Samsung बद्दल अनेक दिवसांपासून बातमी समोर येत होती कि कंपनी आपल्या आगामी 5G फोन Galaxy F52 वर काम करत आहे. आता सर्व बातम्यांवर पूर्णविराम देत दक्षिण कोरियन टेक कंपनीने हा फोन अधिकृतपणे लॉन्च केला आहे. हा फोन सध्या सॅमसंगद्वारे चायनाच्या टेक मार्केटमध्ये लॉन्च केला गेला आहे. तसेच, फीचर्स आणि स्पेसिफिकेशनच्या दृष्टीने डिवाइस सॅमसंगच्या Galaxy A52 5G चा स्वस्त वेरिएंट वाटत आहे. चला जाणून घेऊया Samsung Galaxy F52 5G बाबत. (Samsung Galaxy F52 5G launched price specifications 8GB RAM)
Samsung Galaxy F52 5G ची डिजाइन
सॅमसंग गॅलेक्सी एफ52 5जी फोन पंच-होल डिस्प्लेवर लॉन्च केला गेला आहे. अनेक पंच-होल असलेल्या फोन्समध्ये सेल्फी कॅमेरा मध्यभागी किंवा उजवीकडे असतो परंतु Galaxy F52 मध्ये हा पंच-होल स्क्रीनच्या वरच्या बाजूला डावीकडे आहे. डिस्प्ले ग्लास या फोटोमध्ये कर्व्ड आहे तसेच स्क्रीनच्या तीन कडा बेजल लेस आहेत आणि खालच्या बाजूला रुंद चिन पार्ट देण्यात आला आहे.
हे देखील वाचा : POCO ने आणला लो बजेटमध्ये नवीन 5G फोन, यात आहे 5,000mAh बॅटरी आणि 48MP कॅमेरा
फोनच्या बॅक पॅनलवर क्वॉड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो चौरस आकारात डावीकडे देण्यात आला आहे. फोटोमध्ये सॅमसंग गॅलेक्सी एफ52 5जी फोनचा रियर पॅनल खूप चमकदार आणि ग्लॉसी दिसत आहे जो ग्लास प्रोटेक्शनवर बनलेला आहे. कॅमेरा सेटअप बद्दल बोलायचे तर यात एका लाईनमध्ये फ्लॅश आणि दोन सेंसर देण्यात आले आहेत तसेच दुसऱ्या बाजूला इतर दोन सेंसर आहेत. स्मार्टफोनच्या लोअर पॅनलवर यूएसबी टाइप सी पोर्ट आहे ज्याच्या एका बाजूला 3.5एमएम जॅक आणि दुसऱ्या बाजूला स्पीकर आहे. फोनच्या उजव्या पॅनलवर वॉल्यूम रॉकर आणि खाली पावर बटण आहे. हा पावर बटण फिंगरप्रिंट सेंसर इम्बेडेड आहे.
Samsung Galaxy F52 5G चा डिस्प्ले
Samsung Galaxy F52 5G सह 120Hz रिफ्रेश रेट मिळतो त्यामुळे युजर्सना अभूतपूर्व स्मार्टफोन एक्सपीरियंस मिळेल आहे. हाई क्वालिटी, युजर-फ्रेंडली आणि फास्ट स्मार्टफोन आहे जो तुम्ही न थांबता ब्राउजिंग, बिंज-वॉच, गेम खेळणे, मल्टीपल अॅप वापरण्याव्यतिरिक्त इतर गोष्टींसाठी पण वापरता येईल. या फोनमध्ये 6.6 इंचाचा फुल-एचडी+ (1,080×2,400 पिक्सल) इनफिनिटी-ओ डिस्प्ले देण्यात आला आहे.
Samsung Galaxy F52 5G चा कॅमेरा
शानदार फोटोग्राफीसाठी Galaxy F52 5G मध्ये एकूण 5 कॅमेरे देण्यात आले आहेत, त्यापैकी चार मागे आणि एक फ्रंटला आहे. मागील क्वाड कॅमेरा सेटअप पाहता यात अपर्चर F1.8 सह 64 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा, अपर्चर F2.2 सह 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा, अपर्चर F2.4 सह 2 मेगापिक्सलचा डेप्थ आणि अपर्चर F2.4 सह 2 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनच्या फ्रंटला अपर्चर F2.2 सह 16 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.
हे देखील वाचा : Vodafone idea ने आणली कमालीची ऑफर, रिचार्जसाठी द्यावे लागणार नाहीत पैसे
Samsung Galaxy F52 5G मधील प्रोसेसर
फोनमध्ये Octa Core (2.2GHz Dual + 1.8GHz हेक्सा क्रियो 570 सीपीयूएस) स्नॅपड्रॅगॉन 750G 8nm मोबाईल प्लॅटफॉर्म आहे जो Adreno 619 GPU सह येतो. त्याचबरोबर फोनमध्ये 8GB की रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज आहे. फोनची स्टोरेज तुम्ही माइक्रोएसडी कार्डच्या मदतीने 1 टीबी पर्यंत वाढवू शकता.
Samsung Galaxy F52 5G ची बॅटरी
पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये 4500mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी 25W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. तसेच फोनमध्ये कनेक्टिविटी फीचर्स म्हणून एक्सेलेरोमीटर, ग्रिप सेंसर, एम्बिएंट लाइट सेंसर आणि प्रोक्सिमिटी सेंसर, 5G आणि LTE नेटवर्क सपोर्ट देण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर, यात तुम्हाला मिळेल डॉल्बी अट्मॉस, ज्याचा अनुभव तुम्ही हेडफोनसह घेऊ शकता. फोन Android 11 सह सॅमसंग One UI 3.1 वर चालतो.
Samsung Galaxy F52 5G ची किंमत
Samsung Galaxy F52 5G कंपनीने Dusky Black आणि Magic White कलर ऑप्शनमध्ये सादर केला आहे. या डिवाइसची किंमत 1999 yuan (जवळपास 22,730 रुपये आहे.) आहे. तसेच, फोन चीनमध्ये आजपासून प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध झाला आहे.