सॅमसंग गॅलेक्सी एस10 चे फोटो आले समोर, सर्वांपेक्षा वेगळी असेल डिजाईन, डिस्प्लेच्या आत असेल सेल्फी कॅमेरा

सॅमसंग गॅलेक्सी एस10 ची चर्चा काही थांबत नाही आहे. गॅलेक्सी एस10 सॅमसंग 12जीबी रॅम मेमरी सह लॉन्च करेल आणि यात 5जी सपोर्ट पण असेल हे समोर आल्यापासून गॅलेक्सी एस10 संबंधित वेगवेगळ्या बातम्या येत आहेत. याच आठवड्यात समजले कि गॅलेक्सी एस10 पूर्णपणे बेजल लेस डिस्प्ले सह सादर केला जाईल आणि यात कोणतीही नॉच नसेल तर आज गॅलेक्सी एस10 ची पहिली खरी ईमेज समोर आली आहे.

सॅमसंग गॅलेक्सी एस10 समोर आला आहे. गॅलेक्सी एस10 ची खरी ईमेज इंटरनेट वर वायरल झाली आहे. हा फोटो सॅमसंगच्या आगामी डिवाईस गॅलेक्सी एस10 आहे म्हणून लोकांना आवडत आहे असे नाही, तर हा फोटो इंटरनेट वर पसरण्याचे कारण आहे या फोनचा अनोखा डिस्प्ले. आतापर्यंत वॉटरड्रॉप, ड्यूड्रॉप व हेलो नॉच ट्रेंड मध्ये होत्या पण गॅलेक्सी एस10 कोणत्याही प्रकारच्या नॉचला सपोर्ट करत नाही. या या फोन मध्ये ‘कॅमेरा होल’ देण्यात आला आहे. हा कॅमेरा होल फोन बॉडीशी जोडलेला नसून फोनच्या डिस्प्लेच्या आत आहे.

गॅलेक्सी एस10 चा हा फोटो टिप्सटर बेन जेस्किन ने आपल्या ट्वीटर हँडल वरून शेयर केला आहे. या फोटो मध्ये फोनचा फ्रंट पॅनल दाखिवण्यात आला आहे. गॅलेक्सी एस10 चे तिन्ही बाजू बेजल लेस आहेत. या फोन मध्ये कोणतीही नॉच नाही. फोनचा सेल्फी कॅमेरा डिस्प्लेच्या आत देण्यात आला आहे. फ्रंट पॅनल वरील डिस्प्ले वर छोटासा ‘स्पॉट’ आहे ज्यात कॅमेरा सेंसर आहे. हा कॅमेरा होल फोनच्या बॉडीशी जोडलेला नाही तर या होलच्या चारही बाजूला डिस्प्लेची स्क्रीन देण्यात आली आहे.

सॅमसंग गॅलेक्सी एस10 च्या डाव्या पॅनल वर वाल्यूम रॉकर आणि पावर बटन देण्यात आले आहे तर उजव्या पॅनल वर बिक्सबेची शार्टकट की आहे. गॅलेक्सी एस10 च्या दोन्ही बाजूला कर्व्ड ऐज डिस्प्ले आहे. विशेष म्हणजे गॅलेक्सी एस10 ज्या डिजाईन व डिस्प्ले सह लॉन्च होणार आहे, तसा डिस्प्ले आजपर्यंत कोणत्याही कंपनी किंवा ब्रांड ने आपल्या स्मार्टफोन मध्ये दिलेला नाही. असे बोलले जात आहे कि गॅलेक्सी एस10 चार मॉडेल्स मध्ये सादर केला जाऊ शकतो ज्यात गॅलेक्सी एस10, गॅलेक्सी एस10 प्लस, गॅलेक्सी एस10 एक्स आणि गॅलेक्सी एस10एक्स 5जी असतील.

स्पेसिफिकेशन्स पाहता लीक्स नुसार गॅलेक्सी एस10 प्लस मध्ये 6जीबी रॅम असेल तर गॅलेक्सी एस10 मॉडेल 4जीबी रॅम सह येईल. ताजा लीक मध्ये सांगण्यात आले आहे कि सॅमसंग गॅलेक्सी एस सीरीजचे आगामी स्मार्टफोन पुढच्यावर्षी मार्च मध्ये लॉन्च होतील. कंपनी मार्च 2019 मध्ये गॅलेक्सी एस10 सीरीज टेक मार्केट मध्ये आॅफिशियल करेल जी ग्लोबल लॉन्च नंतर काही दिवसांनी भारतीय बाजारात पण येईल.

सॅमसंग गॅलेक्सी एस10 च्या फोटोग्राफी सेग्मेंट संबंधित एक लीक आधी पण समोर आला आहे. या लीक वरून समजले कि गॅलेक्सी एस10 सीरीजचे फोन ट्रिपल रियर कॅमेरा सह येतील. फोनचा प्राइमरी रियर कॅमेरा 12-मेगापिक्सलचा असेल जो एफ/1.5 आणि एफ/2.4 के डुअल अपर्चर सह येईल. तर सेकेंडरी कॅमेरा सेंसर एफ/1.9 अपर्चर वाला 16-मेगापिक्सलचा असेल तसेच तिसरा कॅमेरा सेंसर 13-मेगापिक्सलचा एफ/2.4 अपर्चर क्षमता असलेला असेल. गॅलेक्सी एस10 च्या या कॅमेरा सेटअप मध्ये अल्ट्रा-वाइंड एंगल लेंस असेल जी 123-डिग्री फिल्ड आॅफ व्यू कॅप्चर करू शकेल.

कंपनी​ हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 855 चिपसेट किंवा एक्नोस 9820 चिपसेट वर सादर करू शकते. या फोन्स मध्ये 7 नॅनो मीटर फॅब्रिकेशन वाला पावरफुल प्रोसेसर असू शकतो जो कमी पावर वापरतो. दिलेल्या माहितीनुसार कंपनी सॅमसंग गॅलेक्सी नोट 9 प्रमाणे गॅलेक्सी एस10 ला पण 4,000 च्या बॅटरी सह सादर करू शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here