Smartphones - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 23 Sep 2022 09:16:47 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Best Smartphone Deals: आयफोनला मागे टाकणारा फोन स्वस्तात; अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट सेलमध्ये ‘या’ फोन्सवर जबरदस्त ऑफर्स https://www.91mobiles.com/marathi/best-smartphones-under-30000-price-amazon-flipkart-sale-deals-offer/ https://www.91mobiles.com/marathi/best-smartphones-under-30000-price-amazon-flipkart-sale-deals-offer/#respond Fri, 23 Sep 2022 09:16:47 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=13397 सणासुदीच्या दिवसांच्या आधी बड्या ई-कॉमर्स साइट्सच्या सेल्स हे नवीन समीकरण झालं आहे. यामुळे ग्राहकांना सणासुदीची शॉपिंग करता येते. खासकरून स्मार्टफोन व अन्य गॅजेट्स या सेल्समध्ये मोठ्या डिस्काउंटसह उपलब्ध होतात. ई-कॉमर्स साइट्स Amazon आणि Flipkart वर सध्या त्यांची सेल्स सुरु आहेत. फ्लिपकार्टच्या Big Billion Days आणि अ‍ॅमेझॉनच्या Great Indian Festival Sale मध्ये अनेक शानदार ऑफर्स व […]

The post Best Smartphone Deals: आयफोनला मागे टाकणारा फोन स्वस्तात; अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट सेलमध्ये ‘या’ फोन्सवर जबरदस्त ऑफर्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सणासुदीच्या दिवसांच्या आधी बड्या ई-कॉमर्स साइट्सच्या सेल्स हे नवीन समीकरण झालं आहे. यामुळे ग्राहकांना सणासुदीची शॉपिंग करता येते. खासकरून स्मार्टफोन व अन्य गॅजेट्स या सेल्समध्ये मोठ्या डिस्काउंटसह उपलब्ध होतात. ई-कॉमर्स साइट्स Amazon आणि Flipkart वर सध्या त्यांची सेल्स सुरु आहेत. फ्लिपकार्टच्या Big Billion Days आणि अ‍ॅमेझॉनच्या Great Indian Festival Sale मध्ये अनेक शानदार ऑफर्स व डील्स मिळत आहे. मोबाइल फोन्सवर दमदार डिस्काउंट व कॅशबॅक दिला जात आहे. पुढे आम्ही best phones under Rs 30,000 म्हणजे 30,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळणाऱ्या स्मार्टफोन्सच्या बेस्ट डील्सची माहिती दिली आहे.

OnePlus 10R 5G

Price – 32,999 रुपये
Deal Price – 29999 रुपये

OnePlus 10R Discount

OnePlus 10R स्मार्टफोन Amazon च्या फेस्टिवल सेलमध्ये 29999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. या वनप्लस फोनमध्ये MediaTek Dimensity 8100-Max प्रोसेसर आणि 150W फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. तसेच फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी आणि Android 12 OS मिळतो. वनप्लसच्या या फोनमध्ये 120Hz AMOLED डिस्प्ले, 93.4 टक्के स्क्रीन टू बॉडी रेश्यो, HDR10+ सपोर्ट, sRGB, Display P3 10 बिट कलर पॅनल, Corning Gorilla Glass 5 लेयर आणि 950 निट्स ब्राइटनेस देण्यात आली आहे. हे देखील वाचा: 5G Plans Price: 4G प्रमाणे मोफत मिळणार 5जी सर्व्हिस? बजेटमध्ये बसेल का पुढील महिन्यात येणारं 5G

Samsung Galaxy S20 FE

Price – 44,999 रुपये
Deal Price – 26,999 रुपये

Samsung Galaxy S20 FE and S21 FE 5G phone discount offer samsung smartphone deals

अ‍ॅमेझॉनवर हा सॅमसंगचा दमदार फोन देखील आता स्वस्तात मिळत आहे. स्मार्टफोन 6.5 इंचाच्या फुलएचडी+ सुपर अ‍ॅमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करतो जो 120Hz रिफ्रेश रेटवर चालतो. प्रोसेसिंगसाठी सॅमसंग एक्सनॉस 990 चिपसेट देण्यात आला आहे. बॅक पॅनलवर 12 मेगापिक्सलचे मेन कॅमेरा, 12 मेगापिक्सलची वाइड अँगल लेन्स आणि 8 मेगापिक्सलची टेलीफोटो लेन्स असलेला ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच यात 32 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. फोनमध्ये 25वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली 4,500एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.

Redmi K50i

Price – 25,000 रुपये
Deal Price – 19,999 रुपये

Redmi K50i Discount

Redmi K50i अ‍ॅमेझॉन इंडियाच्या सेलमध्ये 19,999 मध्ये विकत घेता येईल. AnTuTu स्कोरमध्ये आयफोनला मागे टाकण्यासाठी हा फोन लाँचच्या वेळी चर्चेत होता. शाओमीचा हा स्मार्टफोन MediaTek Dimensity 8100 प्रोसेसर वर चालतो जो गेमिंगसाठी दमदार ऑप्शन आहे. फोनमध्ये 6.6-इंचाचा FHD+ LCD डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 144Hz, DC dimming आणि Dolby Vision ला सपोर्ट देण्यात आला आहे. फोनमध्ये 64MP प्रायमरी कॅमेरा आणि 5080mAh ची बॅटरी आणि 67W फास्ट चार्जिंग मिळते.

iQOO 9 SE

Price – 33,990 रुपये
Deal Price – 20,990 रुपये

iQOO 9 SE Discount

आयकू 9एसई अ‍ॅमेझॉन सेलमध्ये फक्त 20,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल. या फोनमध्ये 6.62-इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप, 48MP प्रायमरी Sony IMX598 सेन्सर आणि OIS सपोर्ट मिळतो. फोनमध्ये 16MP चा फ्रंट कॅमेरा आहे. प्रोसेसींगसाठी Qualcomm Snapdragon 888 चिपसेट मिळतो. हा फोन Android 11 वर आधारित Funtouch OS 12 कस्टम स्किनवर चालतो. फोनमध्ये 4,500mAh ची बॅटरी आणि 66W फास्ट चार्जिंग मिळते. हे देखील वाचा: BSNL चा पैसा वसूल प्लॅन! 130 दिवस डेली Unlimited Data आणि फ्री कॉलिंग, जाणून घ्या सविस्तर

OnePlus Nord 2T 5G

Price – 28,999 रुपये
Deal Price – 26,499 रुपये

Amazon Great Freedom Festival सेलमध्ये हा वनप्लस स्मार्टफोन 26,499 रुपयांमध्ये मिळत आहे. स्मार्टफोनमध्ये 4,500mAh ची बॅटरी आणि 80W फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. त्याचबरोबर फोनमध्ये 6.43-इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 90Hz आहे. हा फोन मीडियाटेकच्या Dimensity 1300 प्रोसेसरवर चालतो. वनप्लसच्या या फोनमध्ये 50MP चा प्रायमरी कॅमेरा, 8MP अल्ट्रा वाइड कॅमेरा आणि 2MP चा डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे.

The post Best Smartphone Deals: आयफोनला मागे टाकणारा फोन स्वस्तात; अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट सेलमध्ये ‘या’ फोन्सवर जबरदस्त ऑफर्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/best-smartphones-under-30000-price-amazon-flipkart-sale-deals-offer/feed/ 0
भारतात बनणारे स्मार्टफोन महागणार! सरकारच्या निर्णयामुळे Made in India मोबाइल्सना फटका https://www.91mobiles.com/marathi/smartphones-to-get-costlier-made-in-india-mobile-phone-price-hike/ https://www.91mobiles.com/marathi/smartphones-to-get-costlier-made-in-india-mobile-phone-price-hike/#respond Thu, 25 Aug 2022 03:32:00 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=12451 गेली दोन वर्ष स्मार्टफोन इंडस्ट्रीमध्ये अनेक चढ उतार पाहायला मिळाले आहेत. Mobile Phone लाँचची संख्या वाढली आहे परंतु त्याचबरोबर स्मार्टफोन्सच्या किंमती देखील वाढल्या आहेत. भारतीय मोबाइल युजर्स स्मार्टफोन्सच्या किंमती वाढल्यामुळे नाराज तर आहेत परंतु ही नाराजी अजून वाढणार आहे. कारण आता पुन्हा एकदा भारतात स्मार्टफोन्स महागणार असल्याची बातमी आली आहे आणि यात Made in India […]

The post भारतात बनणारे स्मार्टफोन महागणार! सरकारच्या निर्णयामुळे Made in India मोबाइल्सना फटका first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
गेली दोन वर्ष स्मार्टफोन इंडस्ट्रीमध्ये अनेक चढ उतार पाहायला मिळाले आहेत. Mobile Phone लाँचची संख्या वाढली आहे परंतु त्याचबरोबर स्मार्टफोन्सच्या किंमती देखील वाढल्या आहेत. भारतीय मोबाइल युजर्स स्मार्टफोन्सच्या किंमती वाढल्यामुळे नाराज तर आहेत परंतु ही नाराजी अजून वाढणार आहे. कारण आता पुन्हा एकदा भारतात स्मार्टफोन्स महागणार असल्याची बातमी आली आहे आणि यात Made in India मोबाइल फोन्सवर सर्वाधिक परिणाम होणार आहे.

Smartphone price in India

भारतात पुन्हा एकदा स्मार्टफोन्सच्या किंमती वाढणार आहेत. पीटीआयच्या हवाल्याने बातमी आली आहे की भारतात स्मार्टफोन्सच्या किंमती वाढू शकतात. ही वाढ Central Board of Indirect Taxes and Customs (CBIC) द्वारे जारी करण्यात आलेल्या एका आदेशामुळे होऊ शकते, ज्यात custom duty चार्ज वाढवण्याचा उल्लेख आहे. विशेष म्हणजे ही कस्टम ड्यूटी मोबाइलवरील नव्हे तर स्मार्टफोनमध्ये वापरण्यात येणाऱ्या विविध पार्ट्सवर लावण्यात येईल.

या आदेशानुसार मोबाइल फोन्समध्ये वापरण्यात येणाऱ्या कम्पोनेंट्सवर कस्टम ड्यूटी लागू केली जाऊ शकते. Smartphone display तसेच back frames वर 10 टक्क्यांची वाढ होऊ शकते तसेच antenna pins, power buttons व अन्य अ‍ॅक्सेसरीजवर लागणारी कस्टम ड्यूटी 5 अजून टक्क्यांनी वाढू शकते. म्हणजे एकूण मिलाकर कस्टम ड्यूटीमध्ये 15 टक्क्यांची वृद्धी दिसू शकते.

Made in India Mobile महागणार

Apex indirect tax of India च्या ऑर्डरनुसार सर्वात जास्त फटका Made in India स्मार्टफोन्सना बसणार आहे. असे फोन निर्माता जे बाहेरच्या देशांमधून मोबाइल फोन्सचे पार्ट्स आयात करून ते भारतात असेंबल करतात, त्यांच्यावर सर्वाधिक भार पडेल. स्मार्टफोन्समध्ये वापरण्यात येणारे घटकांसाठी मॅन्युफॅक्चररला जास्त किंमत द्यावी लागेल त्यामुळे फोन बनवण्याचा खर्च वाढेल. परिणामी मोबाइल ब्रँड आपले स्मार्टफोन जास्त किंमतीत विकण्यास सुरु करतील.

या मोबाइल पार्ट्सवर द्यावा लागेल अतिरिक्त शुल्क

CBIC नुसार स्मार्टफोन डिस्प्लेमध्ये फिट होणाऱ्या Sim tray, antenna pin, speaker net, power key, slider switch, battery compartment, volume Flexible Printed Circuits (FPCs), power, sensors, speakers, fingerprint तसे metal व plastic back support frame वर 15 टक्क्यांची ड्यूटी लागेल.

डिस्प्ले असेंबलीसाठी touch panel, cover glass, brightness enhancement film, indicator guide light, reflector, LED blacklight, polarizers आणि LCD Driver mounted on a flible Printed Circuit ची आवश्यकता असते.

The post भारतात बनणारे स्मार्टफोन महागणार! सरकारच्या निर्णयामुळे Made in India मोबाइल्सना फटका first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/smartphones-to-get-costlier-made-in-india-mobile-phone-price-hike/feed/ 0
ग्राहकांना जोरदार झटका! पुन्हा महागणार Smartphones; येत्या काही महिन्यांत होऊ शकते भाववाढ https://www.91mobiles.com/marathi/smartphones-price-in-india-will-increase-again-know-the-reason-why/ https://www.91mobiles.com/marathi/smartphones-price-in-india-will-increase-again-know-the-reason-why/#respond Wed, 06 Jul 2022 07:03:04 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=11152 गेले काही महिन्यांमध्ये इंडियन स्मार्टफोन इंडस्ट्रीमध्ये चढ-उतार पाहायला मिळाले आहेत. Xiaomi, Redmi, Realme, Samsung, OPPO, Vivo, Infinix आणि Tecno सारख्या अनेक मोबाईल ब्रँड्सनी आपल्या स्मार्टफोन्सच्या किंमती वाढवल्या आहेत. फक्त जुन्या मॉडेल्सच्या किंमती वाढल्या नाहीत तर नवीन हँडसेट देखील जास्त किंमतीत सादर करण्यात आले आहेत. आता मोबाईल मार्केट संबंधित अजून एक वाईट बातमी समोर आली आहे, […]

The post ग्राहकांना जोरदार झटका! पुन्हा महागणार Smartphones; येत्या काही महिन्यांत होऊ शकते भाववाढ first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
गेले काही महिन्यांमध्ये इंडियन स्मार्टफोन इंडस्ट्रीमध्ये चढ-उतार पाहायला मिळाले आहेत. Xiaomi, Redmi, Realme, Samsung, OPPO, Vivo, Infinix आणि Tecno सारख्या अनेक मोबाईल ब्रँड्सनी आपल्या स्मार्टफोन्सच्या किंमती वाढवल्या आहेत. फक्त जुन्या मॉडेल्सच्या किंमती वाढल्या नाहीत तर नवीन हँडसेट देखील जास्त किंमतीत सादर करण्यात आले आहेत. आता मोबाईल मार्केट संबंधित अजून एक वाईट बातमी समोर आली आहे, त्यानुसार येत्या काही दिवसांमध्ये स्मार्टफोन्सच्या किंमतीत आणखी वाढ होऊ शकते.

Smartphones महागणार

अनेक मोबाईल ब्रँड्सनी गेल्या काही महिन्यांमध्ये आपल्या स्मार्टफोन्सच्या किंमती वाढवल्या आहेत. अनेक स्मार्टफोन मॉडेल्सची प्राईस एकदा नव्हे तर दोन किंवा तीन वेळा वाढवण्यात आली आहे. लो बजेट स्मार्टफोन जे 6,000 किंवा 7,000 रुपयांच्या बजेटमध्ये लाँच झाले होते, आता 8,000 रुपयांपेक्षा जास्त किंमतीत उपलब्ध झाले आहेत. तसेच ज्या प्राईस रेंजमध्ये 3GB RAM व 4GB RAM असलेले फोन मिळत होते, त्यात आता 2GB RAM Smartphones वर भागवावे लागत आहे.

स्वस्त स्मार्टफोन महाग झाले आहेत आणि ही महागाई थांबण्याचं नाव काढत नाही. जर तुम्ही नजीकच्या भविष्यात स्वस्त आणि मस्त स्मार्टफोन विकत घेण्याचा विचार करत असाल, तर तो सोडून द्या. साल 2019 नंतरपासून स्मार्टफोन्सच्या प्राईसेस वाढण्यास सुरुवात झाली आहे आणि ही दरवाढ पुढील वर्षी 2023 मध्ये देखील अशीच राहणार आहे. येत्या काही दिवसांत स्मार्टफोन्स अजून महागणार आहेत. नवीन स्मार्टफोन देखील जास्त किंमतीत लाँच होतील तसेच जुन्या मोबाईल फोन्सची प्राईस देखील येत्या काही महिन्यांमध्ये वाढवली जाऊ शकते. हे देखील वाचा: काय रॅम, काय बॅटरी, काय फीचर्स… सगळं दमदार; 18GB रॅम आणि 6000mAh बॅटरीसह Asus चे फोन लाँच

महागाईचे कारण?

स्मार्टफोनच्या वाढत्या किंमतींमागे मोठे कारण त्यात वापरण्यात येणारी चिप आहे. TSMC (Taiwan Semiconductor Company) नं आपल्या नवीन रिपोर्टमध्ये दावा केला आहे की, Global Chip Shortage ची समस्या अजून संपली नाही तसेच ही समस्या अजून एक वर्ष म्हणजे 2023 पर्यंत कायम असेल. चिपसेटच्या तुटवड्याचा परिणाम स्मार्टफोन्सच्या प्रोडक्शन तसेच किंमतींवर आधी देखील दिसला आहे. तसेच आता या चिप बनवणाऱ्या कंपन्या आपल्या कंपोनेंट्स तसेच चिपसेटचे भाव वाढवणार आहेत. म्हणजे चिप महागल्यावर स्मार्टफोन्सच्या किंमती देखील वाढतील.

तैवान सेमीकंडक्टर निर्माण करणारी कंपनी म्हणजे TSMC बद्दल बातमी आली आहे की, गेल्या काही महिन्यांमध्ये ग्लोबल चिप शॉर्टेज असताना देखील या कंपनीनं कमी नफ्यासह त्याच किंमतीत चिपचा पुरवठा केला. परंतु नफा मोठ्या प्रमाणावर कमी झाल्यामुळे लवकरच कंपनी आपल्या चिपसेट तसेच संबंधित कंपोनेंट्सची किंमत वाढवणार आहे. त्यामुळे स्मार्टफोन मॅन्युफॅक्चरर कंपन्यांना या चिपसाठी जास्त पैसे मोजावे लागतील. हे देखील वाचा: शाओमी-सॅमसंगच्या अडचणीत वाढ! दमदार OPPO Reno8 सीरीजच्या भारतीय लाँचची तारीख ठरली

ग्राहकांचा बळी जाणार

प्राईस वाढवण्याची ही प्रक्रिया एक वर्तुळ पूर्ण करेल. चिपसेट बनवणारी कंपनी आपल्या चिप-कंपोनेंट्सची प्राईस वाढवेल आणि स्मार्टफोन कंपन्यांना महागड्या किंमतीत विकेल. महागडे चिपसेट विकत घेणाऱ्या स्मार्टफोन ब्रँड्सच्या मोबाईल फोनच्या प्रोडक्शनचा खर्च वाढेल आणि या प्रोडक्ट्सची सेलिंग प्राईस वाढवण्यात येईल आणि स्मार्टफोन्स महाग होतील. अखेरीस मोबाईल युजर्सनाच नवीन मोबाईल फोन विकत घेण्यासाठी जास्त पैसे द्यावे लागतील.

The post ग्राहकांना जोरदार झटका! पुन्हा महागणार Smartphones; येत्या काही महिन्यांत होऊ शकते भाववाढ first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/smartphones-price-in-india-will-increase-again-know-the-reason-why/feed/ 0
डाउनलोड करा तुमच्या फोन मध्ये एंडरॉयड 9 पाई, इथे जाणून घ्या माहिती https://www.91mobiles.com/marathi/how-to-download-and-install-latest-os-android-9-pie-in-your-smartphone-with-new-features-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/how-to-download-and-install-latest-os-android-9-pie-in-your-smartphone-with-new-features-in-marathi/#respond Tue, 07 Aug 2018 08:14:55 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1597 गूगल च्या पिक्सल सीरीज च्या सर्व स्मार्टफोन्स आज पासून एंडरॉयड पाई वर अपडेट होत आहेत तर इतर स्मार्टफोन्सना एंडरॉयड 9 पाई चा अपडेट मिळण्यासाठी थोडा वेळ जाईल.

The post डाउनलोड करा तुमच्या फोन मध्ये एंडरॉयड 9 पाई, इथे जाणून घ्या माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
टेक दिग्गज गूगल ने मार्च महिन्यात आपल्या वार्षिक बैठक आई/ओ 2018 च्या मंचावरून नवीन ‘एंडरॉयड पी’ सादर केला होता. कंपनी ने तेव्हा एंडरॉयड पी म्हणजे एंडरॉयड पाई चा फक्त बीटा वर्जन आणला होता. पण आज गूगल ने एंडरॉयड च्या सर्वात लेटेस्ट एंडरॉयड आॅपरेटिंग सिस्टम एंडरॉयड 9 पाई ला अधिकृतपणे जगभरात रोलआउट केला आहे. गूगल ने एंडरॉयड पाई आॅफिशियली जाहीर करण्यासोबतच एंडरॉयड चा लेटेस्ट अपडेट कोणत्या स्मार्टफोन्सना मिळेल तसेच कशा प्रकारे हा एडवांस वर्जन आपल्या फोन मध्ये डाउनलोड करावा हे देखील सांगितले आहे.

एंडरॉयड 9 पाई एडवांस एआई, अडॅप्टिव बॅटरी, वेल ​बीइंग फीचर, एसयूएसएच (SUSH) आणि न्यू नेविगेशन सारख्या अनेक आर्कषक फीचर्स सह येतो. एंडरॉयड 9 पाई ​चे फीचर्स किती खास आहेत आणि किती सक्षम आहेत ही जाणून घेण्यासाठी (इथे क्लिक करा). गूगल पिक्सल सोबतच जरुर तुम्ही पण तुमच्या फोन मध्ये एंडरॉयड 9 पाई इंस्टाल करू इच्छित असाल तर आम्ही त्या सर्व स्टेप्स सांगितल्या आहेत ज्या वापरून तुम्ही तुमच्या फोन मध्ये एंडरॉयड पाई चा अपडेट इंस्टाल पण करू शकता.

तुमच्या फोन मध्ये आला आहे का एंडरॉयड पी अपडेट?

सर्वात आधी जाणून घ्या कि तुमच्या स्मार्टफोन मध्ये एंडरॉयड चा कोणता वर्जन आहे. यासाठी :

1. स्मार्टफोन ची सेटिंग्स ओपन करा आणि त्यात ‘सिस्टम’ आॅप्शन वर क्लिक करा
2. सिस्टम मध्ये ‘अबाउट फोन’ चा आॅप्शन मिळेल त्यावर क्लिक करा
3. तिथे सर्वात खाली ‘एंडरॉयड वर्जन’ मिळेल. त्यावर क्लिक करताच समजेल की तुमच्या फोन मध्ये कोणता एंडरॉयड वर्जन आहे.

कसा कराल स्मार्टफोन एंडरॉयड 9 पाई वर अपडेट

1. ‘अबाउट फोन’ मध्ये एंडरॉयड सिक्योरिटी पॅच चा आॅप्शन देण्यात आला आहे, यावर क्लिक करा
2. जर तुमच्या फोन साठी नवीन एंडरॉयड चा अपडेट उपलब्ध असेल तर डाउनलोड अ‍ॅण्ड इंस्टाल चा आॅप्शन येईल
3. नवीन एंडरॉयड वर्जनची फाइल साईज 1 जीबी पेक्षा जास्त असू शकते, त्यामुळे फोन वाईफाई शी कनेक्ट करावा
4. डाउनलोड अॅण्ड इंस्टाल वर टॅप करा, नवीन अपडेट डाउनलोड व्हायला सुरवात होईल

एंडरॉयड 9 पाई गूगल द्वारा ओटीए अर्थात् ओवर-द-एयर च्या माध्यमातून सर्व स्मार्टफोन्स येईल. गूगल ने सांगितले आहे की सोनी मोबाईल, शाओमी, एचएमडी ग्लोबल, ओपो, वीवो, वनप्लस आणि असेन्शल ब्रांड च्या सर्व स्मार्टफोन्स सोबतच ते स्मार्टफोन जे एंडरॉयड वन वर सादर करण्यात आले आहेत, त्यांना एंडरॉयड च्या लेटेस्ट वर्जन एंडरॉयड 9 पाई चा अपडेट मिळेल. गूगल च्या पिक्सल सीरीज च्या सर्व स्मार्टफोन्स आज पासून एंडरॉयड पाई वर अपडेट होत आहेत तर इतर स्मार्टफोन्सना एंडरॉयड 9 पाई चा अपडेट मिळण्यासाठी थोडा वेळ जाईल.

The post डाउनलोड करा तुमच्या फोन मध्ये एंडरॉयड 9 पाई, इथे जाणून घ्या माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/how-to-download-and-install-latest-os-android-9-pie-in-your-smartphone-with-new-features-in-marathi/feed/ 0
भारतात सुरू झाली जगातील सर्वात मोठी मोबाईल फॅक्टरी, मोदींनी केले उद्घाटन https://www.91mobiles.com/marathi/world-largest-mobile-factory-samsung-plant-in-noida-open-with-12-crore-mobile-every-year-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/world-largest-mobile-factory-samsung-plant-in-noida-open-with-12-crore-mobile-every-year-in-marathi/#respond Tue, 10 Jul 2018 07:44:23 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1209 हेही लक्षात असू दे की भारतात सध्या सॅमसंग 2 प्लॅन्ट च्या मदतीने आपले प्रोडक्ट्स बनवत आहे. यात यूपी मधील नोएडा आणि तामीळनाडू मधील श्रीपेरूं बंदूर यांचा समावेश आहे.

The post भारतात सुरू झाली जगातील सर्वात मोठी मोबाईल फॅक्टरी, मोदींनी केले उद्घाटन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
जर कोणी विचारेल की कंज्यूमर इलेक्ट्रॉनिक्स च्या बाबतीत जगातील सर्वात मोठी मोबाईल फॅक्टरी कोणत्या देशात आहे, तर याचे उत्तर चीन, कोरिया किंवा अमेरिका नाही तर भारत असेल. आज म्हणजे 9 जुलै ला भारतात जगातील सर्वात मोठी मोबाईल फॅक्टरी ची सुरवात झाली आहे. जगातील ही सर्वात मोठी फॅक्टरी दिग्गज कंपनी सॅमसंग ने सुरू केली आहे आणि यात 5 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक करण्यात आली आहे.

सॅमसंग ने भारतात केलेली ही सर्वात मोठी गुंतवणूक आहे. सॅमसंग ने ही फॅक्टरी उत्तर प्रदेश मधील नोएडा सेक्टर-81 मध्ये सुरू केली आहे ज्याचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि दक्षिण कोरिया चे राष्ट्रपति मून जे यांचा हस्ते करण्यात आले. सॅमसंग ने या नवीन फॅक्टरी मधून एका वर्षात जवळपास 13 कोटी मोबाईल फोन बनवण्याचे ध्येय ठेवले आहे.

विशेष म्हणजे मागच्या वर्षी जुन मध्ये सॅमसंग ने 4,915 कोटी रूपयांची गुंतवणुक करून नोएडा प्लॅन्ट मध्ये विस्तार करण्याची घोषणा केली होती आणि आज फक्त एक वर्षा नंतर नवीन फॅक्टरी दुप्पट उत्पादनासाठी तयार आहे. भारतात कंपनी सध्या 6.7 कोटी स्मार्टफोन बनवत आहे आणि हा नवीन यूनिट झाल्यावर 12 कोटी पेक्षा जास्त मोबाईल फोन बनवण्यात येतील अशी आशा आहे. जवळपास 5 हजार कोटी रुपयांचा हा सॅमसंग प्लॅन्ट 35 एकर मध्ये पसरला आहे.

सॅमसंग च्या या नवीन फॅक्टरी मध्ये फक्त मोबाइलच नाही तर सॅमसंग चे अन्य प्रोडक्ट्स पण बनवले जातील. यात रेफ्रिजरेटर आणि टेलीविजन चा समावेश आहे. एकीकडे देशात सॅमसंग च्या या प्रोडक्टस ची उपलब्धता वाढेल तर दुसरीकडे या इलेक्ट्रानिक प्रोडक्ट्स च्या किंमत पण कमी होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे वर्ष 2016-17 मध्ये सॅमसंग चा मोबाईल बिजनेस रेवेन्यू 34,400 कोटी होता ज्यात कंपनी ने एकूण 50,000 कोटींची विक्री केली होती.

हेही लक्षात असू दे की भारतात सध्या सॅमसंग 2 प्लॅन्ट च्या मदतीने आपले प्रोडक्ट्स बनवत आहे. यात यूपी मधील नोएडा आणि तामीळनाडू मधील श्रीपेरूं बंदूर यांचा समावेश आहे. या दोन प्लॅन्ट सोबतच सॅमसंग ने भारतात 5 रिसर्च अ‍ॅण्ड डेवलप्मेंट सेंटर आणि 1 डिजाईन सेंटर बनवाला आहे. तसेच संपूर्ण देशात सर्विस देण्यासाठी सॅमसंग ने सध्या 1.5 लाख पेक्षा जास्त रिटेल आउटलेट उघडले आहेत. सॅमसंग कडून 70 हजार लोकांना रोजगार मिळाला आहे.

The post भारतात सुरू झाली जगातील सर्वात मोठी मोबाईल फॅक्टरी, मोदींनी केले उद्घाटन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/world-largest-mobile-factory-samsung-plant-in-noida-open-with-12-crore-mobile-every-year-in-marathi/feed/ 0