Samsung चे आगामी Galaxy S21 FE, Galaxy Z Fold 3 आणि Galaxy Z Flip 3 बदलून टाकतील स्मार्टफोन मार्केट, जाणून घ्या कधी होतील लॉन्च

Samsung Galaxy Z Flip

सॅमसंगच्या आगामी फ्लॅगशिप फोनबद्दल माहिती समोर येऊ लागली आहे. कंपनी Samsung Galaxy S21 FE, Galaxy Z Fold 3, आणि Galaxy Z Flip 3 स्मार्टफोन ऑगस्टपर्यंत लॉन्च करतील. कंपनी यावर्षी Galaxy Note सीरीजचे स्मार्टफोन लॉन्च करणार नाही. Korean न्यूज साइट Yonhap नुसार सॅमसंग सध्या साउथ कोरियन मोबाईल करीयरसह ऑगस्टमध्ये स्मार्टफोन लॉन्चची योजना बनवत आहे. Samsung Galaxy S21 FE स्मार्टफोनच्या लॉन्चबद्दल लीकमध्ये दावा केला जात आहे कि हा फोन 19 ऑगस्टला लॉन्च होणार आहे. म्हणजे Galaxy S21 FE स्मार्टफोन यावर्षी लवकरच लॉन्च केला जाईल. यापूर्वी कंपनीने Galaxy S20 FE स्मार्टफोन सप्टेंबर 2020 मध्ये लॉन्च केला होता. काही लीक रिपोर्टमध्ये दावा केला जात आहे कि Samsung Galaxy Z Flip 3 आणि Galaxy Z Fold 3 स्मार्टफोन कंपनी जुलैमध्ये लॉन्च करू शकते. (Samsung Galaxy S21 FE Galaxy Z Fold 3 and Galaxy Z Flip 3 launch timeline leak check details)

Samsung Galaxy S21 FE : स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy S21 FE स्मार्टफोनबाबत बोलले जात आहे कि हा फोन 6.4-इंचाच्या FHD+ AMOLED डिस्प्लेसह सादर केला जाऊ शकतो. या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz असेल, ज्यात सेल्फीसाठी पंच होल कटआउट दिली जाईल. सॅमसंगचा हा स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 888 चिपसेटसह सादर केला जाईल. सॅमसंगचा हा स्मार्टफोन 128GB आणि 256GB स्टोरेज ऑप्शनसह सादर केला जाऊ शकतो. सॅमसंगचा हा फोन Android 11 वर आधारित OneUI 3.1 वर चालेल. त्याचबरोबर या फोनमध्ये 4,500mAh ची बॅटरी दिली जाऊ शकते. कनेक्टिविटी पाहता या फोनमध्ये 5G, 4G LTE, Wi–Fi 6, Bluetooth 5.1, GPS, आणि USB Type–C पोर्ट दिला जाऊ शकतो. सॅमसंगच्या या फोनचे माप, 155.7 x 71.45 x 7.9mm असे असू शकते. म्हणजे हा फोन Galaxy S20 FE पेक्षा थोडा छोटा असू शकतो.

हे देखील वाचा : Realme Narzo 30 च्या लॉन्चपूर्वी समोर आला व्हिडीओ आणि स्पेसिफिकेशन्स, जाणून घ्या वैशिष्टये

Samsung Galaxy Fold 3

Samsung Galaxy Z Fold 3 : स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy Z Fold 3 स्मार्टफोनबाबत लीक रिपोर्ट्समध्ये दावा केला जात आहे कि हा फोन अंडर डिस्प्ले कॅमेऱ्यासह सादर केला जाऊ शकतो. सॅमसंगच्या या फोनबाबत हा दावा कंपनीच्या अप्रकाशित मार्केटिंग व्हिडीओ प्रोमोच्या माध्यमातून समोर आला आहे. या प्रोमोव्हिडीओच्या स्क्रीन शॉट फोटोजमध्ये Galaxy Z Fold 3 स्मार्टफोनमध्ये फ्रंट कॅमेऱ्यासाठी कोणतीही कॅमेरा कटआउट किंवा नॉच दिसत नाही. यात दावा केला जात आहे कि हा पहिला फोल्डेबल स्मार्टफोन असेल ज्यात अंडर डिस्प्ले कॅमेरा दिला जाऊ शकतो. त्याचबरोबर लीक रिपोर्टमध्ये असा पण दावा केला जात आहे कि यात S Pen ला सपोर्ट दिला जाऊ शकतो.

हे देखील वाचा : ASUS ZenFone 8 सीरीजचा भारतातील लॉन्च कंफर्म, कोरोनामुळे भारतात उशिरा होतील लॉन्च

Samsung Galaxy Z Flip 3 : स्पेसिफिकेशन्स

सॅमसंगचा अजून एक अपकमिंग स्मार्टफोन Galaxy Z Flip 3 पण गेल्या काही दिवसांत चर्चेत आला आहे. सॅमसंगचा हा स्मार्टफोन अलीकडेच मॉडेल नंबर SM–F7110 सह 3C सर्टफिकेशनच्या लिस्टिंगमध्ये स्पॉट केला गेला आहे. या लिस्टिंगमध्ये दावा केला गेला आहे कि सॅमसंगचा हा फोन 15W फास्ट चार्जिंगसह सादर केला जाईल. सॅमसंगच्या या फोनमध्ये फास्ट चार्जला सपोर्ट न दिल्यामुळे निराशा वाटते कारण या किंमतीत कंपन्या सध्या दोन्ही फास्ट चार्ज देतात. सॅमसंगचा हा स्मार्टफोन 5G कनेक्टिविटीसह सादर केला जाईल. सॅमसंगच्या या प्लिप स्मार्टफोनमध्ये 3,273mAh ची डुअलसेल बॅटरी दिली जाईल, ज्यात एक बॅटरीचा आकार 2,370mAh आणि दुसऱ्या बॅटरीचा आकार 903mAh असेल. अंडर डिस्प्ले सेल्फी कॅमेरा असलेला हा स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 888 5G SoC सह सादर केला जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here