Tecno Spark Go 2023 झाला कंपनीच्या वेबसाइटवर लिस्ट; लवकरच येऊ शकतो बाजारात

Highlights

  • Tecno Spark Go 2023 लो बजेट स्मार्टफोन लवकरच भारतात येऊ शकतो.
  • Memory Fusion टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून हा फोन 7GB RAM सह येऊ शकतो.
  • टेक्नो स्पार्क गो 2023 आयपीएक्स2 रेटेड आहे ज्यामुळे हा स्प्लॅश प्रूफ ठरू शकतो.

टेक्नोनं काही दिवसांपूर्वी फ्लॅगशिप स्मार्टफोन Phantom X2 5G आणि Phantom X2 Pro 5G भारतात लाँच करण्यात आला आहे. तसेच आता स्वस्त स्मार्टफोन्स बनवण्यासाठी लोकप्रिय असलेल्या या ब्रँडनं एक नवीन लो बजेट डिवायस आणला आहे. कंपनी लवकरच भारतात Tecno Spark Go 2023 लाँच करू शकते. या एंट्री लेव्हल मोबाइल फोनचं प्रोडक्ट पेज कंपनीच्या ऑफिशियल वेबसाइटवर लाइव्ह करण्यात आलं आहे जिथे स्पार्क गो 2023 च्या फीचर्स व स्पेसिफिकेशन्सचा खुलासा झाला आहे.

Tecno Spark Go 2023 रॅम व स्टोरेज व्हेरिएंट्स

टेक्नो स्पार्क गो 2023 स्मार्टफोन भारतीय बाजारात तीन मेमरी व्हेरिएंट्समध्ये लाँच होईल. कंपनीच्या वेबसाइटनुसार या व्हेरिएंट्समध्ये 3GB RAM + 32GB Storage, 3GB RAM + 64GB Storage आणि 4GB RAM + 64GB Storage चा समावेश असेल. या सर्व मॉडेल्सची इंटरनल स्टोरेज मायक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून वाढवता येईल. हा फोन Endless Black, Nebula Purple आणि Uyuni Blue कलरमध्ये सेलसाठी उपलब्ध होईल.

Tecno Spark Go 2023 फीचर्स व स्पेसिफिकेशन्स

  • 6.56″ HD+ Display
  • 4GB+3GB = 7GB RAM
  • MediaTek Helio A22
  • 13MP Dual Rear Camera
  • 10W 5,000mAh Battery

टेक्नो स्पार्क गो 2023 स्मार्टफोन 6.56 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करू शकतो ज्याला कंपनीनं डॉट नॉच स्क्रीन असं नाव दिलं आहे. हा डिस्प्ले 120हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. फोनचा स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 90 टक्के आहे ज्यात डिस्प्लेच्या तीन कडा बेजल लेस आहेत आणि खालच्या बाजूला बारीक चिन पार्ट आहे. या फोनचे डायमेंशन 163.86×75.51×8.9एमएम आहेत.

Tecno Spark Go 2023 अँड्रॉइड 12 आधारित हायओएस 12.0 सह येईल. तसेच प्रोसेसिंगसाठी हा स्मार्टफोन मीडियाटेक हीलियो ए22 चिपसेटसह बाजारात येईल. हा टेक्नो फोन मेमरी फ्यूजन टेक्नॉलॉजीनं सुसज्ज असेल त्यामुळे फोनमधील 4जीबी रॅम वाढवून 7जीबी करता येईल. हा फोन आयपीएक्स2 रेटेड आहे ज्यामुळे हा स्प्लॅशप्रूफ बनतो.

फोटोग्राफीसाठी टेक्नो स्पार्क गो 2023 ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. ज्याच्या बॅक पॅनलवर एफ/1.85 अपर्चर असलेला 13 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आहे. हा कॅमेरा एआय टेक्नॉलॉजीवर चालेल. सिक्योरिटीसाठी फोनच्या बॅक पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर दिला जाईल. पावर बॅकअपसाठी हा फोन 10वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेल्या 5,000एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here