Exclusive: Samsung नवीन फोन Galaxy F62 वर करत आहे काम, लवकरच करेल भारतात एंट्री

Samsung ने काही महिन्यांपूर्वी भारतीय बाजारात आपल्या नवीन स्मार्टफोन सीरीजची सुरवात केली आहे. हि सीरीज ‘गॅलेक्सी एफ’ नावाने सादर केली गेली आहे जी जगात सर्वप्रथम भारतात सादर केली गेली होती. या सीरीजचा पहिला फोन Samsung Galaxy F41 होता. तसेच, आता 91मोबाईल्सला एक्सक्लूसिव माहिती मिळाली आहे कि कंपनी आपल्या गॅलेक्सी एफ-सीरीज मध्ये नवीन फोन Galaxy F62 भारतात लॉन्च करणार आहे. याची माहिती Ishan Agarwal ने दिली आहे.

इशान अग्रवालने दिलेल्या माहितीनुसार गॅलेक्सी एफ 62 स्मार्टफोन मॉडेल नंबर SM-E625F सह लवकरच फोन भारतात लॉन्च केला जाईल. पण सध्या लॉन्च डेट बद्दल कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. आशा आहे कि Samsung Galaxy F62 चा लॉन्च साल 2021 च्या सुरवातीला केला जाऊ शकतो.

हे देखील वाचा : Exclusive: Redmi 9 Power आणि Mi 10i चे रॅम, स्टोरेज आणि कलर ऑप्शन आले समोर, लवकरच भारतात होतील लॉन्च

Samsung Galaxy F62 चे स्पेसिफिकेशन्स आणि डिजाइन बद्दल अजूनतरी कोणतीही माहिती समोर आली नाही. पण, टिपस्टरने फोनच्या अस्तित्वाची माहिती दिली आहे. येत्या काळात फोनची अजून माहिती मिळू शकते.

Samsung Galaxy F41

सॅमसंग गॅलेक्सी एफ41 स्मार्टफोन 20:9 आस्पेक्ट रेशियो वर लॉन्च झाला होता जो 2400 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.4 इंचाच्या फुलएचडी+ सुपर एमोलेड इनफिनिटी ‘यू’ डिस्प्ले डिस्प्लेला सपोर्ट करतो. हा फोन अँड्रॉइड 10 वर लॉन्च झाला आहे जो 2.3गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह सॅमसंग एक्सनॉस 9611 चिपसेट वर चालतो.

हे देखील वाचा : 6GB रॅम आणि ऍडव्हान्स फीचर्स सह Micromax घेऊन येत नवीन फोन, Xiaomi मिळेल का आव्हान?

फोटोग्राफीसाठी Samsung Galaxy F41 ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 64 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर हा फोन 123डिग्री फिल्ड आफ व्यू क्षमता असलेल्या 8 मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड अँगल लेंस आणि 5 मेगापिक्सलच्या डेफ्थ सेंसरला सपोर्ट करतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोन 32 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. तसेच पावर बॅकअपसाठी फोन मध्ये 15वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेली 6,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.

सॅमसंग गॅलेक्सी एफ41 व्हिडीओ

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here