अजून एका शाओमी फोन मध्ये झाला ब्लास्ट, Redmi Note 7 Pro मध्ये लागली आग

मोबाईल हा प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाला आहे. प्रत्येकजण फोन आपल्या सोबत सतत बाळगत असतो. पण सध्या मोबाईल फोन मध्ये ब्लास्ट होण्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत त्यामुळे मोबाईल यूजर्सच्या चिंतेत वाढ होत आहे. यात जर चूक युजरची असेल तर त्याला समजावले जाते आणि त्यातून इतर यूजर्सना पण शिकवण मिळते. पण जर चूक यूजरची नसेल तर? सर्व प्रकारची काळजी घेऊन पण जर मोबाईल मध्ये ब्लास्ट होत असेल तर काय करावे? अशीच एक घटना गुरुग्राम हरियाणा मध्ये घडली आहे. जिथे योग्य ती काळजी घेऊन पण फोन मध्ये ब्लास्ट झाला आहे. आणि हा फोन होता Xiaomi चा Redmi Note 7 Pro!

Redmi Note 7 Pro मध्ये ब्लास्ट होण्याची हि घटना गुरुग्राम मधील आहे. विकेश कुमार नावाचा तरुण हा Redmi Note 7 Pro फोन वापरत होता. विकेश यांनी डिसेंबर मध्ये चिनी कंपनीचा हा फोन घेतला होता आणि तेव्हा पासून त्याने फोनची योग्य ती काळजी घेतली होती. Redmi Note 7 Pro पण आता पर्यंत अगदी चांगला चालू होता.

Yesterday my MI NOT 7 PRO is blast due to battery explode. I have no any major injury,hurt but no any positive response…

Vikesh Kumar यांनी वर पोस्ट केले शुक्रवार, १३ मार्च, २०२०

13 मार्चला हि दुर्घटना घडली. फोन विकेश यांच्या खिश्यात होता आणि फोन हळू हळू गरम होऊ लागला. नेहमीच फोन गरम होत असल्याने आधी त्यांनी फोन कडे दुर्लक्ष केले. पण जेव्हा फोनचे तापमान असह्य होऊ लागले तेव्हा त्यांनी फोन खिशातून बाहेर काढला तेव्हा फोन मधून धूर येत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तसेच फोन मधून दुर्गंध येत होता, लगेच त्यांनी फोन आपल्या बॅगेच्या दिशेने फेकला. तेव्हा फोन मध्ये ब्लास्ट झाला फोनच्या बॅक पॅनलचे तुकडे तुकडे झाले आणि विकेश यांची बॅग पण जाळली.

91मोबाईल्स मराठीशी बोलताना विकेश म्हणाले कि ते मरता मरता वाचले आहेत, थोडा उशीर झाला असता तर कदाचित ते जखमी झाले असते. तसेच जेव्हा त्यांनी सर्व्हिस सेंटरशी संपर्क साधला तेव्हा फोनच्या जॉब शीट मध्ये पावर ऑन फौल्ट असल्याचा शेरा देण्यात आला आहे. याविषयी शाओमी कडे आम्ही चौकशी केली आहे पण अधिकृत प्रतिसाद अजून मिळू शकलेला नाही. काही दिवसांपूर्वी पण शाओमी Redmi Note 7S फोन मध्ये आग लागल्याची बातमी महाराष्ट्रातून आली होती. वारंवार अश्या घटना समोर येत असल्यामुळे शाओमीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here