TECNO Spark 7P - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 21 Apr 2021 14:13:21 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 5,000एमएएच बॅटरी आणि 6.8 इंचाचा मोठ्या डिस्प्लेसह लाॅन्च झाला हा स्वस्त स्मार्टफोन https://www.91mobiles.com/marathi/tecno-spark-7p-official-full-specs-revealed/ https://www.91mobiles.com/marathi/tecno-spark-7p-official-full-specs-revealed/#respond Wed, 21 Apr 2021 14:13:21 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10674 TECNO Spark 7P कंपनीने अँड्रॉइड 11 वर सादर केला गेला आहे जो हाईओएस 7.5 सह चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये आक्टाकोर प्रोसेसरसह 12नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला मीडियाटेकचा हीलियो जी70 चिपसेट देण्यात आला आहे.

The post 5,000एमएएच बॅटरी आणि 6.8 इंचाचा मोठ्या डिस्प्लेसह लाॅन्च झाला हा स्वस्त स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
टेक ब्रँड टेक्नोने काही दिवसांपूर्वीच भारतात आपल्या ‘स्पार्क सीरीज’ चा नवीन मोबाईल TECNO Spark 7 लाॅन्च केला होता जो 7,499 रुपयांच्या बेस किंमतीत विक्रीसाठी उपलब्ध आहे. तसेच आता या सीरीजमध्ये अजून एक नवीन स्मार्टफोन जोडत टेक्नोने TECNO Spark 7P पण ऑफिशियल केला आहे. स्पार्क 7पी कंपनीच्या ग्लोबल वेबसाइटवर लिस्ट झाला आहे जो येत्या काही दिवसांत भारतासहित जगातील वेगवेगळ्या बाजारांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल. फोनचे स्पेसिफिकेशन्स पाहता TECNO Spark 7P कंपनीद्वारे लो बजेट सेग्मेंटमध्ये लाॅन्च केला जाईल. (Tecno Spark 7P official full specs revealed)

TECNO Spark 7P

फोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता टेक्नो स्पार्क 7पी 20.5:9 आस्पेक्ट रेशियोवर सादर केला गेला आहे जो 1640 X 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.8 इंचाच्या एचडी+ डाॅटनाॅच डिस्प्लेला सपोर्ट करतो. या फोनची स्क्रीन 90हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करतो. TECNO Spark 7P चे डायमेंशन 171.9×77.9×9.15एमएम आहे तसेच हा मोबाईल फोन Alps Blue, Spruce Green, Magnet Black आणि Summer Mojito कलर वेरिएंटमध्ये सादर केला गेला आहे.

Tecno Spark 7P

TECNO Spark 7P कंपनीने अँड्रॉइड 11 वर सादर केला गेला आहे जो हाईओएस 7.5 सह चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये आक्टाकोर प्रोसेसरसह 12नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला मीडियाटेकचा हीलियो जी70 चिपसेट देण्यात आला आहे. ग्राफिक्ससाठी हा फोन माली जी52 जीपीयूला सपोर्ट करतो. ग्लोबल वेबसाइटवर हा फोन 4 जीबी रॅमसह लिस्ट झाला आहे तसेच 64जीबी आणि 128जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे.

हे देखील वाचा : सुपर परफॉर्मन्स असलेला फोन Oppo K9 पुढल्या महिन्यात Enco Air आणि Oppo Band सह होईल लॉन्च

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता टेक्नो स्पार्क 7पी ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो जो आर्टिफिशियल इंटेलिजेंस टेक्नॉलॉजीसह येतो. या कॅमेरा सेटअपमध्ये प्राइमरी सेंसर 16 मेगापिक्सलचा देण्यात आला आहे. रियर सेटअपचे इतर दोन सेंसर्सची माहिती समोर आली नाही. तसेच फ्रंट पॅनल पाहता इथे सेल्फी आणि व्हिडीओ काॅलिंगसाठी 8 मेगापिक्सलचा कॅमेरा सेंसर आहे जो डुअल एलईडी फ्लॅशला सपोर्ट करतो.

TECNO Spark 7P एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीईला सपोर्ट करतो. 3.5एमएम जॅक व इतर बेसिक कनेक्टिविटी फीचर्ससह सिक्योरिटीसाठी जिथे फोनच्या बॅक पॅनलवर रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा मोबाईल फोन फेस अनलाॅक फीचरला पण सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये 5,000एमएएचची मोठी बॅटरी देण्यात आली आहे जो फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करते.

The post 5,000एमएएच बॅटरी आणि 6.8 इंचाचा मोठ्या डिस्प्लेसह लाॅन्च झाला हा स्वस्त स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/tecno-spark-7p-official-full-specs-revealed/feed/ 0
Tecno Camon 17 ची झाली एंट्री, 6GB रॅम आणि Helio G85 चिपसेटसह आहे 48MP ट्रिपल कॅमेरा https://www.91mobiles.com/marathi/tecno-camon-17-launch-in-kenya-with-48mp-camera-specs-features-price/ https://www.91mobiles.com/marathi/tecno-camon-17-launch-in-kenya-with-48mp-camera-specs-features-price/#respond Wed, 21 Apr 2021 13:41:35 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10668 Tecno Camon 17 कंपनीने पंच-होल डिस्प्ले डिजाईनवर सादर केला आहे. फोन स्क्रीनच्या तीन कडा बेजल लेस आहेत तसेच खालच्या बाजूला बारीक चिन पार्ट देण्यात आला आहे.

The post Tecno Camon 17 ची झाली एंट्री, 6GB रॅम आणि Helio G85 चिपसेटसह आहे 48MP ट्रिपल कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
TECNO संबंधित नुकतीच बातमी आली होती कि कंपनीने आपल्या ग्लोबल वेबसाइटच्या माध्यमातून नवीन स्मार्टफोन Tecno Spark 7P ऑफिशियल केला आहे. तर आता ब्रँडसंबंधित अजून एक नवीन माहिती समोर येत आहे कि कंपनीने आपल्या ‘कॅमोन’ सीरीजचा पण गुपचुप विस्तार करत नवीन मोबाईल फोन Tecno Camon 17 पण लाॅन्च केला आहे. हा स्मार्टफोन कंपनीने सध्या केन्यामध्ये सादर केला आहे जो येत्या काही दिवसांत इतर बाजारांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होऊ शकतो. (Tecno Camon 17 launch in Kenya with 48mp camera specs features price)

लुक व डिजाईन

Tecno Camon 17 कंपनीने पंच-होल डिस्प्ले डिजाईनवर सादर केला आहे. फोन स्क्रीनच्या तीन कडा बेजल लेस आहेत तसेच खालच्या बाजूला बारीक चिन पार्ट देण्यात आला आहे. डिस्प्लेच्या वर मध्यभागी सेल्फी कॅमेरा असलेला होल आहे. फोनच्या बॅक पॅनलवर वर्टिकल शेपमध्ये रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या सेटअपमध्ये तीन कॅमेरा सेंसर एकाच रांगेत आहेत ज्यांच्या बाजूला फ्लॅश लाईट देण्यात आली आहे.

Tecno Camon 17

टेक्नो कॅमोन 17 च्या बॅक पॅनलवर खालच्या बाजूला मोठ्या आकारात TECNO ची ब्रँडिग करण्यात आली आहे. रियर पॅनलवर ओवल शेप फिंगरप्रिंट सेंसर आहे. फोनच्या उजव्या पॅनलवर वाॅल्यूम राॅकर आणि पावर बटण देण्यात आला आहे तसेच डाव्या पॅनलवर सिम स्लाॅट आहे. तसेच फोनच्या लोवर पॅनलवर स्पीकर ग्रिल आणि यूएसबी पोर्टसह 3.5mm जॅक पण आहे. हा फोन दोनपेक्षा जास्त कलर वेरिएंट्समध्ये आला आहे ज्यांची माहिती अजूनतरी समोर आली नाही.

फीचर्स व स्पेसिफिकेशन्स

Tecno Camon 17 कंपनीने 1600 X 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.55 इंचाच्या आयपीएस एलसीडी डिस्प्लेवर लाॅन्च केला आहे. या फोनची स्क्रीन 16एम कलरला सपोर्ट करते तसेच कॅमोन 17 चा स्क्रीन-टू-बाॅडी रेशियो 83.2 टक्के आहे. टेक्नोने आपला फोन अँड्रॉइड 11 वर सादर केला आहे जो हाईओएस 7 सह आक्टाकोर प्रोसेसर तसेच मीडियाटेक हीलियो जी85 चिपसेटवर चालतो. हा फोन 6 जीबी रॅमसह बाजारात आला आहे जो 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो.

Tecno Camon 17

फोटोग्राफीसाठी फोनच्या बॅक पॅनलवर ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे ज्यात एलईडी फ्लॅशसह 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर, 16 मेगापिक्सलची सेकंडरी लेंस तसेच 2 मेगापिक्सलचा थर्ड सेंसर आहे. सेल्फी आणि व्हिडीओ काॅलिंगसाठी हा फोन 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. सिक्योरिटीसाठी फोनच्या बॅक पॅनलवर रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तर पावर बॅकअपसाठी हा फोन 5,000एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो. केन्यामध्ये Tecno Camon 17 ची किंमत KES 22,800 म्हणजे 15,000 रुपयांच्या आसपास आहे.

The post Tecno Camon 17 ची झाली एंट्री, 6GB रॅम आणि Helio G85 चिपसेटसह आहे 48MP ट्रिपल कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/tecno-camon-17-launch-in-kenya-with-48mp-camera-specs-features-price/feed/ 0