Samsung Galaxy F14 5G - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 16 Mar 2023 05:10:08 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 सॅमसंग गॅलेक्सी एफ14 5जीची डिजाइन लागली आमच्या हाती, कलर ऑप्शन्सही समजले https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-f14-design-colour-options-exclusive/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-f14-design-colour-options-exclusive/#respond Thu, 16 Mar 2023 05:10:08 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=19531 Samsung Galaxy F14 पुढील आठवड्यात कंपनीद्वारे लाँच केला जाईल अशी अफवा आहे. परंतु कंपनीनं आतापर्यंत या हँडसेटच्या लाँचबद्दल कोणतीही माहिती दिली नाही. आता 91mobiles च्या हाती या फोनचा एक्सक्लूसिव्ह फर्स्ट लुक लागला आहे. ज्यामुळे या स्मार्टफोनची डिजाईन तर समजली आहेच तसेच हा फोन पर्पल आणि कलरमध्ये बाजारात येऊ शकतो, हे देखील समोर आलं आहे. Samsung […]

The post सॅमसंग गॅलेक्सी एफ14 5जीची डिजाइन लागली आमच्या हाती, कलर ऑप्शन्सही समजले first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • सॅमसंग गॅलेक्सी एफ14 फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा असू शकतो.
  • हँडसेट पर्पल आणि ग्रीन कलर ऑप्शनसह येऊ शकतो.
  • गॅलेक्सी एफ14 पुढील आठवड्यात भारतात सादर केला जाऊ शकतो.

Samsung Galaxy F14 पुढील आठवड्यात कंपनीद्वारे लाँच केला जाईल अशी अफवा आहे. परंतु कंपनीनं आतापर्यंत या हँडसेटच्या लाँचबद्दल कोणतीही माहिती दिली नाही. आता 91mobiles च्या हाती या फोनचा एक्सक्लूसिव्ह फर्स्ट लुक लागला आहे. ज्यामुळे या स्मार्टफोनची डिजाईन तर समजली आहेच तसेच हा फोन पर्पल आणि कलरमध्ये बाजारात येऊ शकतो, हे देखील समोर आलं आहे.

Samsung Galaxy F14 ची डिजाइन

91mobiles ला मिळालेल्या हाय-क्वॉलिटी रेंडर्समधून समजलं आहे की फोनची डिजाइन जास्त हटके दिसत नाही. याच्या मागे ड्युअल कॅमेरा सेन्सर वेगवेगळ्या सर्कुलर रिंगमध्ये मिळू शकतात आणि एक एलईडी फ्लॅश देखील असू शकतो. फोन पर्पल आणि ग्रीन कलर ऑप्शनमध्ये दिसत आहे. फोनच्या कडा थोड्या घुमावदार दिसत आहेत. तसेच फोनमध्ये वॉल्यूम रॉकर आणि पावर बटन उजवीकडे मिळू शकतात तर बॅक पॅनलवर सॅमसंगचा लोगो तळाला दिसत आहे. आमच्या हाती फोनचा फ्रंट पॅनल लागला नाही. परंतु सेल्फी स्नॅपर आणि मोठ्या बेजलसह या फोनमध्ये वॉटरड्रॉप नॉच मिळू शकते, हा आमचा अंदाज आहे. हे देखील वाचा: Samsung Galaxy A54 5G आणि Galaxy A34 5G सादर; कंपनीनं केली घोषणा

15,000 रुपये असू शकते किंमत

लीक रिपोर्ट्सनुसार Samsung Galaxy F14 पुढील आठवड्यात लाँच केला जाऊ शकतो. तसेच याची किंमत 15,000 रुपयांच्या आसपास असू शकते. त्याचबरोबर डिवाइस फ्लिपकार्ट, सॅमसंग ऑनलाइन स्टोर अनेक मोठ्या ऑफलाइन स्टोरवरून विकला जाऊ शकतो. हँडसेट गॅलेक्सी F13 चा अपग्रेडेड व्हर्जन असू शकतो, अशी चर्चा आहे. हे देखील वाचा: 260W Fast Charging असलेला ब्रँडचा पहिला फोन असू शकतो Infinix GT 10 Pro, रिपोर्टमधून खुलासा

सॅमसंग गॅलेक्सी एफ14 चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स

आमच्या अंदाजानुसार, गॅलेक्सी एफ14 मध्ये FHD + रिजोल्यूशनसह 6.6 इंचाची स्क्रीन आणि स्टँडर्ड 60Hz रिफ्रेश रेट मिळू शकतो. सूत्रांच्यामते फोनमध्ये 5nm चिपसेट दिला जाऊ शकतो जो Exynos 1330 असू शकतो. यात 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज दिली जाऊ शकते. तसेच आगामी एफ-सीरीज फोनमध्ये Android 13 OS आउट ऑफ द बॉक्स बूट होण्याची शक्यता आहे. तसेच फोनमध्ये मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप असू शकतो परंतु सध्या त्यातील सेन्सर्सची माहिती मिळाली नाही.

The post सॅमसंग गॅलेक्सी एफ14 5जीची डिजाइन लागली आमच्या हाती, कलर ऑप्शन्सही समजले first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-f14-design-colour-options-exclusive/feed/ 0
15 हजारांच्या बजेटमध्ये Samsung Galaxy F14 5G फोन पुढील आठवड्यात येऊ शकतो भारतात लाँच https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-f14-5g-phone-might-launch-in-india-next-week-under-15000-budget/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-f14-5g-phone-might-launch-in-india-next-week-under-15000-budget/#respond Wed, 15 Mar 2023 06:33:35 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=19494 सॅमसंगनं सांगितलं आहे की कंपनी येत्या 16 मार्चला भारतात दोन नवीन स्मार्टफोन Samsung Galaxy A54 5G आणि Samsung Galaxy A34 5G लाँच करणार आहे. हे दोन्ही मोबाइल भारतात येण्यापूर्वी एक नवीन बातमी समोर आली आहे त्यानुसार ही कोरियन कंपनी आपल्या ‘एफ’ सीरीजचा Samsung Galaxy F14 5G फोन देखील पुढील आठवड्यात भारतीय बाजारात येऊ शकतो. रिपोर्टनुसार […]

The post 15 हजारांच्या बजेटमध्ये Samsung Galaxy F14 5G फोन पुढील आठवड्यात येऊ शकतो भारतात लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Samsung Galaxy F14 5G पुढील आठवड्यात भारतात लाँच होऊ शकतो.
  • फोन लाँचची माहिती न्यूज एजेंसी आयएएनएसच्या माध्यमातून समोर आली आहे.
  • हा 5जी सॅमसंग मोबाइल 15,000 रुपयांच्या बजेटमध्ये मार्केटमध्ये येऊ शकतो.

सॅमसंगनं सांगितलं आहे की कंपनी येत्या 16 मार्चला भारतात दोन नवीन स्मार्टफोन Samsung Galaxy A54 5G आणि Samsung Galaxy A34 5G लाँच करणार आहे. हे दोन्ही मोबाइल भारतात येण्यापूर्वी एक नवीन बातमी समोर आली आहे त्यानुसार ही कोरियन कंपनी आपल्या ‘एफ’ सीरीजचा Samsung Galaxy F14 5G फोन देखील पुढील आठवड्यात भारतीय बाजारात येऊ शकतो. रिपोर्टनुसार या 5जी मोबाइलची किंमत 15,000 रुपयांपेक्षा कमी असू शकते.

Samsung Galaxy F14 5G इंडिया लाँचची माहिती न्यूज एजेंसी IANS च्या माध्यमातून समोर आली आहे. रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की हा मोबाइल फोन पुढील आठवड्यात देशात ऑफिशियल केला जाऊ शकतो. हा एक लो बजेट 5जी फोन असू शकतो जो 15 हजारांच्या बजेटमध्ये लाँच केला जाऊ शकतो. या फोनची विक्री शॉपिंग साइट फ्लिपकार्टवरून होऊ शकते. विशेष म्हणजे सॅमसंगच्या गॅलेक्सी ‘एफ’ सीरीजचे फोन ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवरच विकले जातात.

सॅमसंग गॅलेक्सी एफ14 5जी फोनमध्ये मिळू शकतात हे स्पेसिफिकेशन्स

मिळालेल्या माहितीनुसार हा सॅमसंग स्मार्टफोन 6,000एमएएचच्या बॅटरीसह बाजारात येऊ शकतो जी 25वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करू शकते. या स्मार्टफोनमध्ये सॅमसंग एक्सनॉस 1330 ऑक्टाकोर प्रोसेसर असू शकतो जो 2 x ARM Cortex-A78 कोर आणि 6 x ARM Cortex-A55 कोर सीपीयू असू शकतो. या फोनमध्ये 6 जीबी रॅम मिळू शकतो.

लीक्सनुसार, Samsung Galaxy F14 5G मध्ये 6.6 इंचाचा मोठा फुलएचडी+ डिस्प्ले मिळू शकतो. ही एक एलसीडी पॅनलवर बनलेली 90हर्ट्ज रिफ्रेश रेट असलेली स्क्रीन असू शकते. फोटोग्राफीसाठी या 5जी सॅमसंग फोनच्या बॅक पॅनलवर 50 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा सेन्सर दिला जाऊ शकतो तर फ्रंट पॅनलवर 16 मेगापिक्सलचा सेल्फी सेन्सर मिळू शकतो.

Samsung Galaxy A14

सॅमसंग कंपनीनं आतापर्यंत गॅलेक्सी एफ14 5जी फोनच्या लाँच बद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. त्यामुळे सध्या फोनच्या लाँच डेट व समोर आलेल्या स्पेसिफिकेशन्सची पुष्टी करता येत नाही. आशा आहे की 16 मार्चला गॅलेक्सी ए34 5जी आणि ए54 5जी फोनच्या इंडिया लाँचनंतर कंपनी Galaxy F14 5G टीज करेल.

The post 15 हजारांच्या बजेटमध्ये Samsung Galaxy F14 5G फोन पुढील आठवड्यात येऊ शकतो भारतात लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-f14-5g-phone-might-launch-in-india-next-week-under-15000-budget/feed/ 0