वर दिसला होता. या लिस्टिंग मध्ये गॅलेक्सी ए60 सोबत गॅलेक्सी ए70 स्मार्टफोन पण लिस्ट केला गेला होता. स्मार्टफोन लिस्टिंग मध्ये दोन्ही फोनचे काही महत्वाचे स्पेसिफिकेशन्स समोर आले होते तसेच टेना लिस्टिंग नंतर काही दिवसांनी कंपनी ने गॅलेक्सी ए70 समोर आणत टेक मंचावर सादर केला होता. गॅलेक्सी ए70 च्या लॉन्च नंतर आता पुन्हा एकदा गॅलेक्सी ए60 चीनी सर्टिफिकेशन्स साइट वर दिसला आहे. पण यावेळी टेना ने गॅलेक्सी ए60 फुल स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स सह लिस्ट केला आहे.
टेना लिस्टिंग
सॅमसंग गॅलेक्सी ए60 पुन्हा एकदा चीनी सर्टिफिकेशन्स साइट टेना वर लिस्ट केला गेला आहे. या वेबसाइट वर गॅलेक्सी ए60 एसएम-ए6060 मॉडेल नंबर सह लिस्ट केला गेला आहे. टेनाच्या जुन्या लिस्टिंग मध्ये फोनची ईमेज दाखवण्यात आली होती, ज्यावरून गॅलेक्सी ए60 चा लुक आणि डिजाईनची माहिती मिळाली होती आता टेना वर हि लिस्टिंग पूर्ण झाली आहे. अर्थात् टेनाच्या लिस्टिंग मध्ये आता गॅलेक्सी ए60 चे स्पेसिफिकेशन्स पण दिसत आहेत.
सॅमसंग गॅलेक्सी चा ए60 लुक
टेनाच्या या लिस्टिंग मध्ये गॅलेक्सी ए60 पंच होल डिस्प्ले वर बनलेला दाखवण्यात आला आहे. असाच डिस्प्ले गॅलेक्सी ए10 सीरीजच्या स्मार्टफोन्स मध्ये होता. पण गॅलेक्सी ए70 इनफिनिटी-वी डिस्प्ले वर लॉन्च केला गेला आहे, त्यामुळे गॅलेक्सी ए60 च्या डिस्प्ले लुक वर थोडी शंका येते. तसेच टेना वरील फोटोज मध्ये गॅलेक्सी ए60 ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप ने सुसज्ज दाखवण्यात आला आहे. फोनच्या बॅक पॅनल वर डावीकडे वर्टिकल शेप मध्ये तीन कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत. फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर पण आहे.
तुमचा वोटर आईडी वैध आहे कि नाही ! तपासा असे
सॅमसंग गॅलेक्सी ए60 चे स्पेसिफिकेशन्स
गॅलेक्सी ए60 चे स्पेसिफिकेशन्स पाहता टेना नुसार हा स्मार्टफोन 19.5:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला जाईल जो 6.3-इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करेल. गॅलेक्सी ए60 मध्ये एंडरॉयड चा लेटेस्ट ओएस एंडरॉयड 9 पाई असेल सोबत हा फोन आक्टा-कोर प्रोसेसर आणि सॅमसंगच्या एक्सनॉस चिपसेट वर चालेल. टेना लिस्टिंग मध्ये चिपसेट मॉडेलची माहिती मिळाली नाही.
टेना नुसार सॅमसंग हा फोन दोन रॅम वेरिएंट्स मध्ये लॉन्च करू शकते. या वेरिएंट्स मध्ये 6जीबी रॅम आणि 8जीबी रॅम असेल जे 64जीबी मेमरी तसेच 128जीबी इंटरनल स्टोरेज वर लॉन्च केले जाऊ शकतात. सर्टिफिकेशन्स साइटच्या लिस्टिंग मध्ये गॅलेक्सी ए60 चे कॅमेरा डिटेल्स पण सांगण्यात आले आहेत. टेनानुसार गॅलेक्सी ए60 च्या बॅक पॅनल वर 16-मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर दिला जाईल. तसेच फोन मध्ये 8-मेगापिक्सलची टेलीफोटो लेंस तर 5-मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर असेल.
2 एप्रिलला लॉन्च होईल नोकिया एक्स71, पंच-होल डिस्प्ले सह मिळेल 48-एमपी कॅमेरा
गॅलेक्सी ए60 मध्ये सेल्फी साठी 32-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा सेंसर दिला जाऊ शकतो जो पंच-होल मध्ये असेल. टेना वर सांगण्यात आले आहे कि गॅलेक्सी ए60 मध्ये पावर बॅकअप साठी 3,410एमएएच ची बॅटरी दिली जाऊ शकते. लिस्टिंग नुसार सॅमसंग गॅलेक्सी ए60 ब्लॅक, ब्लू आणि ऑरेंज कलर वेरिएंट मध्ये बाजारात येईल. अशा आहे कि येत्या 10 एप्रिलला सॅमसंग गॅलेक्सी ए90 सोबत गॅलेक्सी ए60 पण लॉन्च केला जाईल.