12जीबी रॅम, 5,000एमएएच बॅटरी आणि 6 कॅमेरे असलेला सॅमसंगचा 5जी फोन 29 मार्चला होईल लॉन्च

सॅमसंग कंपनी लो बजट स्मार्टफोन पासून ते हाईएंड फ्लॅगशिप पर्यंत सर्व डिवाईस बनवते. या कोरियन कंपनी ने आपल्या प्रत्येक सेग्मेंट मध्ये प्राविण्य मिळवले आहे. गॅलेक्सी एस सीरीज सॅमसंगची अशी सीरीज आहे जिची वाट दरवर्षी स्मार्टफोन यूजर्स व टेक प्रेमी बघतात. सॅमसंगच्या या स्मार्टफोन सीरीजची प्रतीक्षा यावेळी आधीपेक्षा जास्त खास आहे. कारण कंपनी यावर्षी गॅलेक्सी एस सीरीज मध्ये गॅलेक्सी एस10 सोबत एकूण 4 पावरफुल मॉडेल घेऊन येणार आहे आणि यात सॅमसंगचा पहिला 5जी फोन पण असेल. तर आज अजून एका नवीन बातमीत सॅमसंग गॅलेक्सी एस10 सीरीजच्या लॉन्च डेटचा पण खुलासा झाला आहे.

सॅमसंग गॅलेक्सी एस10 सीरीज बद्दल कोरियन मीडिया ने नवीन बातमी दिली आहे. या रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे कि सॅमसंग मार्चच्या 8 तारखेला आपल्या नव्या सीरीजचे गॅलेक्सी एस10, गॅलेक्सी एस10 ई आणि गॅलेक्सी एस10+ स्मार्टफोन बाजारात आणेल. या ग्लोबल लॉन्च नंतर काही दिवसांनी 29 मार्चला सॅमसंग आपला पहिला 5जी स्मार्टफोन गॅलेक्सी एस10 एक्स पण लॉन्च करेल. अशा आहे कि याच तारखांना सॅमसंग गॅलेक्सी एस10 सीरीजचे फोन भारतात पण येतील.

रिपोर्ट नुसार सॅमसंगच्या 5जी स्मार्टफोन गॅलेक्सी एस10 एक्स ची अंर्तराष्ट्रीय किंमत 1400 यूएस डॉलरच्या आसपास असेल. हि किंमत भारतीय करंसीनुसार 1 लाखांपेक्षा वर जाणार आहे. म्हणजे सॅमसंगचा 5जी फोन सॅमसंग फॅन्सना खूप महाग पडू शकतो. तसेच मीडिया रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे कि गॅलेक्सी एस10, गॅलेक्सी एस10 ई आणि गॅलेक्सी एस10+ मॉडेल्स मध्ये सर्वात कमी किंमतिचा फोन पण जवळपास 700 यूएस डॉलर मध्ये विकला जाईल. जे जवळपास 50,000 रुपये होतात.

सॅमसंग गॅलेक्सी एस10 एक्स बद्दल बोलायचे तर हा फोन गॅलेक्सी एस10 सीरीजचा एकमात्र 5जी सपोर्ट असलेला फोन असेल. हा फोन वेगवेगळ्या मार्केट्स मध्ये गॅलेक्सी एस10 एक्सपीरियंस किंवा गॅलेक्सी एस10 एक्सपान्ड नावाने येऊ शकतो. लीक्सनुसार सॅमसंग आपला हा फोन कंपनीच्या एक्सनॉस 5100 5जी मॉडेम सह आणू शकते. हाच मॉडेमी फोन मध्ये 5जी सपोर्ट एनेबल करेल आणि फोन मध्ये 5जी स्पीड वर इंटरनेट चालवू शकेल.

सॅमसंग गॅलेक्सी एस10 एक्स मध्ये 6.7-इंचाचा मोठा सुपर एमोलेड डिस्प्ले मिळू शकतो. बोलले जात आहे कि हा फोन 10जीबी आणि 12जीबी रॅम वर लॉन्च केला जाऊ शकतो तसेच फोन मध्ये 512जीबी आणि 1टीबी ची इंटरनल स्टोरेज मिळू शकते. फोटोग्राफी साठी गॅलेक्सी एस10 एक्स मध्ये 4 रियर कॅमेरा आणि 2 फ्रंट सेल्फी कॅमेरे मिळू शकतात. म्हणजे हा फोन 6 कॅमेरा सेंसर सह येईल.

ताजा रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे कि सॅमसंग गॅलेक्सी एस10 एक्स मध्ये 5,000एमएएच ची पावरफुल बॅटरी दिली जाईल. बोलले जात आहे कि गॅलेक्सी एस10 एक्स सॅमसंग गॅलेक्सी एस10 सीरीजचा सर्वात एडवांस आणि सर्वात महाग स्मार्टफोन असेल. तर दुसरीकडे गॅलेक्सी एस10 ई या सीरीजचा सर्वात स्वस्त फोन असेल. विशेष म्हणजे गॅलेक्सी एस10 सीरीजच्या या दोन्ही स्मार्टफोनच्या किंमतीतील फरक किंमतीच्या दुप्पट असू शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here