Tecno Spark 10 Pro - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 23 Mar 2023 10:10:37 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 32MP सेल्फी कॅमेरा असलेला फोन फक्त 12,499 रुपयांमध्ये! Tecno Spark 10 Pro ची भारतात एंट्री https://www.91mobiles.com/marathi/50mp-camera-phone-tecno-spark-10-pro-launched-in-india-price-sale-offer-feature-specifications-details-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/50mp-camera-phone-tecno-spark-10-pro-launched-in-india-price-sale-offer-feature-specifications-details-in-marathi/#respond Thu, 23 Mar 2023 10:10:18 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=19693 टेक ब्रँड टेक्नोनं आज भारतीय बाजारात आपल्या ‘स्पार्क 10’ सीरीजची सुरुवात करत नवीन मोबाइल फोन TECNO SPARK 10 Pro लाँच केला आहे. हा स्मार्टफोन 32MP Selfie आणि 50MP Rear Camera ला सपोर्ट करतो. मेमरी फ्यूजन टेक्नॉलॉजीसह हा मोबाइल 16जीबी रॅमवर परफॉर्म करू शकतो. टेक्नो स्पार्क 10 प्रोची किंमत 12,499 रुपये आहे आणि याच्या फीचर्स व […]

The post 32MP सेल्फी कॅमेरा असलेला फोन फक्त 12,499 रुपयांमध्ये! Tecno Spark 10 Pro ची भारतात एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • TECNO SPARK 10 Pro 12,499 रुपयांमध्ये लाँच झाला आहे.
  • Memory Fusion Technology सह याला 16GB RAM ची पावर मिळते.
  • टेक्नो स्पार्क 10 प्रो 32MP Selfie आणि 50MP Rear Camera ला सपोर्ट करतो.

टेक ब्रँड टेक्नोनं आज भारतीय बाजारात आपल्या ‘स्पार्क 10’ सीरीजची सुरुवात करत नवीन मोबाइल फोन TECNO SPARK 10 Pro लाँच केला आहे. हा स्मार्टफोन 32MP Selfie आणि 50MP Rear Camera ला सपोर्ट करतो. मेमरी फ्यूजन टेक्नॉलॉजीसह हा मोबाइल 16जीबी रॅमवर परफॉर्म करू शकतो. टेक्नो स्पार्क 10 प्रोची किंमत 12,499 रुपये आहे आणि याच्या फीचर्स व स्पेसिफिकेशन्सची माहिती तुम्ही पुढे वाचू शकता.

टेक्नो स्पार्क 10 प्रो प्राइस

TECNO SPARK 10 Pro भारतात सध्या सिंगल मेमरी व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. या फोनमध्ये 8जीबी रॅम + 128जीबी स्टोरेज देण्यात आली आहे. स्पार्क 10 प्रो 12,499 रुपयांमध्ये भारतात लाँच झाला आहे. हा फोन उद्यापासून Starry Black, Pearl White आणि Lunar Eclipse कलरमध्ये सेलसाठी उपलब्ध होईल जो नजीकच्या रिटेल स्टोर व मोबाइल शॉपवरून विकत घेता येईल. हे देखील वाचा: 11 5G बँड असलेल्या Samsung Galaxy A54 आणि A34 ची विक्री सुरु; जाणून घ्या किंमत, ऑफर्स आणि फीचर्स

टेक्नो स्पार्क 10 प्रोचे स्पेसिफिकेशन्स

  • 6.78” FHD+ 90Hz Display
  • Memory Fusion Technology
  • 8GB RAM + 128GB Storage
  • Mediatek helio G88
  • 50MP Rear Camera
  • 32MP Selfie Sensor
  • 18W 5,000mAh Battery

TECNO SPARK 10 Pro स्मार्टफोन 1080 x 2460 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.78 इंचाच्या मोठ्या फुलएचडी+ डिस्प्लेसह लाँच झाला आहे. कंपनीनं याला डॉट-इन डिस्प्ले असं नाव दिलं आहे ज्यात स्क्रीनच्या वरच्या बाजूला सेल्फी कॅमेरा असलेला होल आहे. हा टेक्नो फोन 90हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो तसेच यात 270हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेट, 580निट्स ब्राइटनेस व ग्लास बॅक डिजाईन देखील मिळते.

टेक्नो स्पार्क 10 प्रो स्मार्टफोन अँड्रॉइड 13 आधारित हायओएस 12.6 वर सादर झाला आहे. यात मीडियाटेक हीलियो जी88 ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे जो 2.0गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीडवर चालतो. हा फोन गेम टर्बो ड्युअल इंजिन टेक्नॉलॉजीसह येतो. SPARK 10 Pro मेमरी फ्यूजन टेक्नॉलॉजीसह आला आहे जो इंटरनल 8जीबी रॅमला एक्स्ट्रा 8जीबी रॅमची पावर देऊन 16जीबी रॅमवर परफॉर्म करतो. हे देखील वाचा: Jio युजर्ससाठी वाईट बातमी! कंपनीनं 100 रुपयांनी वाढवली सर्वात स्वस्त पोस्टपेड प्लॅनची किंमत

फोटोग्राफीसाठी TECNO SPARK 10 Pro स्मार्टफोन 32 मेगापिक्सलच्या सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करतो जो ड्युअल फ्लॅशसह येतो तसेच एफ/2.45 अपर्चरवर चालतो. तसेच फोनच्या बॅक पॅनलवर ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे ज्यात एफ/1.6 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आणि सेकंडरी एआय लेन्स आहे. पावर बॅकअपसाठी हा टेक्नो फोन 18वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेल्या 5,000एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो.

The post 32MP सेल्फी कॅमेरा असलेला फोन फक्त 12,499 रुपयांमध्ये! Tecno Spark 10 Pro ची भारतात एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/50mp-camera-phone-tecno-spark-10-pro-launched-in-india-price-sale-offer-feature-specifications-details-in-marathi/feed/ 0
अत्यतं कमी किंमतीत 32MP सेल्फी कॅमेरा; Tecno Spark 10 Pro जबरदस्त फीचर्ससह लाँच https://www.91mobiles.com/marathi/tecno-spark-10-pro-with-32mp-selfie-camera-launched-in-india-check-price-and-specs/ https://www.91mobiles.com/marathi/tecno-spark-10-pro-with-32mp-selfie-camera-launched-in-india-check-price-and-specs/#respond Mon, 06 Mar 2023 05:39:45 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=18399 टेक्नो आपल्या एंट्री लेव्हल आणि मिड रेंज स्मार्टफोन्ससाठी ओळखली जाते. आता असाच एक एंट्री लेव्हल स्मार्टफोन Tecno Spark 10 Pro नावानं जागतिक बाजारात लाँच झालं आहे. विशेष म्हणजे या फोनची झलक मोबाइल वर्ल्ड काँग्रेस 2023 मध्ये दिसली होती. आता हा फोन कंपनीच्या वेबसाइटवर लिस्ट करण्यात आला आहे. त्यामुळे या स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती मिळाली आहे. टेक्नोचा […]

The post अत्यतं कमी किंमतीत 32MP सेल्फी कॅमेरा; Tecno Spark 10 Pro जबरदस्त फीचर्ससह लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Tecno Spark 10 Pro एक एंट्री लेव्हल स्मार्टफोन आहे.
  • हा फोन कंपनीच्या वेबसाइटवर लिस्ट करण्यात आला आहे.
  • यात 32MP चा सेल्फी कॅमेरा मिळतो.

टेक्नो आपल्या एंट्री लेव्हल आणि मिड रेंज स्मार्टफोन्ससाठी ओळखली जाते. आता असाच एक एंट्री लेव्हल स्मार्टफोन Tecno Spark 10 Pro नावानं जागतिक बाजारात लाँच झालं आहे. विशेष म्हणजे या फोनची झलक मोबाइल वर्ल्ड काँग्रेस 2023 मध्ये दिसली होती. आता हा फोन कंपनीच्या वेबसाइटवर लिस्ट करण्यात आला आहे. त्यामुळे या स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती मिळाली आहे. टेक्नोचा हा स्मार्टफोन बजेट सेगमेंटमध्ये देखील 32MP सेल्फी कॅमेरा देतो.

Tecno Spark 10 Pro चे स्पेसिफिकेशन्स

Spark 10 Pro मध्ये 6.8 इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा IPS LCD पॅनल 2460 x 1080 पिक्सल रिजोल्यूशन आणि यह 20.5:9 आसपेक्ट रेश्योला सपोर्ट करतो. तसेच, यात 90Hz रिफ्रेश रेट आणि DCI-P3 कलर गॅमट देखील मिळतो. हा स्मार्टफोन Android 13 वर आधारित HiOS 12.6 वर चालतो. हे देखील वाचा: ‘No Network’ मध्ये देखील फोनवरून करता येतो कॉल; जाणून घ्या ही शानदार ट्रिक

Tecno Spark 10 Pro मध्ये MediaTek Helio G88 चिपसेटची ताकद देण्यात आली आहे. जोडीला 8GB RAM आणि 256GB पर्यंतची स्टोरेज देण्यात आली आहे. यातील RAM 8GB पर्यंत व्हर्च्युअली वाढवता येतो. तसेच स्टोरेज वाढवण्यासाठी मायक्रोएसडी कार्ड स्लॉट देण्यात आला आहे.

या स्मार्टफोनच्या मागे ड्युअल कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात 50MP चा प्रायमरी कॅमेरा आणि एक AI लेन्स देण्यात आली आहे जी क्वॉड LED फ्लॅशसह येते. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 32MP चा फ्रंट कॅमेरा मिळतो.

पावर बॅकअपसाठी Tecno Spark 10 Pro मध्ये 5000mAh ची बॅटरी मिळते आणि जी 18W USB Type C फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. तर सिक्योरिटीसाठी या फोनमध्ये पावर बटनसह फिजिकल फिंगरप्रिंट सेन्सर इंटिग्रेट करण्यात आला आहे. हा फोन ड्युअल VoLTE, Wi-Fi, Bluetooth, NFC, 3.5mm ऑडियो जॅक सारख्या फीचर्ससह येतो. हे देखील वाचा: कोणत्या POCO फोनला कधी मिळेल MIUI 14 अपडेट; इथे पाहा मोबाइल्सची नावे आणि रोलआउट शेड्यूल

Tecno Spark 10 Pro ची किंमत

Tecno Spark 10 Pro स्मार्टफोन 8GB RAM + 128GB आणि 8GB RAM + 256GB अशा दोन स्टोरेज मॉडेलमध्ये आला आहे. मीडिया रिपोर्टनुसार फोनची प्रारंभिक किंमत 10,000 रुपयांपेक्षा कमी असू शकते आणि हा 8 मार्चला भारतात सेलसाठी उपलब्ध होईल. ब्रँडनं स्मार्टफोनच्या किंमतीचा खुलासा मात्र केला नाही.

The post अत्यतं कमी किंमतीत 32MP सेल्फी कॅमेरा; Tecno Spark 10 Pro जबरदस्त फीचर्ससह लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/tecno-spark-10-pro-with-32mp-selfie-camera-launched-in-india-check-price-and-specs/feed/ 0