5,000एमएएच बॅटरी आणि 6.8 इंचाचा मोठ्या डिस्प्लेसह लाॅन्च झाला हा स्वस्त स्मार्टफोन

Tecno Spark 7P

टेक ब्रँड टेक्नोने काही दिवसांपूर्वीच भारतात आपल्या ‘स्पार्क सीरीज’ चा नवीन मोबाईल TECNO Spark 7 लाॅन्च केला होता जो 7,499 रुपयांच्या बेस किंमतीत विक्रीसाठी उपलब्ध आहे. तसेच आता या सीरीजमध्ये अजून एक नवीन स्मार्टफोन जोडत टेक्नोने TECNO Spark 7P पण ऑफिशियल केला आहे. स्पार्क 7पी कंपनीच्या ग्लोबल वेबसाइटवर लिस्ट झाला आहे जो येत्या काही दिवसांत भारतासहित जगातील वेगवेगळ्या बाजारांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल. फोनचे स्पेसिफिकेशन्स पाहता TECNO Spark 7P कंपनीद्वारे लो बजेट सेग्मेंटमध्ये लाॅन्च केला जाईल. (Tecno Spark 7P official full specs revealed)

TECNO Spark 7P

फोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता टेक्नो स्पार्क 7पी 20.5:9 आस्पेक्ट रेशियोवर सादर केला गेला आहे जो 1640 X 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.8 इंचाच्या एचडी+ डाॅटनाॅच डिस्प्लेला सपोर्ट करतो. या फोनची स्क्रीन 90हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करतो. TECNO Spark 7P चे डायमेंशन 171.9×77.9×9.15एमएम आहे तसेच हा मोबाईल फोन Alps Blue, Spruce Green, Magnet Black आणि Summer Mojito कलर वेरिएंटमध्ये सादर केला गेला आहे.

Tecno Spark 7P

TECNO Spark 7P कंपनीने अँड्रॉइड 11 वर सादर केला गेला आहे जो हाईओएस 7.5 सह चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये आक्टाकोर प्रोसेसरसह 12नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला मीडियाटेकचा हीलियो जी70 चिपसेट देण्यात आला आहे. ग्राफिक्ससाठी हा फोन माली जी52 जीपीयूला सपोर्ट करतो. ग्लोबल वेबसाइटवर हा फोन 4 जीबी रॅमसह लिस्ट झाला आहे तसेच 64जीबी आणि 128जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे.

हे देखील वाचा : सुपर परफॉर्मन्स असलेला फोन Oppo K9 पुढल्या महिन्यात Enco Air आणि Oppo Band सह होईल लॉन्च

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता टेक्नो स्पार्क 7पी ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो जो आर्टिफिशियल इंटेलिजेंस टेक्नॉलॉजीसह येतो. या कॅमेरा सेटअपमध्ये प्राइमरी सेंसर 16 मेगापिक्सलचा देण्यात आला आहे. रियर सेटअपचे इतर दोन सेंसर्सची माहिती समोर आली नाही. तसेच फ्रंट पॅनल पाहता इथे सेल्फी आणि व्हिडीओ काॅलिंगसाठी 8 मेगापिक्सलचा कॅमेरा सेंसर आहे जो डुअल एलईडी फ्लॅशला सपोर्ट करतो.

TECNO Spark 7P एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीईला सपोर्ट करतो. 3.5एमएम जॅक व इतर बेसिक कनेक्टिविटी फीचर्ससह सिक्योरिटीसाठी जिथे फोनच्या बॅक पॅनलवर रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा मोबाईल फोन फेस अनलाॅक फीचरला पण सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये 5,000एमएएचची मोठी बॅटरी देण्यात आली आहे जो फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here