Samsung Galaxy F41 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 03 Dec 2020 12:26:56 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Exclusive: Samsung नवीन फोन Galaxy F62 वर करत आहे काम, लवकरच करेल भारतात एंट्री https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-f62-india-launch-soon-exclusive/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-f62-india-launch-soon-exclusive/#respond Thu, 03 Dec 2020 12:26:56 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9146 Samsung Galaxy F62 चे स्पेसिफिकेशन्स आणि डिजाइन बद्दल अजूनतरी कोणतीही माहिती समोर आली नाही.

The post Exclusive: Samsung नवीन फोन Galaxy F62 वर करत आहे काम, लवकरच करेल भारतात एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung ने काही महिन्यांपूर्वी भारतीय बाजारात आपल्या नवीन स्मार्टफोन सीरीजची सुरवात केली आहे. हि सीरीज ‘गॅलेक्सी एफ’ नावाने सादर केली गेली आहे जी जगात सर्वप्रथम भारतात सादर केली गेली होती. या सीरीजचा पहिला फोन Samsung Galaxy F41 होता. तसेच, आता 91मोबाईल्सला एक्सक्लूसिव माहिती मिळाली आहे कि कंपनी आपल्या गॅलेक्सी एफ-सीरीज मध्ये नवीन फोन Galaxy F62 भारतात लॉन्च करणार आहे. याची माहिती Ishan Agarwal ने दिली आहे.

इशान अग्रवालने दिलेल्या माहितीनुसार गॅलेक्सी एफ 62 स्मार्टफोन मॉडेल नंबर SM-E625F सह लवकरच फोन भारतात लॉन्च केला जाईल. पण सध्या लॉन्च डेट बद्दल कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. आशा आहे कि Samsung Galaxy F62 चा लॉन्च साल 2021 च्या सुरवातीला केला जाऊ शकतो.

हे देखील वाचा : Exclusive: Redmi 9 Power आणि Mi 10i चे रॅम, स्टोरेज आणि कलर ऑप्शन आले समोर, लवकरच भारतात होतील लॉन्च

Samsung Galaxy F62 चे स्पेसिफिकेशन्स आणि डिजाइन बद्दल अजूनतरी कोणतीही माहिती समोर आली नाही. पण, टिपस्टरने फोनच्या अस्तित्वाची माहिती दिली आहे. येत्या काळात फोनची अजून माहिती मिळू शकते.

Samsung Galaxy F41

सॅमसंग गॅलेक्सी एफ41 स्मार्टफोन 20:9 आस्पेक्ट रेशियो वर लॉन्च झाला होता जो 2400 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.4 इंचाच्या फुलएचडी+ सुपर एमोलेड इनफिनिटी ‘यू’ डिस्प्ले डिस्प्लेला सपोर्ट करतो. हा फोन अँड्रॉइड 10 वर लॉन्च झाला आहे जो 2.3गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह सॅमसंग एक्सनॉस 9611 चिपसेट वर चालतो.

हे देखील वाचा : 6GB रॅम आणि ऍडव्हान्स फीचर्स सह Micromax घेऊन येत नवीन फोन, Xiaomi मिळेल का आव्हान?

फोटोग्राफीसाठी Samsung Galaxy F41 ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 64 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर हा फोन 123डिग्री फिल्ड आफ व्यू क्षमता असलेल्या 8 मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड अँगल लेंस आणि 5 मेगापिक्सलच्या डेफ्थ सेंसरला सपोर्ट करतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोन 32 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. तसेच पावर बॅकअपसाठी फोन मध्ये 15वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेली 6,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.

सॅमसंग गॅलेक्सी एफ41 व्हिडीओ

The post Exclusive: Samsung नवीन फोन Galaxy F62 वर करत आहे काम, लवकरच करेल भारतात एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-f62-india-launch-soon-exclusive/feed/ 0
Samsung Galaxy F41 मध्ये असेल 64 मेगापिक्सल कॅमेरा आणि 6000एमएएच बॅटरी, 8 ऑक्टोबरला होईल भारतात लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-f41-will-support-6000mah-battery-64-megapixel-rear-camera-launch-on-8-october/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-f41-will-support-6000mah-battery-64-megapixel-rear-camera-launch-on-8-october/#respond Mon, 28 Sep 2020 14:31:37 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8335 Samsung Galaxy F41 च्या लॉन्च डेट सोबतच फ्लिपकार्ट पेज वर या फोनचा फोटो पण शेयर करण्यात आला आहे

The post Samsung Galaxy F41 मध्ये असेल 64 मेगापिक्सल कॅमेरा आणि 6000एमएएच बॅटरी, 8 ऑक्टोबरला होईल भारतात लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung ने घोषणा केली आहे कि कंपनी येत्या 8 ऑक्टोबरला टेक मंचावर आपली नवीन ‘गॅलेक्सी एफ’ सीरीजची सुरवात करणार आहे. हा जगात सर्वात आधी भारतातच येईल. या सीरीजचा पहिला फोन Samsung Galaxy F41 नावाने लॉन्च होईल जो 8 ऑक्टोबरला बाजारात येईल. फोन लॉन्चच्या आधी सॅमसंगने सांगितले आहे कि हा फोन 6,000एमएएच च्या पावरफुल बॅटरी सह 64 मेगापिक्सलच्या दमदार कॅमेऱ्याला पण सपोर्ट करेल.

Samsung Galaxy F41 चे अनेक महत्वाचे स्पेसिफिकेशन्स कंपनीद्वारे लॉन्चच्या आधीची सांगण्यात आले आहेत. सॅमसंगने सांगितले आहेत कि गॅलेक्सी एफ41 ट्रिपल रियर कॅमेऱ्यावर लॉन्च केला जाईल आणि याचा प्राइमरी सेंसर 64 मेगापिक्सलचा असेल. पण इतर दोन सेंसर्स कोणते असतील ते सांगण्यात आले नाहीत. तसेच खुलासा केला गेला आहे कि हा सॅमसंग फोन 6,000एमएएच च्या मोठ्या बॅटरी सह लॉन्च केला जाईल तसेच गॅलेक्सी एफ41 मध्ये बेजल लेस सुपर एमोलेड डिस्प्ले दिला जाईल.

सॅमसंग गॅलेक्सी एफ41 को ऑनलाइन ईवेंटच्या माध्यमातून बाजारात येईल. हा ईवेंट 8 ऑक्टोबर संध्याकाळी 5 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल, ज्यात काही मोठे इंडियन सिंगर आणि आर्टिस्ट पण परफॉर्म करतील. लॉन्च ईवेंटचे प्रक्षेपण सॅमसंगच्या सोशल मीडिया प्लॅटफॉम सोबतच फ्लिपकार्ट वर पण केले जाईल. हा लॉन्च तर भारताचा असले पण Samsung Galaxy F चा लाँन्च जगभरातून लाईव बघता येईल.

असा असेल लुक

Samsung Galaxy F41 च्या लॉन्च डेट सोबतच फ्लिपकार्ट पेज वर या फोनचा फोटो पण शेयर करण्यात आला आहे ज्यामुळे गॅलेक्सी एफ41 च्या लुक आणि डिजाईनची माहिती मिळाली आहे. हा फोन मार्केट मध्ये इनफिनिटी ‘यू’ डिस्प्ले वर लॉन्च केला जाईल. फोटो मध्ये फोनची स्क्रीन पूर्णपणे बेजल लेस दिसत आहे. गॅलेक्सी एफ41 च्या बॅक पॅनल वर डावीकडे स्क्वायर शेप ट्रिपल रियर कॅमेरा आणि एक फ्लॅश लाईट देण्यात आली आहे. हे कॅमेरा सेंसर वर्टिकल पॉजिशन मध्ये आहेत. Samsung Galaxy F41 मध्ये रियर फिंगरप्रिंट सेंसर आहे तसेच साईड पॅनल वर वॉल्यूम रॉकर आणि पावर बटन आहे. हा बटन सरासरी पेक्षा जास्त वर दिसत आहे.

Samsung Galaxy F41

सॅमसंगने गॅलेक्सी एफ41 च्या सर्व स्पेसिफिकेशन्सची माहिती तर दिली नाही पण काही दिवसांपूर्वी हा फोन गूगल प्ले कंसोल आणि गीकबेंच वर लिस्ट झाला आहे. गूगल प्ले लिस्टिंग बद्दल बोलायचे झाले तर Samsung Galaxy F41 मध्ये Exynos 9611 चिपसेट सादर केला जाईल, त्या सोबत ग्राफिक्ससाठी ARM Mali G72 GPU आणि 6GB रॅम असेल. तसेच हँडसेट अँड्रॉइड 10 वर चालेल जो वन UI 2.0 कस्टम स्किन सह येईल. इतकेच नव्हे तर Samsung Galaxy F41 मध्ये FHD+ (1,080 x 2,340p) रिजोल्यूशन असलेला डिस्प्ले असेल.

गीकबेंच लिस्टिंगनुसार स्मार्टफोन मॉडेल नंबर SM-F415F सह दिसला आहे. या मॉडेल नंबरला सिंगल-कोर मध्ये 348 पॉईंट आणि मल्टी-कोर मध्ये 1339 स्कोर मिळाला आहे. तसेच लिस्टिंग मध्ये समोर आले आहे कि फोन ऑक्टा-कोर Exynos 9611 चिपसेट आणि 6GB रॅम सह येईल. फोन अँड्रॉइड 10 ऑपरेटिंग सिस्टम वर चालेल. रिपोर्ट मध्ये असा दावा केला गेला आहे कि कंपनी सुरवातीला ऑनलाइन विक्री वर लक्ष केंद्रित करेल, नंतर हा स्मार्टफोन ऑफलाइन सेगमेंट मध्ये येऊ शकतो. फोनच्या ठोस स्पेसिफिकेशन्स, किंमत व विक्री डेटच्या माहितीसाठी 8 ऑक्टोबरची वाट बघावी लागेल. चर्चा अशी आहे कि सॅमसंग गॅलेक्सी एफ41 ब्लॅक, ब्लू आणि ग्रीन कलर ऑप्शन मध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल.

The post Samsung Galaxy F41 मध्ये असेल 64 मेगापिक्सल कॅमेरा आणि 6000एमएएच बॅटरी, 8 ऑक्टोबरला होईल भारतात लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-f41-will-support-6000mah-battery-64-megapixel-rear-camera-launch-on-8-october/feed/ 0
6,000एमएएच बॅटरी आणि सुपर एमोलेड डिस्प्ले असलेला Samsung Galaxy F41, 8 ऑक्टोबरला होईल भारतात लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-f41-to-launch-on-8-october-with-6000-mah-battery-samoled-display/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-f41-to-launch-on-8-october-with-6000-mah-battery-samoled-display/#respond Thu, 24 Sep 2020 16:23:12 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8301 Samsung Galaxy F41 मध्ये 6,000एमएएच ची बॅटरी आणि बेजल लेस सुपर एमोलेड डिस्प्ले दिला जाईल.

The post 6,000एमएएच बॅटरी आणि सुपर एमोलेड डिस्प्ले असलेला Samsung Galaxy F41, 8 ऑक्टोबरला होईल भारतात लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung Galaxy F41 लॉन्चसाठी तयार आहे. कालच या फोनचा प्रोडक्ट पेज शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर लाईव करण्यात आला आहे. तसेच आज कंपनीने फोनच्या लॉन्च डेटचा पण खुलासा केला आहे. सॅमसंग द्वारे सांगण्यात आले आहे कि ‘गॅलेक्सी एफ’ सीरीजचा हा पहिला स्मार्टफोन येत्या 8 ऑक्टोबरला भारतीय बाजारात सादर केला जाईल. सॅमसंग गॅलेक्सी एफ41 जगात सर्वात आधी भारतातच लॉन्च केला जाईल आणि नंतर जगातील इतर मार्केट्स मध्ये येईल.

सॅमसंग गॅलेक्सी एफ41 ऑनलाइन ईवेंटच्या माध्यमातून बाजारात आणेल जो 8 ऑक्टोबर संध्याकाळी 5 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल. या लॉन्च ईवेंटचे प्रक्षेपण सॅमसंगच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सोबतच फ्लिपकार्ट वर पण केले जाईल, जो जगभरातून लाईव बघता येईल. कंपनीने खुलासा केला आहे कि Samsung Galaxy F41 मध्ये 6,000एमएएच ची बॅटरी आणि बेजल लेस सुपर एमोलेड डिस्प्ले दिला जाईल.

असा असेल लुक

Samsung Galaxy F41 च्या लॉन्च डेट सोबतच फ्लिपकार्ट पेज वर या फोनचा फोटो पण शेयर करण्यात आला आहे जिथे गॅलेक्सी एफ41 च्या लुक आणि डिजाईनची माहिती मिळाली आहे. हा फोन मार्केट मध्ये इनफिनिटी ‘यू’ डिस्प्ले वर लॉन्च केला जाईल. फोटो मध्ये फोनची स्क्रीन पूर्णपणे बेजल लेस दिसत आहे. गॅलेक्सी एफ41 च्या बॅक पॅनल वर डावीकडे चौकोनी आकारात ट्रिपल रियर कॅमेरा आणि एक फ्लॅश लाईट देण्यात आली आहे. हे कॅमेरा सेंसर वर्टिकल पॉजिशन मध्ये आहेत. Samsung Galaxy F41 मध्ये रियर फिंगरप्रिंट सेंसर आहे तसेच साईड पॅनल वर वॉल्यूम रॉकर आणि पावर बटन आहे. हा बटन सरासरीपेक्षा जास्त वर दिसत आहे.

Samsung Galaxy F41

सॅमसंगने गॅलेक्सी एफ41 च्या सर्व स्पेसिफिकेशन्सची माहिती दिली नाही पण काही दिवसांपूर्वी हा फोन गूगल प्ले कंसोल आणि गीकबेंच वर लिस्ट झाला आहे. या दोन्ही वेबसाइट्स वर फोनचे नावासोबतच अनेक स्पेसिफिकेशन्स पण समोर आले होते. चर्चा आहे कि सॅमसंग गॅलेक्सी एफ सीरीज कॅमेरा सेंट्रिक स्मार्टफोन सीरीज असेल आणि गॅलेक्सी एफ41 64 मेगापिक्सल क्वॉड रियर कॅमेऱ्यासह लॉन्च केला जाईल. लीकनुसार फोन ब्लॅक, ब्लू आणि ग्रीन कलर ऑप्शन मध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल.

गूगल प्ले लिस्टिंग पाहता गॅलेक्सी एफ41 कंपनीच्या एक्सनॉस 9611 चिपसेट सह दाखवण्यात आला होता ज्या सोबतच एआरएम माली जी72 जीपीयू असल्याचे सांगण्यात आले होते. लिस्टिंग वर हा सॅमसंग फोन 6 जीबी रॅम सह लिस्ट झाला होता. या फोन मध्ये अँड्रॉइड 10 ओएस सह सॅमसंग वन यूआई 2.0 असल्याचे समोर आले होते. या लिस्टिंग मध्ये Samsung Galaxy F41 मध्ये 1080 x 2340 पिक्सल रेज्ल्यूशन असलेला फुलएचडी+ डिस्प्ले असल्याचे समोर आले होते.

दुसरीकडे गीकबेंच लिस्टिंग मध्ये पण हा आगामी सॅमसंग फोन अँड्रॉइड 10 ओएस सह सॅमसंग एक्सनॉस 9611 चिपसेट सोबतच लिस्ट झाला होता. इथे पण फोनचा 6 जीबी रॅम वेरिएंट ही समोर आला होता. गीकबेंच वर सॅमसंग गॅलेक्सी एफ41 ला सिंगल-कोर मध्ये 348 पॉईंट आणि मल्टी-कोर मध्ये 1339 स्कोर मिळाला होता. एका रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले होते कि सुरवातील ऑनलाइन एक्सक्लूसिव ठेवल्यानंतर सॅमसंग हि सीरीज ऑफलाइन सेग्मेंट मध्ये पण घेऊन येईल. फोनच्या ठोस स्पेसिफिकेशन्स आणि किंमत व विक्री डेटच्या माहितीसाठी 8 ऑक्टोबरची वाट बघावी लागेल.

The post 6,000एमएएच बॅटरी आणि सुपर एमोलेड डिस्प्ले असलेला Samsung Galaxy F41, 8 ऑक्टोबरला होईल भारतात लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-f41-to-launch-on-8-october-with-6000-mah-battery-samoled-display/feed/ 0
Samsung Galaxy F41 झाला वेबसाइट वर लिस्ट, जाणून घ्या भारतात कधी लॉन्च होईल हा शानदार स्मार्टफोन https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-f-series-coming-soon-in-india-f41-launch-flipkart-listed/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-f-series-coming-soon-in-india-f41-launch-flipkart-listed/#respond Wed, 23 Sep 2020 16:24:48 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8286 सीरीज अंतर्गत लॉन्च होणाऱ्या पहिल्या स्मार्टफोनचे नाव Samsung Galaxy F41 असेल.

The post Samsung Galaxy F41 झाला वेबसाइट वर लिस्ट, जाणून घ्या भारतात कधी लॉन्च होईल हा शानदार स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung ने सांगितले आहे कि कंपनी एका नवीन Galaxy F series सीरीजची सुरवात करणार आहे. सॅमसंग गॅलेक्सी एफ सीरीज जगात सर्वात आधी भारतात लॉन्च होईल जी कंपनीने टीज करायला सुरवात केली आहे. चर्चा अशी आहे कि सीरीज अंतर्गत लॉन्च होणाऱ्या पहिल्या स्मार्टफोनचे नाव Samsung Galaxy F41 असेल. तसेच आता सॅमसंगची हि आगामी गॅलेक्सी एफ सीरीज ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्ट वर पण लिस्ट करण्यात आली आहे.

सॅमसंग गॅलेक्सी एफ सीरीजचा लॉन्च प्रोडक्ट पेज शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर लाईव करण्यात आला आहे. हा पेज समोर आल्यामुळे स्पष्ट झाले आहे कि नवीन सीरीज मध्ये लॉन्च होणारा कथित गॅलेक्सी एफ41 स्मार्टफोन या वेबसाइट वर विक्रीसाठी उपलब्ध होईल. फ्लिपकार्टने फोनचा फोटो व स्पेसिफिकेशन्स लपवून ठेवले आहेत, पण अशा आहे कि 24 सप्टेंबरला या फोनची लॉन्च डेट समोर येऊ शकते.

Samsung Galaxy F41

सॅमसंगने गॅलेक्सी एफ41 चे नाव सांगितले नाही पण काही दिवसांपूर्वी हा फोन गूगल प्ले कंसोल आणि गीकबेंच वर लिस्ट झाला आहे. या दोन्ही वेबसाइट्स वर फोनच्या नावासोबतच याचे अनेक स्पेसिफिकेशन्स पण समोर आले होते. चर्चा आहे कि सॅमसंग गॅलेक्सी एफ सीरीज एक कॅमेरा सेंट्रिक स्मार्टफोन सीरीज असेल आणि गॅलेक्सी एफ41 को 64 मेगापिक्सल क्वॉड रियर कॅमेऱ्यासह लॉन्च केला जाईल. लीकनुसार हा फोन ब्लॅक, ब्लू आणि ग्रीन कलर ऑप्शन मध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल.

गूगल प्ले लिस्टिंग बद्दल बोलायचे झाले तर Samsung Galaxy F41 मध्ये Exynos 9611 चिपसेट सादर केला जाईल, त्या सोबत ग्राफिक्ससाठी ARM Mali G72 GPU आणि 6GB रॅम असेल. तसेच हँडसेट अँड्रॉइड 10 वर चालेल जो वन UI 2.0 कस्टम स्किन सह येईल. इतकेच नव्हे तर Samsung Galaxy F41 मध्ये FHD+ (1,080 x 2,340p) रिजोल्यूशन असलेला डिस्प्ले असेल.

गीकबेंच लिस्टिंगनुसार स्मार्टफोन मॉडेल नंबर SM-F415F सह दिसला आहे. या मॉडेल नंबरला सिंगल-कोर मध्ये 348 पॉईंट आणि मल्टी-कोर मध्ये 1339 स्कोर मिळाला आहे. तसेच लिस्टिंग मध्ये समोर आले आहे कि फोन ऑक्टा-कोर Exynos 9611 चिपसेट आणि 6GB रॅम सह येईल. फोन अँड्रॉइड 10 ऑपरेटिंग सिस्टम वर चालेल. रिपोर्ट मध्ये असा दावा केला गेला आहे कि कंपनी सुरवातीला ऑनलाइन विक्री वर लक्ष केंद्रित करेल, नंतर हा स्मार्टफोन ऑफलाइन सेगमेंट मध्ये येऊ शकतो.

The post Samsung Galaxy F41 झाला वेबसाइट वर लिस्ट, जाणून घ्या भारतात कधी लॉन्च होईल हा शानदार स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-f-series-coming-soon-in-india-f41-launch-flipkart-listed/feed/ 0