32MP सेल्फी कॅमेरा असलेला फोन फक्त 12,499 रुपयांमध्ये! Tecno Spark 10 Pro ची भारतात एंट्री

Highlights

  • TECNO SPARK 10 Pro 12,499 रुपयांमध्ये लाँच झाला आहे.
  • Memory Fusion Technology सह याला 16GB RAM ची पावर मिळते.
  • टेक्नो स्पार्क 10 प्रो 32MP Selfie आणि 50MP Rear Camera ला सपोर्ट करतो.

टेक ब्रँड टेक्नोनं आज भारतीय बाजारात आपल्या ‘स्पार्क 10’ सीरीजची सुरुवात करत नवीन मोबाइल फोन TECNO SPARK 10 Pro लाँच केला आहे. हा स्मार्टफोन 32MP Selfie आणि 50MP Rear Camera ला सपोर्ट करतो. मेमरी फ्यूजन टेक्नॉलॉजीसह हा मोबाइल 16जीबी रॅमवर परफॉर्म करू शकतो. टेक्नो स्पार्क 10 प्रोची किंमत 12,499 रुपये आहे आणि याच्या फीचर्स व स्पेसिफिकेशन्सची माहिती तुम्ही पुढे वाचू शकता.

टेक्नो स्पार्क 10 प्रो प्राइस

TECNO SPARK 10 Pro भारतात सध्या सिंगल मेमरी व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. या फोनमध्ये 8जीबी रॅम + 128जीबी स्टोरेज देण्यात आली आहे. स्पार्क 10 प्रो 12,499 रुपयांमध्ये भारतात लाँच झाला आहे. हा फोन उद्यापासून Starry Black, Pearl White आणि Lunar Eclipse कलरमध्ये सेलसाठी उपलब्ध होईल जो नजीकच्या रिटेल स्टोर व मोबाइल शॉपवरून विकत घेता येईल. हे देखील वाचा: 11 5G बँड असलेल्या Samsung Galaxy A54 आणि A34 ची विक्री सुरु; जाणून घ्या किंमत, ऑफर्स आणि फीचर्स

टेक्नो स्पार्क 10 प्रोचे स्पेसिफिकेशन्स

  • 6.78” FHD+ 90Hz Display
  • Memory Fusion Technology
  • 8GB RAM + 128GB Storage
  • Mediatek helio G88
  • 50MP Rear Camera
  • 32MP Selfie Sensor
  • 18W 5,000mAh Battery

TECNO SPARK 10 Pro स्मार्टफोन 1080 x 2460 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.78 इंचाच्या मोठ्या फुलएचडी+ डिस्प्लेसह लाँच झाला आहे. कंपनीनं याला डॉट-इन डिस्प्ले असं नाव दिलं आहे ज्यात स्क्रीनच्या वरच्या बाजूला सेल्फी कॅमेरा असलेला होल आहे. हा टेक्नो फोन 90हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो तसेच यात 270हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेट, 580निट्स ब्राइटनेस व ग्लास बॅक डिजाईन देखील मिळते.

टेक्नो स्पार्क 10 प्रो स्मार्टफोन अँड्रॉइड 13 आधारित हायओएस 12.6 वर सादर झाला आहे. यात मीडियाटेक हीलियो जी88 ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे जो 2.0गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीडवर चालतो. हा फोन गेम टर्बो ड्युअल इंजिन टेक्नॉलॉजीसह येतो. SPARK 10 Pro मेमरी फ्यूजन टेक्नॉलॉजीसह आला आहे जो इंटरनल 8जीबी रॅमला एक्स्ट्रा 8जीबी रॅमची पावर देऊन 16जीबी रॅमवर परफॉर्म करतो. हे देखील वाचा: Jio युजर्ससाठी वाईट बातमी! कंपनीनं 100 रुपयांनी वाढवली सर्वात स्वस्त पोस्टपेड प्लॅनची किंमत

फोटोग्राफीसाठी TECNO SPARK 10 Pro स्मार्टफोन 32 मेगापिक्सलच्या सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करतो जो ड्युअल फ्लॅशसह येतो तसेच एफ/2.45 अपर्चरवर चालतो. तसेच फोनच्या बॅक पॅनलवर ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे ज्यात एफ/1.6 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आणि सेकंडरी एआय लेन्स आहे. पावर बॅकअपसाठी हा टेक्नो फोन 18वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेल्या 5,000एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here