सर्वात शक्तिशाली सॅमसंग फोनची संभाव्य किंमत लीक; Galaxy S23 Ultra चा रिटेल बॉक्सही आला समोर

Highlights

  • Samsung Galaxy S23 Ultra चा रिटेल बॉक्स, लाइव्ह इमेज आणि किंमत लीक झाली आहे.
  • फोन फँटम ब्लॅक, बॉटॅनिक ग्रीन कॉटन फ्लॉवर आणि मिस्टी लायलॅक कलरमध्ये उपलब्ध होऊ शकतो.
  • Samsung Galaxy S23 Ultra स्मार्टफोन 1 फेब्रुवारीला बाजारात येऊ शकतो.

Samsung Galaxy S23 सीरिज 1 फेब्रुवारी 2023 ला लाँच केली जाणार आहे. Galaxy S23 च्या ताज्या लिक्समधून स्मार्टफोनचा रिटेल बॉक्स, लाइव्ह इमेजेस आणि Samsung Galaxy S23 Ultra ची किंमत देखील लीक झाली आहे, जो या सीरिजमधील सर्वात मोठा स्मार्टफोन असू शकतो. कॅमेऱ्याच्या कंपनी मोठे बदल करू शकते अशी अपेक्षा आहे. लाइव्ह इमेजेसनुसार हा फोन कर्व डिस्प्लेसह फोन फँटम ब्लॅक, बॉटॅनिक ग्रीन कॉटन फ्लॉवर आणि मिस्टी लायलॅक कलरमध्ये उपलब्ध होऊ शकतो.

Samsung Galaxy S23 Ultra

Samsung Galaxy S23 Ultra स्मार्टफोनच्या लाइव्ह इमेजेसनुसार हा फोन चार रंगात सादर केला जाईल आणि सर्वांना मॅट फिनिशसह बाजारात येऊ शकतो. बॉक्समध्ये चार्जर देण्याचं कंपनी टाळू शकते. फोनमध्ये एस पेनसाठी स्लॉट, स्पीकर ग्रील, टाइप-सी पोर्ट आणि सिम ट्रे बॉटमला दिला जाऊ शकतो. पावर आणि व्हॉल्युम रॉकर बटन्स उजवीकडे असू शकतो. फोनच्या मागे व्हर्टिकली तीन कॅमेरा सेन्सर असू शकतो, ज्यांच्या शेजारी एलईडी फ्लॅश आणि आणखी दोन कटआऊट मिळू शकतात.

Samsung Galaxy S23 Ultra ची संभाव्य किंमत

एका रिटेलरने Galaxy S23 Ultra ची किंमत फेसबुकवर शेअर केली आहे. त्यानुसार हा फ्लॅगशिप स्मार्टफोन 1,400 अमेरिकन डॉलर्स (सुमारे 1,13,400 रुपये) मध्ये उपलब्ध होऊ शकतो. परंतु ही किंमत कोणत्या रॅम व स्टोरेज मॉडेलची असेल हे मात्र त्याने स्पष्ट सांगितलं नाही. विशेष म्हणजे Galaxy S22 Ultra चा बेस मॉडेल यूएसमध्ये 1,199 डॉलर्स (सुमारे 97,100 रुपये) मध्ये लाँच करण्यात आला होता, ज्यात 8GB रॅम व 128GB स्टोरेज होती.

Samsung Galaxy S23 Ultra चे लीक स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy S23 Ultra मध्ये 6.8-इंचाचा QHD+ कर्व्ड अ‍ॅमोलेड डिस्प्ले मिळू शकतो, जो 120Hz रिफ्रेश रेट, 2200 नीट्स ब्राइटनेस, कॉर्निग गोरिल्ला ग्लास विक्ट्स 2 आणि 12MP च्या पंच होल सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करू शकतो. या फोनमध्ये ओव्हरक्लॉक क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 चिपसेट मिळू शकतो. यात 5,000mAh ची बॅटरी 45W फास्ट चार्जिंगसह मिळू शकते.

कनेक्टिव्हिटीसाठी यात 5जी, 4जी एलटीई, वायफाय 6, ब्लूटूथ, जीपीएस आणि यूएसबी टाइप सी पोर्ट मिळू शकतो. हा फोन अँड्रॉइड 13-आधारित वन युआय 5.1 वर चालू शकतो. यातील क्वॉड रियर कॅमेरा सेटअपमध्ये 200MP सॅमसंगचा एचपी2 सेन्सर, 12MP अल्ट्रा वाइड कॅमेरा आणि दोन 10MP टेलीफोटो सेन्सर 3x आणि 10x ऑप्टिकल झूमसह मिळू शकतील. Samsung Galaxy S23 Ultra मध्ये वॉटर आणि डस्ट प्रोटेक्शनसाठी IP68 रेटिंग मिळू शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here