Jio युजर्ससाठी वाईट बातमी! कंपनीनं 100 रुपयांनी वाढवली सर्वात स्वस्त पोस्टपेड प्लॅनची किंमत

Highlights

  • जियोच्या 199 रुपयांच्या प्लॅनची किंमत वाढवण्यात आली आहे.
  • आता जियोच्या सर्वात स्वस्त पोस्टपेड प्लॅनची किंमत 299 रुपये झाली आहे.
  • 299 रुपये प्लॅनमध्ये 30जीबी एकूण डेटा मिळतो.

रिलायन्स जियोनं अलीकडेच आपल्या पोस्टपेड ग्राहकांसाठी नवीन प्लॅन्स सादर केले होते. तसेच, आता आकाश मुकेश अंबानी यांच्या Jio कंपनीनं ग्राहकांना धक्का देत आपल्या सर्वात स्वस्त पोस्टपेड प्लॅनच्या किंमतीत वाढ केली आहे. कंपनीनं एंट्री लेव्हल 199 रुपयांच्या पोस्टपेड प्लॅनची किंमत वाढवून 299 रुपये केली आहे. ग्राहकांना जास्त किंमतीसह जास्त डेटा देखील मिळणार आहे. पुढे तुम्हाला या प्लॅनमध्ये मिळणाऱ्या सर्व बेनिफिट्सची माहिती दिली आहे.

299 रुपये झाली 199 रुपयांच्या प्लॅनची किंमत

Jio नं गुपचूप आपल्या एंट्री-लेव्हल पोस्टपेड प्लॅनची किंमत 199 रुपयांवरून वाढवून 299 रुपये केली आहे. कंपनीच्या वेबसाइटवर देखील प्लॅन नव्या वाढलेल्या किंमतीसह लिस्ट करण्यात आला आहे. 299 रुपयांचा प्लॅन बद्दल बोलायचं झालं तर यात आता एकूण 30जीबी डेटा मिळतो. तसेच, डेटा संपल्यावर ग्राहकांना रोज 1जीबी वापरण्यासाठी 10 रुपये द्यावे लागतील. तसेच आधी प्लॅनमध्ये 25जीबी डेटा मिळत होता. हे देखील वाचा: 108MP Camera आणि 6,000mAh battery सह Samsung नं सादर केला Galaxy M54 5G

प्लॅनमध्ये युजर्सना अनलिमिटेड टॉक टाइम आणि डेली 100 एसएमएस ऑफर केले जात आहेत. तसेच JioTV, JioCinema, JioSecurity, आणि JioCloud सहित अ‍ॅप्सच्या Jio Suite साठी एक कॉम्प्लिमेंट्री सब्सक्रिप्शन देखील आहे. हा एक खाजगी प्लॅन आहे, ज्याचा अर्थ असा की अ‍ॅड-ऑन कनेक्शन यात मिळत नाही. इतकेच नव्हे तर या प्लॅनमध्ये अनलिमिटेड 5G डेटा मिळतो. हे देखील वाचा: 11 5G बँड असलेल्या Samsung Galaxy A54 आणि A34 ची विक्री सुरु; जाणून घ्या किंमत, ऑफर्स आणि फीचर्स

रिलायन्स जियोनं अलीकडेच एका महिन्याच्या फ्री ट्रायलसह आपला नवीन फॅमिली प्लॅन – जियो प्लस लाँच केला होता. जियो प्लस प्लॅनमध्ये पहिल्या कनेक्शनसाठी ग्राहकांना 399 रुपये द्यावे लागतात. इतकेच नव्हे तर प्लॅनमध्ये 3 अतिरिक्त कनेक्शन जोडता येतात. प्रत्येक अतिरिक्त कनेक्शनसाठी 99 रुपयांची किंमत युजर्सना द्यावी लागेल. जियो प्लसमध्ये 4 कनेक्शनसाठी 696 रुपये (399+99+99+99) दरमहा द्यावे लागतील. प्लॅनसह 75जीबी डेटा मिळेल. 4 कनेक्शन असलेल्या फॅमिली प्लॅनमध्ये एक सिमवर दरमहा जवळपास 174 रुपये खर्च येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here