18GB रॅम आणि 6000mAh बॅटरीसह Asus ROG Phone 6 सीरीज लाँच

Asus सध्या आपल्या गेमिंग स्मार्टफोन्सवर जास्त लक्ष केंद्रित करत आहे. कंपनीनं भारतासह जगभरात Asus ROG Phone 6 ही नेक्स्ट जेनेरेशन गेमिंग स्मार्टफोन सीरीज लाँच केली आहे. या सीरिजमध्ये ROG Phone 6 आणि ROG Phone 6 Pro हे दोन स्मार्टफोन लाँच करण्यात आले आहेत. हे फोन क्वॉलकॉमच्या सर्वात शक्तिशाली Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसरसह सादर करण्यात आले आहेत. तसेच यात 167Hz रिफ्रेश रेट, 6000mAh ची बॅटरी, 18GB रॅम आणि 512GB पर्यंतची स्टोरेज मिळते.

Asus ROG Phone 6 सीरीजची खास डिजाइन

Asus ROG Phone 6 सीरीजमध्ये फ्यूचरिस्टिक डिजाइनसह सादर करण्यात आली आहे. ROG Phone 6 स्मार्टफोन स्टॉर्म व्हाईट आणि फँटम ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये सादर करण्यात आला आहे. फोनचा फ्रॉस्टेड ग्लास बॅक पॅनलवर इल्यूमिनेटेड ROG लोगो देण्यात आला आहे. ज्याचे रंग युजर त्याच्या आवडीनुसार बदलू शकतात.

Asus ROG Phone 6 Pro स्मार्टफोन फक्त स्टॉर्म व्हाईट कलर ऑप्शनमध्ये सादर झाला आहे. या फोनच्या बॅक पॅनलवर ROG Vision बॅक PMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्यात युजर्स कस्टमाइजेबल ग्राफिक्स सह इनकमिंग कॉल, गेम लाँचिंग, एंटरिंग एक्स मोड इत्यादी फीचर्स सेट करू शकतात. हा डिस्प्ले 60 प्रकारचे नवीन अ‍ॅनिमेशन दाखवू शकतो. दोन्ही फोन कम्फर्टेबल राउंड एज Gorilla Glass 3 बॅकसह येतात. हे देखील वाचा: शाओमी-सॅमसंगच्या अडचणीत वाढ! दमदार OPPO Reno8 सीरीजच्या भारतीय लाँचची तारीख ठरली

ASUS ROG Phone 6 सीरीजचे स्पेसिफिकेशन्स

ASUS ROG Phone 6 सीरीजच्या दोन्ही स्मार्टफोन ROG Phone 6 आणि ROG Phone 6 Pro चे स्पेसिफिकेशन्स जवळ्पास्ट एकसारखे आहेत. ROG Phone 6 Pro स्मार्टफोन कंपनीनं 18GB पर्यंत रॅम आणि 512GB स्टोरेजसह सादर केला आहे. तसेच प्रो मॉडेलच्या बॅक पॅनलवर खास ROG Vision डिस्प्ले देण्यात आला आहे.

डिस्प्ले

ASUS ROG Phone 6 सीरीजच्या दोन्ही स्मार्टफोनमध्ये 6.78-इंचाचा Full HD+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्याचा रिफ्रेश रेट 165Hz आणि टच सॅंप्लिंग रेट 720Hz आहे. हा फोन 1200 नीट्स पीक ब्राईटनेस आणि 23 मिली सेकंड टच लेटन्सीला सपोर्ट करतो. त्याचबरोबर फोनच्या डिस्प्लेमध्ये Corning Gorilla Glass Victus ची सुरक्षा मिळते.

प्रोसेसिंग पावर

ASUS ROG Phone 6 सीरीजमध्ये क्वॉलकॉमचा लेटेस्ट Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसर देण्यात आला आहे. दोन्ही गेमिंग स्मार्टफोनमध्ये थर्मल मॅनेजमेंटसाठी GameCool 6 टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे. फोनच्या बॅक पॅनलवर AeroActive Cooler 6 फॅन देखील जोडता येतो. त्याचबरोबर Asus नं फोनच्या उजव्या पॅनलवरील Air Triggers अपग्रेड केले आहेत, जे गेमिंगमध्ये मदत करतात. हे स्मार्टफोन अँड्रॉइड 12 ऑपरेटिंग सिस्टमवर चालतात. तो पुन्हा येतोय! रियलमीला मात देण्यासाठी Redmi च्या ‘के’ सीरिजचं तीन वर्षांनंतर पुनरागमन

बॅटरी

ASUS ROG Phone 6 सीरीजच्या गेमिंग स्मार्टफोनमध्ये 6000mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 65W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. देण्यात आला आहे. या फोनमध्ये बॅटरीसह कूलिंग मॅकॅनिज्म देखील देण्यात आला आहे. बिनदिक्कत गेमिंगसाठी फोनमध्ये बॉटमला आणि उजव्या पॅनलवर असे दोन USB Type-C पोर्ट मिळतात.

कॅमेरा

फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात 50MP Sony IMX766 सेन्सर मुख्य कॅमेऱ्याचे काम करतो, सोबतीला 13MP चा अल्ट्रावाईड कॅमेरा आणि 5MP चा मॅक्रो कॅमेरा सेन्सर आहे. फोनमध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 12MP Sony IMX663 कॅमेरा सेन्सर मिळतो.

अन्य फिचर

दोन्ही गेमिंग स्मार्टफोनमध्ये स्टीरियो स्पिकर आणि 3.5mm चा हेडफोन जॅक देण्यात आला आहे. या फोन्सना दोन वर्षांपर्यंत अपडेट मिळतील. तसेच फोनमध्ये WiFi 6e सपोर्ट, NFC, Bluetooth 5.2, दोन SIM कार्ड स्लॉट देण्यात आले आहेत.

ASUS ROG Phone 6 सीरीजची किंमत

ASUS ROG Phone 6 सीरीजचे स्मार्टफोन ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म Flipkart आणि ASUS च्या ऑफिशियल वेबसाईटच्या माध्यमातून विकत घेता येतील. ASUS ROG Phone 6 ची किंमत भारतात 71,999 रुपये ठेवण्यात आली आहे. तर ASUS ROG Phone 6 Pro स्मार्टफोनसाठी 89,999 रुपये मोजावे लागतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here