141 रुपयांमध्ये 365 दिवसांची वॅलिडिटी! यापेक्षा स्वस्तात मिळणार नाही वर्षभराची वैधता

4G आणि 5G सर्व्हिसच्या नावावर मोबाइल सर्व्हिस देणाऱ्या कंपन्या सतत दरवाढ करत आहेत. परंतु अशी एक कंपनी आहे जी खूप कमी किंमतीत दीर्घ वैधता असलेले प्लॅन्स सादर करत आहे. मी MTNL च्या 141 रुपयांच्या प्लॅनबाबत बोलत आहे ज्यात तुम्हाला संपूर्ण एक वर्षाची वैधता मिळते. एकीकडे Jio, Airtel आणि VI सारख्या कंपन्या एवढ्या किंमतीत महिनाभर वैधता असलेले प्लॅन्स देखील देत नाहीत. परंतु MTNL च्या या प्लॅनमध्ये तुम्हाला 1 वर्षाची वॅलिडिटी मिळते. टॅरिफ प्लॅनच्या बाबतीत BSNL स्वस्त असल्याचा समज आहे. परंतु BSNL कडे देखील असा प्लॅन नाही. हा प्लॅन कसा मिळवायचा याची सविस्तर माहिती मी पुढे दिली आहे.

सर्वात स्वस्त 365 दिवसांचा प्लॅन

साधारण 28 दिवसांची वॅलिडिटी असलेला प्लॅन मिळवण्यासाठी मोबाइल युजर्सना जवळपास 200 रुपयांचा रिचार्ज करावा लागतो. तसेच वर्षभराच्या वॅलिडिटीसाठी हजारो रुपये खर्च करावे लागतात. परंतु 141 रुपयांमध्ये 365 दिवसांची वॅलिडिटी देऊन MTNL नं कमाल केली आहे. जे काम Jio, Airtel, Vi आणि BSNL देखील जमलं नाही ते सरकारी कंपनी महानगर टेलीफोन निगम लिमिटेडनं करून दाखवलं आहे. एमटीएनएलचा हा एक वर्ष म्हणजे 365 दिवसांच्या वॅलिडिटीसह येतो.

MTNL चा 141 रुपयांचा प्लॅन पाहता, कंपनीनं 365 दिवसांची वॅलिडिटी असलेला हा प्रीपेड युजर्ससाठी सादर करण्यात आला आहे. प्लॅनची सर्वात मोठी खासियत म्हणजे यात 365 दिवस मोबाइल सर्व्हिस मिळते आणि तुमचा नंबर सक्रिय राहतो. अन्य बेनिफिट्स पाहता प्लॅनमध्ये 90 दिवसांसाठी 90 जीबी डेटा मिळतो ज्याचा वापर रोज 1 जीबी असा करता येईल. या 90 दिवसांमध्ये एमटीएनएल नेटवर्कवर कॉलिंग पूर्णपणे फ्री असेल तर अन्य नेटवर्कवर कॉल करण्यासाठी 200 मिनिट्स मिळतील.

असा घ्या फायदा

MTNL बाबत खटकणारी बाब म्हणजे कंपनीची सर्व्हिस फक्त मुंबई आणि दिल्लीमध्ये उपलब्ध आहे, त्यामुळे देशातील अन्य भागांमध्ये हे सिम विकत घेता येणार नाही. परंतु एक महत्वाची बाब म्हणजे तुमची संपूर्ण देशात मोफत रोमिंग वापरू शकता. त्यामुळे जर तुम्ही मुंबई किंवा दिल्लीमधून MTNL चं सिम विकत घेतलं तर या प्लानचा वापर तुम्ही देशात कुठूनही घेऊ शकता. MTNL च्या सर्व्हिसमध्ये BSNL कडून रोमिंग मिळतं.

प्लॅनचे फायदे

हा प्लॅन त्या लोकांसाठी चांगला आहे ज्यांना कमी पैशात नंबर सक्रिय ठेवायचा आहे. असे अनेक युजर्स आहेत ज्यांना इंटरनेट वापरायचं नसतं किंवा कॉलिंगची गरज नसते. असे ग्राहक फक्त 141 रुपयांमध्ये वर्षभराची वॅलिडिटी मिळवू शकतात. जास्त पैसे न देता दीर्घ वॅलिडिटी देखील मिळेल तसेच इनकमिंग देखील मोफत मिळेल. या प्लॅनमध्ये 90 दिवसांनंतर आउटगोइंग कॉलसाठी 0.02 पैसे प्रति सेकंड शुल्क आकारले जाईल. जर तुम्ही एमटीएनएल सर्कलमध्ये राहत असाल तर या धमाकेदार ऑफरचा लाभ घेऊ शकता. हे देखील वाचा: Jio नं पुन्हा आणली धमाकेदार ऑफर, 75GB डेटासह 6 शानदार बेनिफिट्स अगदी मोफत

365 दिवसांची वॅलिडिटी असलेले सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन्स

एमटीएनएलचा हा प्लॅन फक्त या कंपनीचा देशाचा सर्वात स्वस्त 365 दिवस वॅलिडिटी असलेला प्लॅन आहे. Jio, Airtel, Vi आणि BSNL कोणतीही कंपनी या प्राइसमध्ये इतकी वॅलिडिटी असलेला प्लॅन देत नाही. परंतु पुढे मी या कंपन्यांच्या सर्वात स्वस्त 365 दिवस वॅलिडिटी असलेल्या प्लॅन्सची माहिती दिली आहे.

BSNL चा 365 दिवस वॅलिडिटी असलेला रिचार्ज प्लॅन

भारत संचार निगम लिमिटेड म्हणजे बीएसएनएलचा सर्वात स्वस्त 365 दिवस वॅलिडिटी असलेला प्लॅन 797 रुपयांमध्ये येतो. बीएसएनएलच्या या प्लॅनमध्ये रोज 2 जीबी इंटरनेट डेटा मिळत आहे जो पहिल्या 60 दिवसांपर्यंत मिळेल. हा प्लॅन अनलिमिटेड व्हॉइस कॉल आणि 100एसएमएस देखील देतो. रोजचा 2 जीबी डेटा संपल्यावर देखील बीएसएनएल युजर या प्लॅनमध्ये 80केबीपीएस स्पीडवर इंटरनेट वापरू शकतील.

Vi चा सर्वात स्वस्त 365 दिवसांचा प्लॅन

एक वर्षाची वैधता असलेल्या प्लॅन्सच्या बाबतीत वोडाफोन आयडिया म्हणजे विआय देखील एक हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत 365 दिवसांची वॅलिडिटी दिली आहे. विआयचा हा मोबाइल रिचार्ज प्लॅन 999 रुपयांमध्ये मिळतो. Vi च्या 999 रुपयांचा प्लॅनमध्ये 365 दिवसांची वॅलिडिटी मिळते. या प्रीपेड प्लॅनमध्ये वर्षभराच्या वैधतेसह एकूण 50 जीबी इंटरनेट डेटा मिळतो. हा 50 जीबी डेटा कोणत्याही डेली लिमिटविना वापरता येतो.

Airtel चा सर्वात स्वस्त 365 दिवस वॅलिडिटी असलेला प्लॅन

एयरटेल कंपनीनं फक्त 1,799 रुपयांमध्ये 365 दिवसांची वॅलिडिटी असलेला प्लॅन आणला आहे. वर्षभराची वैधता असलेल्या या प्लॅनमध्ये 1799 रुपयांचा रिचार्ज केल्यावर 365 दिवसांच्या वॅलिडिटीसह 24 जीबी इंटरनेट डेटा मिळतो. या प्लॅनमध्ये सर्व नॅशनल व्हॉइस कॉल पूर्णपणे फ्री आहेत. तसेच 360 दिवसांपर्यंत रोज 100 एसएमएस मोफत मिळतात. विशेष म्हणजे या या प्लॅनमध्ये अ‍ॅमेझॉन प्राइम मेंबरशिप, विंक म्यूजिक आणि फ्री कॉलरट्यून सोबतच 100 रुपयांचा फास्ट टॅग कॅशबॅक देखील मिळतो. हे देखील वाचा: जुन्या आयफोन्सपेक्षा स्वस्तात लाँच होणार का iPhone 14; जाणून घ्या किंमत, फीचर्स आणि मॉडेल्सची सविस्तर माहिती

Jio चा सर्वात स्वस्त 365 दिवसांचा प्लॅन

रिलायन्स जियो 2,999 रुपयांमध्ये 365 दिवसांची वॅलिडिटी देते. या प्लॅनमध्ये रोज 2.5जीबी 4जी डेटा दिला जात आहे. म्हणजे जियो युजर्सना एकूण 912.5 जीबी डेटा मिळेल. तसेच रोज 100 एसएमएस देखील मिळतात. वर्षभर अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग बेनिफिट देखील मिळत आहेत. जियो युजर्स या प्लॅनमध्ये Disney+ Hotstar सोबतच JioTV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud सारख्या जियो अ‍ॅप्सचा मोफत अ‍ॅक्सेस देखील मिळवू शकतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here