Samsung Galaxy F41 मध्ये असेल 64 मेगापिक्सल कॅमेरा आणि 6000एमएएच बॅटरी, 8 ऑक्टोबरला होईल भारतात लॉन्च

Samsung ने घोषणा केली आहे कि कंपनी येत्या 8 ऑक्टोबरला टेक मंचावर आपली नवीन ‘गॅलेक्सी एफ’ सीरीजची सुरवात करणार आहे. हा जगात सर्वात आधी भारतातच येईल. या सीरीजचा पहिला फोन Samsung Galaxy F41 नावाने लॉन्च होईल जो 8 ऑक्टोबरला बाजारात येईल. फोन लॉन्चच्या आधी सॅमसंगने सांगितले आहे कि हा फोन 6,000एमएएच च्या पावरफुल बॅटरी सह 64 मेगापिक्सलच्या दमदार कॅमेऱ्याला पण सपोर्ट करेल.

Samsung Galaxy F41 चे अनेक महत्वाचे स्पेसिफिकेशन्स कंपनीद्वारे लॉन्चच्या आधीची सांगण्यात आले आहेत. सॅमसंगने सांगितले आहेत कि गॅलेक्सी एफ41 ट्रिपल रियर कॅमेऱ्यावर लॉन्च केला जाईल आणि याचा प्राइमरी सेंसर 64 मेगापिक्सलचा असेल. पण इतर दोन सेंसर्स कोणते असतील ते सांगण्यात आले नाहीत. तसेच खुलासा केला गेला आहे कि हा सॅमसंग फोन 6,000एमएएच च्या मोठ्या बॅटरी सह लॉन्च केला जाईल तसेच गॅलेक्सी एफ41 मध्ये बेजल लेस सुपर एमोलेड डिस्प्ले दिला जाईल.

सॅमसंग गॅलेक्सी एफ41 को ऑनलाइन ईवेंटच्या माध्यमातून बाजारात येईल. हा ईवेंट 8 ऑक्टोबर संध्याकाळी 5 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल, ज्यात काही मोठे इंडियन सिंगर आणि आर्टिस्ट पण परफॉर्म करतील. लॉन्च ईवेंटचे प्रक्षेपण सॅमसंगच्या सोशल मीडिया प्लॅटफॉम सोबतच फ्लिपकार्ट वर पण केले जाईल. हा लॉन्च तर भारताचा असले पण Samsung Galaxy F चा लाँन्च जगभरातून लाईव बघता येईल.

असा असेल लुक

Samsung Galaxy F41 च्या लॉन्च डेट सोबतच फ्लिपकार्ट पेज वर या फोनचा फोटो पण शेयर करण्यात आला आहे ज्यामुळे गॅलेक्सी एफ41 च्या लुक आणि डिजाईनची माहिती मिळाली आहे. हा फोन मार्केट मध्ये इनफिनिटी ‘यू’ डिस्प्ले वर लॉन्च केला जाईल. फोटो मध्ये फोनची स्क्रीन पूर्णपणे बेजल लेस दिसत आहे. गॅलेक्सी एफ41 च्या बॅक पॅनल वर डावीकडे स्क्वायर शेप ट्रिपल रियर कॅमेरा आणि एक फ्लॅश लाईट देण्यात आली आहे. हे कॅमेरा सेंसर वर्टिकल पॉजिशन मध्ये आहेत. Samsung Galaxy F41 मध्ये रियर फिंगरप्रिंट सेंसर आहे तसेच साईड पॅनल वर वॉल्यूम रॉकर आणि पावर बटन आहे. हा बटन सरासरी पेक्षा जास्त वर दिसत आहे.

Samsung Galaxy F41

सॅमसंगने गॅलेक्सी एफ41 च्या सर्व स्पेसिफिकेशन्सची माहिती तर दिली नाही पण काही दिवसांपूर्वी हा फोन गूगल प्ले कंसोल आणि गीकबेंच वर लिस्ट झाला आहे. गूगल प्ले लिस्टिंग बद्दल बोलायचे झाले तर Samsung Galaxy F41 मध्ये Exynos 9611 चिपसेट सादर केला जाईल, त्या सोबत ग्राफिक्ससाठी ARM Mali G72 GPU आणि 6GB रॅम असेल. तसेच हँडसेट अँड्रॉइड 10 वर चालेल जो वन UI 2.0 कस्टम स्किन सह येईल. इतकेच नव्हे तर Samsung Galaxy F41 मध्ये FHD+ (1,080 x 2,340p) रिजोल्यूशन असलेला डिस्प्ले असेल.

गीकबेंच लिस्टिंगनुसार स्मार्टफोन मॉडेल नंबर SM-F415F सह दिसला आहे. या मॉडेल नंबरला सिंगल-कोर मध्ये 348 पॉईंट आणि मल्टी-कोर मध्ये 1339 स्कोर मिळाला आहे. तसेच लिस्टिंग मध्ये समोर आले आहे कि फोन ऑक्टा-कोर Exynos 9611 चिपसेट आणि 6GB रॅम सह येईल. फोन अँड्रॉइड 10 ऑपरेटिंग सिस्टम वर चालेल. रिपोर्ट मध्ये असा दावा केला गेला आहे कि कंपनी सुरवातीला ऑनलाइन विक्री वर लक्ष केंद्रित करेल, नंतर हा स्मार्टफोन ऑफलाइन सेगमेंट मध्ये येऊ शकतो. फोनच्या ठोस स्पेसिफिकेशन्स, किंमत व विक्री डेटच्या माहितीसाठी 8 ऑक्टोबरची वाट बघावी लागेल. चर्चा अशी आहे कि सॅमसंग गॅलेक्सी एफ41 ब्लॅक, ब्लू आणि ग्रीन कलर ऑप्शन मध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here