Samsung चा नवा डाव! कमी किंमतीत 8GB RAM, 5 कॅमेरे असलेला Galaxy A23 5G केला लाँच

Samsung Galaxy A23 5G बद्दल गेले कित्येक दिवस लीक्स आणि रिपोर्ट्समधून माहिती समोर येत होती. या फोनचे फोटोज व स्पेसिफिकेशन्स देखील लीक झाले होते. तर आता या वीकेंड दरम्यान Samsung नं गुपचूप आपला हा नवीन 5जी फोन अधिकृतपणे सादर केला आहे. सॅमसंग गॅलेक्सी ए23 5जी ऑफिशियल झाला आहे ज्यात 8GB RAM, 50MP quad Camera आणि 90Hz Display देण्यात आला आहे.

Samsung Galaxy A23 5G चे स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy A23 5G स्मार्टफोन सर्वात नवीन अँड्रॉइड 12 ओएसवर लाँच झाला आहे जो कंपनीच्या वनयुआय 4.1 वर चालतो. या स्मार्टफोनमध्ये ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे परंतु कंपनीनं अजूनही चिपसेटची माहिती दिली नाही. हा मोबाइल फोन क्वॉलकॉमच्या 6एनएम फॅब्रिकेशनवर बनलेल्या स्नॅपड्रॅगन 695 चिपसेटसह बाजारात येईल, अशी चर्चा आहे. हा फोन 8GB पर्यंत रॅम आणि 128GB पर्यांतच्या स्टोरेजला सपोर्ट करतो. ही स्टोरेज मायक्रोएसडी कार्डच्या मदतीनं 1TB पर्यंत वाढवता येते. हे देखील वाचा: 1999 रुपयांमध्ये बुक करा शक्तिशाली आणि हटके Samsung Galaxy Z Flip 4 आणि Fold 4; सोबत अनेक ऑफर्स

सॅमसंग गॅलेक्सी ए23 5जी फोन फुलएचडी+ रिजोल्यूशन असलेल्या 6.6 इंचाच्या मोठ्या स्क्रीनला सपोर्ट करतो जी 90हर्ट्ज रिफ्रेश रेटवर चालते. सॅमसंगनं याला इनफिनिटी ‘वी’ डिस्प्ले असं नाव दिलं आहे. सिक्योरिटीसाठी या सॅमसंग फोनच्या फोन साईड पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. तसेच पावर बॅकअपसाठी कंपनीनं या स्मार्टफोनमध्ये 5,000एमएएचची मोठी बॅटरी दिली आहे.

Samsung Galaxy A23 5G चा कॅमेरा

फोटोग्राफीसाठी सॅमसंग गॅलेक्सी ए23 5जी फोन क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे सोबतीला एफ/2.2 अपर्चर असलेला 5 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स, एफ/2.4 अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स तसेच तेवढाच अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी Samsung Galaxy A23 5G मध्ये एफ/2.2 अपर्चर असलेला 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. हे देखील वाचा: रेडमी-रियलमीची झोप उडणार! 10 हजारांच्या आत देखील 5G; स्वस्त Samsung Galaxy A04s मध्ये 5G नेटवर्क

व्हेरिएंट आणि उपलब्धता

सॅमसंग गॅलेक्सी ए23 5जी कंपनीनं तीन व्हेरिएंट्समध्ये सादर केला आहे. फोनच्या बेस व्हेरिएंटमध्ये 4 जीबी रॅमसह 64 जीबी स्टोरेज देण्यात आली आहे. तर दुसरा व्हेरिएंट 6 जीबी रॅमला सपोर्ट करतो तसेच सर्वात मोठ्या व्हेरिएंटमध्ये 8 जीबी रॅमसह 128 जीबी स्टोरेज देण्यात आली आहे. कंपनीनं अजूनतरी फोनच्या किंमतीवरून पडदा हटवला नाही. कंपनीची ए सीरिज किफायतशीर स्मार्टफोन्ससाठी ओळखली जाते, त्यामुळे हा फोन देखील परवडणाऱ्या किंमतीत उपलब्ध होण्याची शक्यता आहे. या हँडसेटच्या किंमतीची आणि उपलब्धतेची माहिती मिळताच वाचकांना कळवण्यात येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here