भारतीय स्मार्टफोन निर्माता कंपनी Micromax ने काही दिवसांपूर्वी दोन नवीन फोन Micromax In Note 1 आणि Micromax In 1b बाजारात आणले होते. आता कंपनीकडून माहिती समोर आली आहे कि येत्या काळात माइक्रोमॅक्स भारतीय बाजारात 6जीबी रॅम असलेला नवीन स्मार्टफोन सादर करण्याची योजना बनवत आहे. माइक्रोमॅक्सचे सह-संस्थापक राहुल शर्मा यांनी सोमवारी यूट्यूब वर एक वर्चुअल सेशन मध्ये सांगितले कि कंपनी एक नवीन 6जीबी रॅम असलेला स्मार्टफोन बनवत आहे. इतकेच नव्हे तर त्यांनी In-सीरीजच्या आगामी स्मार्टफोन मध्ये हाय रिफ्रेश रेट आणि लिक्विड कूलिंग असल्याचे पण म्हटले आहे.
तसेच राहुल शर्मा यांनी प्रोडक्ट हेड सुनील जून सोबत केलेल्या या वर्चुल सेशन मध्ये माहिती दिली आहे कि माइक्रोमॅक्स आपले इन-सीरीज फोन देशात ऑफलाइन विकायला सुरवात करेल. नवीन 6जीबी रॅम वर बाबत त्यांनी स्पष्ट केले कि हा Micromax In Note 1 चा नवीन वेरिएंट नसेल. इन नोट 1 हा फोन 4 जीबी रॅम सह 64 जीबी आणि 128 जीबी स्टोरेज ऑप्शन सह येतो.
काही दिवसांपूर्वी Micromax In 1b स्मार्टफोन संबंधीत एक मोठी माहिती समोर आली होती. गॅजेट360 वेबसाइटच्या एका रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले होते कि माइक्रोमॅक्स इन 1बी स्मार्टफोनचे दोन्ही मॉडेल वेगवेगळ्या अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टम वर चालतील. फोनचा 4 जीबी रॅम वेरिएंट अँड्रॉइड 10 च्या रेग्युलर एडिशन वर चालेल पण Micromax In 1b चा 2 जीबी रॅम वेरिएंट कंपनी अँड्रॉइड 10 च्या ‘गो’ एडिशन सह बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करेल. विशेष म्हणजे माइक्रोमॅक्स स्मार्टफोनचे हे दोन्ही मॉडेल्स समान चिपसेटला सपोर्ट करतील.
तसेच अलीकडेच एक रिपोर्ट समोर आला आहे, ज्यात राहुल शर्मा यांनी एका व्हिडीओ मध्ये मान्य केले आहे कि Micromax In Note 1 स्मार्टफोन पूर्णपणे मेड इन इंडिया फोन नाही आणि याच्या निर्मितीत चीनची पण मदत आहे. राहुल यांनी सांगितले आहे कि माइक्रोमॅक्स इन नोट स्मार्टफोन मध्ये वापरण्यात आलेली बॅटरी चीन वरून इंपोर्ट केली गेली आहे. पण दुसरा फोन Micromax In 1b कंपनीच्या सीईओने शंभर टक्के ‘Made In India’ स्मार्टफोन असल्याचे सांगितले आहे ज्याचे सर्व पार्ट्स भारतातच बनले आहेत.
माइक्रोमॅक्स इन 1बी 64जीबी व्हिडीओ