Samsung Galaxy S20 FE आणि Galaxy S21 FE 5G वर कंपनी देतेय डिस्काउंट

Samsung Galaxy S20 FE and S21 FE 5G phone discount offer samsung smartphone deals

Samsung ला माहित आहे की सर्वच ग्राहकांना महागडे फ्लॅगशिप स्मार्टफोन्स परवडत नाहीत. म्हणून कंपनी फ्लॅगशिप फीचर्स असलेले स्मार्टफोन्स मिड बजेटमध्ये फॅन एडिशन नावासह सादर करते. हे फोन्स वनप्लस. रियलमी आणि शाओमीच्या मिड रेंज स्मार्टफोन्सना टक्का देतात. Samsung Galaxy S20 FE 5G आणि Samsung Galaxy S20 FE 5G असे सॅमसंगचे दोन स्मार्टफोन आहेत जे कमी किंमतीत फ्लॅगशिप फील देतात. आणि आता डिस्काउंटमुळे या दोन्ही स्मार्टफोन्सची किंमत 30,000 रुपयांच्या बजेटमध्ये आली आहे.

Samsung Offers

Samsung Galaxy S20 FE 5G डील अंतगर्त 29,999 रुपयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. तसेच सॅमसंग शॉप अ‍ॅपवर हा स्मार्टफोन खरेदी केल्यास एचडीएफसी बँक कार्ड धारकांना अतिरिक्त 3,000 रुपयांचा डिस्काउंट मिळेल. त्यामुळे सॅमसंग गॅलेक्सी एस20 एफई 5जी फोन फक्त 26,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. Samsung Galaxy S21 FE 5G देखील फ्लिपकार्टवरून 31,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. या फोनची सेल प्राइस 34,999 रुपये आहे, परंतु आयसीआयसीआय बँक व अ‍ॅक्सिस बँक कार्ड धारकांना 1,500 रुपयांचा अतिरिक्त डिस्काउंट दिला जात आहे. या बँक्सच्या क्रेडिट कार्डचा वापर केल्यास अजून 1,500 रुपयांची सूट देखील दिली जात आहे.

Samsung Galaxy S21 FE Specifications

सॅमसंग गॅलेक्सी एस21 एफई स्मार्टफोन 6.4 इंचाच्या फुलएचडी+ डायनॉमिक अ‍ॅमोलेड 2के डिस्प्लेवर लाँच करण्यात आला आहे जो 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर चालतो. हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर टेक्नॉलॉजीसह येतो. Samsung Galaxy S21 Fan Edition अँड्रॉइड 12 आधारित वनयुआय 4.0 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी कंपनीनं यात 5नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला एक्सनॉस 2100 चिपसेट दिला आहे.

Samsung Galaxy S20 FE and S21 FE 5G phone discount offer samsung smartphone deals

फोटोग्राफीसाठी सॅमसंग गॅलेक्सी एस21 फॅन एडिशन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. बॅक पॅनलवर दोन 12 मेगापिक्सलचे कॅमेरा सेन्सर्स देण्यात आले आहेत. यातील एक 12एमपी अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आहे तर दुसरी 12एमपीची वाइड अँगल लेन्स आहे. जोडीला एक 8 मेगापिक्सलची एक टेलीफोटो लेन्स मिळते. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा स्मार्टफोन 32 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: 20 हजारांच्या बजेटमध्ये नवीन Samsung 5G Smartphone ची एंट्री; जाणून घ्या या फोनचे जबरदस्त स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy S20 FE and S21 FE 5G phone discount offer samsung smartphone deals

पावर बॅकअपसाठी सॅमसंग गॅलेक्सी एस21 एफई मध्ये 4,500एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे जी 25वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कंपनीनं आपला फोन 15वॉट वायरलेस चार्जिंग आणि रिवर्स वायरलेस चार्जिंग टेक्नॉलॉजीसह बाजारात सादर केला आहे. हा सॅमसंग फोन ड्युअल सिमला सपोर्ट करतो ज्यात 5जी सह 4जी देखील वापरता येतं. बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्ससह हा सॅमसंग मोबाइल 3.5एमएम जॅक व एनएफसी सारख्या फीचर्सना सपोर्ट करतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here