सुपर परफॉर्मन्स असलेला फोन Oppo K9 पुढल्या महिन्यात Enco Air आणि Oppo Band सह होईल लॉन्च

OPPO लवकरच आपल्या K-सीरीजचा नवीन स्मार्टफोन Oppo K9 लॉन्च करण्याची तयारी करत आहे. ओप्पोचा हा 5G स्मार्टफोन सर्वप्रथम चीनमध्ये लॉन्च केला जाईल. ओप्पोने सोशल मीडिया साइट वीबोवर एक पोस्ट शेयर करून Oppo K9 5G स्मार्टफोनचा लॉन्च टीज केला आहे. Oppo K9 स्मार्टफोन कंपनी पुढल्या महिन्यात 6 मेला लॉन्च करेल. या स्मार्टफोनसह कंपनी ईयरबड्स OPPO Enco Air आणि फिटनेस ट्रॅकर OPPO Band पण लॉन्च करेल. Oppo K9 स्मार्टफोन टीज करत कंपनीने सांगितले कि हा स्मार्टफोन 64 मेगापिक्सल ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आणि 65W फ्लॅश चार्जसह सादर केला जाईल.

स्मार्टफोनमध्ये मिळेल सुपर परफॉर्मन्स

आगामी Oppo K9 स्मार्टफोनच्या बॅक पॅनलवर “09-K Super Performance” लिहिण्यात आले आहे. ओप्पोच्या या स्मार्टफोनमध्ये कोणता सा चिपसेट दिला जाईल याची माहिती अजूनतरी समोर आली नाही. MyFixGuide ने अंदाज लावला आहे कि ओप्पोचा अपकमिंग Oppo K9 स्मार्टफोन ‘सब-फ्लॅगशिप’ लेवल चिपसेटसह सादर केला जाऊ शकतो. अंदाज लावला जात आहे कि ओप्पोचा हा स्मार्टफोन क्वालकॉम Snapdragon 870 चिपसेट किंवा Dimensity 1100 चिपसेटसह सादर केला जाऊ शकतो.

हे देखील वाचा : Tecno Camon 17 ची झाली एंट्री, 6GB रॅम आणि Helio G85 चिपसेटसह आहे 48MP ट्रिपल कॅमेरा

Oppo K9

मिळेल 64MP ट्रिपल रियर कॅमेरा

हा स्मार्टफोन टीज करताना ओप्पोने Weibo पोस्टमध्ये लिहिले आहे अपकमिंग स्मार्टफोन फक्त पाच मिनिटे चार्ज केल्यावर दोन तासांचा बॅकअप ऑफर करतो. हा स्मार्टफोन 64 मेगापिक्सल ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह सादर केला जाईल. हा पोस्ट चायनीजमध्ये शेयर केला गेला आहे. यापूर्वी ओप्पोने एक प्रेस रिलीज शेयर करून अपकमिंग प्रोडक्ट लॉन्चची माहिती शेयर केली होती. ओप्पोने सांगितले होते कि ते Oppo K9 स्मार्टफोनसह ईयरबड्स Oppo Enco Buds आणि नवीन फिटनेस ट्रॅकर OPPO Band पण लॉन्च करतील.

हे देखील वाचा : स्वस्त कर्ज घेणे पडेल महागात, खोट्या कॉलपासून सावधान, मिनिटांत रिकामे होऊ शकते बॅंक अकाउंट

OPPO Enco Air आणि OPPO Band

आगामी OPPO Enco Air बाबत बोलले जात आहे कि हे ईयरबड्स Bluetooth 5.2 कनेक्टिविटीसह सादर केले जाऊ शकतात. हे लेटेस्ट ईयरबड्स दोन कलर ऑप्शन – ब्लॅक आणि व्हाइटमध्ये सादर केले जातील. पण याबाबत कंपनीने कोणतीही ऑफिशियल माहिती सध्या शेयर केली नाही. तसेच कंपनीचा अपकमिंग फिटनेस ट्रॅकर OPPO Band बद्दल पण जास्त माहिती समोर आली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here