20 हजारांच्या बजेटमध्ये नवीन Samsung 5G Smartphone ची एंट्री; जाणून घ्या या फोनचे जबरदस्त स्पेसिफिकेशन्स

एकेकाळी अँड्रॉइड स्मार्टफोन बाजारावर राज्य करणारी सॅमसंग कंपनीच्या स्पर्धेत सध्या खूप वाढ झाली आहे. परंतु असं असताना देखील कंपनी फ्लॅगशिपसह बजेट आणि मिडरेंज सेगमेंटमध्ये देखील चांगले स्मार्टफोन सादर करत आहे. आता Samsung नं आपली होम मार्केट दक्षिण कोरियामध्ये नवीन मोबाइल फोन Samsung Galaxy Wide 6 लाँच केला आहे. या सीरीजचे स्मार्टफोन भारतीय बाजारात सादर केले जात नाहीत परंतु यांच्या स्पेसिफिकेशन्स व फीचर्समुळे टेक मार्केटमध्ये गॅलेक्सी वाइड सीरीजची वेगळी ओळख बनली आहे. या सीरीजचा Samsung Galaxy Wide 6 स्मार्टफोन देखील 50MP Triple Camera व Dimensity 700 chipset सारख्या शानदार स्पेसिफिकेशन्ससह बाजारात आला आहे, पुढे आम्ही या हँडसेटची संपूर्ण माहिती दिली आहे.

Samsung Galaxy Wide 6 specifications

सॅमसंग गॅलेक्सी वाइड 6 चे फीचर्स व स्पेसिफिकेशन्स पाहता हा मोबाइल फोन 20:9 अ‍ॅस्पेक्ट रेशियोवर सादर झाला आहे जो 720 x 1600 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. या फोनची स्क्रीन वॉटरड्रॉप नॉच स्टाईलसह येते आणि एलसीडी पॅनलवर बनली आहे. हे देखील वाचा: रेडमी-रियलमीला दणका देण्यासाठी अत्यंत कमी किंमतीत Samsung Galaxy A04s ची एंट्री

Samsung Galaxy Wide 6 अँड्रॉइड 12 आधारित सॅमसंगच्या वनयुआयवर चालतो. प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये ऑक्टाकोर प्रोसेसरसह मीडियाटेक डिमेनसिटी 700 चिपसेट देण्यात आला आहे. सॅमसंगचा हा नवीन मोबाइल फोन 4 जीबी रॅमसह 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो, जी कार्डच्या माध्यमातून वाढवता येईल.

फोटोग्राफीसाठी सॅमसंग गॅलेक्सी वाइड 6 ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जोडीला 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स व 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आहे. तसेच सॅमसंग स्मार्टफोन 8 मेगापिक्सल सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Samsung Galaxy Wide 6 ड्युअल सिम फोन आहे जो 5जीला सपोर्ट करतो. 3.5एमएम जॅक, ब्लूटूथ व वायफाय सोबतच सिक्योरिटीसाठी साइड पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. तर पावर बॅकअपसाठी हा स्मार्टफोन 5,000एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: सर्वात स्वस्त मोबाईलमध्ये दिला 8GB RAM; Samsung Galaxy A04 लाँच, पाहा फुल स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy Wide 6 Price

सॅमसंग गॅलेक्सी वाइड 6 स्मार्टफोन एकच व्हेरिएंट दक्षिण कोरियामध्ये लाँच करण्यात आला आहे. या व्हेरिएंटमध्ये 4 जीबी रॅमसह 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. Samsung Galaxy Wide 6 ची प्राइस KRW 349,000 म्हणजे भारतीय करंसीनुसार 20,400 रुपयांच्या आसपास आहे. तसेच हा फोन black, white आणि blue कलरमध्ये विकत घेता येईल. जरी ही सीरिज भारतात येत नसली तरी या स्मार्टफोनचा रीब्रँड व्हर्जन देशात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here