Tecno Camon 17 ची झाली एंट्री, 6GB रॅम आणि Helio G85 चिपसेटसह आहे 48MP ट्रिपल कॅमेरा

Tecno Camon 17

TECNO संबंधित नुकतीच बातमी आली होती कि कंपनीने आपल्या ग्लोबल वेबसाइटच्या माध्यमातून नवीन स्मार्टफोन Tecno Spark 7P ऑफिशियल केला आहे. तर आता ब्रँडसंबंधित अजून एक नवीन माहिती समोर येत आहे कि कंपनीने आपल्या ‘कॅमोन’ सीरीजचा पण गुपचुप विस्तार करत नवीन मोबाईल फोन Tecno Camon 17 पण लाॅन्च केला आहे. हा स्मार्टफोन कंपनीने सध्या केन्यामध्ये सादर केला आहे जो येत्या काही दिवसांत इतर बाजारांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होऊ शकतो. (Tecno Camon 17 launch in Kenya with 48mp camera specs features price)

लुक व डिजाईन

Tecno Camon 17 कंपनीने पंच-होल डिस्प्ले डिजाईनवर सादर केला आहे. फोन स्क्रीनच्या तीन कडा बेजल लेस आहेत तसेच खालच्या बाजूला बारीक चिन पार्ट देण्यात आला आहे. डिस्प्लेच्या वर मध्यभागी सेल्फी कॅमेरा असलेला होल आहे. फोनच्या बॅक पॅनलवर वर्टिकल शेपमध्ये रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या सेटअपमध्ये तीन कॅमेरा सेंसर एकाच रांगेत आहेत ज्यांच्या बाजूला फ्लॅश लाईट देण्यात आली आहे.

Tecno Camon 17

टेक्नो कॅमोन 17 च्या बॅक पॅनलवर खालच्या बाजूला मोठ्या आकारात TECNO ची ब्रँडिग करण्यात आली आहे. रियर पॅनलवर ओवल शेप फिंगरप्रिंट सेंसर आहे. फोनच्या उजव्या पॅनलवर वाॅल्यूम राॅकर आणि पावर बटण देण्यात आला आहे तसेच डाव्या पॅनलवर सिम स्लाॅट आहे. तसेच फोनच्या लोवर पॅनलवर स्पीकर ग्रिल आणि यूएसबी पोर्टसह 3.5mm जॅक पण आहे. हा फोन दोनपेक्षा जास्त कलर वेरिएंट्समध्ये आला आहे ज्यांची माहिती अजूनतरी समोर आली नाही.

फीचर्स व स्पेसिफिकेशन्स

Tecno Camon 17 कंपनीने 1600 X 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.55 इंचाच्या आयपीएस एलसीडी डिस्प्लेवर लाॅन्च केला आहे. या फोनची स्क्रीन 16एम कलरला सपोर्ट करते तसेच कॅमोन 17 चा स्क्रीन-टू-बाॅडी रेशियो 83.2 टक्के आहे. टेक्नोने आपला फोन अँड्रॉइड 11 वर सादर केला आहे जो हाईओएस 7 सह आक्टाकोर प्रोसेसर तसेच मीडियाटेक हीलियो जी85 चिपसेटवर चालतो. हा फोन 6 जीबी रॅमसह बाजारात आला आहे जो 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो.

Tecno Camon 17

फोटोग्राफीसाठी फोनच्या बॅक पॅनलवर ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे ज्यात एलईडी फ्लॅशसह 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर, 16 मेगापिक्सलची सेकंडरी लेंस तसेच 2 मेगापिक्सलचा थर्ड सेंसर आहे. सेल्फी आणि व्हिडीओ काॅलिंगसाठी हा फोन 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. सिक्योरिटीसाठी फोनच्या बॅक पॅनलवर रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तर पावर बॅकअपसाठी हा फोन 5,000एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो. केन्यामध्ये Tecno Camon 17 ची किंमत KES 22,800 म्हणजे 15,000 रुपयांच्या आसपास आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here