जगातील सर्वात ताकदवान फोन असेल सॅमसंग गॅलेक्सी एस10, 12जीबी रॅम सह होईल लॉन्च, 5जी स्पीडने चालेल इंटरनेट

टेक दिग्गज सॅमसंग जितकी जुनी कंपनी आहे, टेक्नॉलिजीच्या बाबतीत तेवढीच एडवांस आहे. दरवर्षी सॅमसंग आपल्या फ्लॅगशिप अंतर्गत एखादा असा स्मार्टफोन सादर करते जो इतर ब्रांड्स साठी आदर्श ठरतो. यावर्षी सॅमसंग ने गॅलेक्सी एस9 स्मार्टफोन सादर करून कॅमेरा आणि प्रोसेसिंगच्या बाबतीत उत्कृष्ट असा डिवाईस स्मार्टफोन बाजारात आणला आहे. पण आता सॅमसंग आपल्या आगामी फोन गॅलेक्सी एस10 ने स्मार्टफोन टेक्नॉलॉजी अजूनच पुढे घेऊन जाणार आहे. सॅमसंग संबंधित एक ताजा माहिती समोर आली आहे जावरून समजले आहे कि सॅमसंग गॅलेक्सी एस10 12जीबी रॅम सह लॉन्च होईल आणि हा 5जी ला पण सपोर्ट करेल.

सॅमसंग गॅलेक्सी एस10 संबंधित हि लेटेस्ट बातमी प्रसिद्ध टिप्सटर स्लॅशलीक ने इंटरनेट वर शेयर केली आहे. ताजा लीक मध्ये समजले आहे कि गॅलेक्सी एस10 ला सॅमसंग 12जीबी च्या पावरफुल रॅम मेमरी सह बाजारात आणेल. गॅलेक्सी एस सीरीजचा हा स्मार्टफोन गॅलेक्सी एस10 एक्स 5जी नावाने लॉन्च केला जाईल. फोनच्या नावावरून समजले आहे कि हा फोन 5जी कनेक्टिविटी सह बाजारात येईल.

गॅलेक्सी एस10 सीरीज अंतर्गत सॅमसंग या फोनचे चार मॉडेल सादर करेल. या मॉडेल्सचे नाव गॅलेक्सी एस10, गॅलेक्सी एस10 प्लस, गॅलेक्सी एस10 एक्स आणि गॅलेक्सी एस10एक्स 5जी असतील. या चारही मॉडेल्स पैकी गॅलेक्सी एस10एक्स 5जी सर्वात जास्त ताकदवान असेल. या मॉडेल मध्ये 12जीबी रॅम असेल तर इतर मॉडेल्स पाहता गॅलेक्सी एस10 एक्स कंपनी 8जीबी रॅम सह लॉन्च करेल.

सॅमसंग गॅलेक्सी एस10 प्लस मध्ये 6जीबी रॅम देईल तसेच गॅलेक्सी एस10 मॉडेल 4जीबी रॅम सह टेक बाजारात येईल. ताजा लीक मध्ये सांगण्यात आले आहे कि सॅमसंग गॅलेक्सी एस सीरीजचे आगामी स्मार्टफोन पुढल्या वर्षी मार्च मध्ये लॉन्च होतील. कंपनी मार्च 2019 मध्ये गॅलेक्सी एस10 सीरीज टेक मार्केट मध्ये आॅफिशियल करेल जी ग्लोबल लॉन्च नंतर काही दिवसांनी भारतीय बाजारात पण उपलब्ध होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here