Samsung Galaxy S21 FE - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 09 Mar 2023 11:36:23 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Samsung Galaxy S20 FE आणि Galaxy S21 FE 5G वर कंपनी देतेय डिस्काउंट https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s20-fe-and-s21-fe-5g-phone-discount-offer-samsung-smartphone-deals/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s20-fe-and-s21-fe-5g-phone-discount-offer-samsung-smartphone-deals/#respond Tue, 20 Sep 2022 11:21:40 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=13284 Samsung Galaxy S20 FE 5G आणि Samsung Galaxy S20 FE 5G असे सॅमसंगचे दोन स्मार्टफोन आहेत जे कमी किंमतीत फ्लॅगशिप फील देतात. आणि आता या दोन्ही स्मार्टफोन्सची किंमत 30,000 रुपयांच्या बजेटमध्ये आली आहे.

The post Samsung Galaxy S20 FE आणि Galaxy S21 FE 5G वर कंपनी देतेय डिस्काउंट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung ला माहित आहे की सर्वच ग्राहकांना महागडे फ्लॅगशिप स्मार्टफोन्स परवडत नाहीत. म्हणून कंपनी फ्लॅगशिप फीचर्स असलेले स्मार्टफोन्स मिड बजेटमध्ये फॅन एडिशन नावासह सादर करते. हे फोन्स वनप्लस. रियलमी आणि शाओमीच्या मिड रेंज स्मार्टफोन्सना टक्का देतात. Samsung Galaxy S20 FE 5G आणि Samsung Galaxy S20 FE 5G असे सॅमसंगचे दोन स्मार्टफोन आहेत जे कमी किंमतीत फ्लॅगशिप फील देतात. आणि आता डिस्काउंटमुळे या दोन्ही स्मार्टफोन्सची किंमत 30,000 रुपयांच्या बजेटमध्ये आली आहे.

Samsung Offers

Samsung Galaxy S20 FE 5G डील अंतगर्त 29,999 रुपयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. तसेच सॅमसंग शॉप अ‍ॅपवर हा स्मार्टफोन खरेदी केल्यास एचडीएफसी बँक कार्ड धारकांना अतिरिक्त 3,000 रुपयांचा डिस्काउंट मिळेल. त्यामुळे सॅमसंग गॅलेक्सी एस20 एफई 5जी फोन फक्त 26,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. Samsung Galaxy S21 FE 5G देखील फ्लिपकार्टवरून 31,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. या फोनची सेल प्राइस 34,999 रुपये आहे, परंतु आयसीआयसीआय बँक व अ‍ॅक्सिस बँक कार्ड धारकांना 1,500 रुपयांचा अतिरिक्त डिस्काउंट दिला जात आहे. या बँक्सच्या क्रेडिट कार्डचा वापर केल्यास अजून 1,500 रुपयांची सूट देखील दिली जात आहे.

Samsung Galaxy S21 FE Specifications

सॅमसंग गॅलेक्सी एस21 एफई स्मार्टफोन 6.4 इंचाच्या फुलएचडी+ डायनॉमिक अ‍ॅमोलेड 2के डिस्प्लेवर लाँच करण्यात आला आहे जो 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर चालतो. हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर टेक्नॉलॉजीसह येतो. Samsung Galaxy S21 Fan Edition अँड्रॉइड 12 आधारित वनयुआय 4.0 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी कंपनीनं यात 5नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला एक्सनॉस 2100 चिपसेट दिला आहे.

Samsung Galaxy S20 FE and S21 FE 5G phone discount offer samsung smartphone deals

फोटोग्राफीसाठी सॅमसंग गॅलेक्सी एस21 फॅन एडिशन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. बॅक पॅनलवर दोन 12 मेगापिक्सलचे कॅमेरा सेन्सर्स देण्यात आले आहेत. यातील एक 12एमपी अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आहे तर दुसरी 12एमपीची वाइड अँगल लेन्स आहे. जोडीला एक 8 मेगापिक्सलची एक टेलीफोटो लेन्स मिळते. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा स्मार्टफोन 32 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: 20 हजारांच्या बजेटमध्ये नवीन Samsung 5G Smartphone ची एंट्री; जाणून घ्या या फोनचे जबरदस्त स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy S20 FE and S21 FE 5G phone discount offer samsung smartphone deals

पावर बॅकअपसाठी सॅमसंग गॅलेक्सी एस21 एफई मध्ये 4,500एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे जी 25वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कंपनीनं आपला फोन 15वॉट वायरलेस चार्जिंग आणि रिवर्स वायरलेस चार्जिंग टेक्नॉलॉजीसह बाजारात सादर केला आहे. हा सॅमसंग फोन ड्युअल सिमला सपोर्ट करतो ज्यात 5जी सह 4जी देखील वापरता येतं. बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्ससह हा सॅमसंग मोबाइल 3.5एमएम जॅक व एनएफसी सारख्या फीचर्सना सपोर्ट करतो.

The post Samsung Galaxy S20 FE आणि Galaxy S21 FE 5G वर कंपनी देतेय डिस्काउंट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s20-fe-and-s21-fe-5g-phone-discount-offer-samsung-smartphone-deals/feed/ 0
Samsung चे आगामी Galaxy S21 FE, Galaxy Z Fold 3 आणि Galaxy Z Flip 3 बदलून टाकतील स्मार्टफोन मार्केट, जाणून घ्या कधी होतील लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s21-fe-galaxy-z-fold-3-and-galaxy-z-flip-3-launch-timeline-leak-check-details/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s21-fe-galaxy-z-fold-3-and-galaxy-z-flip-3-launch-timeline-leak-check-details/#respond Mon, 10 May 2021 15:09:56 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10879 कंपनीने Galaxy S20 FE स्मार्टफोन सप्टेंबर 2020 मध्ये लॉन्च केला होता. काही लीक रिपोर्टमध्ये दावा केला जात आहे कि Samsung Galaxy Z Flip 3 आणि Galaxy Z Fold 3 स्मार्टफोन कंपनी जुलैमध्ये लॉन्च करू शकते.

The post Samsung चे आगामी Galaxy S21 FE, Galaxy Z Fold 3 आणि Galaxy Z Flip 3 बदलून टाकतील स्मार्टफोन मार्केट, जाणून घ्या कधी होतील लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सॅमसंगच्या आगामी फ्लॅगशिप फोनबद्दल माहिती समोर येऊ लागली आहे. कंपनी Samsung Galaxy S21 FE, Galaxy Z Fold 3, आणि Galaxy Z Flip 3 स्मार्टफोन ऑगस्टपर्यंत लॉन्च करतील. कंपनी यावर्षी Galaxy Note सीरीजचे स्मार्टफोन लॉन्च करणार नाही. Korean न्यूज साइट Yonhap नुसार सॅमसंग सध्या साउथ कोरियन मोबाईल करीयरसह ऑगस्टमध्ये स्मार्टफोन लॉन्चची योजना बनवत आहे. Samsung Galaxy S21 FE स्मार्टफोनच्या लॉन्चबद्दल लीकमध्ये दावा केला जात आहे कि हा फोन 19 ऑगस्टला लॉन्च होणार आहे. म्हणजे Galaxy S21 FE स्मार्टफोन यावर्षी लवकरच लॉन्च केला जाईल. यापूर्वी कंपनीने Galaxy S20 FE स्मार्टफोन सप्टेंबर 2020 मध्ये लॉन्च केला होता. काही लीक रिपोर्टमध्ये दावा केला जात आहे कि Samsung Galaxy Z Flip 3 आणि Galaxy Z Fold 3 स्मार्टफोन कंपनी जुलैमध्ये लॉन्च करू शकते. (Samsung Galaxy S21 FE Galaxy Z Fold 3 and Galaxy Z Flip 3 launch timeline leak check details)

Samsung Galaxy S21 FE : स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy S21 FE स्मार्टफोनबाबत बोलले जात आहे कि हा फोन 6.4-इंचाच्या FHD+ AMOLED डिस्प्लेसह सादर केला जाऊ शकतो. या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz असेल, ज्यात सेल्फीसाठी पंच होल कटआउट दिली जाईल. सॅमसंगचा हा स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 888 चिपसेटसह सादर केला जाईल. सॅमसंगचा हा स्मार्टफोन 128GB आणि 256GB स्टोरेज ऑप्शनसह सादर केला जाऊ शकतो. सॅमसंगचा हा फोन Android 11 वर आधारित OneUI 3.1 वर चालेल. त्याचबरोबर या फोनमध्ये 4,500mAh ची बॅटरी दिली जाऊ शकते. कनेक्टिविटी पाहता या फोनमध्ये 5G, 4G LTE, Wi–Fi 6, Bluetooth 5.1, GPS, आणि USB Type–C पोर्ट दिला जाऊ शकतो. सॅमसंगच्या या फोनचे माप, 155.7 x 71.45 x 7.9mm असे असू शकते. म्हणजे हा फोन Galaxy S20 FE पेक्षा थोडा छोटा असू शकतो.

हे देखील वाचा : Realme Narzo 30 च्या लॉन्चपूर्वी समोर आला व्हिडीओ आणि स्पेसिफिकेशन्स, जाणून घ्या वैशिष्टये

Samsung Galaxy Fold 3

Samsung Galaxy Z Fold 3 : स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy Z Fold 3 स्मार्टफोनबाबत लीक रिपोर्ट्समध्ये दावा केला जात आहे कि हा फोन अंडर डिस्प्ले कॅमेऱ्यासह सादर केला जाऊ शकतो. सॅमसंगच्या या फोनबाबत हा दावा कंपनीच्या अप्रकाशित मार्केटिंग व्हिडीओ प्रोमोच्या माध्यमातून समोर आला आहे. या प्रोमोव्हिडीओच्या स्क्रीन शॉट फोटोजमध्ये Galaxy Z Fold 3 स्मार्टफोनमध्ये फ्रंट कॅमेऱ्यासाठी कोणतीही कॅमेरा कटआउट किंवा नॉच दिसत नाही. यात दावा केला जात आहे कि हा पहिला फोल्डेबल स्मार्टफोन असेल ज्यात अंडर डिस्प्ले कॅमेरा दिला जाऊ शकतो. त्याचबरोबर लीक रिपोर्टमध्ये असा पण दावा केला जात आहे कि यात S Pen ला सपोर्ट दिला जाऊ शकतो.

हे देखील वाचा : ASUS ZenFone 8 सीरीजचा भारतातील लॉन्च कंफर्म, कोरोनामुळे भारतात उशिरा होतील लॉन्च

Samsung Galaxy Z Flip 3 : स्पेसिफिकेशन्स

सॅमसंगचा अजून एक अपकमिंग स्मार्टफोन Galaxy Z Flip 3 पण गेल्या काही दिवसांत चर्चेत आला आहे. सॅमसंगचा हा स्मार्टफोन अलीकडेच मॉडेल नंबर SM–F7110 सह 3C सर्टफिकेशनच्या लिस्टिंगमध्ये स्पॉट केला गेला आहे. या लिस्टिंगमध्ये दावा केला गेला आहे कि सॅमसंगचा हा फोन 15W फास्ट चार्जिंगसह सादर केला जाईल. सॅमसंगच्या या फोनमध्ये फास्ट चार्जला सपोर्ट न दिल्यामुळे निराशा वाटते कारण या किंमतीत कंपन्या सध्या दोन्ही फास्ट चार्ज देतात. सॅमसंगचा हा स्मार्टफोन 5G कनेक्टिविटीसह सादर केला जाईल. सॅमसंगच्या या प्लिप स्मार्टफोनमध्ये 3,273mAh ची डुअलसेल बॅटरी दिली जाईल, ज्यात एक बॅटरीचा आकार 2,370mAh आणि दुसऱ्या बॅटरीचा आकार 903mAh असेल. अंडर डिस्प्ले सेल्फी कॅमेरा असलेला हा स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 888 5G SoC सह सादर केला जाईल.

The post Samsung चे आगामी Galaxy S21 FE, Galaxy Z Fold 3 आणि Galaxy Z Flip 3 बदलून टाकतील स्मार्टफोन मार्केट, जाणून घ्या कधी होतील लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s21-fe-galaxy-z-fold-3-and-galaxy-z-flip-3-launch-timeline-leak-check-details/feed/ 0