Samsung Galaxy F52 5G - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 20 May 2021 12:03:28 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Samsung चा कमी किंमत असलेला मास्टर स्ट्रोक, लॉन्च केला 8GB रॅम आणि 4,500mAh बॅटरी असलेला Galaxy F52 5G https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-f52-5g-launched-price-specifications-8gb-ram/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-f52-5g-launched-price-specifications-8gb-ram/#respond Thu, 20 May 2021 12:03:28 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10989 सॅमसंग गॅलेक्सी एफ52 5जी फोन पंच-होल डिस्प्लेवर लॉन्च केला गेला आहे. अनेक पंच-होल असलेल्या फोन्समध्ये सेल्फी कॅमेरा मध्यभागी किंवा उजवीकडे असतो परंतु Galaxy F52 मध्ये हा पंच-होल स्क्रीनच्या वरच्या बाजूला डावीकडे आहे.

The post Samsung चा कमी किंमत असलेला मास्टर स्ट्रोक, लॉन्च केला 8GB रॅम आणि 4,500mAh बॅटरी असलेला Galaxy F52 5G first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung बद्दल अनेक दिवसांपासून बातमी समोर येत होती कि कंपनी आपल्या आगामी 5G फोन Galaxy F52 वर काम करत आहे. आता सर्व बातम्यांवर पूर्णविराम देत दक्षिण कोरियन टेक कंपनीने हा फोन अधिकृतपणे लॉन्च केला आहे. हा फोन सध्या सॅमसंगद्वारे चायनाच्या टेक मार्केटमध्ये लॉन्च केला गेला आहे. तसेच, फीचर्स आणि स्पेसिफिकेशनच्या दृष्टीने डिवाइस सॅमसंगच्या Galaxy A52 5G चा स्वस्त वेरिएंट वाटत आहे. चला जाणून घेऊया Samsung Galaxy F52 5G बाबत. (Samsung Galaxy F52 5G launched price specifications 8GB RAM)

Samsung Galaxy F52 5G ची डिजाइन

सॅमसंग गॅलेक्सी एफ52 5जी फोन पंच-होल डिस्प्लेवर लॉन्च केला गेला आहे. अनेक पंच-होल असलेल्या फोन्समध्ये सेल्फी कॅमेरा मध्यभागी किंवा उजवीकडे असतो परंतु Galaxy F52 मध्ये हा पंच-होल स्क्रीनच्या वरच्या बाजूला डावीकडे आहे. डिस्प्ले ग्लास या फोटोमध्ये कर्व्ड आहे तसेच स्क्रीनच्या तीन कडा बेजल लेस आहेत आणि खालच्या बाजूला रुंद चिन पार्ट देण्यात आला आहे.

हे देखील वाचा : POCO ने आणला लो बजेटमध्ये नवीन 5G फोन, यात आहे 5,000mAh बॅटरी आणि 48MP कॅमेरा

Samsung Galaxy F52 5G new

फोनच्या बॅक पॅनलवर क्वॉड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो चौरस आकारात डावीकडे देण्यात आला आहे. फोटोमध्ये सॅमसंग गॅलेक्सी एफ52 5जी फोनचा रियर पॅनल खूप चमकदार आणि ग्लॉसी दिसत आहे जो ग्लास प्रोटेक्शनवर बनलेला आहे. कॅमेरा सेटअप बद्दल बोलायचे तर यात एका लाईनमध्ये फ्लॅश आणि दोन सेंसर देण्यात आले आहेत तसेच दुसऱ्या बाजूला इतर दोन सेंसर आहेत. स्मार्टफोनच्या लोअर पॅनलवर यूएसबी टाइप सी पोर्ट आहे ज्याच्या एका बाजूला 3.5एमएम जॅक आणि दुसऱ्या बाजूला स्पीकर आहे. फोनच्या उजव्या पॅनलवर वॉल्यूम रॉकर आणि खाली पावर बटण आहे. हा पावर बटण फिंगरप्रिंट सेंसर इम्बेडेड आहे.

Samsung Galaxy F52 5G चा डिस्प्ले

Samsung Galaxy F52 5G सह 120Hz रिफ्रेश रेट मिळतो त्यामुळे युजर्सना अभूतपूर्व स्मार्टफोन एक्सपीरियंस मिळेल आहे. हाई क्वालिटी, युजर-फ्रेंडली आणि फास्ट स्मार्टफोन आहे जो तुम्ही न थांबता ब्राउजिंग, बिंज-वॉच, गेम खेळणे, मल्टीपल अ‍ॅप वापरण्याव्यतिरिक्त इतर गोष्टींसाठी पण वापरता येईल. या फोनमध्ये 6.6 इंचाचा फुल-एचडी+ (1,080×2,400 पिक्सल) इनफिनिटी-ओ डिस्प्ले देण्यात आला आहे.

samsung galaxy f52 5g

Samsung Galaxy F52 5G चा कॅमेरा

शानदार फोटोग्राफीसाठी Galaxy F52 5G मध्ये एकूण 5 कॅमेरे देण्यात आले आहेत, त्यापैकी चार मागे आणि एक फ्रंटला आहे. मागील क्वाड कॅमेरा सेटअप पाहता यात अपर्चर F1.8 सह 64 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा, अपर्चर F2.2 सह 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा, अपर्चर F2.4 सह 2 मेगापिक्सलचा डेप्थ आणि अपर्चर F2.4 सह 2 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनच्या फ्रंटला अपर्चर F2.2 सह 16 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.

हे देखील वाचा : Vodafone idea ने आणली कमालीची ऑफर, रिचार्जसाठी द्यावे लागणार नाहीत पैसे

Samsung Galaxy F52 5G मधील प्रोसेसर

फोनमध्ये Octa Core (2.2GHz Dual + 1.8GHz हेक्सा क्रियो 570 सीपीयूएस) स्नॅपड्रॅगॉन 750G 8nm मोबाईल प्लॅटफॉर्म आहे जो Adreno 619 GPU सह येतो. त्याचबरोबर फोनमध्ये 8GB की रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज आहे. फोनची स्टोरेज तुम्ही माइक्रोएसडी कार्डच्या मदतीने 1 टीबी पर्यंत वाढवू शकता.

Samsung Galaxy F52 5G Camera

Samsung Galaxy F52 5G ची बॅटरी

पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये 4500mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी 25W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. तसेच फोनमध्ये कनेक्टिविटी फीचर्स म्हणून एक्सेलेरोमीटर, ग्रिप सेंसर, एम्बिएंट लाइट सेंसर आणि प्रोक्सिमिटी सेंसर, 5G आणि LTE नेटवर्क सपोर्ट देण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर, यात तुम्हाला मिळेल डॉल्बी अट्मॉस, ज्याचा अनुभव तुम्ही हेडफोनसह घेऊ शकता. फोन Android 11 सह सॅमसंग One UI 3.1 वर चालतो.

Samsung Galaxy F52 5G ची किंमत

Samsung Galaxy F52 5G कंपनीने Dusky Black आणि Magic White कलर ऑप्शनमध्ये सादर केला आहे. या डिवाइसची किंमत 1999 yuan (जवळपास 22,730 रुपये आहे.) आहे. तसेच, फोन चीनमध्ये आजपासून प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध झाला आहे.

The post Samsung चा कमी किंमत असलेला मास्टर स्ट्रोक, लॉन्च केला 8GB रॅम आणि 4,500mAh बॅटरी असलेला Galaxy F52 5G first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-f52-5g-launched-price-specifications-8gb-ram/feed/ 0
8GB रॅमसह Samsung घेऊन येत आहे एक नवीन 5G फोन Samsung Galaxy F52, लॉन्चच्या आधी वेबसाइटवर झाला लिस्ट https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-f52-5g-specs-listed-on-google-play-console-launch-soon/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-f52-5g-specs-listed-on-google-play-console-launch-soon/#respond Wed, 28 Apr 2021 14:07:27 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10750 Google Play Console लिस्टिंगनुसार Samsung Galaxy F52 5G कंपनी Qualcomm SM7225 चिपसेटसह सादर करू शकते जो स्नॅपड्रॅगॉन 750G असेल.

The post 8GB रॅमसह Samsung घेऊन येत आहे एक नवीन 5G फोन Samsung Galaxy F52, लॉन्चच्या आधी वेबसाइटवर झाला लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung बद्दल अनेक दिवसांपासून बातमी समोर येत आहे कि कंपनी आपल्या आगामी 5G फोन Galaxy F52वर काम करत आहे. दक्षिण कोरियन टेक कंपनीचा हा फोन आतापर्यंत अनेक सर्टिफिकेशन साइट जसे कि Bluetooth SIG वेबसाइट, TENAA आणि Wi-Fi Alliance वर स्पॉट पण केला गेला आहे. बोलले जात आहे कि फोन लवकरच मार्केटमध्ये सादर केला जाईल. पण, आतापर्यंत कंपनीने याबाबत कोणतीही ऑफिशियल माहिती दिली नाही. आता 91mobiles ने Samsung Galaxy F52 5G चे स्पेसिफिकेशन गुगल प्ले कंसोल लिस्टिंगमध्ये स्पॉट केला आहे. या लिस्टिंगमध्ये फोनच्या रॅम, चिपसेट, डिस्प्ले रेजोल्यूशन आणि बरीच माहिती समोर आली आहे. (Samsung Galaxy F52 5G specs listed on Google play console launch soon)

Samsung Galaxy F52 5G स्पेसिफिकेशन Google Play Console

Google Play Console लिस्टिंगनुसार Samsung Galaxy F52 5G कंपनी Qualcomm SM7225 चिपसेटसह सादर करू शकते जो स्नॅपड्रॅगॉन 750G असेल. तसेच फोनमध्ये 8GB रॅम असेल. पण, आशा आहे कि डिवाइस यापेक्षा जास्त रॅम वेरिएंटमध्ये लॉन्च केला जाईल. तसेच लिस्टिंगमध्ये समोर आलेल्या रेंडर्सवरून स्पष्ट झाले आहे कि फोन डिस्प्लेमध्ये होल-पंच सेल्फी कॅमेरा असेल जो टॉप-राइट कॉनर्रवर असेल. तसेच Samsung Galaxy F52 मध्ये FHD+ (1080×2009) रेजोल्यूशन पण असेल.

हे देखील वाचा : COVID Vaccine Registration In India: 18 पेक्षा जास्त वय असणारे अश्याप्रकारे करू शकतात नोंदणी

लिस्टिंगमध्ये सांगण्यात आले आहे कि फोन अँड्रॉइड 11 वर चालेल. तसेच गुगल कंसोलवर फोनच्या नावाची माहिती मिळाली नाही. पण, डिवाइस मॉडेल नंबर SM-E5260 सह लिस्ट झाला आहे.

या महिन्याच्या सुरुवातीला स्पॉट करण्यात आलेल्या TENAA लिस्टिंगनुसार, सॅमसंग गॅलेक्सी F52 5G मध्ये 4,350mAh ची बॅटरी आहे आणि याचा आकार 164.63mm × 76.3mm × 8.7 मिमी असेल. 3 सी सर्टिफिकेशनवरून समजले होते कि फोन 25W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. इतर सुविधा पाहता डुअल-बॅंड वाय-फाय आणि ब्लूटूथ वी 5.1 चा समावेश आहे.

TENAA लिस्टिंगनुसार हा फोन Android 11 सह येईल. फोनमध्ये 6.57 इंचाच्या फुल-एचडी+ एमोलेड डिस्प्लेसह येईल. ज्याचे ज्याचा रिजोल्यूशन 1080 x 2408 असेल. तसेच, फोन 2.40GHz ऑक्टा-कोर प्रोसेसरसह येईल, सोबत 8 जीबी रॅम मिळेल. फोनची स्टोरेज 128 जीबी असेल, ज्यात माइक्रो एसडी कार्ड सपोर्ट मिळेल.

हे देखील वाचा : 44MP सेल्फी कॅमेरा आणि स्लिम डिजाइनसह लॉन्च झाली Vivo V21 सीरीज, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये

फोटोग्राफीसाठी फोनमध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप असेल, ज्याचा प्राइमरी कॅमेरा 64 मेगापिक्सलचा असेल. सेल्फी व व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा कॅमेरा दिला जाईल.

The post 8GB रॅमसह Samsung घेऊन येत आहे एक नवीन 5G फोन Samsung Galaxy F52, लॉन्चच्या आधी वेबसाइटवर झाला लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-f52-5g-specs-listed-on-google-play-console-launch-soon/feed/ 0