टेक कंपनी सोनी ने ऑगस्ट मध्ये एक्सपीरिया सीरीज वाढवत आपला हाईएंड फ्लॅगशिप फोन एक्सपीरिया एक्सझेड3 लॉन्च केला होता. हा स्मार्टफोन एंडरॉयड च्या लेटेस्ट नवीन ओएस वर्जन एंडरॉयड पाई वर लॉन्च झाला होता जो क्वालकॉमच्या सर्वात ताकदवान चिपसेट स्नॅपड्रॅगन 845 वर चालतो. आता अशी बातमी येत आहे की सोनी लवकरच आपल्या या स्मार्टफोन सीरीज मध्ये अजून एक नवीन डिवाईस आणेल. एका ताजा लीक मध्ये सोनी एक्सपीरिया एक्सझेड4 चा रेंडर वीडियो समोर आला आहे ज्या वरून या फोनची माहिती मिळाली आहे.
सोनी एक्सपीरिया एक्सझेड4 चा हा रेंडर वीडिया एमएसपी ने आॅनलीक्स सोबत मिळून शेयर केला आहे. हा वीडियो 24 सेकेंड चा आहे आणि यात एक्सपीरिया एक्सझेड4 360 डिग्री एंगल ने दाखवण्यात आला आहे. या वीडियो समोर आल्यामुळे एक्सपीरिया एक्सझेड4 च्या लुक, डिस्प्ले व डिजाईन ची माहिती मिळाली आहे. सर्वात आधी फ्रंट पॅनल बद्दल बोलायचे तर एक्सपीरिया एक्सझेड4 मध्ये कोणत्याही प्रकारची नॉच दिसत नाही तसेच हा फोन 18:9 आस्पेक्ट रेशियो सह सादर केला जाऊ शकतो.
एक्सपीरिया एक्सझेड4 चे डायमेंशन या वीडियो मध्ये 166.9 x 72.4 x 8.2एमएम असल्याचे सांगण्यात आले आहे ज्याची जाडी 9एमएम आहे. तसेच लीकनुसार एक्सपीरिया एक्सझेड4 मध्ये 6.5 इंचाचा डिस्प्ले दिला जाईल. फोनचा सिंगल सेल्फी कॅमेरा पण या वीडियो मध्ये दिसला आहे. एक्सपीरिया एक्सझेड4 च्या बॅक पॅनल वर तीन रियर कॅमेरा सेंसर दाखवण्यात आले आहेत जे बॅक पॅनलच्या मधेच वर्टिकल शेप मध्ये आहेत. कॅमेरा सेटअप च्या वर एलईडी फ्लॅश देण्यात आला आहे. फोनच्या उजव्या पॅनल वर वॉल्यूम तसेच पावर बटण आहे.
सोनी एक्सपीरिया एक्सझेड4 च्या उजव्याच पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. तसेच उजव्याच पॅनल वर खालच्या बाजूला कॅमेरा शटर बटण देण्यात आला आहे. फोनच्या खालच्या पॅनल वर स्पीकर ग्रिल आणि यूएसबी टाइप सी पोर्ट देण्यात आला आहे तसेच वरच्या पॅनल वर सिम ट्रे आहे. या वीडियो ने एक्सपीरिया एक्सझेड4 च्या डिजाईनची पहिली झलक दिली असली तरी फोन लॉन्चची तसेच याच्या स्पेसिफिकेशन्स साठी सोनीच्या घोषणेची वाट बघितली जात आहे.














