Vodafone idea ने आणली कमालीची ऑफर, रिचार्जसाठी द्यावे लागणार नाहीत पैसे

vodafone-idea

कोरोना वायरसमुळे देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये सुरु असलेल्या लॉकडाउनमध्ये टेलीकॉम कंपन्यांनी आपल्या ग्राहकांना मोठी आनंदाची बातमी दिली आहे. अलीकडेच रिलायंस जियोने आपल्या जियो फोन युजर्ससाठी एका रिचार्जवर दुसरा रिचार्ज फ्री आणि 300 मिनिटे कॉलिंग फ्री देण्याची घोषणा केली होती. या घोषणेनंतर एयरटेलने पण अशाप्रकारच्या ऑफरची घोषणा केली होती. आता महामारी दरम्यान ग्राहकांना कंपनी (VI) सोबत राहण्यास मदत करत आहे. (Vodafone idea users get free recharge corona virus impact)

Vi ची फ्री रिचार्ज ऑफर

वोडाफोन आयडिया (VI) ने आपल्या सहा कोटीच्या आसपास कमी उत्पन्न असलेल्या ग्राहकांसाठी 49 रुपयांचा प्लान मोफत देण्याची घोषणा केली आहे. कंपनीनुसार कमी उत्पन्न असलेले लोकांनी जर 79 रुपयांचा रिचार्ज केला तर त्यांना त्यावर जवळपास दुप्पट लाभ दिले जातील.

हे देखील वाचा : Android 12 मुळे बदलून जाईल स्मार्टफोन वापरण्याचा अंदाज, बघा याचे 12 शानदार फीचर्स

vodafone-idea

2,940 दशलक्ष रुपये खर्च करत आहे कंपनी

कंपनीने एका विधानात म्हटले आहे कि, VI सध्या कठीण परिस्थितीत आपल्या कमी उत्पन्न असलेल्या सहा कोटी ग्राहकांना 49 रुपयांचा पॅक निशुल्क उपलब्ध करवून देत आहे. खास फायदे देणाऱ्या या वन टाइम ऑफरच्या माध्यमातून लो इनकम ग्रुप असलेल्या युजर्सवर भारतात जवळपास 2,940 दशलक्ष रुपयांचा खर्च करत आहे.

Vodafone Idea चा स्वस्त 49 रुपयांच्या प्रीपेड प्लान

Vodafone Idea चा रुपयांचा प्रीपेड प्लान पाहता यात युजर्स 100 MB डेटा मिळतो. तसेच रिचार्जमध्ये वॉयस कॉलिंगसाठी 38 रुपये टॉकटाइम मिळतो. इंटरनेट आणि कॉलिंगच्या फायद्यांव्यतिरिक्त या प्लानमध्ये 28 दिवसांची वैधता मिळेल.

Vi चा न्यू प्लान

तसेच वोडाफोन आयडियाने एक नवीन कॉम्बो वाउचर RC79 सादर केला आहे. या प्लानचे फायदे पाहता यात युजर्सना डबल टॉकटाइम 128 रुपये (64+64) दिला जात आहे. तुम्हाला इंटरनटे वापरण्यासाठी 200 MB डेटा मिळेल. या रिचार्जमध्ये 28 दिवसांची वैधता मिळेल.

हे देखील वाचा : Vivo ने लॉन्च केला स्वस्त 5G फोन वीवो Y52 स्मार्टफोन, करू शकेल का Xiaomi-Realme ची सुट्टी

Jio ची फ्री ऑफर

Jio ने पण अलीकडेच आपल्या युजर्सच्या कोविड रिलीफ प्लानची घोषणा केली होती. जियोने शब्द दिला होता कि जे ग्राहक कोरोनावायरसच्या या स्थितीमुळे आपल्या जियो फोनमध्ये रिचार्ज करू शकत नाहीत त्यांना कंपनी प्रतिमाह 300 मिनिटे आउटगोइंग कॉल फ्री देत आहे. तसेच जियोने युजर्सद्वारे रिचार्ज केलेल्या प्रत्येक Jio Phone प्लानवर एक फ्री रिचार्ज पण देण्याची घोषणा करण्यात आली आहे. कंपनी जो अतिरिक्त रिचार्ज प्लान देईल तो त्याच किंमतीचा असेल जो Jio Phone युजरने रिचार्ज केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here