सॅमसंग गॅलेक्सी एफ14 5जीची डिजाइन लागली आमच्या हाती, कलर ऑप्शन्सही समजले

Highlights

  • सॅमसंग गॅलेक्सी एफ14 फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा असू शकतो.
  • हँडसेट पर्पल आणि ग्रीन कलर ऑप्शनसह येऊ शकतो.
  • गॅलेक्सी एफ14 पुढील आठवड्यात भारतात सादर केला जाऊ शकतो.

Samsung Galaxy F14 पुढील आठवड्यात कंपनीद्वारे लाँच केला जाईल अशी अफवा आहे. परंतु कंपनीनं आतापर्यंत या हँडसेटच्या लाँचबद्दल कोणतीही माहिती दिली नाही. आता 91mobiles च्या हाती या फोनचा एक्सक्लूसिव्ह फर्स्ट लुक लागला आहे. ज्यामुळे या स्मार्टफोनची डिजाईन तर समजली आहेच तसेच हा फोन पर्पल आणि कलरमध्ये बाजारात येऊ शकतो, हे देखील समोर आलं आहे.

Samsung Galaxy F14 ची डिजाइन

91mobiles ला मिळालेल्या हाय-क्वॉलिटी रेंडर्समधून समजलं आहे की फोनची डिजाइन जास्त हटके दिसत नाही. याच्या मागे ड्युअल कॅमेरा सेन्सर वेगवेगळ्या सर्कुलर रिंगमध्ये मिळू शकतात आणि एक एलईडी फ्लॅश देखील असू शकतो. फोन पर्पल आणि ग्रीन कलर ऑप्शनमध्ये दिसत आहे. फोनच्या कडा थोड्या घुमावदार दिसत आहेत. तसेच फोनमध्ये वॉल्यूम रॉकर आणि पावर बटन उजवीकडे मिळू शकतात तर बॅक पॅनलवर सॅमसंगचा लोगो तळाला दिसत आहे. आमच्या हाती फोनचा फ्रंट पॅनल लागला नाही. परंतु सेल्फी स्नॅपर आणि मोठ्या बेजलसह या फोनमध्ये वॉटरड्रॉप नॉच मिळू शकते, हा आमचा अंदाज आहे. हे देखील वाचा: Samsung Galaxy A54 5G आणि Galaxy A34 5G सादर; कंपनीनं केली घोषणा

15,000 रुपये असू शकते किंमत

लीक रिपोर्ट्सनुसार Samsung Galaxy F14 पुढील आठवड्यात लाँच केला जाऊ शकतो. तसेच याची किंमत 15,000 रुपयांच्या आसपास असू शकते. त्याचबरोबर डिवाइस फ्लिपकार्ट, सॅमसंग ऑनलाइन स्टोर अनेक मोठ्या ऑफलाइन स्टोरवरून विकला जाऊ शकतो. हँडसेट गॅलेक्सी F13 चा अपग्रेडेड व्हर्जन असू शकतो, अशी चर्चा आहे. हे देखील वाचा: 260W Fast Charging असलेला ब्रँडचा पहिला फोन असू शकतो Infinix GT 10 Pro, रिपोर्टमधून खुलासा

सॅमसंग गॅलेक्सी एफ14 चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स

आमच्या अंदाजानुसार, गॅलेक्सी एफ14 मध्ये FHD + रिजोल्यूशनसह 6.6 इंचाची स्क्रीन आणि स्टँडर्ड 60Hz रिफ्रेश रेट मिळू शकतो. सूत्रांच्यामते फोनमध्ये 5nm चिपसेट दिला जाऊ शकतो जो Exynos 1330 असू शकतो. यात 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज दिली जाऊ शकते. तसेच आगामी एफ-सीरीज फोनमध्ये Android 13 OS आउट ऑफ द बॉक्स बूट होण्याची शक्यता आहे. तसेच फोनमध्ये मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप असू शकतो परंतु सध्या त्यातील सेन्सर्सची माहिती मिळाली नाही.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here