येत आहे जगातील पहिला स्मार्टफोन ज्यात असेल 52-एमपी चा रियर कॅमेरा, 25 फेब्रुवारीला होईल लॉन्च

टेक कंपनी सोनी येत्या 25 फेब्रुवारीला एफडब्ल्यूसी 2019 मध्ये ईवेंटचे आयोजन करणार आहे. बातमी अशी आहे कि या दिवशी कंपनी आपल्या एक्सपीरिया सीरीजचे नवीन स्मार्टफोन्स सादर करेल ज्यात एक्सपीरिया एक्सझेड4 पण असेल. कालच एक्सपीरिया एक्सझेड4 संबंधित एक लीक आला होता ज्यात फोनच्या स्टोरेज आणि बॅटरी संबंधी माहिती समोर आली होती. आज ​सोनी संबंधित एक मोठी बातमी आली आहे ज्यात फोनच्या कॅमेरा सेग्मेंटचे डिटेल देण्यात आले आहेत. या रिपोर्ट नुसार एक्सपीरिया एक्सझेड4 चा एक मॉडेल 52-मेगापिक्सल कॅमेरा सेंसर सह येईल.

सोनी एक्सपीरिया एक्सझेड4 संबंधित हि माहिती जापानी मीडिया मध्ये पब्लिश झाली आहे. या रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे कि सोनी एक्सपीरिया एक्सझेड4 चा एक प्रीमियम मॉडेल पण कंपनी लॉन्च करेल ज्यात 52-मेगापिक्सलचा कॅमेरा सेंसर असेल. सोनी एक्सपीरिया एक्सझेड4 ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपला सपोर्ट करेल. नव्या रिपोर्ट मध्ये रियर कॅमेरा सेटअपचे डिटेल समोर आले आहेत. या रिपोर्टनुसार सोनी चा हा जगातील पहिला स्मार्टफोन असेल ​ज्यात 52-मेगापिक्सलचा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात येईल.

एक्सपीरिया एक्सझेड4 प्रीमियम मॉडेल बद्दल बोलायचे तर रिपोर्टनुसार या फोनच्या बॅक पॅनल वर एफ/2.6 अपर्चर वाली 16-मेगापिक्सलची टेलीफोटो लेंस असेल. फोनचा दुसरा रियर सेंसर 52-मेगापिक्सलचा आले जो एफ/1.6 अपर्चरला सपोर्ट करेल तर तिसरा एफ/1.4 अपर्चर वाला 0.3-मेगापिक्सलचा टीओएफ सेंसर असेल जो ऑटो फोकसचा वेग वाढवेल. अलीकडेच शाओमीचा रेडमी नोट 7 आणि ऑनरचा व्यू 20 स्मार्टफोन बाजारात आले आहेत जे 48-मेगापिक्सलच्या कॅमेऱ्याला सपोर्ट करतात. पण सोनीचा आगामी फोन याना मागे टाकत नवा रिकॉर्ड बनवेल.

सोनी एक्सपीरिया एक्सझेड4 चे इतर स्पेसिफिकेशन्स पाहता आतापर्यंत आलेल्या लीक्सनुसार हा फोन 21:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला जाईल जो 3,360 x 1,440 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.4-इंचाच्या क्वॉड एचडी+ ओएलईडी डिस्प्लेला सपोर्ट करेल. तसेच प्रोटेक्शन साठी या फोनला गोरिल्ला ग्लास 5 ने कोट केले जाईल. एक्सपीरिया एक्सझेड4 एंडरॉयड 9.0 पाई आधारित फोन असेल जो क्वालकॉमच्या सर्वात पावरफुल चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 855 वर लॉन्च केला जाऊ शकतो.

कंपनी एक्सपीरिया एक्सझेड4 6जीबी रॅम सह 128जीबी च्या इंटरनल स्टोरेज वर सादर करू शकते. तसेच एक्सपीरिया एक्सझेड4 प्रीमियम मॉडेल मध्ये 8जीबी किंवा यापेक्षा जास्त रॅम मिळू शकतो. कपंनी हा फोन आईपी68 रेटिंग सह लॉन्च करू शकते. तसेच पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 4,400एमएएच ची बॅटरी दिली जाऊ शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here