Samsung Galaxy S10 X 5G - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 15 Jan 2019 12:00:08 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 12जीबी रॅम, 5,000एमएएच बॅटरी आणि 6 कॅमेरे असलेला सॅमसंगचा 5जी फोन 29 मार्चला होईल लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s10-x-5g-phone-to-launch-28-march-5000mah-battery-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s10-x-5g-phone-to-launch-28-march-5000mah-battery-in-marathi/#respond Tue, 15 Jan 2019 12:00:08 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3382 गॅलेक्सी एस10 सीरीजच्या या दोन्ही स्मार्टफोनच्या किंमतीतील फरक किंमतीच्या दुप्पट असू शकतो.

The post 12जीबी रॅम, 5,000एमएएच बॅटरी आणि 6 कॅमेरे असलेला सॅमसंगचा 5जी फोन 29 मार्चला होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सॅमसंग कंपनी लो बजट स्मार्टफोन पासून ते हाईएंड फ्लॅगशिप पर्यंत सर्व डिवाईस बनवते. या कोरियन कंपनी ने आपल्या प्रत्येक सेग्मेंट मध्ये प्राविण्य मिळवले आहे. गॅलेक्सी एस सीरीज सॅमसंगची अशी सीरीज आहे जिची वाट दरवर्षी स्मार्टफोन यूजर्स व टेक प्रेमी बघतात. सॅमसंगच्या या स्मार्टफोन सीरीजची प्रतीक्षा यावेळी आधीपेक्षा जास्त खास आहे. कारण कंपनी यावर्षी गॅलेक्सी एस सीरीज मध्ये गॅलेक्सी एस10 सोबत एकूण 4 पावरफुल मॉडेल घेऊन येणार आहे आणि यात सॅमसंगचा पहिला 5जी फोन पण असेल. तर आज अजून एका नवीन बातमीत सॅमसंग गॅलेक्सी एस10 सीरीजच्या लॉन्च डेटचा पण खुलासा झाला आहे.

सॅमसंग गॅलेक्सी एस10 सीरीज बद्दल कोरियन मीडिया ने नवीन बातमी दिली आहे. या रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे कि सॅमसंग मार्चच्या 8 तारखेला आपल्या नव्या सीरीजचे गॅलेक्सी एस10, गॅलेक्सी एस10 ई आणि गॅलेक्सी एस10+ स्मार्टफोन बाजारात आणेल. या ग्लोबल लॉन्च नंतर काही दिवसांनी 29 मार्चला सॅमसंग आपला पहिला 5जी स्मार्टफोन गॅलेक्सी एस10 एक्स पण लॉन्च करेल. अशा आहे कि याच तारखांना सॅमसंग गॅलेक्सी एस10 सीरीजचे फोन भारतात पण येतील.

रिपोर्ट नुसार सॅमसंगच्या 5जी स्मार्टफोन गॅलेक्सी एस10 एक्स ची अंर्तराष्ट्रीय किंमत 1400 यूएस डॉलरच्या आसपास असेल. हि किंमत भारतीय करंसीनुसार 1 लाखांपेक्षा वर जाणार आहे. म्हणजे सॅमसंगचा 5जी फोन सॅमसंग फॅन्सना खूप महाग पडू शकतो. तसेच मीडिया रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे कि गॅलेक्सी एस10, गॅलेक्सी एस10 ई आणि गॅलेक्सी एस10+ मॉडेल्स मध्ये सर्वात कमी किंमतिचा फोन पण जवळपास 700 यूएस डॉलर मध्ये विकला जाईल. जे जवळपास 50,000 रुपये होतात.

सॅमसंग गॅलेक्सी एस10 एक्स बद्दल बोलायचे तर हा फोन गॅलेक्सी एस10 सीरीजचा एकमात्र 5जी सपोर्ट असलेला फोन असेल. हा फोन वेगवेगळ्या मार्केट्स मध्ये गॅलेक्सी एस10 एक्सपीरियंस किंवा गॅलेक्सी एस10 एक्सपान्ड नावाने येऊ शकतो. लीक्सनुसार सॅमसंग आपला हा फोन कंपनीच्या एक्सनॉस 5100 5जी मॉडेम सह आणू शकते. हाच मॉडेमी फोन मध्ये 5जी सपोर्ट एनेबल करेल आणि फोन मध्ये 5जी स्पीड वर इंटरनेट चालवू शकेल.

सॅमसंग गॅलेक्सी एस10 एक्स मध्ये 6.7-इंचाचा मोठा सुपर एमोलेड डिस्प्ले मिळू शकतो. बोलले जात आहे कि हा फोन 10जीबी आणि 12जीबी रॅम वर लॉन्च केला जाऊ शकतो तसेच फोन मध्ये 512जीबी आणि 1टीबी ची इंटरनल स्टोरेज मिळू शकते. फोटोग्राफी साठी गॅलेक्सी एस10 एक्स मध्ये 4 रियर कॅमेरा आणि 2 फ्रंट सेल्फी कॅमेरे मिळू शकतात. म्हणजे हा फोन 6 कॅमेरा सेंसर सह येईल.

ताजा रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे कि सॅमसंग गॅलेक्सी एस10 एक्स मध्ये 5,000एमएएच ची पावरफुल बॅटरी दिली जाईल. बोलले जात आहे कि गॅलेक्सी एस10 एक्स सॅमसंग गॅलेक्सी एस10 सीरीजचा सर्वात एडवांस आणि सर्वात महाग स्मार्टफोन असेल. तर दुसरीकडे गॅलेक्सी एस10 ई या सीरीजचा सर्वात स्वस्त फोन असेल. विशेष म्हणजे गॅलेक्सी एस10 सीरीजच्या या दोन्ही स्मार्टफोनच्या किंमतीतील फरक किंमतीच्या दुप्पट असू शकतो.

The post 12जीबी रॅम, 5,000एमएएच बॅटरी आणि 6 कॅमेरे असलेला सॅमसंगचा 5जी फोन 29 मार्चला होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s10-x-5g-phone-to-launch-28-march-5000mah-battery-in-marathi/feed/ 0
सॅमसंग गॅलेक्सी एस10 चे फोटो आले समोर, सर्वांपेक्षा वेगळी असेल डिजाईन, डिस्प्लेच्या आत असेल सेल्फी कॅमेरा https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s10-real-image-with-camera-hole-design-5g-12gb-ram-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s10-real-image-with-camera-hole-design-5g-12gb-ram-in-marathi/#respond Thu, 01 Nov 2018 09:15:13 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=2734 गॅलेक्सी एस10 चा हा फोटो टिप्सटर बेन जेस्किन ने आपल्या ट्वीटर हँडल वरून शेयर केला आहे.

The post सॅमसंग गॅलेक्सी एस10 चे फोटो आले समोर, सर्वांपेक्षा वेगळी असेल डिजाईन, डिस्प्लेच्या आत असेल सेल्फी कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सॅमसंग गॅलेक्सी एस10 ची चर्चा काही थांबत नाही आहे. गॅलेक्सी एस10 सॅमसंग 12जीबी रॅम मेमरी सह लॉन्च करेल आणि यात 5जी सपोर्ट पण असेल हे समोर आल्यापासून गॅलेक्सी एस10 संबंधित वेगवेगळ्या बातम्या येत आहेत. याच आठवड्यात समजले कि गॅलेक्सी एस10 पूर्णपणे बेजल लेस डिस्प्ले सह सादर केला जाईल आणि यात कोणतीही नॉच नसेल तर आज गॅलेक्सी एस10 ची पहिली खरी ईमेज समोर आली आहे.

सॅमसंग गॅलेक्सी एस10 समोर आला आहे. गॅलेक्सी एस10 ची खरी ईमेज इंटरनेट वर वायरल झाली आहे. हा फोटो सॅमसंगच्या आगामी डिवाईस गॅलेक्सी एस10 आहे म्हणून लोकांना आवडत आहे असे नाही, तर हा फोटो इंटरनेट वर पसरण्याचे कारण आहे या फोनचा अनोखा डिस्प्ले. आतापर्यंत वॉटरड्रॉप, ड्यूड्रॉप व हेलो नॉच ट्रेंड मध्ये होत्या पण गॅलेक्सी एस10 कोणत्याही प्रकारच्या नॉचला सपोर्ट करत नाही. या या फोन मध्ये ‘कॅमेरा होल’ देण्यात आला आहे. हा कॅमेरा होल फोन बॉडीशी जोडलेला नसून फोनच्या डिस्प्लेच्या आत आहे.

गॅलेक्सी एस10 चा हा फोटो टिप्सटर बेन जेस्किन ने आपल्या ट्वीटर हँडल वरून शेयर केला आहे. या फोटो मध्ये फोनचा फ्रंट पॅनल दाखिवण्यात आला आहे. गॅलेक्सी एस10 चे तिन्ही बाजू बेजल लेस आहेत. या फोन मध्ये कोणतीही नॉच नाही. फोनचा सेल्फी कॅमेरा डिस्प्लेच्या आत देण्यात आला आहे. फ्रंट पॅनल वरील डिस्प्ले वर छोटासा ‘स्पॉट’ आहे ज्यात कॅमेरा सेंसर आहे. हा कॅमेरा होल फोनच्या बॉडीशी जोडलेला नाही तर या होलच्या चारही बाजूला डिस्प्लेची स्क्रीन देण्यात आली आहे.

सॅमसंग गॅलेक्सी एस10 च्या डाव्या पॅनल वर वाल्यूम रॉकर आणि पावर बटन देण्यात आले आहे तर उजव्या पॅनल वर बिक्सबेची शार्टकट की आहे. गॅलेक्सी एस10 च्या दोन्ही बाजूला कर्व्ड ऐज डिस्प्ले आहे. विशेष म्हणजे गॅलेक्सी एस10 ज्या डिजाईन व डिस्प्ले सह लॉन्च होणार आहे, तसा डिस्प्ले आजपर्यंत कोणत्याही कंपनी किंवा ब्रांड ने आपल्या स्मार्टफोन मध्ये दिलेला नाही. असे बोलले जात आहे कि गॅलेक्सी एस10 चार मॉडेल्स मध्ये सादर केला जाऊ शकतो ज्यात गॅलेक्सी एस10, गॅलेक्सी एस10 प्लस, गॅलेक्सी एस10 एक्स आणि गॅलेक्सी एस10एक्स 5जी असतील.

स्पेसिफिकेशन्स पाहता लीक्स नुसार गॅलेक्सी एस10 प्लस मध्ये 6जीबी रॅम असेल तर गॅलेक्सी एस10 मॉडेल 4जीबी रॅम सह येईल. ताजा लीक मध्ये सांगण्यात आले आहे कि सॅमसंग गॅलेक्सी एस सीरीजचे आगामी स्मार्टफोन पुढच्यावर्षी मार्च मध्ये लॉन्च होतील. कंपनी मार्च 2019 मध्ये गॅलेक्सी एस10 सीरीज टेक मार्केट मध्ये आॅफिशियल करेल जी ग्लोबल लॉन्च नंतर काही दिवसांनी भारतीय बाजारात पण येईल.

सॅमसंग गॅलेक्सी एस10 च्या फोटोग्राफी सेग्मेंट संबंधित एक लीक आधी पण समोर आला आहे. या लीक वरून समजले कि गॅलेक्सी एस10 सीरीजचे फोन ट्रिपल रियर कॅमेरा सह येतील. फोनचा प्राइमरी रियर कॅमेरा 12-मेगापिक्सलचा असेल जो एफ/1.5 आणि एफ/2.4 के डुअल अपर्चर सह येईल. तर सेकेंडरी कॅमेरा सेंसर एफ/1.9 अपर्चर वाला 16-मेगापिक्सलचा असेल तसेच तिसरा कॅमेरा सेंसर 13-मेगापिक्सलचा एफ/2.4 अपर्चर क्षमता असलेला असेल. गॅलेक्सी एस10 च्या या कॅमेरा सेटअप मध्ये अल्ट्रा-वाइंड एंगल लेंस असेल जी 123-डिग्री फिल्ड आॅफ व्यू कॅप्चर करू शकेल.

कंपनी​ हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 855 चिपसेट किंवा एक्नोस 9820 चिपसेट वर सादर करू शकते. या फोन्स मध्ये 7 नॅनो मीटर फॅब्रिकेशन वाला पावरफुल प्रोसेसर असू शकतो जो कमी पावर वापरतो. दिलेल्या माहितीनुसार कंपनी सॅमसंग गॅलेक्सी नोट 9 प्रमाणे गॅलेक्सी एस10 ला पण 4,000 च्या बॅटरी सह सादर करू शकते.

The post सॅमसंग गॅलेक्सी एस10 चे फोटो आले समोर, सर्वांपेक्षा वेगळी असेल डिजाईन, डिस्प्लेच्या आत असेल सेल्फी कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s10-real-image-with-camera-hole-design-5g-12gb-ram-in-marathi/feed/ 0
जगातील सर्वात ताकदवान फोन असेल सॅमसंग गॅलेक्सी एस10, 12जीबी रॅम सह होईल लॉन्च, 5जी स्पीडने चालेल इंटरनेट https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s10-x-5g-s10-x-and-s10-plus-with-12gb-ram-5g-support-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s10-x-5g-s10-x-and-s10-plus-with-12gb-ram-5g-support-in-marathi/#respond Thu, 25 Oct 2018 07:56:02 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=2632 गॅलेक्सी एस10 सीरीज अंतर्गत सॅमसंग या फोनचे चार मॉडेल सादर करेल.

The post जगातील सर्वात ताकदवान फोन असेल सॅमसंग गॅलेक्सी एस10, 12जीबी रॅम सह होईल लॉन्च, 5जी स्पीडने चालेल इंटरनेट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
टेक दिग्गज सॅमसंग जितकी जुनी कंपनी आहे, टेक्नॉलिजीच्या बाबतीत तेवढीच एडवांस आहे. दरवर्षी सॅमसंग आपल्या फ्लॅगशिप अंतर्गत एखादा असा स्मार्टफोन सादर करते जो इतर ब्रांड्स साठी आदर्श ठरतो. यावर्षी सॅमसंग ने गॅलेक्सी एस9 स्मार्टफोन सादर करून कॅमेरा आणि प्रोसेसिंगच्या बाबतीत उत्कृष्ट असा डिवाईस स्मार्टफोन बाजारात आणला आहे. पण आता सॅमसंग आपल्या आगामी फोन गॅलेक्सी एस10 ने स्मार्टफोन टेक्नॉलॉजी अजूनच पुढे घेऊन जाणार आहे. सॅमसंग संबंधित एक ताजा माहिती समोर आली आहे जावरून समजले आहे कि सॅमसंग गॅलेक्सी एस10 12जीबी रॅम सह लॉन्च होईल आणि हा 5जी ला पण सपोर्ट करेल.

सॅमसंग गॅलेक्सी एस10 संबंधित हि लेटेस्ट बातमी प्रसिद्ध टिप्सटर स्लॅशलीक ने इंटरनेट वर शेयर केली आहे. ताजा लीक मध्ये समजले आहे कि गॅलेक्सी एस10 ला सॅमसंग 12जीबी च्या पावरफुल रॅम मेमरी सह बाजारात आणेल. गॅलेक्सी एस सीरीजचा हा स्मार्टफोन गॅलेक्सी एस10 एक्स 5जी नावाने लॉन्च केला जाईल. फोनच्या नावावरून समजले आहे कि हा फोन 5जी कनेक्टिविटी सह बाजारात येईल.

गॅलेक्सी एस10 सीरीज अंतर्गत सॅमसंग या फोनचे चार मॉडेल सादर करेल. या मॉडेल्सचे नाव गॅलेक्सी एस10, गॅलेक्सी एस10 प्लस, गॅलेक्सी एस10 एक्स आणि गॅलेक्सी एस10एक्स 5जी असतील. या चारही मॉडेल्स पैकी गॅलेक्सी एस10एक्स 5जी सर्वात जास्त ताकदवान असेल. या मॉडेल मध्ये 12जीबी रॅम असेल तर इतर मॉडेल्स पाहता गॅलेक्सी एस10 एक्स कंपनी 8जीबी रॅम सह लॉन्च करेल.

सॅमसंग गॅलेक्सी एस10 प्लस मध्ये 6जीबी रॅम देईल तसेच गॅलेक्सी एस10 मॉडेल 4जीबी रॅम सह टेक बाजारात येईल. ताजा लीक मध्ये सांगण्यात आले आहे कि सॅमसंग गॅलेक्सी एस सीरीजचे आगामी स्मार्टफोन पुढल्या वर्षी मार्च मध्ये लॉन्च होतील. कंपनी मार्च 2019 मध्ये गॅलेक्सी एस10 सीरीज टेक मार्केट मध्ये आॅफिशियल करेल जी ग्लोबल लॉन्च नंतर काही दिवसांनी भारतीय बाजारात पण उपलब्ध होईल.

The post जगातील सर्वात ताकदवान फोन असेल सॅमसंग गॅलेक्सी एस10, 12जीबी रॅम सह होईल लॉन्च, 5जी स्पीडने चालेल इंटरनेट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s10-x-5g-s10-x-and-s10-plus-with-12gb-ram-5g-support-in-marathi/feed/ 0