Tecno Camon 19 Pro 5G - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 13 Sep 2022 05:25:28 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 रेडमी-रियलमी राहणार मागे! 13GB RAM, 64MP कॅमेऱ्यासह येतोय हा बाहुबली Phone https://www.91mobiles.com/marathi/13gb-ram-64mp-camera-phone-tecno-camon-19-pro-mondrian-edition-launch-soon-india-amazon-sale-price/ https://www.91mobiles.com/marathi/13gb-ram-64mp-camera-phone-tecno-camon-19-pro-mondrian-edition-launch-soon-india-amazon-sale-price/#respond Wed, 07 Sep 2022 07:28:18 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=12882 Tecno Camon 19 Pro Mondrian Edition Launch: टेक्नो (Tecno) भारतात आपला नवीन स्मार्टफोन लाँच करण्याची तयारी करत आहे. कंपनी Tecno Camon 19 Pro Mondrian Edition याच महिन्यात म्हणजे सप्टेंबरमध्ये सादर करू शकते. परंतु लाँच डेटबद्दल कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. लाँच डेटच्या आधी ई-कॉमर्स साइट Amazon India वर या आगामी फोनची एक मायक्रोसाइट बनवण्यात […]

The post रेडमी-रियलमी राहणार मागे! 13GB RAM, 64MP कॅमेऱ्यासह येतोय हा बाहुबली Phone first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Tecno Camon 19 Pro Mondrian Edition Launch: टेक्नो (Tecno) भारतात आपला नवीन स्मार्टफोन लाँच करण्याची तयारी करत आहे. कंपनी Tecno Camon 19 Pro Mondrian Edition याच महिन्यात म्हणजे सप्टेंबरमध्ये सादर करू शकते. परंतु लाँच डेटबद्दल कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. लाँच डेटच्या आधी ई-कॉमर्स साइट Amazon India वर या आगामी फोनची एक मायक्रोसाइट बनवण्यात आली आहे. या साइटवर coming soon असं लिहिण्यात आलं आहे आणि डिवाइसच्या काही खास फीचर्सची माहिती देखील देण्यात आली आहे.

या दिवशी होईल विक्री

आशा आहे की या स्मार्टफोनचा सेल अ‍ॅमेझॉन इंडियाच्या ग्रेट इंडियन फेस्टिवल सेलमध्ये सुरु होईल. लाइव्ह झालेल्या मायक्रोसाइटवर फोनच्या डिजाइनसह खास फीचर्सची देखील माहिती देण्यात आली आहे. चला जाणून घेऊया Tecno Camon 19 Pro Mondrian Edition च्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती.

रंग बदलणारा बॅक पॅनल

फोनची सर्वात मोठी खासियत याचा बॅक पॅनल आहे. याच्या शानदार डिजाइनिंग मध्ये कंपनीनं polychromatic photoisomer technology चा वापर केला आहे. ही टेक्नॉलॉजी फोनच्या बॅक पॅनलवरील प्रत्येक ब्लॉकचा रंग अनेक वेगवेगळ्या रंगात बदलत राहते. कंपनीनं या टेक्नॉलॉजीला सनलाइट ड्रॉइंग असं नाव दिलं आहे. अशीच काहीशी टेक्नॉलॉजी विवोच्या स्मार्टफोन्समध्ये देखील पाहायला मिळाली आहे, परंतु ते स्मार्टफोन्स महागड्या किंमतीत आले आहेत. हे देखील वाचा: 141 रुपयांमध्ये 365 दिवसांची वॅलिडिटी! यापेक्षा स्वस्तात मिळणार नाही वर्षभराची वैधता

Tecno Camon 19 Pro Mondrian Edition चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

फोनमध्ये कंपनीनं 1080×2460 पिक्सल रिजोल्यूशनसह 6.8 इंचाचा फुल एचडी+ IPS डिस्प्ले दिला जाईल. तसेच, स्मार्टफोनचा डिस्प्ले 20.5:9 अ‍ॅस्पेक्ट रेशियो आणि 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. इतकेच नव्हे तर फोनमध्ये 8जीबी रॅम आणि 128जीबी इनबिल्ट स्टोरेज दिली जाऊ शकते. कंपनी या फोनमध्ये 5जीबी व्हर्च्युअल रॅम फिचर देखील देऊ शकते, त्यामुळे फोनमध्ये 13GB RAM मिळेल. प्रोसेसर म्हणून या फोनमध्ये तुम्हाला मीडियाटेक हीलियो G96 चिपसेट मिळू शकतो. हा फोन अँड्रॉइड 12 आधारित HiOS वर चालेल. हे देखील वाचा: सर्वात स्वस्त स्मार्टफोन! realme Narzo 50i Prime भारतीय लाँचसाठी सज्ज; लाँच डेट आणि किंमतीचा खुलासा

अ‍ॅमेझॉन लिस्टिंगवरून स्पष्ट झालं आहे आहे की फोटोग्राफीसाठी या फोनच्या मागे क्वॉड एलईडी फ्लॅशसह एक 64 मेगापिक्सलचा मेन कॅमेरा मिळेल जो ओआयएसला सपोर्ट करेल आणि एक 50 मेगापिक्सलचाची टेलिफोटो लेन्स आली जाऊ शकते. तसेच फोनमध्ये 2 मेगापिक्सलचा एक डेप्थ लेन्स आणि एक लेजर ऑटोफोकस यूनिट असेल. सेल्फीसाठी यात कंपनी 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देईल. सिक्योरिटीसाठी या टेक्नो फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर दिला जाऊ शकतो. पावर बॅकअपसाठी 5000mAh ची बॅटरी 33 वॉट फास्ट चार्जिंगसह मिळेल.

The post रेडमी-रियलमी राहणार मागे! 13GB RAM, 64MP कॅमेऱ्यासह येतोय हा बाहुबली Phone first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/13gb-ram-64mp-camera-phone-tecno-camon-19-pro-mondrian-edition-launch-soon-india-amazon-sale-price/feed/ 0
64MP चा दमदार कॅमेऱ्यासह TECNO CAMON 19 Pro 5G फोन येतोय भारतात, पाहा कधी होणार लाँच https://www.91mobiles.com/marathi/64-mp-camera-phone-tecno-camon-19-pro-5g-india-launch-date-10-august-price-specs/ https://www.91mobiles.com/marathi/64-mp-camera-phone-tecno-camon-19-pro-5g-india-launch-date-10-august-price-specs/#respond Mon, 08 Aug 2022 12:20:49 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=12074 कमी बजेटमध्ये दमदार स्पेसिफिकेशन्स देणारा ब्रँड अशी टेक्नोची ओळख आहे. कंपनीनं भारतीय बाजारात अलीकडेच Tecno Camon 19 Neo आणि Tecno Camon 19 स्मार्टफोन लाँच केले होते. टेक्नो कॅमोन 19 स्मार्टफोनची किंमत प्राईस 14,999 रुपये तर कॅमोन 19 नियोची किंमत 12,499 रुपये आहे. आपल्या या सीरीज अंतगर्त आता कंपनी दोन दिवसांनी म्हणजे 10 ऑगस्टला TECNO CAMON […]

The post 64MP चा दमदार कॅमेऱ्यासह TECNO CAMON 19 Pro 5G फोन येतोय भारतात, पाहा कधी होणार लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
कमी बजेटमध्ये दमदार स्पेसिफिकेशन्स देणारा ब्रँड अशी टेक्नोची ओळख आहे. कंपनीनं भारतीय बाजारात अलीकडेच Tecno Camon 19 Neo आणि Tecno Camon 19 स्मार्टफोन लाँच केले होते. टेक्नो कॅमोन 19 स्मार्टफोनची किंमत प्राईस 14,999 रुपये तर कॅमोन 19 नियोची किंमत 12,499 रुपये आहे. आपल्या या सीरीज अंतगर्त आता कंपनी दोन दिवसांनी म्हणजे 10 ऑगस्टला TECNO CAMON 19 Pro 5G लाँच करणार आहे.

TECNO CAMON 19 Pro 5G चा भारतीय लाँच

TECNO CAMON 19 Pro 5G फोन येत्या 10 ऑगस्टला भारतीय बाजारात लाँच होईल. टेक्नो इंडियानं आपल्या अधिकृत ट्वीटर हँडलच्या माध्यमातून फोन लाँचची माहिती देत सांगितलं आहे की, कॅमोन सीरीजचा हा नवीन 5जी मोबाइल फोन दोन दिवसांनी भारतीय बाजारात एंट्री करेल. ट्वीटमध्ये फोनचा फोटो देखील शेयर करण्यात आला आहे. टेक्नो कॅमोन 19 प्रो 5जी फोनची किंमत किती असेल यासाठी 10 ऑगस्टची वाट बघावी लागेल.

TECNO CAMON 19 Pro 5G चे स्पेसिफिकेशन्स

टेक्नो इंडियानं अजूनतरी या फोनच्या स्पेसिफिकेशन्सचा खुलासा केलं नाही. परंतु जागतिक बाजारात याची चाहूल लागली आहे त्यामुळे भारतात लाँच होण्याआधी फोनच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती मिळाली आहे. आशा आहे की हा हँडसेट ग्लोबल व्हेरिएंटच्या स्पेसिफिकेशन्ससह भारतात एंट्री करेल. हा टेक्नो मोबाइल ग्लोबल मंचावर 1080 x 2460 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.8 इंचाच्या मोठ्या फुलएचडी डिस्प्लेसह लाँच झाला आहे जो 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर चालतो. हे देखील वाचा: फक्त 18,249 रुपयांमध्ये मिळतोय OnePlus चा दमदार स्मार्टफोन; स्वस्तात 6GB RAM, 5000mAh ची बॅटरी

TECNO CAMON 19 Pro 5G मध्ये अँड्रॉइड 12 ओएस देण्यात आला आहे जो अँड्रॉइड 13 रोलआउट होताच त्यावर अपडेट होईल. तसेच प्रोसेसिंगसाठी हा स्मार्टफोन मीडियाटेक डिमेनसिटी 810 5जी चिपसेटवर चालतो. टेक मंचावर या मोबाइल फोननं 8 जीबी रॅमसह एंट्री घेतली होती जो 256 जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो.

फोटोग्राफीसाठी TECNO CAMON 19 Pro 5G फोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो ज्यात 64 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी टेक्नो कॅमोन 19 प्रो 5जी मध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. पावर बॅकअपसाठी या टेक्नो मोबाइल फोनमध्ये 5,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे जी 33वॉट फ्लॅश चार्ज टेक्नॉलॉजीला सपोर्ट करते. हे देखील वाचा: Samsung चा नवा डाव! कमी किंमतीत 8GB RAM, 5 कॅमेरे असलेला Galaxy A23 5G केला लाँच

TECNO CAMON 19 Pro 5G ची संभाव्य किंमत

Tecno Camon 19 Pro 5G स्मार्टफोन केनियामध्ये एकाच व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आला आहे. तिथे या हँडसेटची किंमत 300 यूएस डॉलर्स इतकी ठेवण्यात आली आहे. ही किंमत भारतीय चलनात रूपांतरित केल्यास 24,000 रुपयांच्या आसपास होते. परंतु अधिकृत भारतीय किंमतीसाठी आपल्याला लाँचची वाट पाहावी लागेल.

The post 64MP चा दमदार कॅमेऱ्यासह TECNO CAMON 19 Pro 5G फोन येतोय भारतात, पाहा कधी होणार लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/64-mp-camera-phone-tecno-camon-19-pro-5g-india-launch-date-10-august-price-specs/feed/ 0