Sony Xperia XZ4 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 06 Jul 2023 08:24:51 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 सोनी एक्सपीरिया एक्सए3 चा फोटो झाला लीक, 25 फेब्रुवारीला लॉन्च होईल हा शानदार स्मार्टफोन https://www.91mobiles.com/marathi/sony-xperia-xa3-render-image-leaked-display-to-launch-in-mwc-2019-25-february-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/sony-xperia-xa3-render-image-leaked-display-to-launch-in-mwc-2019-25-february-in-marathi/#respond Thu, 07 Feb 2019 09:57:53 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3569 हा फोन कंपनी मीड बजेट मध्ये सादर करू शकते.

The post सोनी एक्सपीरिया एक्सए3 चा फोटो झाला लीक, 25 फेब्रुवारीला लॉन्च होईल हा शानदार स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
टेक कंपनी सोनी घोषणा केली आहे कि कंपनी मोबाईल वर्ल्ड कॉग्रेंस 2019 मध्ये सहभागी होत आहे आणि 25 फेब्रुवारीला आपले नवीन स्मार्टफोन व डिवाईस टेक मंचावर सादर करेल. पण सोनी ने अजूनतरी सांगतिले नाही कि कंपनी त्यादिवशी कोणते फोन लॉन्च करेल पण चर्चा अशी आहे कि एमडब्ल्यूसी 2019 मध्ये सोनी एक्सपीरिया एक्सझेड4, एक्सपीरिया एक्सए3, एक्सपीरिया एक्सए3 अल्ट्रा आणि एक्सपीरिया एल3 लॉन्च करू शकते. आज यातील एक्सपीरिया एक्सए3 स्मार्टफोनची रेंडर ईमेज आणि स्पेसिफिकेशन्स लॉन्चच्या आधीच लीक झाले आहेत.

सोनी एक्सपीरिया एक्सए3 विनफ्यूचर द्वारा शेयर करण्यात आला आहे. या वेबसाइट ने फोनच्या रेंडर ईमेज सोबत याच्या स्पेसिफिकेशन्सचा खुलासा केला आहे. समोर आलेल्या फोटो मध्ये एक्सपीरिया एक्सए3 बेजल लेस डिजाईन वर दाखवण्यात आला आहे. डिस्प्लेच्या वरच्या बाजूला बॉडी पार्ट मध्ये सेल्फी कॅमेरा आणि स्पीकर आहे. तसेच फ्रंट पॅनल वर इतर तिन्ही किनारे पूर्णपणे बेजल लेस दाखवण्यात आले आहेत. फोनच्या बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. या कॅमेरा सेटअपच्या वरच्या बाजूला फ्लॅश लाईट आहे आणि बॅक पॅनल वरच सोनी लोगो आणि एनएफसी साईन आहे.

एक्सपीरिया एक्सए3 बद्दल बोलले जात आहे कि हा फोन 21:9 आस्पेक्ट रेशियो वाली डिस्प्ले वर सादर केला जाईल. लीकनुसार या फोन मध्ये 5.9-इंचाची मोठी ​स्क्रीन दिली जाईल जी 2560 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशनला सपोर्ट करेल. लीक पाहता सोनी एक्सपीरिया एक्स3 4जीबी रॅम सह सादर केला जाईल तसेच हा फोन 64जीबी च्या इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करेल. तसेच प्रोसेसिंग साठी या फोन मध्ये क्वालकॉम चा स्नॅपड्रॅगॉन 660 चिपसेट दिला जाऊ शकतो.

एक्सक्लूसिव : हा आहे जगातील पहिला 5 रियर कॅमेरा असलेला फोन नोकिया 9 प्योरव्यू

सोनीचा हा फोन डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. या सेटअप मध्ये एक कॅमेरा सेंसर 25-मेगापिक्सलचा असू शकतो तर दुसरा कॅमेरा सेंसर 8-मेगापिक्सलचा दिला जाऊ शकतो. तसेच पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 3,500एमएएच ची बॅटरी दिली जाऊ शकते. समोर आलेल्या फोटो वरून समजते कि सोनी आपल्या या फोन मध्ये साईड पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर बटण देईल. फोनच्या उजव्या पॅनल वरच पावर बटण व वाल्यूम रॉकर असतील.

जियोफोन 3 ची माहिती आली समोर, बघा कसा असेल हा फोन

एक्सपीरिया एक्सए3 सोनी द्वारा ब्लू, ब्लॅक, सिल्वर आणि पिंक कलर वेरिएंट मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. कंपनी ने अजूनतरी एक्सपीरिया एक्सए3 च्या लॉन्च ची कोणतीही माहिती दिली नाही पण अशा आहे कि 25 फेब्रुवारीला सोनी च्या एमडब्ल्यूसी ईवेंट मध्ये एक्सपीरिया एक्सए3 पण येईल. हा फोन कंपनी मीड बजेट मध्ये सादर करू शकते.

The post सोनी एक्सपीरिया एक्सए3 चा फोटो झाला लीक, 25 फेब्रुवारीला लॉन्च होईल हा शानदार स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/sony-xperia-xa3-render-image-leaked-display-to-launch-in-mwc-2019-25-february-in-marathi/feed/ 0
येत आहे जगातील पहिला स्मार्टफोन ज्यात असेल 52-एमपी चा रियर कॅमेरा, 25 फेब्रुवारीला होईल लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/sony-xperia-xz4-premium-to-support-52mp-triple-rear-camera-specifications-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/sony-xperia-xz4-premium-to-support-52mp-triple-rear-camera-specifications-in-marathi/#respond Thu, 31 Jan 2019 13:39:58 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3508 हा जगातील पहिला स्मार्टफोन असेल ​ज्यात 52-मेगापिक्सलचा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात येईल.

The post येत आहे जगातील पहिला स्मार्टफोन ज्यात असेल 52-एमपी चा रियर कॅमेरा, 25 फेब्रुवारीला होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
टेक कंपनी सोनी येत्या 25 फेब्रुवारीला एफडब्ल्यूसी 2019 मध्ये ईवेंटचे आयोजन करणार आहे. बातमी अशी आहे कि या दिवशी कंपनी आपल्या एक्सपीरिया सीरीजचे नवीन स्मार्टफोन्स सादर करेल ज्यात एक्सपीरिया एक्सझेड4 पण असेल. कालच एक्सपीरिया एक्सझेड4 संबंधित एक लीक आला होता ज्यात फोनच्या स्टोरेज आणि बॅटरी संबंधी माहिती समोर आली होती. आज ​सोनी संबंधित एक मोठी बातमी आली आहे ज्यात फोनच्या कॅमेरा सेग्मेंटचे डिटेल देण्यात आले आहेत. या रिपोर्ट नुसार एक्सपीरिया एक्सझेड4 चा एक मॉडेल 52-मेगापिक्सल कॅमेरा सेंसर सह येईल.

सोनी एक्सपीरिया एक्सझेड4 संबंधित हि माहिती जापानी मीडिया मध्ये पब्लिश झाली आहे. या रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे कि सोनी एक्सपीरिया एक्सझेड4 चा एक प्रीमियम मॉडेल पण कंपनी लॉन्च करेल ज्यात 52-मेगापिक्सलचा कॅमेरा सेंसर असेल. सोनी एक्सपीरिया एक्सझेड4 ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपला सपोर्ट करेल. नव्या रिपोर्ट मध्ये रियर कॅमेरा सेटअपचे डिटेल समोर आले आहेत. या रिपोर्टनुसार सोनी चा हा जगातील पहिला स्मार्टफोन असेल ​ज्यात 52-मेगापिक्सलचा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात येईल.

एक्सपीरिया एक्सझेड4 प्रीमियम मॉडेल बद्दल बोलायचे तर रिपोर्टनुसार या फोनच्या बॅक पॅनल वर एफ/2.6 अपर्चर वाली 16-मेगापिक्सलची टेलीफोटो लेंस असेल. फोनचा दुसरा रियर सेंसर 52-मेगापिक्सलचा आले जो एफ/1.6 अपर्चरला सपोर्ट करेल तर तिसरा एफ/1.4 अपर्चर वाला 0.3-मेगापिक्सलचा टीओएफ सेंसर असेल जो ऑटो फोकसचा वेग वाढवेल. अलीकडेच शाओमीचा रेडमी नोट 7 आणि ऑनरचा व्यू 20 स्मार्टफोन बाजारात आले आहेत जे 48-मेगापिक्सलच्या कॅमेऱ्याला सपोर्ट करतात. पण सोनीचा आगामी फोन याना मागे टाकत नवा रिकॉर्ड बनवेल.

सोनी एक्सपीरिया एक्सझेड4 चे इतर स्पेसिफिकेशन्स पाहता आतापर्यंत आलेल्या लीक्सनुसार हा फोन 21:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला जाईल जो 3,360 x 1,440 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.4-इंचाच्या क्वॉड एचडी+ ओएलईडी डिस्प्लेला सपोर्ट करेल. तसेच प्रोटेक्शन साठी या फोनला गोरिल्ला ग्लास 5 ने कोट केले जाईल. एक्सपीरिया एक्सझेड4 एंडरॉयड 9.0 पाई आधारित फोन असेल जो क्वालकॉमच्या सर्वात पावरफुल चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 855 वर लॉन्च केला जाऊ शकतो.

कंपनी एक्सपीरिया एक्सझेड4 6जीबी रॅम सह 128जीबी च्या इंटरनल स्टोरेज वर सादर करू शकते. तसेच एक्सपीरिया एक्सझेड4 प्रीमियम मॉडेल मध्ये 8जीबी किंवा यापेक्षा जास्त रॅम मिळू शकतो. कपंनी हा फोन आईपी68 रेटिंग सह लॉन्च करू शकते. तसेच पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 4,400एमएएच ची बॅटरी दिली जाऊ शकते.

The post येत आहे जगातील पहिला स्मार्टफोन ज्यात असेल 52-एमपी चा रियर कॅमेरा, 25 फेब्रुवारीला होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/sony-xperia-xz4-premium-to-support-52mp-triple-rear-camera-specifications-in-marathi/feed/ 0
3 रियर कॅमेरा असलेल्या एक्सपीरिया एक्सझेड4 चा वीडियो आला समोर, हा असेल सोनीचा सर्वात ताकदवान फोन https://www.91mobiles.com/marathi/sony-xperia-xz4-360-render-video-leaked-with-design-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/sony-xperia-xz4-360-render-video-leaked-with-design-in-marathi/#respond Wed, 28 Nov 2018 18:21:13 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3016 सोनी एक्सपीरिया एक्सझेड4 चा हा रेंडर वीडिया एमएसपी ने आॅनलीक्स सोबत मिळून शेयर केला आहे.

The post 3 रियर कॅमेरा असलेल्या एक्सपीरिया एक्सझेड4 चा वीडियो आला समोर, हा असेल सोनीचा सर्वात ताकदवान फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
टेक कंपनी सोनी ने ऑगस्ट मध्ये एक्सपीरिया सीरीज वाढवत आपला हाईएंड फ्लॅगशिप फोन एक्सपीरिया एक्सझेड3 लॉन्च केला होता. हा स्मार्टफोन एंडरॉयड च्या लेटेस्ट नवीन ओएस वर्जन एंडरॉयड पाई वर लॉन्च झाला होता जो क्वालकॉमच्या सर्वात ताकदवान चिपसेट स्नॅपड्रॅगन 845 वर चालतो. आता अशी बातमी येत आहे की सोनी लवकरच आपल्या या स्मार्टफोन सीरीज मध्ये अजून एक नवीन डिवाईस आणेल. एका ताजा लीक मध्ये सोनी एक्सपीरिया एक्सझेड4 चा रेंडर वीडियो समोर आला आहे ज्या वरून या फोनची माहिती मिळाली आहे.

सोनी एक्सपीरिया एक्सझेड4 चा हा रेंडर वीडिया एमएसपी ने आॅनलीक्स सोबत मिळून शेयर केला आहे. हा वीडियो 24 सेकेंड चा आहे आणि यात एक्सपीरिया एक्सझेड4 360 डिग्री एंगल ने दाखवण्यात आला आहे. या वीडियो समोर आल्यामुळे एक्सपीरिया एक्सझेड4 च्या लुक, डिस्प्ले व डिजाईन ची माहिती मिळाली आहे. सर्वात आधी फ्रंट पॅनल बद्दल बोलायचे तर एक्सपीरिया एक्सझेड4 मध्ये कोणत्याही प्रकारची नॉच दिसत नाही तसेच हा फोन 18:9 आस्पेक्ट रेशियो सह सादर केला जाऊ शकतो.

एक्सपीरिया एक्सझेड4 चे डायमेंशन या वीडियो मध्ये 166.9 x 72.4 x 8.2एमएम असल्याचे सांगण्यात आले आहे ज्याची जाडी 9एमएम आहे. तसेच लीकनुसार एक्सपीरिया एक्सझेड4 मध्ये 6.5 इंचाचा डिस्प्ले दिला जाईल. फोनचा सिंगल सेल्फी कॅमेरा पण या वीडियो मध्ये दिसला आहे. एक्सपीरिया एक्सझेड4 च्या बॅक पॅनल वर तीन रियर कॅमेरा सेंसर दाखवण्यात आले आहेत जे बॅक पॅनलच्या मधेच वर्टिकल शेप मध्ये आहेत. कॅमेरा सेटअप च्या वर एलईडी फ्लॅश देण्यात आला आहे. फोनच्या उजव्या पॅनल वर वॉल्यूम तसेच पावर बटण आहे.

सोनी एक्सपीरिया एक्सझेड4 च्या उजव्याच पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. तसेच उजव्याच पॅनल वर खालच्या बाजूला कॅमेरा शटर बटण देण्यात आला आहे. फोनच्या खालच्या पॅनल वर स्पीकर ग्रिल आणि यूएसबी टाइप सी पोर्ट ​देण्यात आला आहे तसेच वरच्या पॅनल वर सिम ट्रे आहे. या वीडियो ने एक्सपीरिया एक्सझेड4 च्या डिजाईनची पहिली झलक दिली असली तरी फोन लॉन्चची तसेच याच्या स्पेसिफिकेशन्स साठी सोनीच्या घोषणेची वाट बघितली जात आहे.

The post 3 रियर कॅमेरा असलेल्या एक्सपीरिया एक्सझेड4 चा वीडियो आला समोर, हा असेल सोनीचा सर्वात ताकदवान फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/sony-xperia-xz4-360-render-video-leaked-with-design-in-marathi/feed/ 0