POCO ने आणला लो बजेटमध्ये नवीन 5G फोन, यात आहे 5,000mAh बॅटरी आणि 48MP कॅमेरा

पॉपुलर स्मार्टफोन ब्रँड Poco ने आज भारतासह जगभरात आपला सर्वात जास्त विकल्या गेलेल्या बजेट फोन Poco M3 च्या प्रो मॉडेलचा 5जी वेरिएंट POCO M3 Pro 5G आज अधिकृतपणे लॉन्च केला आहे. हा फोन कमी किंमतीत चांगल्या फीचर्स सोबतच खास डिजाइनसह सादर केला गेला आहे. पोको एम3 प्रो 5जी मीडियाटेक प्रोसेसर आणि हाई रिफ्रेश रेटने सुसज्ज केला गेला आहे. फोन कंपनीच्या पॅरेंट कंपनी शाओमीच्या रेडमी नोट 10 5G चा रिब्रँडेड वेरिएंट आहे. (Poco M3 Pro 5G launched 48mp camera price specification)

POCO M3 Pro 5G ची डिजाइन

पोकोचा हा नवीन फोन पंच-होल डिस्प्लेवर लॉन्च झाला आहे ज्याला कंपनीने डॉट डिस्प्ले असे नाव दिले आहे. स्क्रीनच्या तीन कडा बेजललेस आहेत तसेच बारीक रुंद चिन पार्ट देण्यात आला आहे. पंच-होल स्क्रीनच्या वरच्या बाजूला मध्यभागी देण्यात आला आहे. फोनच्या बॅक पॅनलवर क्वॉड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो डावीकडे आहे. हा सेटअप पोकोच्या ब्रँडिंग कवरमध्ये ठेवण्यात आला आहे. फोनच्या मागील POCO ब्रँडिंग कंपनीने याआधी पोको एम3 मध्ये पण दिली आहे. तर फिंगरप्रिंट सेंसर डावीकडे असलेल्या पावर बटणमध्ये एम्बेड केला गेला आहे.

हे देखील वाचा : Vivo ने लॉन्च केला स्वस्त 5G फोन वीवो Y52 स्मार्टफोन, करू शकेल का Xiaomi-Realme ची सुट्टी

poco m3 pro display

POCO M3 Pro 5G चा डिस्प्ले

पोको एम3 प्रो 5जी स्मार्टफोन 20:9 आस्पेक्ट रेशियोवर सादर केला गेला आहे जो 2400 X 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या फुलएचडी+ एलसीडी डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोनचा डिस्प्ले कोर्निंग गोरिल्ला ग्लास 3 ने प्रोटेक्टेड आहे जो 90हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करतो. त्याचबरोबर हा फोन 1100निट्स ब्राइटनेसला पण सपोर्ट करतो. या वैशिष्ट्यानंतर फोनचा डिस्प्ले खूप सुंदर दिसतो.

POCO M3 Pro मधील कॅमेरा

फोटोग्राफीसाठी POCO M3 Pro मध्ये मागे ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या सेटअपमध्ये 0.8µm पिक्सलसह 1/2.0” सेंसर आणि अपर्चर f/1.8 असलेला 48 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच फोनमध्ये दोन 2MP कॅमेरा (मॅक्रो आणि डेप्थ) देण्यात आले आहेत. फ्रंटला व्हिडीओ कॉलिंग आणि सेल्फीसाठी 8MP चा कॅमेरा मिळेल.

poco m3 Pro gaming

प्रोसेसिंग पावर

पोकोने आपल्या या फोनला ताकद देण्यासाठी 7nm डाइमेंशन 700 चिपची निवड केली आहे. यात 2.77 Gbps पर्यंतचा पीक डाउनलोड स्पीड आणि Cortex-A76 कोरची एक जोडी, त्याचबरोबर एक माली G57 GPU आहे. फोनमध्ये तुम्हाला 64GB या 128GB UFS 2.2 स्टोरेजसह क्रमशः 4GB किंवा 6GB RAM (LPDDR4X) मिळेल.

हे देखील वाचा : Vodafone idea ने आणली कमालीची ऑफर, रिचार्जसाठी द्यावे लागणार नाहीत पैसे

बॅटरी आणि कनेक्टिविटी ऑप्शन

हा 5,000mAh च्या बॅटरीसह येतो. Poco M3 मध्ये 6,000mAh ची बॅटरी होती. तसेच POCO M3 Pro 5G ची बॅटरी 18W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते. फोन अँड्रॉइड 11 वर बेस्ड MIUI 12 वर चालतो. फोनमध्ये सर्व बेसिक कनेक्टिविटी फीचर्स देण्यात आले आहेत.

POCO M3 Pro 5G ची किंमत

POCO M3 Pro च्या 4GB + 64GB वर्जनची किंमत EUR 179 (जवळपास 16,000 रुपये) आणि 6GB + 128GB वर्जनची किंमत EUR 199 (जवळपास 17,750 रुपये) आहे. परंतु, कंपनीने एका स्पेशल ऑफरअंतगर्त फोन क्रमश: 159 यूरो आणि 179 यूरोच्या आरंभिक किंमतीत विक्रीची घोषणा केली आहे. POCO चा हा नवीन फोन येलो, कूल ब्लू आणि पावर ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये आला आहे. तसेच डिवाइस यूरोपमध्ये 20 मेपासून Amazon, POCO ची वेबसाइट, AliExpress आणि Gobooच्या माध्यमातून विक्रीसाठी उपलब्ध होईल. POCO M3 Pro 5G च्या इंडिया लॉन्चबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here