Tecno Spark Go 2023 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 09 Mar 2023 12:51:04 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Tecno Spark Go 2023 भारतात लाँच, फोनमध्ये 3GB RAM https://www.91mobiles.com/marathi/6999-price-mobile-phone-tecno-spark-go-2023-launched-in-india-features-and-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/6999-price-mobile-phone-tecno-spark-go-2023-launched-in-india-features-and-specifications/#respond Mon, 23 Jan 2023 12:37:12 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=17156 टेक ब्रँड टेक्नोनं आज भारतीय बाजारात आपला आणखी एक स्वस्त स्मार्टफोन सादर केला आहे. कंपनीनं Tecno Spark Go 2023 भारतात लाँच केला आहे. हा मोबाइल फोन 13MP Camera, 3GB RAM, MediaTek Helio A22 प्रोसेसर आणि 5,000mAh Battery सारख्या स्पेसिफिकेशन्सना सपोर्ट करतो, जो फक्त 6 हजारांच्या बजेटमध्ये विकत घेता येईल. स्पार्क गो 2023 च्या प्राइस आणि […]

The post Tecno Spark Go 2023 भारतात लाँच, फोनमध्ये 3GB RAM first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Tecno Spark Go 2023 फोन 6,999 रुपयांमध्ये लाँच झाला आहे.
  • हा मोबाइल फोन 3GB Additional Fusion RAM सह येतो.
  • टेक्नो स्पार्क गो 2023 मीडियाटेक हीलियो ए22 प्रोसेसर वर चालतो
  • या स्मार्टफोनमध्ये 13MP Dual Rear आणि 5MP Selfie Camera देण्यात आला आहे.

टेक ब्रँड टेक्नोनं आज भारतीय बाजारात आपला आणखी एक स्वस्त स्मार्टफोन सादर केला आहे. कंपनीनं Tecno Spark Go 2023 भारतात लाँच केला आहे. हा मोबाइल फोन 13MP Camera, 3GB RAM, MediaTek Helio A22 प्रोसेसर आणि 5,000mAh Battery सारख्या स्पेसिफिकेशन्सना सपोर्ट करतो, जो फक्त 6 हजारांच्या बजेटमध्ये विकत घेता येईल. स्पार्क गो 2023 च्या प्राइस आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती पुढे देण्यात आली आहे.

Tecno Spark Go 2023 Price

हा स्मार्टफोन भारतात सध्या सिंगल मेमरी व्हेरिएंटमध्ये लाँच झाला आहे. यात 3जीबी रॅमसह 32जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. टेक्नो स्पार्क गो 2023 ची किंमत 6,999 रुपये आहे. हा मोबाइल फोन Endless Black, Uyuni Blue आणि Nebula Purple कलरमध्ये विकत घेता येईल. हे देखील वाचा: सर्वात शक्तिशाली सॅमसंग फोनची किंमत लीक; लाँच पूर्वीच रिटेल बॉक्सही आला समोर

Tecno Spark Go 2023 Specifications

  • 6.56″ HD+ Display
  • 3GB + 3GB = 6GB RAM
  • MediaTek Helio A22
  • 13MP Dual Rear Camera
  • 10W 5,000mAh Battery

टेक्नो स्पार्क गो 2023 के फीचर्स व स्पेसिफिकेशस पाहता हा मोबाइल फोन 1612 x 720 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.56 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेसह लाँच झाला आहे. फोनची स्क्रीन आयपीएस पॅनलवर बनली आहे जी 480निट्स ब्राइटनेस व 120हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करते. या फोनचा अ‍ॅस्पेक्ट रेशियो 20:9 आहे तर डायमेंशन 163.86×75.51×8.9एमएम आहे.

Tecno Spark Go 2023 अँड्रॉइड 12 आधारित हायओएस 12.0 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 2.0गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेला मीडियाटेक हीलियो ए22 प्रोसेसर देण्यात आला आहे. हा टेक्नो फोन मेमरी फ्यूजन टेक्नॉलॉजीसह येतो त्यामुळे फोनमधील 3जीबी रॅममध्ये एक्स्ट्रा 3जीबी रॅम वाढवता येतो. फोनमध्ये 32जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे जी 256जीबी पर्यंत वाढवता येते.

फोटोग्राफीसाठी टेक्नो स्पार्क गो 2023 ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर ड्युअल फ्लॅशसह एफ/1.85 अपर्चर असलेला 13 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो सेकंडरी एआय सेन्सरसह चालतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा स्मार्टफोन एफ/2.0 अपर्चर असलेल्या 5 मेगापिक्सलचा एआय फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: How To Download Youtube Shorts : पाहा युट्युब शॉर्ट्स व्हिडीओ डाउनलोड करण्याच्या सर्वात सोप्या ट्रिक्स

Tecno Spark Go 2023 मध्ये सिक्योरिटीसाठी फोनच्या बॅक पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. तर पावर बॅकअपसाठी हा फोन 10वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेल्या 5,000एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो. हा टेक्नो फोन आयपीएक्स2 रेटिंगसह आला आहे ज्यामुळे हा पाण्याच्या शिंतोड्यांपासून सहज वाचू शकतो.

The post Tecno Spark Go 2023 भारतात लाँच, फोनमध्ये 3GB RAM first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/6999-price-mobile-phone-tecno-spark-go-2023-launched-in-india-features-and-specifications/feed/ 0
Tecno Spark Go 2023 झाला कंपनीच्या वेबसाइटवर लिस्ट; लवकरच येऊ शकतो बाजारात https://www.91mobiles.com/marathi/4gb-ram-smartphone-tecno-spark-go-2023-specifications-revealed-launch-in-india-soon/ https://www.91mobiles.com/marathi/4gb-ram-smartphone-tecno-spark-go-2023-specifications-revealed-launch-in-india-soon/#respond Fri, 20 Jan 2023 03:30:04 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=17063 टेक्नोनं काही दिवसांपूर्वी फ्लॅगशिप स्मार्टफोन Phantom X2 5G आणि Phantom X2 Pro 5G भारतात लाँच करण्यात आला आहे. तसेच आता स्वस्त स्मार्टफोन्स बनवण्यासाठी लोकप्रिय असलेल्या या ब्रँडनं एक नवीन लो बजेट डिवायस आणला आहे. कंपनी लवकरच भारतात Tecno Spark Go 2023 लाँच करू शकते. या एंट्री लेव्हल मोबाइल फोनचं प्रोडक्ट पेज कंपनीच्या ऑफिशियल वेबसाइटवर लाइव्ह […]

The post Tecno Spark Go 2023 झाला कंपनीच्या वेबसाइटवर लिस्ट; लवकरच येऊ शकतो बाजारात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Tecno Spark Go 2023 लो बजेट स्मार्टफोन लवकरच भारतात येऊ शकतो.
  • Memory Fusion टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून हा फोन 7GB RAM सह येऊ शकतो.
  • टेक्नो स्पार्क गो 2023 आयपीएक्स2 रेटेड आहे ज्यामुळे हा स्प्लॅश प्रूफ ठरू शकतो.

टेक्नोनं काही दिवसांपूर्वी फ्लॅगशिप स्मार्टफोन Phantom X2 5G आणि Phantom X2 Pro 5G भारतात लाँच करण्यात आला आहे. तसेच आता स्वस्त स्मार्टफोन्स बनवण्यासाठी लोकप्रिय असलेल्या या ब्रँडनं एक नवीन लो बजेट डिवायस आणला आहे. कंपनी लवकरच भारतात Tecno Spark Go 2023 लाँच करू शकते. या एंट्री लेव्हल मोबाइल फोनचं प्रोडक्ट पेज कंपनीच्या ऑफिशियल वेबसाइटवर लाइव्ह करण्यात आलं आहे जिथे स्पार्क गो 2023 च्या फीचर्स व स्पेसिफिकेशन्सचा खुलासा झाला आहे.

Tecno Spark Go 2023 रॅम व स्टोरेज व्हेरिएंट्स

टेक्नो स्पार्क गो 2023 स्मार्टफोन भारतीय बाजारात तीन मेमरी व्हेरिएंट्समध्ये लाँच होईल. कंपनीच्या वेबसाइटनुसार या व्हेरिएंट्समध्ये 3GB RAM + 32GB Storage, 3GB RAM + 64GB Storage आणि 4GB RAM + 64GB Storage चा समावेश असेल. या सर्व मॉडेल्सची इंटरनल स्टोरेज मायक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून वाढवता येईल. हा फोन Endless Black, Nebula Purple आणि Uyuni Blue कलरमध्ये सेलसाठी उपलब्ध होईल.

Tecno Spark Go 2023 फीचर्स व स्पेसिफिकेशन्स

  • 6.56″ HD+ Display
  • 4GB+3GB = 7GB RAM
  • MediaTek Helio A22
  • 13MP Dual Rear Camera
  • 10W 5,000mAh Battery

टेक्नो स्पार्क गो 2023 स्मार्टफोन 6.56 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करू शकतो ज्याला कंपनीनं डॉट नॉच स्क्रीन असं नाव दिलं आहे. हा डिस्प्ले 120हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. फोनचा स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 90 टक्के आहे ज्यात डिस्प्लेच्या तीन कडा बेजल लेस आहेत आणि खालच्या बाजूला बारीक चिन पार्ट आहे. या फोनचे डायमेंशन 163.86×75.51×8.9एमएम आहेत.

Tecno Spark Go 2023 अँड्रॉइड 12 आधारित हायओएस 12.0 सह येईल. तसेच प्रोसेसिंगसाठी हा स्मार्टफोन मीडियाटेक हीलियो ए22 चिपसेटसह बाजारात येईल. हा टेक्नो फोन मेमरी फ्यूजन टेक्नॉलॉजीनं सुसज्ज असेल त्यामुळे फोनमधील 4जीबी रॅम वाढवून 7जीबी करता येईल. हा फोन आयपीएक्स2 रेटेड आहे ज्यामुळे हा स्प्लॅशप्रूफ बनतो.

फोटोग्राफीसाठी टेक्नो स्पार्क गो 2023 ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. ज्याच्या बॅक पॅनलवर एफ/1.85 अपर्चर असलेला 13 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आहे. हा कॅमेरा एआय टेक्नॉलॉजीवर चालेल. सिक्योरिटीसाठी फोनच्या बॅक पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर दिला जाईल. पावर बॅकअपसाठी हा फोन 10वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेल्या 5,000एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करेल.

The post Tecno Spark Go 2023 झाला कंपनीच्या वेबसाइटवर लिस्ट; लवकरच येऊ शकतो बाजारात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/4gb-ram-smartphone-tecno-spark-go-2023-specifications-revealed-launch-in-india-soon/feed/ 0