How To Download Youtube Shorts : पाहा युट्युब शॉर्ट्स व्हिडीओ डाउनलोड करण्याच्या सर्वात सोप्या ट्रिक्स

How To Youtube Shorts Videos: YouTube नं साल 2021 मध्ये टिकटॉक आणि इंस्टाग्राम रिल्सला टक्कर देण्यासाठी Youtube Shorts हे फीचर सादर केलं होतं. विविध देशांमधून टिकटॉकवर बंदी आल्यानंतर युट्युब शॉर्ट्सची लोकप्रियता वाढली. अनेक युट्युबर्सनी शॉर्ट व्हिडीओ पोस्ट करण्यासाठी खास चॅनल्स सुरु केले आहेत कारण YouTube Shorts मुळे युट्युबवर जास्त व्यूज मिळत आहेत. यात टेक, कॉमेडी, नॉलेज, डांस आणि अ‍ॅक्टिंग सारख्या वेगवेगळ्या पद्धतीच्या शॉर्ट व्हिडीओजा समावेश आहे. जर तुम्ही देखील युट्युबवर शॉर्ट व्हिडीओचे चाहते असाल आणि हे व्हिडीओ डाउनलोड करू इच्छित असाल तर आज आम्ही तुम्हाला काही टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहोत, ज्यांच्या मदतीनं तुम्ही हे शॉर्ट व्हिडीओ डाउनलोड करू शकाल.

Youtube Shorts Videos या वेबसाइटवरून करा डाउनलोड

जर तुम्ही तुमच्या फोन किंवा लॅपटॉपच्या ब्राउजरवरून Youtube Shorts Videos डाउनलोड करू इच्छित असाल तर तुम्ही Shortsnoob, 8Downloader आणि Savetube सारख्या वेबसाईटसवरून हे व्हिडीओ डाउनलोड करू शकता. या वेबसाइटवरून व्हिडीओ .mp4 फॉरमॅटमध्ये सेव्ह होतात. इथे आम्ही तुम्हाला स्टेप बाई स्टेप माहिती देत आहोत.

  • सर्वप्रथम YouTube Shorts ओपन करा आणि शेयर बटनवर क्लिक करून व्हिडीओ लिंक कॉपी करा.
  • वर दिलेली कोणतीही एक वेबसाइट ओपन करा. इथे आम्ही आम्ही शॉर्ट्सनूब वापरत आहोत. https://shortsnoob.com/ओपन करा आणि Youtube Shorts ची लिंक पेस्ट करा.
  • त्यानंतर तुम्हाला सर्च बटनवर क्लिक करावे लागेल, त्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या फॉरमॅटमध्ये तो व्हिडीओ दिसू लागेल.
  • फॉर्मेटची निवड करताच डाउनलोडिंग स्टार्ट होईल आणि व्हिडीओ तुमच्या डिवाइसमध्ये सेव्ह होईल.

PC App वरून व्हिडीओ करा डाउनलोड

4K Video Downloader सॉफ्टवेयरच्या मदतीनं तुमच्या पर्सनल कंप्यूटरवर YouTube Shorts video डाउनलोड करू शकता. हे सॉफ्टवेयर Windows, macOS, आणि Linux प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. इथे आम्ही तुम्हाला याची माहिती देत आहोत.

  • सर्वप्रथम तुम्हाला YouTube Shorts ओपन करावं लागेल आणि याची लिंक कॉपी करून घ्या.
  • आता तुम्हाला कंप्यूटरवर 4K Video Downloader सॉफ्टवेयर ओपन करा आणि लिंक पेस्ट करा.
  • आता तुम्हाला ज्या फॉर्मेटमध्ये व्हिडीओ हवा आहे तो सिलेक्ट करा.
  • डाउनलोड बटनवर क्लिक करून थेट व्हिडीओ डाउनलोड करू शकता.

नोट: कोणत्याही थर्ड-पार्टी साइट किंवा अ‍ॅप जे तुम्हाला YouTube, Instagram, Twitter आणि Facebook वरील व्हिडीओ डाउनलोड करण्यास मदत करतात ते या प्लॅटफॉर्मच्या पॉलिसीत बसत नाहीत. जर तुम्ही हे व्हिडीओ डाउनलोड केले तर ते फक्त ऑफलाईन बघा. कारण या व्हिडीओचा वापर व्यावसायिक लाभांसाठी केल्यास कंपनी किंवा व्हिडीओचे मालक तुमच्याविरोधात कायदेशीर कारवाई करू शकतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here