सॅमसंग एकीकडे शानदार लुक आणि दमदार स्पेसिफिकेशन्स असलेले स्मार्टफोन सादर करून टेक बाजारात आपले स्थान कायम ठेवत आहे. तर दुसरीकडे कंपनीच्या स्मार्टफोन्स सोबत होणाऱ्या दुर्घटना काही थांबत नाही आहेत. काही दिवसांपूर्वी सॅमसंग गॅलेक्सी नोट 9 मध्ये आग लागली होती तर आता पुन्हा सॅमसंग गॅलेक्सी एस सीरीज च्या एस7 ऐज स्मार्टफोन मध्ये आग लागण्याच्या दुर्घटनेमुले सॅमसंग फॅन्स मध्ये भीतीचे वातावरण आहे.
ताजी घटना मोरोक्को मधील आहे जिथे एका व्यक्तीच्या पॅन्टच्या खिशात ठेवलेल्या गॅलेक्सी एस7 ऐज मध्ये आग लागली आहे. हि घटना 4 दिवसांपूर्वीची आहे. सोशल ब्लॉग वर पीडित व्यक्तीने संपूर्ण घटनेची माहिती दिली आहे. त्यानुसार त्यांनी फोन आपल्या पॅन्टच्या मागच्या खिशात ठेवला होता. त्यांनी फोटो घेण्यासाठी फोन बाहेर काढला आणि फोटो क्लिक करताना फोन हँग होऊन बंद झाला.
सॅमसंग गॅलेक्सी एस7 ऐज बंद झाल्यावर त्या पीडित व्यक्तीने फोन बूटच्या माध्यमातून ऑन करण्याचा प्रयत्न केला. फोन ऑन होत असताना त्यातून धूर येऊ लागला आणि त्यात आग लागली. आग लागताच त्यांनी फोन बाजूला फेकून दिला. फोन खिशात असताना आग लागली नाही म्हणून बरे झाले नाही तरी स्मार्टफोन यूजर भाजले गेले असते.
पीडित व्यक्तीने या दुर्घटनेची माहिती सॅमसंगला दिली त्यांनतर कंपनीने त्यांची माफी मागितली आणि गॅलेक्सी एस7 ऐज च्या जागी नवीन गॅलेक्सी एस9 स्मार्टफोन देऊ केला. पीडित व्यक्तीने दुर्घटना विसरत नवीन गॅलेक्सी एस9 स्मार्टफोन घेतला. पण या दुर्घटनेमुळे भीतीचे वातावरण सर्वच स्मार्टफोन युजर मध्ये निर्माण झाले आहे. स्मार्टफोन मध्ये आग लागण्याच्या घटनेत दिवसेंदिवस होत असलेली वाढ पाहता यूजर्सच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.