Smartphone Blast - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 12 Sep 2022 11:19:58 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 पुन्हा Xiaomi फोनचा स्फोट! Redmi 6A मध्ये झाला ब्लास्ट, झोपेत महिलेचा मृत्यू https://www.91mobiles.com/marathi/redmi-6a-blast-woman-dies-while-sleeping-in-xiaomi-phone-explode/ https://www.91mobiles.com/marathi/redmi-6a-blast-woman-dies-while-sleeping-in-xiaomi-phone-explode/#respond Mon, 12 Sep 2022 11:19:58 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=13028 Mobile Phone सध्या माणसाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे, त्यामुळे सतत आपल्या आजूबाजूला फोन असतोच. कधी हातात, तर कधी खिशात आणि झोपताना उशाला देखील आपण स्मार्टफोन ठेवतो. परंतु दिवस-रात्र आपल्या सोबत असलेली वस्तू बॉम्ब प्रमाणे फुटत असली तर काय होईल? चीनी कंपनी Xiaomi चा मोबाइल फोन पुन्हा एकदा बॉम्ब बनला आहे. Redmi 6A Blast झाल्याची […]

The post पुन्हा Xiaomi फोनचा स्फोट! Redmi 6A मध्ये झाला ब्लास्ट, झोपेत महिलेचा मृत्यू first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Mobile Phone सध्या माणसाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे, त्यामुळे सतत आपल्या आजूबाजूला फोन असतोच. कधी हातात, तर कधी खिशात आणि झोपताना उशाला देखील आपण स्मार्टफोन ठेवतो. परंतु दिवस-रात्र आपल्या सोबत असलेली वस्तू बॉम्ब प्रमाणे फुटत असली तर काय होईल? चीनी कंपनी Xiaomi चा मोबाइल फोन पुन्हा एकदा बॉम्ब बनला आहे. Redmi 6A Blast झाल्याची बातमी नुकतीच आली आहे आणि या दुर्घटनेत एका झोपेत असलेल्या महिलेचा मृत्यू देखील झाला आहे.

Xiaomi Phone Blast

रेडमी 6ए ब्लास्टची बातमी एका व्यक्तीनं आपल्या ट्वीटर हँडलवर पोस्ट केली आहे. या ट्वीटमध्ये मनजीत नावाच्या व्यक्तीनं काही फोटोज शेयर करत दावा केला आहे की त्यांच्या काकीचा मृत्यु Xiaomi Redmi 6A Blast मुळे झाला आहे. आपल्या ट्वीटमध्ये मनजीतनं ब्लास्ट झालेल्या मोबाइल फोनच्या फोटो सोबतच मृत महिलेचा फोटो देखील शेयर केला आहे ज्यात मृतदेह स्पष्ट दिसत आहे. हे देखील वाचा: OPPO करणार धमाका! 64MP कॅमेरा आणि 8GB रॅम असलेल्या OPPO F21s Pro Series ची लाँच देतं ठरली

हे ट्वीट खूप संवेदनशील आहे त्यामुळे विवेक बाळगण्याचा सल्ला दिला जात आहे.

रेडमी फोनमध्ये स्फोट

मिळालेल्या माहितीनुसार, मृत महिला आपला रेडमी 6ए स्मार्टफोन बिछान्यावर उशीला कडेला ठेऊन झोपली होती. महिला जेव्हा झोपेत होती तेव्हा अचानकपणे तिच्या उशीवर ठेवण्यात आलेल्या शाओमी फोनमध्ये ब्लास्ट झाला आहे. हा स्फोट इतका जबरदस्त होता की तेव्हा महिलेच्या डोक्याला मार बसला होता तसेच अंथरुणातच तिचा मृत्यू झाला. शेयर केलेल्या फोटोजमध्ये बिछान्यावर रक्त दिसत दिसत आहे. तसेच फोन देखील पूर्णपणे जळाला आहे. हे देखील वाचा: रेडमी-रियलमीला मोटोरोलाचा दणका! स्वस्त आणि मस्त Moto E22 ची माहिती लीक; असा दिसेल हँडसेट

xiaomi Redmi 6a Blast

शाओमीनं व्यक्त केला शोक

ट्वीटवर रेडमी तसेच कंपनीच्या उच्च अधिकाऱ्यांना टॅग केल्यानंतर कंपनीकडून उत्तर आलं आहे तसेच या प्रकरणाचा तपास करण्याचा दिलासा देण्यात आला आहे. परंतु या मोठ्या दुर्घटनेनंतर कंपनी मृतकाच्या कुटुंबाला नुकसान भरपाई देईल की नाही हे पाहण्यासाठी थोडी वाट पाहावी लागेल. त्यापेक्षाही मोठी बाब अशी आहे की Xiaomi Redmi 6A Blast च्या मागे कंपनी आपल्या प्रोडक्ट मधील दोष मान्य करेल की युजरची चूक म्हणून खापर युजरवर फोडेल, ही देखील महत्वाची बाब म्हणता येईल.

The post पुन्हा Xiaomi फोनचा स्फोट! Redmi 6A मध्ये झाला ब्लास्ट, झोपेत महिलेचा मृत्यू first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/redmi-6a-blast-woman-dies-while-sleeping-in-xiaomi-phone-explode/feed/ 0
अजून एका शाओमी फोन मध्ये झाला ब्लास्ट, Redmi Note 7 Pro मध्ये लागली आग https://www.91mobiles.com/marathi/redmi-note-7-pro-phone-blast-in-gurugram-haryana-india/ https://www.91mobiles.com/marathi/redmi-note-7-pro-phone-blast-in-gurugram-haryana-india/#respond Sat, 14 Mar 2020 07:49:36 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6781 Redmi Note 7 Pro मध्ये ब्लास्ट होण्याची हि घटना गुरुग्राम मधील आहे.

The post अजून एका शाओमी फोन मध्ये झाला ब्लास्ट, Redmi Note 7 Pro मध्ये लागली आग first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
मोबाईल हा प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाला आहे. प्रत्येकजण फोन आपल्या सोबत सतत बाळगत असतो. पण सध्या मोबाईल फोन मध्ये ब्लास्ट होण्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत त्यामुळे मोबाईल यूजर्सच्या चिंतेत वाढ होत आहे. यात जर चूक युजरची असेल तर त्याला समजावले जाते आणि त्यातून इतर यूजर्सना पण शिकवण मिळते. पण जर चूक यूजरची नसेल तर? सर्व प्रकारची काळजी घेऊन पण जर मोबाईल मध्ये ब्लास्ट होत असेल तर काय करावे? अशीच एक घटना गुरुग्राम हरियाणा मध्ये घडली आहे. जिथे योग्य ती काळजी घेऊन पण फोन मध्ये ब्लास्ट झाला आहे. आणि हा फोन होता Xiaomi चा Redmi Note 7 Pro!

Redmi Note 7 Pro मध्ये ब्लास्ट होण्याची हि घटना गुरुग्राम मधील आहे. विकेश कुमार नावाचा तरुण हा Redmi Note 7 Pro फोन वापरत होता. विकेश यांनी डिसेंबर मध्ये चिनी कंपनीचा हा फोन घेतला होता आणि तेव्हा पासून त्याने फोनची योग्य ती काळजी घेतली होती. Redmi Note 7 Pro पण आता पर्यंत अगदी चांगला चालू होता.

Yesterday my MI NOT 7 PRO is blast due to battery explode. I have no any major injury,hurt but no any positive response…

Vikesh Kumar यांनी वर पोस्ट केले शुक्रवार, १३ मार्च, २०२०

13 मार्चला हि दुर्घटना घडली. फोन विकेश यांच्या खिश्यात होता आणि फोन हळू हळू गरम होऊ लागला. नेहमीच फोन गरम होत असल्याने आधी त्यांनी फोन कडे दुर्लक्ष केले. पण जेव्हा फोनचे तापमान असह्य होऊ लागले तेव्हा त्यांनी फोन खिशातून बाहेर काढला तेव्हा फोन मधून धूर येत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तसेच फोन मधून दुर्गंध येत होता, लगेच त्यांनी फोन आपल्या बॅगेच्या दिशेने फेकला. तेव्हा फोन मध्ये ब्लास्ट झाला फोनच्या बॅक पॅनलचे तुकडे तुकडे झाले आणि विकेश यांची बॅग पण जाळली.

91मोबाईल्स मराठीशी बोलताना विकेश म्हणाले कि ते मरता मरता वाचले आहेत, थोडा उशीर झाला असता तर कदाचित ते जखमी झाले असते. तसेच जेव्हा त्यांनी सर्व्हिस सेंटरशी संपर्क साधला तेव्हा फोनच्या जॉब शीट मध्ये पावर ऑन फौल्ट असल्याचा शेरा देण्यात आला आहे. याविषयी शाओमी कडे आम्ही चौकशी केली आहे पण अधिकृत प्रतिसाद अजून मिळू शकलेला नाही. काही दिवसांपूर्वी पण शाओमी Redmi Note 7S फोन मध्ये आग लागल्याची बातमी महाराष्ट्रातून आली होती. वारंवार अश्या घटना समोर येत असल्यामुळे शाओमीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

The post अजून एका शाओमी फोन मध्ये झाला ब्लास्ट, Redmi Note 7 Pro मध्ये लागली आग first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/redmi-note-7-pro-phone-blast-in-gurugram-haryana-india/feed/ 0
शाओमी मी ए1 मध्ये झाला ब्लास्ट, झोपेत असताना घडली दुर्घटना https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-a1-caught-fire-explode-and-blast-while-charging-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-a1-caught-fire-explode-and-blast-while-charging-in-marathi/#respond Wed, 03 Oct 2018 11:20:34 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=2348 जरी ही घटना भारतात घडली नसली तरी देशात शाओमी फोन वापरणारे लोक भरपूर आहेत आणि अशा दुर्घटना स्मार्टफोन यूजर्स मध्ये भीती निर्माण करतात.

The post शाओमी मी ए1 मध्ये झाला ब्लास्ट, झोपेत असताना घडली दुर्घटना first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
शाओमी चीन मधील अॅप्पल म्हणून ओळखली जाते. चीनच्या बाहेर पण या कंपनी ने आपली चांगली पकड बनवली आहे. शाओमी सध्या भारतातील नंबर वन स्मार्टफोन ब्रँड बनली आहे आणि लो व मीड बजट सेग्मेंट मध्ये सर्वात जास्त विक्री करणारी कंपनी आहे. जेवढे नाव मोठे असते तेवढ्याच मोठ्या जबाबदार्‍या पण वाढतात आणि लोकांचा विश्वास कायम ठेवावा लागतो. पण नुकतीच एक दुर्घटना समोर आली आहे ज्यामुळे शाओमीला डाग लागू शकतो. शाओमी च्या हिट स्मार्टफोन मी ए1 मध्ये आग लागल्याची बातमी आली आहे ज्यामुळे शाओमी सोबतच स्मार्टफोन यूजर्स मध्ये पण भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

शाओमी मी ए1 स्मार्टफोन मध्ये आग लागल्याची बातमी समोर आली आहे. शाओमी च्या मी फोरम वर एका यूजरने या घटनेची माहिती दिली. मी फोरम वर न्यूज अपडेट करणार्‍या यूजरने सांगितले आहे की त्याचा मित्र शाओमी मी ए1 स्मार्टफोन वापरतो. एका रात्री तो फोन आपल्या बेड जवळ ठेऊन झोपला होता. फोन चार्जिंगला लावण्यात आला होता आणि अचानक त्यात आग लागली. सुदैवाने आग वाढण्याच्या आणि ब्लास्ट होण्याआधी फोन यूजरला जाग आली होती आणि त्याने आपला जीव वाचवला.

पोस्ट नुसार यूजर ने आठ महिन्यांपूर्वी शाओमी मी ए1 स्मार्टफोन विकत घेतला होता आणि या आठ महिन्यात स्मार्टफोन यूजरला कधी फोन गरम झाल्याच्या समस्येला सामोरे जावे लागले नव्हते. रात्री झोपताना यूजर ने फोन चार्जिंग ला लावला होता आणि त्याच दरम्यान फोनला आग लागली आणि तो ब्लास्ट झाला. स्मार्टफोन यूजरने दावा केला आहे की तो फोनचा आॅरिजनल चार्जर वापरतो आणि त्या रात्री पण त्यांनी आॅरिजनल चार्जरच वापरला होता.

शाओमी मी ए1 यूजरने सांगितले की जर त्याचा फोन दूरवर नसता तर त्याला पण या ब्लास्टचा त्रास झाला असता. ही दुर्घटना होऊन एक आठवडा होत आला पण अजूनही शाओमी ने यूजरशी संपर्क साधला नाही किंवा मी ए1 सोबत झालेल्या या दुर्घटने वर कोणती प्रतिक्रिया पण दिली नाही. जरी ही घटना भारतात घडली नसली तरी देशात शाओमी फोन वापरणारे लोक भरपूर आहेत आणि अशा दुर्घटना स्मार्टफोन यूजर्स मध्ये भीती निर्माण करतात.

The post शाओमी मी ए1 मध्ये झाला ब्लास्ट, झोपेत असताना घडली दुर्घटना first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-a1-caught-fire-explode-and-blast-while-charging-in-marathi/feed/ 0
सॅमसंग गॅलेक्सी एस7 ऐज मध्ये लागली आग, फोटो घेताना झाली दुर्घटना https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s7-edge-caught-fire-smartphone-accident-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s7-edge-caught-fire-smartphone-accident-in-marathi/#respond Mon, 24 Sep 2018 14:05:16 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=2241 काही दिवसांपूर्वी सॅमसंग गॅलेक्सी नोट 9 मध्ये आग लागली होती तर आता पुन्हा सॅमसंग गॅलेक्सी एस सीरीज च्या एस7 ऐज स्मार्टफोन मध्ये आग लागण्याच्या दुर्घटनेमुले सॅमसंग फॅन्स मध्ये भीतीचे वातावरण आहे.

The post सॅमसंग गॅलेक्सी एस7 ऐज मध्ये लागली आग, फोटो घेताना झाली दुर्घटना first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सॅमसंग एकीकडे शानदार लुक आणि दमदार स्पेसिफिकेशन्स असलेले स्मार्टफोन सादर करून टेक बाजारात आपले स्थान कायम ठेवत आहे. तर दुसरीकडे कंपनीच्या स्मार्टफोन्स सोबत होणाऱ्या दुर्घटना काही थांबत नाही आहेत. काही दिवसांपूर्वी सॅमसंग गॅलेक्सी नोट 9 मध्ये आग लागली होती तर आता पुन्हा सॅमसंग गॅलेक्सी एस सीरीज च्या एस7 ऐज स्मार्टफोन मध्ये आग लागण्याच्या दुर्घटनेमुले सॅमसंग फॅन्स मध्ये भीतीचे वातावरण आहे.

ताजी घटना मोरोक्को मधील आहे जिथे एका व्यक्तीच्या पॅन्टच्या खिशात ठेवलेल्या गॅलेक्सी एस7 ऐज मध्ये आग लागली आहे. हि घटना 4 दिवसांपूर्वीची आहे. सोशल ब्लॉग वर पीडित व्यक्तीने संपूर्ण घटनेची माहिती दिली आहे. त्यानुसार त्यांनी फोन आपल्या पॅन्टच्या मागच्या खिशात ठेवला होता. त्यांनी फोटो घेण्यासाठी फोन बाहेर काढला आणि फोटो क्लिक करताना फोन हँग होऊन बंद झाला.

सॅमसंग गॅलेक्सी एस7 ऐज बंद झाल्यावर त्या पीडित व्यक्तीने फोन बूटच्या माध्यमातून ऑन करण्याचा प्रयत्न केला. फोन ऑन होत असताना त्यातून धूर येऊ लागला आणि त्यात आग लागली. आग लागताच त्यांनी फोन बाजूला फेकून दिला. फोन खिशात असताना आग लागली नाही म्हणून बरे झाले नाही तरी स्मार्टफोन यूजर भाजले गेले असते.

पीडित व्यक्तीने या दुर्घटनेची माहिती सॅमसंगला दिली त्यांनतर कंपनीने त्यांची माफी मागितली आणि गॅलेक्सी एस7 ऐज च्या जागी नवीन गॅलेक्सी एस9 स्मार्टफोन देऊ केला. पीडित व्यक्तीने दुर्घटना विसरत नवीन गॅलेक्सी एस9 स्मार्टफोन घेतला. पण या दुर्घटनेमुळे भीतीचे वातावरण सर्वच स्मार्टफोन युजर मध्ये निर्माण झाले आहे. स्मार्टफोन मध्ये आग लागण्याच्या घटनेत दिवसेंदिवस होत असलेली वाढ पाहता यूजर्सच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

The post सॅमसंग गॅलेक्सी एस7 ऐज मध्ये लागली आग, फोटो घेताना झाली दुर्घटना first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s7-edge-caught-fire-smartphone-accident-in-marathi/feed/ 0
स्मार्टफोन मध्ये झाला ब्लास्ट, एका व्यक्तीचा मृत्यू ! https://www.91mobiles.com/marathi/blackberry-huawei-smartphone-blast-mobile-caught-fire-malaysia-ceo-dies-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/blackberry-huawei-smartphone-blast-mobile-caught-fire-malaysia-ceo-dies-in-marathi/#respond Thu, 21 Jun 2018 12:43:07 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1010 स्थानिक पोलिस या घटनेचा तपास घेत आहेत की नाजरीन यांच्या कोणत्या स्मार्टफोन मध्ये आधी ब्लास्ट झाला होता आणि त्यांचा मृत्यू कसा झाला.

The post स्मार्टफोन मध्ये झाला ब्लास्ट, एका व्यक्तीचा मृत्यू ! first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
स्मार्टफोन आजकाल मोबाइल यूजर्स ची पहिली गरज बनला आहे. दिवसाच्या सुरवातीपासून रात्री झोपेपर्यंत आपण स्मार्टफोन आपल्या सोबत ठेवतो. पण मोबाइल चा हा वापर कधी कधी घातक ठरतो. स्मार्टफोंस च्या बॅटरी मध्ये ब्लास्ट होणे किंवा आग लागल्याच्या बातम्या येत असतात. अशा प्रकारच्या घटना लोकांमध्ये भीती तर निर्माण करतातच पण आता अशी दुर्घटना घडली आहे ज्यात स्मार्टफोन मध्ये ब्लास्ट झाल्यामुळे यूजरला आपला जीव गमवावा लागला आहे.

ही भयानक घटना मलेशिया मधील आहे. जिथे नाजरीन हसन नावाच्या एका व्यक्तीचा जीव त्याच्या फोन मध्ये ब्लास्ट झाल्यामुळे गेला आहे. मीडिया रिपोर्ट्स मधून समजले आहे की नाजरीन मलेशियन वित्त मंत्रालया साठी काम करत होते आणि क्रॅडल फंड नावाच्या एका संस्थेचे सीईओ होते. बातमी नुसार नाजरीन आपला स्मार्टफोन चार्जिंग वर लाऊन झोपले होते आणि फोन ब्लास्ट झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.

रिपार्ट्स नुसार नाजरीन कडे ब्लॅकबेरी आणि हुआवई चे दोन स्मार्टफोन ​​होते. नाजरीन हे दोन्ही स्मार्टफोन चार्जिंग वर लाऊन झोपले होते की अचानक एका फोन मध्ये ब्लास्ट झाला. ब्लास्ट नंतर च्या आगीने बेडरूम मधील गाद्यांनी पेट घेतला. आगीमुळे संपूर्ण घरात धूर झाला त्यात गुदमरल्यामुळे नाजरीन यांचा मृत्यू झाला. पण दोन्ही पैकी कोणत्या फोन मध्ये ब्लास्ट झाला हे अजून स्पष्ट झाले नाही.

तर दुसरीकडे नाजरीन यांच्या घरच्यांचे म्हणणे आहे की त्यांचा मृत्यू गुदमरून झाला नाही. कुटुंबानुसार फोन मध्ये ब्लास्ट झाला होता आणि काही वेळाने घरात आग लागली. फोन मध्ये धमाका होताच फोन चे काही तुकडे नाजरीन यांच्या डोक्यात घुसले आणि त्या जखमेमुळे घरात धूर होण्याआधीच त्यांचा जीव गेला होता.

स्थानिक पोलिस या घटनेचा तपास घेत आहेत की नाजरीन यांच्या कोणत्या स्मार्टफोन मध्ये आधी ब्लास्ट झाला होता आणि त्यांचा मृत्यू कसा झाला. अशा प्रकारच्या दुर्घटने पासून वाचण्यासाठी 91मोबाईल्स च्या टीम चा सल्ला आहे की आपला स्मार्टफोन ओवरहिट होण्या पासून वाचावा तसेच चार्जिंग इत्यादि साठी कंपनी च्या आॅरिजनल एक्सेसरीज चा वापर करावा.

The post स्मार्टफोन मध्ये झाला ब्लास्ट, एका व्यक्तीचा मृत्यू ! first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/blackberry-huawei-smartphone-blast-mobile-caught-fire-malaysia-ceo-dies-in-marathi/feed/ 0